१००/१२५ वृक्षांची ओघवत्या शैलीत, सचित्र ओळख करून देणारे एक बहारदार पुस्तक.
श्री ज्ञानदेवांच्या समाधीवर सावली धरणाऱ्या "अजान" वृक्षा पासून संपूर्ण भारत भरातल्या गोड्या पाण्यावर तरंगणार्या "जलकुंभी" पर्यंत अनेक वृक्ष ,त्यांचे मूलस्थान, पर्यावर्णातील त्यांचे महत्व, महती आणि माहिती सांगणारे हे पुस्तक हातात घेतले कि ठेववत नाही. अत्यंत सुंदर अशी छायाचित्रे हे या पुस्तकाचे आणखी एक वैशिठ्य आहे.
नाशिकच्या दैनिक "गावकरी" मध्ये "बहर' याच नावाने यातील काही लेख डॉक्टरांनी प्रकाशित केले होते. वाचकांचा प्रतिसाद पाहून हे सर्व लेख पुस्तक रुपात प्रसिद्ध झाले आहेत. (प्रकाशन वर्ष २००२)
शहरात रस्त्याच्या कडेला लावलेल्या अनेक वृक्षांकडे अनेक वेळेला आपले दुर्लक्ष होते. जसे रस्त्यावरील गर्दीत आपले कोणी असतेच असे नाही, पण एखादी ओळखीची व्यक्ती दिसली तर जसा आनंद होतो, तसा आनंद हे पुस्तक वाचून त्या वृक्षाची ओळख झाल्यामुळे होतो.
उदाहरण म्हणून आजकाल रत्याच्या कडेला विशेषता: नवी मुंबई ,ठाणे, या ठिकाणी पुढच्या १०/१५ दिवसात बहरू लागणाऱ्या (सप्टेंबर/ऑक्टोबर) सप्तपर्णी या वृक्षाचे देता येईल. आपली सातवीन म्हणजे हि सप्तपर्णी हिचे वानस शास्त्रीय नाव "ALSTONIA SCHOLARIS " या नावातील scholaris का आले ते सांगताना डॉक्टर म्हणतात "पूर्वीच्या काळी सप्त पर्णीच्या नरम लाकडाचा शाळेतले फळे तयार करण्यासाठी वापर केला जात असे म्हणून हिच्या नावात स्कॉलर घुसला" अशा प्रकारची मनोरंजनात्मक माहिती मिळवण्यासाठी आणि वृक्ष प्रेम वाढवण्या साठी हा "बहर" एकदा अनुभवायलाच हवा.
प्रतिक्रिया
13 Sep 2013 - 6:01 am | स्पंदना
पुस्तक ओळख आवडली.
15 Sep 2013 - 2:28 pm | पैसा
आता अशी कित्येक झाडे बघायला मिळत नाहीत पाहिली तरी ओळख विसरली जाते. अशी पुस्तके जरूर वाचायला हवीत.
16 Sep 2013 - 11:07 am | भ ट क्या खे ड वा ला
झाडे आहेत, लावली जात आहेत. जोपासण्याची वृत्ती , पाहण्याची दृष्टी,वेळ, आवड मात्र कमी होत चालल्ये, त्या साठी हा छोटासा प्रयत्न
15 Sep 2013 - 3:56 pm | अग्निकोल्हा
असे आपले बर्यापैकी लेख नेहमीच त्रोटक नसते तर भुरळ पाडणारेच आहेत. लीहित रहा...
16 Sep 2013 - 12:51 am | एस
आंतरजालावर कुठे उपलब्ध आहे का? गुगलून काही फारसे हाती लागले नाही.
16 Sep 2013 - 11:03 am | भ ट क्या खे ड वा ला
FLOWERS OF SAHYADRI आणी FURTHER FLOWERS OF SAHYADRI हि श्रीकांत INGALHALLIKAR यांची पुस्तके आंतरजालावर आहेत, बहर नाही मिळत. हि दोन्ही सुद्धा आवड असेल तर वाचायला ,पहायला ,बाळगायला उत्तम आहेत अजून एक फार जुने पण सुंदर वृक्ष गान लेखक डॉक्टर शरदिनी डहाणूकर हे सुद्धा बघा मिळते का ?
17 Sep 2013 - 12:49 am | एस
फ्लॉवर्स ऑफ् सह्याद्री आणि फर्दर फ्लॉवर्स ऑफ् सह्याद्री ही पुस्तके संग्रही आहेत. बहरसारख्या वृक्षांची माहिती देणार्या पुस्तकाची कमतरता प्रकर्षाने जाणवत आहे. सुंदर वृक्षगानही छानच असणार. मिळाल्यास जरूर घेईनच. माहितीबद्दल पुनश्च धन्यवाद.
16 Sep 2013 - 8:23 pm | पाषाणभेद
डॉक्टर श्रीश क्षीरसागर यांनी मधूमेहावर पेटंट असलेले औषध तयार केले आहे.
17 Sep 2013 - 8:44 am | मुक्त विहारि
आवडली..