मध्यतंरी कोल्हापुरला गेलो होतो. त्यावेळी चिमण्यांचा आकाराचे काहि पोटावर पिवळसर झाक असलेल पक्षी अचानकच दिसले.
सहजच म्हणून घराच्या मागच्या बाजुला गेलो आणि बघतोय तर काय मला दिसली ही एक सुखी समृद्ध कॉलनी.
तिच नाव बहुद्धा "आदर्श कॉलनी"च असेल बॉ. :)
बघा बघा तुम्हीदेखील बघा.
मग जरा ह्या कॉलनीतील रहिवाशी कसे आहेत आणि काय करत आहेत हे बघुया म्हणल तर हे महाशय दिसले.
बहुद्धा मनातच म्हणत असतील, "छे एक घर असताना देखील ह्या आमच्या बयेन दुसर घर बांधायला सांगितलय.
तिला काय जातय नुसतच सांगायला. इकडे मी किती दमतो. चला ती जवळपास दिसत नाहिये तोवर एक डूलकी काढावी."
असच चिंतन चालल असेल नै? :)
"अरे बापरे! आली वाटत."
आता कुठे त्या दोघांमध्ये लक्ष देता म्हणुन मी दुसर्या एका रहिवाशाकडे मोर्चा वळवला. पण हे साहेब
त्यांच्या कामात फारच गर्क होते. त्यानी माझ्याकडे पुर्ण दुर्लक्ष केल आणि काम सुरुच ठेवल.
मग मी देखील त्याना फारस डिस्टर्ब न करता पुढच्या घराकडे पाहिल तर हे महाशय असे बसले होते. जणू म्हणत असावेत,
"चला घर बांधुन झाल. आता कारभारीण कधी येते त्याची वाट बघुया." :)
मंडळी मी तिथुन थोडस पुढे आलो तर कोणा एका हिरोने त्याच्या सखीसाठी दोनमजली घर बांधुन ठेवलेल दिसलं.
ते दोघेही कुठे दिसले नाहीत. मग लक्षात आल गेले असतील बाजारला खरेदी करण्यासाठी. कदाचित त्यांच्या
घरी कोणी लहान पाहुणा येणार असेल त्याची तयारी करत असतील.
म्हणूनच दोन मजली घर केल असेल. :)
तिथुन जरा पलिकडच्या फांदीवर हे एक घरट आणि त्याची मालकीण दिसली. ती बहुद्धा त्याची वाट बघत दाराच्या जवळच
बसली आहे आणि म्हणत आहे ," आता तर होता की हा, लगेच कुठे गेला??
मघाशी मी जरास रागवुन गेलास उडत असं म्हणाले त्यामुळे तर कुठे गेलेला नाहिये ना हा??"
आणि काय सांगु मित्रानो, तिच हे स्वगत त्याला लग्गेच कळाल आणि तो आलाच. हे बघा.
मग कशी वाटली "आदर्श कॉलनी' ?
नक्की सांगा बर..... :)
बाय द वे, हा पक्षी सुगरणच ना? कि त्यालाच शिंपिण म्हणतात??
अवांतर : मला पुर्वदृष्य मध्ये सगळे फोटो नीट दिसले आहेत. जर कोणाला दिसत नसतील तर
http://picasaweb.google.co.in/zakasrao/SugaranichiGharate#
इथे जावुन पहा. सगळे फोटो आणि त्यांची वर्णन लेखात असलेल्या क्रमानेच आहेत.
प्रतिक्रिया
22 Sep 2008 - 11:04 pm | प्रभाकर पेठकर
सर्व फोटो मस्त आहेत. अभिनंदन.
22 Sep 2008 - 11:54 pm | टारझन
झकाआआआआआआआआअस ..
लेका ... फोटू अन वर्णर क्लास .. कसा रेट चालु आहे रे .. स्क्वेअर इंच ? १बिएचके ला नंबर लावावा म्हणतो .. आदर्श कॉलनी आहे मात्र भारी ...
एफ.सी. रोड वरील पक्षी पहाण्यात दंग
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
22 Sep 2008 - 11:05 pm | विसोबा खेचर
केवळ सुंदर फोटू..!
धन्यवाद झकासराव...!
मिपाकर कलावंतांमुळे दिवसेंदिवस मिपाचं कलादालन अधिकाधिक समृद्ध होत आहे याचा खूप आनंद वाटतो..!
आपला,
(आनंदी) तात्या.
23 Sep 2008 - 7:09 pm | रामदास
कलाविष्काराच्या वाढत्या धाग्यांमुळे मिपाची शोभा वाढतेय.
झकासराव , फोटो फार छान आलेत.
विषय पण वेगळाच आहे.
पुफोशु.
http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
22 Sep 2008 - 11:07 pm | भाग्यश्री
हेहे झकास फोटो.. आणि टिप्पणी पण! दुमजली घर्,चिंतन करणारे काका, गेलास उडत वाल्याचे डोकावून पाहणे बेस्ट्ट !!
22 Sep 2008 - 11:18 pm | लिखाळ
सुगरण पक्ष्याचे फोटो चांगले आहेत. शिंपी पक्षी वेगळा दिसतो आणि अशी घरे बांधत नाही.
सुगरण पक्ष्यांमध्ये नर घर बांधतो आणि मादी घर पाहुन नराला पसंत करते.
-- लिखाळ.
22 Sep 2008 - 11:21 pm | चतुरंग
माझ्या समजुतीप्रमाणे ते एकच.
आणखी माहिती देऊ शकाल का लिखाळराव?
चतुरंग
23 Sep 2008 - 9:19 am | महेश हतोळकर
शिंपी आणि सुगरण वेगवेगळे आहेत. सुगरण पक्षी चिमणीच्या वर्गातला. तर शिंपी वटवट्यांच्या वर्गातला. शिंपी झाडांची पाने शिऊन घरटे बांधतो. सुगरण गवताच्या काड्यांनी घरटे विणतो.
हा शिंपी पक्षी:
हे शिंप्याचे घरटे:
हा सुगरण पक्षी:
महेश हतोळकर
23 Sep 2008 - 9:44 am | चतुरंग
चित्रांमुळे नीट समजले.
चतुरंग
23 Sep 2008 - 12:54 pm | ध्रुव
चित्रे सुरेख.
शिंपी पक्षी ज्या स्वरात ओरडतो, तो आवाज फार आवडतो. महेश, तुमचे शिंप्याचे चित्र सुरेख आले आहे.
सुगरणीचे रंग याच काळात मस्त दिसतात, नंतर फरक ओळखणे कठिण होते.
हे बघा अजून काही सुगरणीचे शिंपी पक्ष्याचे फोटो....
--
ध्रुव
23 Sep 2008 - 1:16 pm | महेश हतोळकर
माझे नाही. अंतरजाल झिंदाबाद.....
22 Sep 2008 - 11:18 pm | देवदत्त
मस्त एकदम.
शाळेतील कविता आठवली.
अरे खोप्यामधी खोपा,
सुगरणीचा चांगला.
22 Sep 2008 - 11:19 pm | चतुरंग
हो हे शिंपीण किंवा सुगरण पक्षीच!
एका जागी इतकी घरटी म्हणजे खाली थोडी दलदल किंवा पाणथळ जागा आहे का?
शिंपी आपले घरटे शक्यतोवर अशा जागी बांधतो कारण सापपासून धोका, अशा पाण्यावर लोंबणार्या, फांदीच्या टोकाला असलेल्या घरट्यात साप यायची शक्यता कमी.
खूप वर्षांपूर्वी कुठल्याशा तलावाच्या काठावर मी अशीच अनेक घरटी एका बाभळीच्या झाडावर बघितली होती साधारण पन्नास एक तरी असावीत. कुठला तलाव ते आता आठवत नाही. :(
चतुरंग
22 Sep 2008 - 11:57 pm | वृषाली
सुगरण पक्ष्याचे फोटो फार सुंदर आहेत
वृषाली
22 Sep 2008 - 11:57 pm | अनामिक
अरे खोप्यामंदी खोपा
सुगरणीचा चांगला...
एका पिलासाठी तिनं,
जीव झाडाले टांगला.....
ह्या बहिणाबाईंच्या ओळी आठवल्या
22 Sep 2008 - 11:58 pm | वृषाली
सुगरण पक्ष्याचे फोटो फार सुंदर आहेत
वृषाली
23 Sep 2008 - 12:03 am | ब्रिटिश टिंग्या
झकासराव, फोटो अन् त्यावरील टिपण्णी एकदम झकास आहे!
23 Sep 2008 - 12:18 am | धनंजय
छानच.
23 Sep 2008 - 5:02 am | मृदुला
फोटो छान, टिप्पण्या मस्त. :-)
हे सुगरण पक्षी.
शिपीण पक्षी पानाला पान जोडून घरटे शिवतात, विणत नाहीत असे.
23 Sep 2008 - 5:24 am | प्राजु
झकासराव,
सुंदर फोटो आणि वर्णन... क्लास
कोल्हापूरी शोभलात... :)
जियो...!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
23 Sep 2008 - 7:07 am | अनिल हटेला
फोटो आणी टीप्पणी एकदम झकास !!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
23 Sep 2008 - 7:23 am | शितल
झकासराव,
सुगरणीचे घरट्यांची आदर्श कॉलनी आणि त्यावर केलेली टिपण्णी सह्ही केली आहे.
फोटो तर अगदी मस्तच.
:)
23 Sep 2008 - 8:57 am | प्रमोद देव
झकास रे झकासरावा!
छायाचित्रं आणि त्यावरील भाष्य दोन्हीही एकदम झकास!
23 Sep 2008 - 9:05 am | सखाराम_गटणे™
मस्तच
आभार ही माहीती दिल्या बद्दल
-----
नाडीला घाबरु नका, ज्योतिषाला पैसे देउन पटवा.
23 Sep 2008 - 9:25 am | ऋषिकेश
इवलीशी तीची चोच
तेच हात तेच ओठ
तुला दिले रे देवानं
दोन हात दाह बोटं
सुंदर चित्र!
-(माणसाच्या वसाहतीत राहणारा) ऋषिकेश
23 Sep 2008 - 9:47 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मस्त चित्र आहेत.
23 Sep 2008 - 9:50 am | ऋचा
मस्त्च आहेत सगळे फोटो.
मला दुमजली घर आवडल :)
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
23 Sep 2008 - 10:28 am | मनस्वी
झकासराव, काय सॉल्लिड फोटो आहेत!
दोनमजली घर असलेला सुगरणीचा खोपा पहिल्यांदाच पाहिला! तुझी कॉमेन्ट्री पण सही!
मनस्वी
*डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*
23 Sep 2008 - 10:48 am | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
झकास्++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
++++++++++++++++++++++++++इन्फिनिटी
वि.प्र.
23 Sep 2008 - 11:01 am | अनिरुध्द
झकास राव ! लई भारी चित्र आहेत. आवडली आपल्याला. तुम्ही केलंय का एखादं घर बुक. आत्तापर्यंत संपली सुध्दा असतील सगळी.
23 Sep 2008 - 11:49 am | मिंटी
झकासराव खुप मस्त आले आहेत फोटो सगळेच......
सुगरणिचे दोन मजली घर पहिल्यांदाच बघितले.....
ईतके सुंदर फोटो दिल्याबद्दल धन्यवाद.... :)
23 Sep 2008 - 11:54 am | नंदन
फोटोज, झकासराव. दुमजली घरट्याचा फोटो प्रथमच पाहिला.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
23 Sep 2008 - 2:16 pm | राघव
असेच म्हणतो. खूपच छान फोटोज!!
येऊ द्यात अजून :)
मुमुक्षु
23 Sep 2008 - 12:04 pm | मदनबाण
झकासराव एकदम झकास फोटो आहेत..
मदनबाण>>>>>
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
23 Sep 2008 - 12:29 pm | प्रकाश घाटपांडे
ही तर झकास कॉलनी. झकासराव
प्रकाश घाटपांडे
23 Sep 2008 - 12:58 pm | दिपोटी
झकासराव,
फोटो एकदम झकास आलेत. अभिनंदन !
----------------------------------
'मी' महेश हतोळकर,
तुमचे फोटो सुध्दा भारी आवडले, त्यातील रंगसंगती, image clarity सुरेख आहे ... त्यांच्या तांत्रिक माहितीचा खुलासा कराल काय ? उदाहरणार्थ, कॅमेरा, लेन्स, ऍपेर्चर / शटर स्पीड सेटिंग, ऑटोफोकस/फ्लॅश/ट्रायपॉड चा वापर केलात का, इत्यादि.
- दिपोटी
23 Sep 2008 - 7:01 pm | झकासराव
इथे प्रतिक्रिया देवुन हुरुप वाढवणार्या दोस्तानो धन्यवाद :)
"मी" यानी मनात असलेली शंका पुर्णच मिटवुन टाकली. धन्यवाद.
तुम्ही टाकलेले फोटो खल्लास आहेत. :)
धृव तु काढलेले फोटो उत्तमच रे.
चतुरंग अगदि बरोब्बर ओळखल तुम्ही. खाली दलदल आहे. तिथे जाणे प्रचंड कठिण असल्यानेच मला क्लोज अप फोटो नाही मिळाला.
त्यात माझ्या कॅमेर्यात फक्त १५ क्ष झूम आहे.
तात्या शेठ, अहो म्हणूनच तर आम्ही तुमच्याकडे फोटुंसाठी वेगळा विभाग करा अस टुमण लावल होत. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
6 Dec 2008 - 8:28 pm | स्वानन्द
मस्तच टिपले आहेत फोटो. आणि त्याची कथाही छान लिहिली आहे.
7 Dec 2008 - 12:58 pm | सोनम
झकासराव फोटो तर छान काढले आहे. तसेच पक्ष्याचे फोटो पाहायला मिळाले खूप छान. नाहीतर या सि॑मेटच्या दुनियेत( शहरात) पक्ष्यानी येणे आणि कोणाच्या घराजवळ वा बगीचेत घरटे बा॑धणे अशक्य झाले आहे. त्यामुळे तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद.
:T
7 Dec 2008 - 1:25 pm | स्वाती दिनेश
आदर्श कॉलनी आवडली.
फोटो आणि टिप्पणी 'झक्कास'!
स्वाती