कॉकटेल लाउंज : कलुआ अ‍ॅलेक्झांडर

सोत्रि's picture
सोत्रि in पाककृती
13 Sep 2013 - 6:15 pm

‘कॉकटेल लाउंज मालिकेतील आजचे कॉकटेल आहे कलुआ अ‍ॅलेक्झांडर

पार्श्वभूमी:

बायकोकडून गीफ्ट मिळालेल्या कोन्यॅकचा वापर आतापर्यंत फक्त 2-3 मित्रांना टेस्ट करून देण्यापुरताच झाला होता. स्निफ्टर ग्लास आणि क्युबन सिगार नसल्याने मीही अजुन म्हणावी तशी कोन्यॅक चाखलीच नाहीयेय. कोन्यॅक वापरून कॉकटेल बनवायचे मनात होते पण योग जुळून येत नव्हता. आज बाजारात गेल्यावर अमुल फ्रेश क्रीम दिसले आणि एकदम कलुआ आणि कोन्यॅक (ब्रॅन्डी) आठवली. लगेच अमुल फ्रेश विकत घेतले आणि कलुआ अ‍ॅलेक्झांडर करायचे ठरवले.

कलुआ (Kahlúa) ही कॉफी बेस्ड मेक्सीकन लिक्युअर आहे. त्यामुळे, तिच्याअपासून आणि ब्रॅन्डीपासून बनणारे हे 'कलुआ अ‍ॅलेक्झांडर' हे 'Digestifs' ह्या प्रकारात मोडते, म्हणजे भरपेट जेवण झाल्यावर घ्यावयाचे पाचक पेय. :) कॉफी बेस्ड लिक्युअर मुळे कॉफ़ीची एक झक्कास चव ह्या कॉकटेलला मिळते आणि ब्रॅन्डीमुळे ती किंचीत तीव्र होते. अतिशय चवदार आणि मादक असते हे कॉकटेल.

प्रकार
ब्रॅन्डी आणि कलुआ बेस्ड कॉकटेल

साहित्य

कलुआ (Kahlúa)
१ औस (३० मिली)

ब्रॅन्डी (कोन्यॅक)
१ औस (३० मिली)

क्रीम
१ औस (३० मिली)

बर्फ

चिमूटभर इन्स्टंट कॉफी पावडर (गार्निशिंगसाठी)

ग्लास
कॉकटेल ग्लास

कृती:

कॉकटेल शेकरमध्ये बर्फ भरून घ्या. त्यानंतर त्यात कलुआ, कोन्यॅक आणि क्रीम ओतून घ्या. सर्व घटक एकजीव होतील असे शेकर मध्ये शेक करुन घ्या. कॉकटेल शेकरवर बाहेरून बाष्प जमा झाले की कॉकटेल तयार झाले असे समजावे.

शेक केलेले मिश्रण कॉकटेल ग्लासमध्ये ओतून घ्या. चिमूटभर इन्स्टंट कॉफी पावडर ग्लासमध्ये भुरभुरू द्या. (एखादा डिझाइन मोल्ड असेल तर त्यातून एखादे डिझाइन केल्यास उत्तम)

झक्कास आणि चवदार 'कलुआ अ‍ॅलेक्झांडर' आहे :)

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

13 Sep 2013 - 6:33 pm | मुक्त विहारि

झक्कास...

ही कोनॅक फार महाग असते का हो?

मी अबु धाबीच्या एयर पोर्ट वर एक कोनॅकची बाटली बघितली होती (३०,००० दिरॅम म्हणजे साडे चार लाख रुपये, १००० मि.ली.)

किंमत बघूनच मी गार झालो.

सोत्रि's picture

14 Sep 2013 - 9:29 pm | सोत्रि

साडे चार लाख रुपये

हा आकडा बरोबर आहे का? जरा अतिरंजित वाटतो आहे. साडे चार हजार असावा.
साहित्याच्या चित्रात दिसणारी Hennessy V.S.O.P. १००० मि.ली. ची किंमत साडे चार हजार आहे.

- (साकिया) सोकाजी

मुक्त विहारि's picture

16 Sep 2013 - 8:15 pm | मुक्त विहारि

म्हणून मी पण २/३ वेळा बघून खात्री केली.

अहो, आखातात दारु हराम मानतात. तिथे अशीच महाग मिळणार.

मुक्त विहारि's picture

17 Sep 2013 - 9:08 pm | मुक्त विहारि

अबु धाबीला , भारतापेक्षा स्वत दारु मिळते.

आणि

माझ्या अंदाजाप्रमाणे ड्युटी फ्री शॉप मध्ये दारुच्या किंमती सगळीकडे सारख्याच असाव्यात.फरक असलाच तर तो ५/१० अमेरिकन डॉ.पेक्षा जास्त नसावा.

सौंदाळा's picture

13 Sep 2013 - 7:09 pm | सौंदाळा

कोनॅक वाचुनच (माइल्ड) किक बसली आहे.
मुक्त विहारिशी सहमत. फारच महाग असते वाटतं. मुविंची ४.५ लाख किंमत बरोबर पकडली तर १५० रु. प्रत्येकी प्रमाणे तब्बल ३००० स्क्रु-ड्रायव्हर येतील. ;)
असो बघुनच त्रुप्त झालो आहे.

जॅक डनियल्स's picture

14 Sep 2013 - 8:24 pm | जॅक डनियल्स

तब्बल ३००० स्क्रु-ड्रायव्हर येतील.

हिशोब अगदी मनापासून पटला. :)

केदार-मिसळपाव's picture

13 Sep 2013 - 8:01 pm | केदार-मिसळपाव

साधी कोन्याक १५-२० युरो पर्यन्त येते.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

15 Sep 2013 - 7:28 am | निनाद मुक्काम प...

केदार शी सहमत
२० वाली कोन्याक माझ्या कडे आहे.
त्यानंतर रेंज खाली प्रतिसाद दिली आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

15 Sep 2013 - 7:26 am | निनाद मुक्काम प...

करून पहिले पाहिजे
कलुआ घेणे आले चांगल्या दर्जाची युरोपात २५ ते ३० युरोला येते त्याहून महाग ३० ते ४५ पर्यंत

मुक्त विहारि's picture

16 Sep 2013 - 8:25 pm | मुक्त विहारि
सोत्रि's picture

17 Sep 2013 - 7:21 pm | सोत्रि

अगागागा... काय ह्या किमती का काय?
ज्यांना त्यांच्याकडे असलेल्या पैशाचे काय करावे हे कळत नाही त्यांच्यासाठीच असाव्यात ह्या.

- (एवढे पैसे कधी गाठीला जमणार ह्याचा विचार करणारा) सोकाजी

चिगो's picture

18 Sep 2013 - 11:05 pm | चिगो

दोन मिलीयन डाॅलर्सची दारु !? तब्बल साडेबारा कोटीची कोनॅक.. अबाबाबो.. मेलो, किंमती वाचूनच मेलो..

अवांतर : माझ्या जिल्ह्यात सिजू केव्ह्स आहेत.. आतापर्यंत ५ किमी इतपत लांबी एक्सप्लोर झालीय त्यांची.. अशी ष्टोरी आहे की कुठल्याश्या ब्रिटीश अधिकार्याने ह्या गुफांच्या जाळ्यात 'चाॅईसेस्ट स्काॅच'चे बॅरल ठेवलंय म्हणे.. त्याच्याच मार्गाचा माग घेत कुणी आला तर त्याला गिफ्ट म्हणून.. ;-) आता शोध घ्यावा म्हणतोय.. भारी किंमत मिळेल.. :-D

स्पंदना's picture

17 Sep 2013 - 7:29 am | स्पंदना

कोनियाक शराब नही होती...या डायलॉगने कोन्याकबद्दल कुतुहल चाळवल होतं.
लग्नानंतर ते शमलही. एकदम् मलमलीत.
लेकिन अपनी फेवरीट तो....रेड लेबल..युरोपिअन मेड...हल्लीच कधीतरी अशीच विकत आणली होती तिला जळलेल्या ओटस चा जरा जास्तच फ्लेवर होता.
असो.
टेबलक्लॉथ आवडले. भिंतीचा मागचा रंग आवडला
अन सोत्री काका एव्हढ्या दिसांनी मिपावर अवतरल्याबद्दल अतिशय कुतुहल वाटुन राह्यलय.

अग्निकोल्हा's picture

17 Sep 2013 - 12:00 pm | अग्निकोल्हा

तरंगायला होतय.

ब्रूच्या बरणीचा आकार आवडला.

नाटक्या's picture

20 Sep 2013 - 3:53 am | नाटक्या

छान!!!