अनेक सर्व शक्तिमान देशांच्या अहंकाराची थडग चिमुकल्या आणि लौकिकर्थाने कमजोर देशांमध्ये सापडतात. औरंगझेब आणि त्याच्या उद्दाम सरदारांची ज्याप्रमाणे महाराष्ट्रात सापडतात तशी.. सर्व शक्तिमान अमेरिकेला तर या नियमाने अनेक वेळा तडाखा दिला आहे. मग ते विएतनाम युद्ध असो किंवा इराक युद्ध असो. रशिया सारख्या प्रचंड लष्करी बळ असणार्या देशाचे पण अफगाणिस्तान मध्ये वस्त्र हरण झाले आणि त्याना तिथून माघार घ्यावी लागली. कीबहुना या अफगाण युद्धाने रशियन कमजोर अर्थव्यवस्थेवर इतका ताण पडला की तत्कालीन सोविएत यूनियन चे विघटन होण्याला जी अनेक कारण कारणीभूत ठरली त्यात या अफगाण युद्धाचा क्रम बराच वरचा आहे. १९६२ मध्ये भारताचा दारुण पराभव करणार्या चिनी लाल सैन्याला १९७९ मध्ये विएतनाम मध्ये दारुण पराभव स्वीकारावा लागला.
या नियमाला सिद्ध करणारा अपवाद सापडणे तसे कठीण. अगदी आपला भारत देश पण. कालच शूजीत सरकार या अफलातून दिग्दर्शकाचा 'मद्रास कॅफे' हा १९८७ मधील भारतीय लष्कराच 'विएतनाम' प्रभावी पणे चित्रित करणारा चित्रपट पाहिला आणि लष्करी बळावर आजूबाजूच्या चिमुकल्या देशाना चिरडून टाकु हा गंड बाळगण्याचे भीषण परिणाम दोन्ही देशाना कसे भोगावे लागतात याची अजुन एकदा आठवण zआलि.
आंतरराष्ट्रीय घटनांच्या पार्श्वभूमीवर चित्रपट बनण्याची वेळ भारतीय चित्रपट सृष्टीत जवळ जवळ नाहीच. ( माझया मते निव्वळ युद्ध पट या श्रेणीत मोडत नाहीत. त्यामुळे बॉर्डर आणि हकिकत हे बाद). कबीर खान चा 'काबुल एक्सप्रेस' हा नियम सिद्ध करणारा अपवाद. 'मद्रास कॅफे' हा शूजीत सरकार या दिग्दर्शकाचा दीर्घ कारकिर्दीतला हा केवळ तिसरा चित्रपट. त्याच्या पहिल्या 'यहाँ' चित्रपटात धागधगत्या काश्मीर च्या पार्श्वभूमीवर एक भारतीय मेजर आणि एक काश्मीरी मुलगी यांच्यातली प्रेम कहाणी तरल पणे मांडली होती. विकी डोनर हा स्पर्म डोनेशन वर खुष्खुशीत भाष्य करणारा त्याचा दुसरा चित्रपट बॉक्स ऑफीस वर पण चांगलाच चालला होता. विकी डोनर नंतर मोठे स्टार घेऊन सर्व सामन्यांची मनोरंजनाची मागणी पूर्ण करणारा चित्रपट बनवण्याची सेफ बेट घेण्याची संधी सोडून त्याने भारताने श्रीलंका प्रश्नात केलेला हस्तक्षेप व त्या पार्श्वभूमीवर राजीव गांधींची झालेली हत्या हा चाकोरीबाहेरचा विषय निवडून त्याने आपले वेगळेपण सिद्ध केले.
कहाणी सुरू होते ती रॉ ही भारतीय गुप्तहेर संघटना मेजर विक्रम सिंग या आपल्या अधिकार्याला तमिळ प्रश्नात वाढणारे अण्णा (प्रभाकारन या तमिळ दहशतवाद्यावर बेतलेल पात्र ) चे वर्चस्व कमी करून त्याला जाफना या तामिळ बहूल भागात एक दुसरा राजकीय पर्याय उभा करण्याच्या कामगिरीवर पाठवते. विक्रम सिंग जेंव्हा श्रीलंकेत प्रवेश करतो तेंव्हा सलामिलाच त्याला अनेक भारतीय शांती सेनेतील सैनिकांचे मृतदेह दिसतात. आपल्या पुढयात काय वाढून ठेवल आहे याची चुणूक विक्रम सिंग ला मिळते. अण्णा ला राजकीय पर्याय उभा करताना त्याला हे ही जाणवते की फितुरी आणि दगाबाजी यानी भारतीय राजकीय आणि लष्करी उद्दिष्टांचा कणाच मोडून काढला आहे.
तरीही विक्रम सिंग आपले सर्वस्व पणाला लावून देशासाठी लढतो. पण त्याला त्याची किंमत आपल्या वैयक्तिक आयुष्यात मोजावी लागते. तरीही विक्रम सिंग तमिळ दहशतवादी संघटनेची पाळमुल खणुन काढण्याच आपल काम चालूच ठेवतो. ही तमिळ संघटना श्रीलंके मध्ये शांती सैन्य पाठवणार्या आपल्या माजी पंतप्रधान ला मरणार आहे अशी त्याला खात्री पटत चालली आहे. दरम्यान अंतर्गत फितूरि, श्रीलंका सरकारचे असहकाराचे धोरण, तामिलांचा कडवा प्रतिकार आणि झालेली बेसुमार हानी यामुळे भारत आपली फौज माघारी घेते.विक्रम सिंग आपल्या नेत्याची हत्या टाळण्यात यशस्वी होतो? अण्णा ला राजकीय पर्याय उभा राहतो? विक्रम सिंग चे पुढे काय होते? या प्रश्नांची उत्तर सत्य घटनेवर आधारित असलेला चित्रपट ( संबंधित निर्माते आणि दिग्दर्शक याचा इनकार करत असले तरी)देतो. आणि ही उत्तर नक्कीच आपला राष्ट्रीय गर्व वाढवणारी नाहीत.
चित्रपट सर्वच आघाडीवर सरस आहे. कुठलेही पात्र विनाकारण घुसडलेले वाटत नाही. ना मनोरंजक गाणी, ना कॉमिक रिलीफ ना अंगप्रदर्शन त्यामुळे मनोरंजन हा शुद्ध हेतू बाळगून जाणार्या पब्लिक ने इकडे न गेलेलेच बरे. विक्रम सिंग ला त्याच्या कामात मदत देणारी पत्रकार नर्गिस फाखरी ने चांगली केली आहे. ' Criticizing my national policies doesn't make me anti national" हा तिचा संवाद बरेच काही सांगून जातो. व्यवसायिक गुप्तहेर अधिकार्याच्या भूमिकेत जॉन अब्राहम चक्क शोभून दिसतो. माठ अभिनेता म्हणून ओळखल्या जाणार्या या अभिनेत्याने प्रोड्यूसर म्हणून वेगवेगळे विषय निवडून चांगलीच चमक दाखवली आहे. शंतनू मोइत्रचे क्रेडिट्स च्या वेळी येणारे मौला हे गाणे अप्रतिम. युद्दगरस्त श्रीलंकेला कॅमेरया मध्ये अप्रतिम पणे बद्ध करणार्या कॅमरा मन ला सलाम.
पण चित्रपटाचे खरे नायक आहेत ते प्रचंड रिसर्च करून पटकथा लिहिणारी सोमनाथ डे आणि शुभेन्दु भट्टाचार्य ही जोडगोळी व दिग्दर्शक शूजीत सिर्कार. जर विकी डोनर ची पुण्याई नसती तर कदाचित हा चित्रपट पडद्यावर आला असता की नाही याबद्दल शंका घ्यायला वाव आहे.
चित्रपट हे मॅक्रो पातळीवर नसले तरी माइक्रो लेवल ला खूप मोठे बदल घडवून आणू शकतात हे माझे मत. एसी कॅबिन मध्ये बसून भरल्या पोटी भारताने पाकिस्तान वर त्वरित हल्ला चढवून पाकिस्तान नष्ट करावा अशी स्टेटस फेस्बूक वर अपडेट करणार्यांपैकी काही लोका ना तरी युद्ध हे किती वाईट असते आणि आपले काहीच स्टेक वर नसताना प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढणार्याला किती तरी गमवावे लागते याची जाणीव होऊन त्यानी युद्धखोरीची वांझ भावना बदलली तरी मद्रास कॅफे हा १०० कोटी कमावणार्या इतर चित्रपट पेक्षा यशस्वी होईल.
प्रतिक्रिया
25 Aug 2013 - 11:16 am | शिल्पा ब
चित्रपट नक्कीच बघितला जाईल.
25 Aug 2013 - 11:23 am | अमोल खरे
चांगलं परिक्षण. पण "एसी कॅबिन मध्ये बसून भरल्या पोटी भारताने पाकिस्तान वर त्वरित हल्ला चढवून पाकिस्तान नष्ट करावा अशी स्टेटस फेस्बूक वर अपडेट करणार्यांपैकी काही लोका ना तरी युद्ध हे किती वाईट असते आणि आपले काहीच स्टेक वर नसताना प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढणार्याला किती तरी गमवावे लागते याची जाणीव होऊन त्यानी युद्धखोरीची वांझ भावना बदलली तरी मद्रास कॅफे हा १०० कोटी कमावणार्या इतर चित्रपट पेक्षा यशस्वी होईल." हे वाक्य गरजेचे नव्हते. श्रीलंकेत सैन्य पाठवणे ही भारताची चुक असेलही. पण पाकिस्तानला नष्ट न करणे ही त्याहुन मोठी चुक ठरेल. पण परिक्षण आवडले आहे. चित्रपटाच्या शेवटाचा अंदाज आला आहे. बहुदा वाईट शेवटच असणार.
25 Aug 2013 - 12:28 pm | प्रभाकर पेठकर
>>>>एसी कॅबिन मध्ये बसून भरल्या पोटी....नसताना प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढणार्याला किती तरी गमवावे लागते याची जाणीव होऊन....<<<<
हे अनावश्यक तर आहेच पण देशाभिमान बाळगणार्या बहुसंख्यांच्या भावनांना कमी लेखणारं, अपमानास्पद विधान आहे.
लेखकाला जर त्या मनोवृत्तीत कांही चूक दिसत असेल तर फारातफार आपण पाकीस्तान विरुद्ध युद्धाची भाषा करण्यात काय चुक करीत आहोत हे जाणवलं असं म्हंटलं असतं तरी त्याचा स्विकार झाला असता. पण स्वतःला इतर सर्वसामान्यांपासून वेगळे ठसवून, न्यायाधिशाच्या भूमिकेतून, इतरांवर आसूड ओढणे पटत नाही. लेखाचा समतोल बिघडतो आहे.
पाकिस्तानच्या गेल्या कित्येक वर्षापासून चालत आलेल्या भीषण कुरापती पाहिल्या आणि त्यावरील प्रतिक्रिया म्हणून भारत सातत्त्याने चर्चेचे गुर्हाळ चालू ठेवण्याची भाषा करीत असेल तर सामान्य माणसांचा संताप होणं अनैसर्गिक आहे का? जी सामान्य जनता 'एसीत बसून....' (लेखकाचा शब्दप्रयोग आहे, माझा नाही.) मिळकतकर भरते (ज्यावर भारताचे सैन्य आणि इतर आवश्यक गरजा भागविल्या जातात) त्यांना मतप्रदर्शनाचाही हक्क असू नये? 'भारतिय सैन्य पाकिस्तान सारख्या देशासाठी भारी आहे' असे आपण अनेकदा ऐकत आलो आहोत. पण त्या सैन्याचा आपण वापरच करणार नसलो तर सर्व सैन्य दले बरखास्त करुन फक्त चर्चेची गुर्हाळे चालवणारी मंडळे स्थापन करा. निदान देशाचा खर्च तरी कमी होईल.
आपल्या जवळ प्रबळ सैन्य आहे ह्याचा अर्थ आपण वारंवार युद्धाचीच भाषा आणि कृती करावी असे मी म्हणत नाही. पण आपल्या देशात घातपाती कारवायां करणार्या, सीमेवर आपल्या सैनिकांचा शिरच्छेद करून त्यांचे मुंडके पळविणार्या, शस्त्रसंधीला हरताळ फासणार्या देशाला वचक बसेल, कारवायांना चाप बसेल असा जर आपल्या सैन्याचा योग्य वापर केला नाही तर ती दूर्बलाची सहिष्णुता ठरेल. असो.
दुसरा मुद्दा.
महाराष्ट्र कमजोर नव्हता. औरंगजेबाच्या साम्राज्यासमोर आकाराने आणि वयाने लहान होता. पण काटक होता, शूर होता, धाडसी आणि चतुर राज्यकर्ता लाभलेला सक्षम प्रदेश होता. म्हणजे आक्रमण नाही केलं तर त्याला 'कमजोर' म्हणून हिणवायचं आणि युद्धाची भाषा जरी केली तरी त्याला 'युद्धखोर' म्हणायचं. असं दुटप्पी धोरण योग्य वाटतं का? पेशव्यांच्या काळात दिल्लीचं राजकारण पुण्यातून चालायचं, दिल्लीच्या तख्तावर कोण बसणार हे पेशवे ठरवायचे आणि राघोबांनी अटकेपार झेंडे रोवले वगैरे वगैरे वाचण्यात आले आहे. इंग्रजांनाही इतर प्रदेशांच्या मानाने महाराष्ट्र सहजासहजी नाही मिळाला. महाराष्ट्राने चिवट झुंज दिली त्या महाराष्ट्राला कमजोर म्हणणं कुठल्या नितीत बसतं? असो.
चित्रपट नक्कीच पाहिला जाईल.
25 Aug 2013 - 12:37 pm | डॉ सुहास म्हात्रे
छान परिक्षण.
पण त्यानिमित्ताने तुम्ही मांडलेला युद्धाबद्दलचा प्वाईंटाचा मुद्दा अर्धसत्य आहे...
दर वेळा युद्ध करणे मुर्खपणाचे आहे हे निश्चीतच... कारण सर्वात यशस्वी युद्ध म्हणजे एकही गोळी न झाडता आणि रक्ताचा एकही थेंब न सांडता युद्धाची सर्व उद्दिष्ट्ये साध्य करणे... ह्या दुसर्या (योग्य युद्धसज्जता असणे, ती वेळप्रसंगी वापरली जाईलच याची "शत्रूला" खात्री असणे, आंतरराष्ट्रीय राजकारणातील वजन, इ.) बाजूसंबद्धात भारताची काय अवस्था आहे ते जगजाहीर आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा आपले हितशत्रू सतत घेत आहेत हे रोजच्या वर्तमानपत्रात आपण वाचतोच आहोत. मला वाटते सर्वसाधारण जनता अशा सततच्या भारतीय अपयशाने निराश होऊन अशी आतताई विधाने करते. पण म्हणून त्या सत्याची दुसरी बाजू विसरून फक्त जनतेला (जरी ते मत मला पटत नसले तरी) दोष देणे अस्थाई आहे.
कोणीतरी म्हटलेच आहे की, "अर्धसत्य हे पूर्ण असत्यापेक्षा अधिक घातक असते."
25 Aug 2013 - 8:59 pm | पैसा
परीक्षण आवडले. मात्र
या भागाबद्दल जरा शंका आहे. कारण युद्धखोरी ही पाकिस्तानकडून होते आहे आणि आपले सैनिक केवळ हकनाक बळी जात आहेत असे साधारणपणे दिसते.
26 Aug 2013 - 8:54 am | पिंपातला उंदीर
अनेकदा आपला देश हा बळी आहे आणि समोरचा शत्रू हा आक्रमक हा गंड सर्वच देशात आढळतो. पण १९७१ मध्ये आपण पाकिस्तान चे २ तुकडे केले होते हे आपल्या देशाच्या प्रेमापोटी आपण विसरतो. टाळी एका हाताने वाजत नाही हा वैश्विक नियम इथे पण लागू होतोच. पाकिस्तान ला बॅड बॉय म्हणून चालणार नाही. आपण पण अनेकवेळा त्याना सतावल आहे. एका देशाचे दोन तुकडे करणे म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. अजुन पण पाकिस्तान त्या धक्क्यातून सावरल नाही. प्रचंड कडवट पणा आला आहे त्यांच्यामध्ये. श्रीलंका प्रकरणात पण भारताने गरज नसताना शांति फौज पाठवून त्यांची मुस्काटदाआबी केली. खर तर तो श्रीलंकेचा अंतर्गत प्रश्न होता. जेंव्हा आपले ५ जवान मारले गेले त्या आधी भारतीय सेना ने पाक व्याप्त काश्मीर मध्ये घुसून ४ आतँकवाड्यांची गाठडि वळली होति. http://www.indianexpress.com/news/a-link--days-ago-army--killed-5-pak-in...आपली प्रतिष्ठा वाचवायला त्याना हे करणे भागच होते. हा टॉम अँड जेर्री चा खेळ तिथे नेहमीच चालतो. सांगायचा मुद्दा हा की आपण विक्टिम आहोत हा सर्वसामान्य माणसाचा गंड आहे तो तितकस्सा खरा नाही.
26 Aug 2013 - 9:49 am | टवाळ कार्टा
अछ्छा म्हणजे (he) आधीच केले कारण आपण १९७१ मधे पाकिस्तानचे २ तुकडे करणार हे त्यांना १९४७ मधेच माहित होते तर
26 Aug 2013 - 9:50 am | टवाळ कार्टा
लिंक गंडली :)
26 Aug 2013 - 9:54 am | टवाळ कार्टा
POK आणि COK चा नकाशा पहावा
26 Aug 2013 - 10:55 am | प्रभाकर पेठकर
पाकीस्तानने १९४७ साली काश्मिरात सैन्य घुसवून, अफगाणी टोळ्या घुसवून काश्मिरचा लचका तोडला. हल्लीच्या कालखंडात दाऊद सारख्याला आश्रय देऊन भारतात घातपाती कारवाया घडवून आणल्या, १९७१ चे कित्येक सैनिक अ़़जून पाक कैदेत खितपत पडले आहेत, भारता विरुद्ध घातपात करण्यासाठी प्रशिक्षण शिबीरे चालवली, आतंकवाद्यांना प्रशिक्षित केले, इन्डियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण करून आतंकवाद्यांना सोडविणार्यांना पाकिस्तानात थारा दिला, हाफिज सईद राजरोसपणे पाकिस्तानात फिरतो आहे, कसाब सारख्या १० जणांना भारतात पाठवून हा:हा:कार माजविला, अनेक कोळी बांधवांना पकडून डांबून ठेवले, गेले आठवडाभर सीमेवर गोळीबार वगैरे केला..... हे सर्वही भारतिय जनतेचे गंडच आहेत का??
मान्य की सरकार कडून जनतेची दिशाभूल केली जाते. पण वरील सर्व घटना घडल्या आहेत आणि त्याचे पुरावेही भारताने वारंवार दिले आहेत. की भारतच कुरापतखोर आहे, आतंकवादी कारवाया करणारा आहे आणि सभ्य आणि सोज्वळ पाकिस्तान विरुद्ध कांगावा करत आहे असे समजायचे?
26 Aug 2013 - 11:52 am | उद्दाम
पाकिस्तानने लचका तोडला? की स्थनिक लोकांच्या इच्छेविर्रुध हरिसिंगाच्या हट्टाखातर भारतानेच काश्मिर गिळला? सत्य काय आहे?
26 Aug 2013 - 1:44 pm | प्रभाकर पेठकर
हरीसिंगांचे, 'लष्कर पाठवून काश्मिरला वाचवा हे विनंती पत्र घेऊन' हरीसिंगांचा वकील ३ दिवस दिल्लीत बसून होता. पंडीत नेहरूंनी त्याला भेट दिली नाही. नेहरूंचा आग्रह होता 'आधी विलीनीकरणावर सही करा.' म्हणजेच विलीनीकरणाचा आग्रह नेहरूंचा होता हरीसिंगांचा नाही. हरीसिंगांना स्वतंत्र राहायचे होते. आधी मुस्लिमबहुल काश्मिरला पाकिस्तान सोबत जायचे होते परंतु अफगाण टोळ्यांनी जे अनन्वित अत्याचार आणि बलात्कार केले त्याने जनता बिथरली आणि त्यांनी भारताबरोबर राहणे पसंद केले. काश्मिरात जनमताचा कौल घेण्यात यावा अशी मागणी पाकिस्तानने केली परंतु शेख अब्दुल्ला (त्यावेळचे हरिसिंगांचे विरोधक आणि नेहरूंचे मित्र) कारावासात होते त्यांना आधी मोकळे करा आणि मग जनमताचा कौल घ्या असे नेहरूंनी सांगितले.
तात्पर्यः
१) हरिसिंगांच्या आग्रहाखातीर हा मुद्दा चुकीचा आहे.
२) प्रथम पाकीस्तानाबरोबर जाणारी जनता अफगाणी अत्याचारांनंतर भारतातच राहू इच्छित होती.
३) मुस्लिम नेता शेख अब्दुल्लाला सोडल्यास तो जनमत पाकिस्तानच्या बाजूने वळवेल अशी भिती असूनही विरोधी नेत्याला कारावासात ठेवून निष्पक्षपाती जनमत होणार नाही ही भारताची भूमिका होती.
अफगाणी टोळ्या काश्मिरात पाठवून आपली चुक झाली, काश्मिरी जनता आपल्या विरोधात गेली आहे हे पाकिस्तानच्या लक्षात येऊन जेवढा काश्मिरचा भाग मिळाला होता (नेहरूंमुळे) तो पाकिस्तानने दाबून ठेवून लगेच तिथे आपला 'पंतप्रधान' जाहिर करून टाकला. त्यामुळे पाकिस्तानात गेल्यास आपला पंतप्रधानपदाचा दावा फोल ठरणार हे लक्षात येऊन आणि जनतेचा कौल भारताकडे वळल्याचे लक्षात घेऊन शेख अब्दुल्लाने भारताबरोबर राहण्याचे पसंद केले आणि स्वतंत्र भारताच्या काश्मिरवर 'पंतप्रधान'की चा दावा केला, पद मिळविले. शेख अब्दुल्लांनाही स्वतंत्र काश्मिर हवे होते पण ते शक्य नाही हे लक्षात येताच त्यांनी त्या प्रदेशा करीता वेगळे कायदे कानून बनवून भारतातील इतर राज्यांपेक्षा वेगळा दर्जा मिळवून घेतला. (नेहरूंमुळेच हे शक्य झाले.) भारतीय सैन्य अफगाणी टोळ्यांस काश्मिर बाहेर हुसकून लावित असतानाच नेहरूंनी शस्त्र संधी घडवून आणली आणि सैन्य कारवाई थांबविली.
जरी काश्मिर पाकीस्तानात जायला पाहिजे होता असे मानले तर त्याच न्यायाने हैद्राबादही पाकिस्तानात जायला पाहिजे होते तसेचे बांगला देश हा पूर्व पाकिस्तानम्हणून होताच. काश्मिर पाकीस्तानात गेला असता तर पाकिस्तान आणि चीनला भारताची राजधानी अगदी हाताशी आली असती. तसेच पाकिस्तान, चीन, हैदराबाद (पाकीस्तान) आणि पूर्व पाकिस्तान अशा शत्रूंनी घेरलेल्या भारतास शांतता, सुरक्षितता आणि प्रगती साधण्याची संधी नसती मिळाली. सामरि़कदृष्ट्या असुरक्षित भारत मागे पडला असता.
26 Aug 2013 - 2:17 pm | सुनील
तुम्हाला ज्ञात असलेला इतिहास तितकासा खरा नाही.
असो, ह्या विषयावर इथे मिपावरच इतके चर्वित-चर्वण झाले आहे की आता पुन्हा पुनरुक्ती करायची इच्छा नाही. त्यामुळे तूर्तास इतकेच.
26 Aug 2013 - 3:15 pm | प्रभाकर पेठकर
बर्र बुवा!
26 Aug 2013 - 5:09 pm | पिंपातला उंदीर
+११११. लांब जायची गरज नाही. आंतर राष्ट्रीय माध्यम वाचा विकी पेक्षा
26 Aug 2013 - 11:07 pm | जॅक डनियल्स
माझे वाचन खूप कमी आहे, हे मी आधीच मान्य करतो.
काश्मिर किंवा युद्ध विषयावर (फक्त भारतीय) कुठे वाचावे ? आंतरराष्ट्रीय माध्यम म्हणजे काय ? नुसते गुगल करून लाख लिंका मिळतात पण तुम्ही नक्की कुठे वाचन करतात ?
26 Aug 2013 - 5:46 pm | पिंपातला उंदीर
तुमच्या वयाचा आणि कर्तुत्वाचा आदर ठेवून तुमचे वाचन (या मुद्द्या वरच) खूप कमी आहे.
27 Aug 2013 - 2:44 am | प्रभाकर पेठकर
अमोल उदगिरकरसाहेब,
तुमच्या, 'आंतर राष्ट्रीय माध्यम वाचा विकी पेक्षा' आणि 'तुमचे वाचन (या मुद्द्या वरच) खूप कमी आहे.' ह्या दोन्ही अभिप्रायांमधून तुम्ही व्यक्त केलेला वयाचा आणि कर्तृत्वाचा आदर पाहून गहिवरून आले.
दुसर्याला, 'मुद्द्यावर प्रतिक्रिया दिलित तर अजुन आनंद होईल.' असा सल्ला देताना स्वतः मात्र दुसर्यावर ती व्यक्ती 'विकी वाचूनच प्रतिक्रिया देते आहे' आणि त्या व्यक्तीचे 'वाचन खूप कमी आहे असा अप्रत्यक्ष वैयक्तिक आरोप करायचा' तसेच, स्वतः मात्र रेडिफ आणि विकीच्याच लिंका द्यायच्या हा दुटप्पीपणा गमतीशीर आहे.
माझा आंतरजाल आणि विकी वगैरेशी संबंध यायच्या कितीतरी आधी, जम्मू आणि काश्मिरचे गव्हर्नर श्री जगमोहने ह्यांचे 'धुमसते बर्फ' हे पुस्तक माझ्या वाचनात आले होते. माझा काश्मिर ह्या विषयावर तुमच्या इतका अभ्यास नसेलही कदाचित पण श्री. जगमोहन हे काश्मिरचे अभ्यासक आहेत आणि त्यांनी इतिहास अभ्यासूनच पुस्तक लिहीले आहे असा माझा विश्वास आहे. तसे नसेल तर तेही माझ्यासारखेच अज्ञानी आणि विचारांनी उथळ असले पाहिजेत.
माझे चुकते आहे, माझे ज्ञान (ह्या विषयातले) तोकडे आहे असे आपणांस वाटत आहे तर मी कुठले पुस्तक वाचू म्हणजे आपल्यासारखा ज्ञानी होईन ते सांगावे. मी जरूर जरूर वाचेन. मला तुमच्या सारखे ज्ञानी व्हावयास आवडेल.
26 Aug 2013 - 11:54 am | डॉ सुहास म्हात्रे
पुन्हा काही अर्धसत्ये...
...पण १९७१ मध्ये आपण पाकिस्तान चे २ तुकडे केले होते....
भारताच्या कारवाईने बांगलादेश स्वतंत्र राष्ट्र म्हणून आस्तित्वात आला. पण त्या अगोदर पाकिस्तानने तेथे काय केले आणि त्याचे भारतावर काय परिणाम झाले याबद्दलची सत्य परिस्थिती जगजाहीर असतानासुद्धा असले अतीटोकाचे आणि एकतर्फी विधान ???
जेंव्हा आपले ५ जवान मारले गेले त्या आधी भारतीय सेना ने पाक व्याप्त काश्मीर मध्ये घुसून ४ आतँकवाड्यांची गाठडि वळली होति.
म्हणजे आतंकवादी आणि एखाद्या सार्वभौम राष्ट्राचे सैनीक एकाच तराजूत मोजायचे काय? शिवाय एका राष्ट्राला आतंकवादी पोसण्याची आणि त्यांना दुसर्या राष्ट्रात घुसवण्याची परवानगी आहे पण दुसर्याने त्याबाबत काही कारवाई केली तर नाराज व्हायची तरतूद पण आहे. या प्रकाराला मराठीत कांगावा आणि इंग्लीश्मध्ये हायपोक्रसी म्हणतात. भारताचे दुर्दैव असे की (१) भारताला अश्या हायपोक्रसीत पीएच् डी केलेले शेजारी आहेत, (२) त्यांचा तात्विक मुकाबला करण्यात भारत सतत कमी पडतो आहे आणि (३) शिवाय वर तथाकथीत भारतिय "विचार्वंत" आपले शेजारी आणि त्यांचे भाडोत्री आतंकवादी यांची तळी उचलून धरण्यासाठी चढाओढ करत असतात ! हे केवळ माझे स्वतःचेच मत नाही तर याबाबत चर्चा करत असताना पुढारलेल्या आणि पुरोगामी मानल्या गेलेल्या देशाच्या सुशिक्षीत नागरिकांनी ह्या वस्तुस्थितीबद्दल अनेकदा आश्चर्य व्यक्त केले आहे आणि काहीवेळेस तेथे हजर असलेल्या शेजारी राष्ट्राच्या नागरिकाने खुशीने डोळ्यांची सूचक हालचाल करत गप्प राहणे पसंत केलेले आहे.
केवळ थक्क झालो आहे !
26 Aug 2013 - 5:06 pm | पिंपातला उंदीर
जर तुम्हाला असे वाटत असेल की ती कारवाई दहशतवाद्यानी केली तर तुम्हाला सलाम. ती कारवाई पाकिस्तानी सैनिक दलानी केली. BAT या पाथकानी. १९७१ मध्ये आपण मुक्तिवाहिनी या त्याकाळच्या दहशतवादी पाथकाला सपोर्ट केला होता. आणि इंदिरा जिंच्या काळात तमिळ गणिमाना. जमल तर अभ्यास वाढवा आणि आपला देश निष्पाप आहे हे डोक्यातून काढा.आणि भारतीय प्रसारमाध्यमावर विसंबून न राहता काही आंतर राष्ट्रीय माध्यम पण बघा. १९६५ च युद्ध का आपण जिंकलो नाहीत. कारगिल मधली काही शिखर अजुन का पाकिस्तान च्या ताब्यात आहे ही पण उत्तर मिळतील. आणि . म्हाजे या मुद्द्यावार भावनत्मकतन होता भरपूर वाचन करा. तुमच्या ज्यष्ठेतेचा आदर आहेच. काही विदा हवा असेल तर खर्ड वहित कळवा.
26 Aug 2013 - 5:28 pm | मालोजीराव
१९६५ च युद्ध का आपण जिंकलो नाहीत
26 Aug 2013 - 5:35 pm | पिंपातला उंदीर
मालोजि राव आपण ते युद्ध जिंकलो नाहीत पण हारलो पण नाहीत. बुद्धिबलाच्या भाषेत तो stale mate होता.
26 Aug 2013 - 6:09 pm | मालोजीराव
The invading Indian forces outfought their Pakistani counterparts and halted their attack on the outskirts of Lahore, Pakistan's second-largest city. By the time United Nations intervened on September 22, Pakistan had suffered a clear defeat.
26 Aug 2013 - 6:33 pm | पिंपातला उंदीर
http://www.rediff.com/news/2005/sep/06war2.htm
http://guides.wikinut.com/1965-War%3A-Blunders-of-The-Indian-Army/3tds6kj3/
http://www.helium.com/items/1567387-indo-pakistani-war-of-1965
26 Aug 2013 - 7:09 pm | मालोजीराव
डेव्हिन हेगर्टी आंतरराष्ट्रीय दर्जाचे तज्ञ आहेत,MIT-केम्ब्रिज इथे प्रोफेसर आहेत, भारतीय उपखंड आणि तेथील राजकारण यावर बरेच वर्ष ते लिहित आहेत.
याउलट तुम्ही दिलेल्या लिंक्स मधील व्यक्ती जसे कि
१. मेहमूद शाम, जंग ग्रुप - पाकिस्तान …यांचे विचार पूर्ण बायस आहेत.
२. मदन सिंग - यांची आंतरराष्ट्रीय सोडाच पण राष्ट्रीय ओळख नीटशी नाही
३. केव्हिन थालेरस्मिथ - हा मिपावरील '१ आठवडा जुना सदस्य' या तोडीचा आहे.
26 Aug 2013 - 7:15 pm | पिंपातला उंदीर
Perceptions. सत्य आपल्याला वाटत तेवढ एकतर्फी नाही हा संदेश मिळाला तरी खूप आहे. १९७१ च युद्ध आपण एकतर्फी जिंकल होत त्याबद्दल कुठेही विवाद नाहीत. १९६५ च युद्ध तस नव्हत .गूगल वर सर्च केलात तर १९६५ च्या युद्ध वर खूप विदा मिळेल
26 Aug 2013 - 11:07 pm | अनुप ढेरे
वर म्हणालात विकिपेक्षा आंतरराष्ट्रीय माध्यमं वाचा आणि संदर्भ म्हणून रेडिफ आणि विकिनटच्या लिंका दिल्यायत. अंमळ गौंमत वाटली. :)
26 Aug 2013 - 5:49 pm | पुण्याचे वटवाघूळ
हल्ली इतरांना तुच्छ लेखत उपदेश करत सुटायची साथ आली आहे बहुतेक मिपावर :(
26 Aug 2013 - 5:56 pm | पिंपातला उंदीर
खरच तस नाही. त्यांच्या सारख्या ज्येष्ठ सदस्याला अपमानीत करण्याचा माझा मुळीच उद्देश नाही. शब्द रचना चुकली असल्यास क्षमस्व. मुद्द्यावर प्रतिक्रिया दिलित तर अजुन आनंद होईल.
26 Aug 2013 - 6:09 pm | श्रीरंग_जोशी
या वर तुम्ही पूर्वीही लिहिले आहेच. एक लक्षात घ्या, लष्करी कारवाई पूर्ण जोमाने करणे लष्कराच्या हातात असते; पण दर वेळी १००% मिळेल याची खात्री कुणीच देवू शकत नाही. तुम्ही त्या चर्चेच्या वेळी दिलेल्या दुव्यात लिहिले होते की भारतानेही त्या भौगोलिक प्रदेशात यापूर्वी स्वतःच्या ताब्यात नसलेली शिखरे ताब्यात घेतली आहेत व एका कारवाईत अपयश आल्याने इथे उल्लेखलेली ताब्यात येऊ शकली नाही. पण पूर्वी ताब्यात नसलेली शिखरे आता असल्याने पाकिस्तानी लष्कराला काबूत ठेवणे भारतीय लष्करासाठी पूर्वीपेक्षा सोपे आहे.
अन हाच मुद्दा जर सियाचिनला लावला तर?
बाकी परिक्षण आवडले. हा चित्रपट मी कालच पाहिला.
मात्र या परिक्षणातील ऐतिहासिक दाखले देणार्या काही वाक्यांची मांडणी खटकली.
26 Aug 2013 - 6:18 pm | पिंपातला उंदीर
मान्य. पण कारगिल मध्ये गमावलेला पूर्ण भू भाग आपण अनेक शूर जवान गमावून आपण मिळवू शकलो नाहीत हे सत्य दशंगुले व्यापून उरतेच. कुठलेही लष्कर १०० % देऊन पण नेहमी यश मिळवेळच याची खात्री नाही या तुमच्या विधानाशी सहमत. पाकिस्तान हा खूप कमजोर देश असून आपण त्यांच्या पेक्षा खूप सामर्थ्य शाली आहोत असे मत असणार्या लोकाा हे कळले तर बरे होईल.
26 Aug 2013 - 6:52 pm | श्रीरंग_जोशी
सदर लष्करी घडामोडींत कारगिल युद्धापूर्वी एकमेकांच्या ताब्यात असणार्या शिखरांची अदलाबदल झाली. भारतीय लष्कराने एकतर्फी नुकसान सहन केलेले नाहीये.
१९९९ नंतर कारगिलसारख्या मोहिमेची पुनरावॄत्ती करणे पाकिस्तानी लष्कराला अगदी थोड्या प्रमाणातही शक्य झालेले नाहीये. इतकेच नव्हे भौगोलिक क्लिष्टतेचा लाभ उठवून अतिरेक्यांना पाकव्याप्त काश्मिरातून नियंत्रणरेषेच्या भारतीय बाजूला घुसवणेही पूर्वीपेक्षा लक्षणीयरित्या कमी झाले.
26 Aug 2013 - 7:21 pm | पिंपातला उंदीर
१९९९ नंतर पाकिस्तानी लष्कराविरुद्ध कुठलीही कारवाई करणे आपल्याला पण शक्य झाले नाही. संसदेवर हलला झाल्यावर आपण खूप मोठे लष्कर सिमे वर नेऊन ठेवले होते. पण आपण काहीही केल नाही. त्यावेळेस कॉंग्रेस वालयानी भाजप सरकार वर टीका केली आता भाजप वाले कॉंग्रेस वर टीका करतात. आणि आपल्याला वाटत की राजकीय इच्छाशक्ती अभावी आपण काही करत नाही. पण मुळात दोन्ही बाजू ला असणारी अण्वस्त्र आणि भारतीय लष्कराने हरवलेला एज हे मुख्य कारण आआहेत हे दोन्ही पक्षाना (कॉंग्रेस आणि भाजप) चांगले माहीत आहे. त्यामुळे भविष्य काळात पण प्रत्यक्ष युद्ध होण्याची शक्यता नाही च्या बरोबर आहे.
26 Aug 2013 - 8:07 pm | श्रीरंग_जोशी
१९९९ पाक लष्कराने कारगिलसारखी आगळीक केलीच नसल्याने पाक लष्कराविरुद्ध थेट कारवाई करण्यासारखे कारण कुठे होते?
दोन्ही राष्ट्रे अण्वस्त्रसज्ज असल्याने मोठे युद्ध (कारगिलचे युद्धदेखील या श्रेणीत बसू शकत नाही) टळले आहे; या बाबत तुमच्या मताशी सहमत.
बाकी भारतीय लष्कराच्या २००१ मधल्या नियंत्रणरेषेपलिकडील धडक कारवाईचे उदाहरण इथे चर्चिले गेले आहेच.
26 Aug 2013 - 8:15 pm | पिंपातला उंदीर
भारतीय संसदेवर झालेला हलला, मुंबई हल्ला असे अनेक पाक पुरस्कृत हल्ले देशात झाले. पण सिमे वर लष्कराची जमाजमव करण्या पलीकडे आपण काही केली नाही. आणि भारतीय लष्कर सिमे पलीकडे जौन कारवाई कसे करते याचे उदाहरण देऊन तुम्ही चांगले केले. इथे लोकाणा वाटते की पाकिस्तानी लष्कर इथे कधी पण येते आणि आपल्या गरीब लष्करावर हल्ले करते. माझा पॉइण्ट हाच आहे. Nobody is clean here. भारत पण नाही.
26 Aug 2013 - 8:27 pm | श्रीरंग_जोशी
नियंत्रणरेषेच्या भारतीय बाजूने पाकव्याप्त काश्मिरमध्ये अतिरेकी घुसवण्याची भारतीय लष्कराचा प्रयत्न पाकिस्तानने हाणून पाडला अशी बातमी एकदा तरी कुठेही वाचली आहे का? पाकिस्तानी लष्कर भारतीय भूभागात होणार्या अतिरेकी कारवायांसाठी प्रत्यक्ष काम करते.
नियंत्रण रेषेच्या पाकिस्तानी बाजूचे अतिरेकी तळ त्या कारवाईमध्ये नेस्तनाबूत केले गेले होते. अचानक केलेली कारवाई १००% यशस्वी पार पाडल्याने व कुठलाही पुरावा मागे न सोडल्याने पाकीस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचे अजिबात भांडवल करू शकला नाही.
अन पाकिस्तानवर टिका होते कारण त्यांच्या लष्कराने भारतीय लष्कराबरोबर युद्धबंदीचा तह केलेला आहे. असा कुठलाही तह झालेला नसता तर गोष्ट वेगळी होती.
26 Aug 2013 - 9:21 pm | डॉ सुहास म्हात्रे
...जर तुम्हाला असे वाटत असेल की ती कारवाई दहशतवाद्यानी केली तर तुम्हाला सलाम. ती कारवाई पाकिस्तानी सैनिक दलानी केली. BAT या पाथकानी.
साहेब, या अमुल्य शिक्षणाबद्दल अनेकानेक धन्यवाद !अशी विषय भरकटवणारी कॉमेंट (अशा गोष्टिबद्दल की जी वर्तमानपत्रातसुद्धा चावून चोथा झाली आहे) आली की समोरच्याला प्रतिवाद न सापडल्याने आता विवाद न करता वितंडवाद करायचा आहे हे आम्ही फार पूर्वीच शिकलोय... आणि माझा हा अंदाज खरेच चुकीचा असला तर तुम्ही प्रथम तुमचा प्रतिसाद (ज्यावर मी प्रतिसाद लिहिला) वाचावा आणि मग तुमचा स्वतःचा वरचा प्रतिसाद वाचावा अशी विनंती करतो.
तोपर्यंत विनयाने एवढेच सांगतो की मी जे काही लिहिले आहे त्याच्या मागे आंधळी / भडक देशभक्ती नसून काही तपे अनेक संबद्धीत लोकांबरोबरच्या प्रत्यक्ष संबद्धातून अनुभवलेले व ऐकलेले सत्य आहे. किमान दिवाणखान्यात बसून अथवा जालावरचा काही विदा वाचून बनवलेले मत तर आजिबात नाही याची खात्री असू द्यावी.
जमल्यास वर सांगितल्याप्रमाणे करावे, मग बोलू. अन्यथा आमचा रामराम घ्यावा ही विनंती.
28 Aug 2013 - 7:15 pm | अशोक पतिल
अनेकदा आपला देश हा बळी आहे आणि समोरचा शत्रू हा आक्रमक हा गंड सर्वच देशात आढळतो.
श्रीलंका प्रकरणात पण भारताने गरज नसताना शांति फौज पाठवून त्यांची मुस्काटदाआबी केली. खर तर तो श्रीलंकेचा अंतर्गत प्रश्न होता.
ही वाक्ये फार विचारपुर्वक वाचली, आणि त्यात तथ्यांस जाणवला . आपण जे काही हलके पणाने वाचतो,जसे की आपण काश्मिर प्रश्न हा युनोत न्यायला नको होता...किंवा आपला देश हा दुसर्या देशामधे काहीही ढवळाढवळ
करत नाही.... हे कदाचीत काहीसे खरे नसावे. पाकिस्तान हा आपला भारत देश सिंध वेगळे करण्यास फुस
देतो हा आरोप कायम करतच असतो. सरबजीत सिंगा वरील आरोपा विषयी भारताने कधीही पक्का पावित्रा घेतला
नाही. आपले गुप्तचर हे परदेशात काही प्रमाणात सक्रिय असतीलच.
तसेच आपल्या आजच्या आतराष्ट्रीय सीमा ह्या ब्रिटीशा च्या साम्राज्यवादाचीच देण आहे. म्हणुन पुरवोत्तर राज्ये आज आपल्या भारतात आहेत.व त्यामुळेच चीनशी सीमावाद आहे.आनी जगात असा कोणताही देश नाही की त्याचा शेजारील देशाशी सीमावाद नाहि.
खर्या गोष्टी जेव्हा अचुक सदंर्भ ग्रथं वाचायला मिळतील तेव्हाच त्या समजतात. नाहीतर एकीव माहीतीच्या आधारे
फक्त रक्त उसळते. ( पण म्हणुन पाकिस्तान/चीन चे चुकत नाही असे नाही. त्यान त्याबद्दल किंमत चुकवाविच लागेल हा विश्वाचा नियमच आहे. आठवा १९५०-६० मधील अमेरीकेची आतर राष्ट्रीय ढवळाढवळ...व आजची त्या देशाची स्थिती.)
25 Aug 2013 - 9:54 pm | निमिष ध.
परीक्षण अतिशय उत्तम आहे आणि उत्कंठा वाढवणारे आहे. त्यामुळे आता चित्रपट नक्की पहावा लागेल.
मला तरी त्यांचे युद्धखोरिबद्दलचे विधान बरोबर वाटते. उगीच कशाचाही अनुभव नसताना आणि किती हानी होईल याची कल्पना नसताना जे लोक सदानकदा हल्ला करा हल्ला करा असे म्हणतात यांना तो सल्ला होता की जर सारासार विचार करा आणि पहा की या युद्धामुळे किती नुकसान होते. फक्त घरदार नव्हे तर मनुष्य आणि शेती, झाडे पशुपक्षी सगळ्यांचाच प्राण जातो. आणि त्यामुळे देश जो कर्जबाजारी होईल ती गोष्ट निराळीच.
अमेरिकेचा हल्ला आणि आपला हल्ला यात मुलभूत फरक आहे - कधीही त्यांच्या सीमेवर प्रत्यक्ष युद्ध झालेले नाही. पोलंड युक्रेन लेबेनॉन यांसारख्या देशातील नागरिक सांगतील उगीच कारण नसताना युद्ध करून काही फायदा होणार नाही.
दहशदवादी हल्ले होतात त्यात सगळीकडून येत असतात - नुसता पाकिस्तान नाही तर आता नेपाळ बांगलादेश चीन असे बरेच देश आहेत. आणि एका युद्धामुळे देश कमजोर झाला की दुसरीकडून आक्रमण करायला हेच टपून बसले आहेत.
हे हल्ले खरे तर अंतर्गत सुरक्षा आणि गुप्तहेर खाते मजबूत करून थांबवायला पाहिजेत. आणि त्या उग्रवाद्यांना जास्ती उचल मिळू नये म्हणून उलट पाकिस्तानात लोकशाही स्थिर सरकार असायला पाहिजे.
26 Aug 2013 - 9:20 am | दादा कोंडके
परिक्षण आवडलं, विशेषतः शेवटचा परिच्छेद.
26 Aug 2013 - 10:25 am | क्रेझी
कालच बघितला हा चित्रपट डोकं अगदी सुन्न होतं..
26 Aug 2013 - 12:46 pm | तिरकीट
चित्रपट सुंदर आहे असं खुप ऐकलंय, पण त्याच्या विरोधात निदर्शनं का झाली नक्की कळलं नाही..
26 Aug 2013 - 2:35 pm | मालोजीराव
एक पॉलीटीकल थ्रिलर म्हणून चित्रपट चांगला आहे आवडला,चित्रपटाचा पेस काही ठिकाणी खूप कमी झालाय.
मद्रास कॅफे वर स्पाय गेम आणि ब्ल्याक हॉक डाऊन ची छाप दिसली
बाकी युद्ध हि न परवडणारी गोष्ट आहे ती न झालेलीच चांगली
26 Aug 2013 - 3:08 pm | संपत
शान्ति सेना पाठवण्यामागची सांगायची कारणे आणी खरी कारणे वेगळी आहेत असे माझे मत आहे. श्रीलंकेतील स्वतंत्र तमिळ इलमची चळवळ आणि भारतातील दाक्शिणात्यांचा स्वतंत्र देशाची (द्रवीड्नाडु) चळवळ ह्यात नेहमीच सख्य होते. जर का तमिळ इलम अस्तित्वात आले असते तर तमिळनाडुमध्ये तमिळ इलमला सामील होण्यासाठीच्या मागणीने नक्किच उग्र रूप धारण केले असते. शांतीसेनेने लिट्टेला दुबळे केले व भारतातला अजून एक संभाव्य फुटिरतावाद टाळला.
26 Aug 2013 - 5:13 pm | पिंपातला उंदीर
शांति सेना ने तामिळ आतँकवाड्याना कमजोर केले? खूपच विनोदी विधान. उलट भारतीय सेने ला खूप हानी होऊन माघार घ्यावी लागली. आणि नतर ते कधी नव्हते एवढे ताकदवान झाले. आपल्या एका हिंदू हृदय सम्राताणी तमिळ हिंदू आहेत म्हणून त्याना नैतिक पाठिंबा दिल्याचे स्मरते
26 Aug 2013 - 11:13 pm | संपत
शांतिसेनेने लिट्टेला निश्चितच खिळखिळे केले होते. जर वी. पी. सिंगनी लश्कराला मागे बोलवले नसते तर कदाचित निर्णायक विजय मिळालाही असता. वी. पीं. च्या ह्या निर्णयामागे देखिल द्रवीडनाडु समर्थक करुणनिधिंचा दबाव होता. मात्र भारतिय लश्कराचे ह्यात नुकसान झाले हे खरय, पण राजीव गांधींसमोर दुसरा पर्यायही नव्हता. अर्थात रॉने सुरवतीच्या काळात लिट्टेला प्रशि़क्षण व शस्त्रे दिली होते हे ही खरेच.
26 Aug 2013 - 3:22 pm | होबासराव
नक्कि बघेन हा चित्रपट
26 Aug 2013 - 6:22 pm | पिंपातला उंदीर
अजुन एक गोष्ट म्हणजे पाकिस्तान च्या मुद्द्यावर तावा तावाने मुद्दे साणगणारी मंडळी भारताने श्रीलंका मध्ये आपली फौज पाठवणे किती संयुक्तिक होते या मुद्द्यावर मूग गिळून गप्प आहेत. का आपला तो बाप्या नियम इथे लागू पडतो ते देव जाणे
26 Aug 2013 - 9:52 pm | पैसा
श्रीलंकेतून भारतात येणारे तमिळ निर्वासित हा मोठा प्रश्न उभा राहिला होता, (सुमारे १ लाख ३५ हजार तमिळ निर्वासित भारतात समुद्रमार्गे आल्याची नोंद झाली होती. नोंद न झालेले आणखी असू शकतील.) आणि पाकिस्तान श्रीलंकन तमिळींच्या प्रश्नात बरीच ढवळाढवळ करू लागले होते, जे थांबवणे आवश्यक होते. या दोन कारणांमुळे आणि श्रीलंकेबरोबर केलेल्या तहानुसार भारतीय शांतिसेना पाठवण्यात आली होती.
26 Aug 2013 - 9:53 pm | सुबोध खरे
अमोल साहेब,
भारताने अगोदर तमिळ अतिरेक्यांना शस्त्रास्त्रे व मदत केली होती ही वस्तू स्थिती आहे परंतु नंतर तमिळ अतिरेक्यांना आवरणे श्रीलंकन लष्कराच्या हाताबाहेर गेल्याने त्यांनी भारताकडे मदत मागितली. हे प्रकरण केवळ वेगळा तमिळ प्रदेशाच्या पुढे जाऊन श्रीलंका पादाक्रांत करण्याच्या पातळी पर्यंत आले होते यामुळे श्रीलंकेने आपले सार्वभौमत्व गमावण्याच्या भीतीने भारताला पाचारण केले आणि जर भारताने ती मदत दिली नसती तर त्यांची अमेरिकेकडे (प्रत्यक्षात चीन कडे) मदत मागण्याची तयारी चालू होती या बदल्यात त्यांनी अमेरिकेला (किंवा चीनला) सशस्त्र तळ उभारण्याची परवानगी देण्याचे ठरत होते. अमेरिका किंवा चीन सारखा देश आपल्या परसदारात येउन बसणे परवडणारे नव्हते. यासाठी भारताने तमिळ अतिरेक्यांना वेसण घालण्याचे प्रयत्न चालू केले त्यात तमिळ अतिरेक्यांनी भारताने पुरवलेली शस्त्रास्त्रे शांतिसेनेला पूर्णपणे परत केली. पण आपल्या गुप्त हेर खात्याचे अपयश असे कि त्यांनी तमिळ वाघांनी आंतर राष्ट्रीय बाजारपेठेत(चीनी शस्त्रे) किती मिळवली आहेत याचा बरोबर लेखा जोखा मिळवण्यात चूक केली. यामुळे आपली शांती सेना तेथे गेली ती तमिळ अतिरेक्यांना थोडासा धाक दाखवून वाटाघाटीच्या टेबलावर आणू या मिषाने. पण प्रत्यक्षात उलटेच घडले पहिल्या काही दिवसात लश्कराची फार मोठी हानी झाली कारण तमिळ अतिरेक्यांकडे AK ४७, मोर्टार, रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड सारखी अद्ययावत शस्त्रास्त्रे होती.आणि आपल्या सैनिकांकडे फक्त 7. 62 रायफल होत्या शिवाय भारतीय लष्कराला सक्त ताकीद होती कि गरज पडेल तरच गोळी मारा कारण तेथिल तमिळ लोक हे भारतीय वंशाचेच आहेत. या लढाईतून भारतीय लष्कराला कोणताही फायदा झाला नाही. उलट त्यांच्या मनोधैर्यावर परिणाम मात्र झाला होत. कारण अधिकारी वर्गाला सैनिकांना भारतीय वंशाच्या लोकांना मारून आपण दुसर्याच्या देशासाठी का लढत आहोत हे समजावणे आणि प्रोत्साहन देणे(motivate) फार कठीण गेले. नंतर मात्र आपल्या सैनिकांनी प्रतिहल्ला चढविला आणि तामिळ वाघांची वाताहत झाली. यानंतर सुद्धा जेंव्हा लष्कर निर्णायक विजयाच्या जवळ होते तेंव्हा त्यांना परत येण्यास सांगितले कारण द्रमुक आणि इतर राजकीय पक्षांचे असलेले हितसंबंध.
प्रत्येक गोष्ट राजकीय कारणासाठी बाहेर येतेच असे नाही. लष्कराच्या सेनापतींनी लष्कर श्रीलंकेत पाठीण्यास कसून विरोध केला होता पण तो राजकीय निर्णय होता.
बर्याच वेळेस लष्कराचे नुसते हात नव्हे तर तोंड सुद्धा बांधलेले असते.
26 Aug 2013 - 7:55 pm | बाबा पाटील
आंतरराष्ट्रीय राजकारणात जर वचक ठेवायचा असेल तर शेजारी आपल्या पेक्षा प्रबळ कधीच होवुन देता येत नाही.त्यामुळे राष्ट्राचा गाडा हाकताना शेजारील देशात काहीना काही घडवावच लागत्,त्यातुन बर्याच्श्या उलथापालथी होत असतात्,प्रत्येक जन दुसर्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणारच्,आपपल्या सिमांचा विस्तार करण्याचा प्रयत्न करणारच्,त्यामुळे भारत काय किंवा पाकिस्तान काय या गोष्टी घडतच राहणार फक्त भारत थोडीफार नितीमत्ता पाळतो अथवा लोकशाहीच्या असलेल्या दबावामुळे ती पाळाविच लागते, आणी पाक च्या बाबतीत नितीमत्ता हा शब्दच वापरायचा का नाही हाच मोठा प्रश्न आहे.
26 Aug 2013 - 9:03 pm | धमाल मुलगा
लाख मोलाची गोष्ट बोल्लासा बाबा तुमी! सगळ्याच बाजूंनी निरनिराळ्या प्रकारचा रेटा परिस्थितीत जर उलथापालथ घडवणार असेल तर अशा वेळी गांडूळासारखं बसल्याजागी वळवळत राहणं म्हणजे आपल्याच हातानं आपल्या पायावर कुर्हाड मारुन घेणं ठरतं.
आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात कु णी ही धुतल्या तांदळासारखं स्वच्छ असण्याची अपेक्षा करणं म्हणजे शुध्द वेडगळपणा आहे. हे जे प्रकार केले जातात त्याला स्ट्रॅटेजिक अॅक्तिव्हिटिज म्हणतात आणि त्यांशिवाय आपण स्वतः सुरक्षित राहणं अवघड असतं. कधी निर्णय चुकतात कधी बरोबर येतात...
26 Aug 2013 - 10:28 pm | अत्रुप्त आत्मा
बघणार...!
26 Aug 2013 - 11:19 pm | अनुप ढेरे
पण पहिला भाग वेगवान बनवण्याच्या नादात घाई घाईमध्ये उरकल्यासारखा वाटतो. मध्यंतरानंतर मात्र एकदमच भारी आहे. चित्रपटाबद्दल एक चांगली गोष्ट म्हणजे त्यांनी अमुक एकाची बाजू चांगली किंवा अमुक एक बाजू वाईट असे जजमेंटल काही दाखवले नाहीये. त्यांनी जे काही घडलं त्या पार्श्वभूमीवर फक्त एक कथा सांगितली आहे.
26 Aug 2013 - 11:58 pm | अग्निकोल्हा
विषेशतः पहिलाभाग (व हाणामारिचे प्रसंग) युध्दानुभव अजिबात न वाटता डोक्युमेंटरी वाटत राहते बहुदा एडिटरचा दोष म्हणुया कारण ब्लॅक हॉक(सर्वोत्कृष्ट एडिटिंगचे ऑस्कर ) अथवा हर्ट लॉकर बघितल्यावर त्यातिल्या तांत्रिक सफाइसोबत तुलना होतेच. सेकंडहाफ मात्र चित्रपट माध्यम म्हणून आवश्यक असलेलि नाट्यमयता व रंगत व्यवस्थित भरतो, इतकं की शेवटचा प्रसंग फॅन फिक्शन मानत बदलला जातो की काय याची शंका यावी.
(होय चित्रपट मनोरंजक बनवायला त्यात इतिहास बदलता येतो आणि इंग्लोरिअस बास्टर्डमधिल हिटलर वध हे याचे उत्तम उदाहरण आहे)
26 Aug 2013 - 11:26 pm | अवतार
केवळ एक भाग आहे. युद्ध झाले नाही म्हणून रणनीती आखण्याचे कोणी सोडत नाही. औरंगझेब कधी ना कधी सर्व शक्तिसमेत दक्षिणेत येणार ही अटकळ शिवाजी महाराजांनी दहा बारा वर्षे आधीच बांधली होती. त्या वेळी माघार घ्यावी लागली तर सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी जिंजीपर्यंत राज्य विस्तार करून ठेवला होता. अलीकडेच युएन सिक्युरिटी कौन्सिल मध्ये भारत सरकारने श्रीलंकेच्या विरोधात मतदान केले ही देखील रणनीतीच आहे.
राजकारण हीच मुळात दलदल आहे. त्यात उतरल्यावर ज्यांच्या कपड्यांवर कमी डाग आहेत ते निष्पाप आणि जास्त डाग आहेत ते पापी अशी मांडणी करणे हे निवडणुका जिंकण्यासाठी सोयिस्कर असले तरी प्रत्यक्षात निरुपयोगी आहे. तत्वांची पाठराखण करणे हे राजकारणात दाखवायचे दात आहेत. राजकारणाचा मुख्य हेतू जे ताब्यात आहे ते राखणे आणि कमीत कमी नुकसान सोसून अधिक मिळवण्याचा प्रयत्न करणे हा आहे.केवळ तात्विक मांडणी करता येत नाही म्हणून हातातले सोडण्याचा मूर्खपणा राजकारणात होत नसतो.
राजकारण हे तत्वांसाठी किंवा हक्कांसाठी नसून राष्ट्रीय स्वार्थासाठी केले जाते. राष्ट्रीय स्वार्थ हा त्या देशातील राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या जनतेच्या आकांक्षांचा परिपाक असतो.
काश्मिरी हिंदूंवर अन्याय होतो हे सत्य सांगतांना श्रीलंकेत तामिळी हिंदूंवर देखील अन्याय होतो हे तेवढ्याच जोरकसपणे मांडले जात नाही. या देशातील बरेच घटक खऱ्या अर्थाने स्वत:ला आजही राष्ट्रीय प्रवाहात विलीन करायला तयार नाहीत. एखाद दुसरा घटक असे वागत असेल तर त्याला राष्ट्रद्रोही ठरवता येते. पण राष्ट्रीय प्रवाहापासून लांब जाणाऱ्या घटकांची संख्या जर वाढत चालली असेल तर हा राष्ट्रीय प्रवाह संकुचित होत चालला आहे का याचा विचार करणे अत्यावश्यक ठरते. प्रत्येक ठिकाणी सैन्य तैनात करणे हा तोडगा असू शकत नाही. राष्ट्र हे जनतेच्या इच्छेवर टिकते. सैन्याच्या शक्तीवर नव्हे.
27 Aug 2013 - 12:15 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१००%
यासंदर्भात एका शेजारी राष्ट्राच्या नागरिकाने खाजगीत केलेली स्पष्टोक्ती आठवली: "आमचे अतिरेकी तुमच्या देशांतर्गत जितके नुकसान करतात त्यापेक्षा जास्त तुमचे "सो कॉल्ड मानवतावादी विचारवंत" राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर तुमचे नुकसान करतात... आणि ते सर्व आम्हाला फुकटात मिळते !"
27 Aug 2013 - 12:33 pm | सुनील
दुसर्याच्या बोलण्यावर लगेच इतका विश्वास ठेऊ नका हो राजेसाहेब!
बाकी त्यांचे अतिरेकी तूर्तास आपल्यापेक्षा त्यांचेच जास्त नुकसान करताहेत, हे त्याने सांगितले नसेलच तुम्हाला! ;)
27 Aug 2013 - 1:26 pm | डॉ सुहास म्हात्रे
बाकी त्यांचे अतिरेकी तूर्तास आपल्यापेक्षा त्यांचेच जास्त नुकसान करताहेत, हे त्याने सांगितले नसेलच तुम्हाला!
बादवे, माझा मुद्दा आपलेच लोक आपल्या देशाचे कसे नुकसान करतात याबाबत होता. त्यांचे लोक त्यांचे काय करतात याबाबत नव्हता.त्यांच्या अतिरेक्यांनी त्यांच्या देशात अतिरेकी कारवाया केल्या तर त्यामुळे आपल्या देशातले लोक आपलेच नुकसान करतात ते योग्य ठरते असे तुम्हाला म्हणायचे आहे काय? म्हणजे, ते नाही का स्वतःच्या पायावर गोळी मारून घेत, मग आपणही आपणही आपल्या पायावर कुर्हाड मारून घेतली तर काय बिघडले असे म्हटल्यासारखे वाटत नाही काय?
आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे जे वाक्य मी उद्धृत केले होते ते "कोणी कोणावर विश्वास ठेवण्यापेक्षा" जास्त "जगजाहीर सत्य आहे"... मुद्दा हा की "ते तुमच्या तोंडावर सांगूनही मला काही फरक पडणार नाही, ते तसेच चालूच राहील", इतका ठाम विश्वास त्यातून दिसतोय हे जास्त महत्वाचे. अर्थात शहामृगासारखे तोंड जमिनीत खुपसून सगळे आलबेल आहे असे म्हणायचे असले, तर... चालू द्या.
दुसर्याच्या बोलण्यावर लगेच इतका विश्वास ठेऊ नका हो राजेसाहेब!
बादवे... मी कोणत्याही एका राजकीय पक्षाचा समर्थक नाही... माझ्या बुद्धीने दिसलेल्या सगळ्या चुकाना चुका म्हणतो, सगळ्या चांगल्या कामांना चांगले म्हणतो... मग ते कोणत्या व्यक्तीने / पक्षाने केले हा मुद्दा मला गौण असतो... या सगळ्यांपेक्षा देश कितीतरी पटींनी जास्त महत्वाचा असे समजतो. गैरसमज नसावा :)
27 Aug 2013 - 7:00 pm | सुधीर
"ना मनोरंजक गाणी, ना कॉमिक रिलीफ ना अंगप्रदर्शन" हे अगोदर वृत्तपत्रात वाचलं होतं, म्हणून बघावासा वाटत होता पण जॉन अब्राहम मुळे चित्रपटावर डाउट खाऊन होतो. परीक्षण वाचून तीन तास वाया जाणार नाहीतसे वाटते. इतर मिपाकरही चित्रपट कसा वाटला ते सांगतीलच.
27 Aug 2013 - 8:56 pm | Dipankar
जेंव्हा आपले ५ जवान मारले गेले त्या आधी भारतीय सेना ने पाक व्याप्त काश्मीर मध्ये घुसून ४ आतँकवाड्यांची गाठडि वळली
चार अतिरेकी पाकचे मारले म्हणून आपल्याला फारच वाईट वाटते आहे, कोणीच १०० % शुद्ध नसते पण नियत नावाची काही गोष्ट असते त्यात पाकिस्तान बसते असे वाटत नाही
28 Aug 2013 - 11:23 am | कपिलमुनी
धाग्याचा काश्मिर झाला..
चित्रपटासाठी दुसरा धागा काढायला लागतोय वाटत :)
28 Aug 2013 - 7:33 pm | मी-सौरभ
सहमत
28 Aug 2013 - 12:06 pm | llपुण्याचे पेशवेll
हा राष्ट्रीय गर्व काय प्रकार असतो बुवा?
28 Aug 2013 - 8:39 pm | आदूबाळ
गर्व आहे मला मराठी असल्याचा.
त्यातला गर्व हो श्रीमंत.
5 Sep 2013 - 5:32 pm | llपुण्याचे पेशवेll
मग तो गर्व नाही तो अभिमान असतो मराठीत. कारण गर्वाचे घर खाली असेच म्हटले जाते मराठीत.
5 Sep 2013 - 9:54 pm | डॉ सुहास म्हात्रे
गर्व आहे मला मराठी असल्याचा.
हे हिंदीयुक्त मराठी झाले !मराठी "अभिमान" = हिंदी "गर्व"
मराठी "गर्व" = हिंदी "घमण्ड"
28 Aug 2013 - 12:12 pm | llपुण्याचे पेशवेll
चित्रपट हे मॅक्रो पातळीवर नसले तरी माइक्रो लेवल ला खूप मोठे बदल घडवून आणू शकतात हे माझे मत. एसी कॅबिन मध्ये बसून भरल्या पोटी भारताने पाकिस्तान वर त्वरित हल्ला चढवून पाकिस्तान नष्ट करावा अशी स्टेटस फेस्बूक वर अपडेट करणार्यांपैकी काही लोका ना तरी युद्ध हे किती वाईट असते आणि आपले काहीच स्टेक वर नसताना प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढणार्याला किती तरी गमवावे लागते याची जाणीव होऊन त्यानी युद्धखोरीची वांझ भावना बदलली तरी मद्रास कॅफे हा १०० कोटी कमावणार्या इतर चित्रपट पेक्षा यशस्वी होईल.
यातून काय समजायचे ते समजले. असो.
29 Aug 2013 - 3:11 pm | निनाद मुक्काम प...
एसी ऑफिस मध्ये बसून युद्धाची भाषा ह्या मजकुराची, सहमत . निदान हा सिनेमा पाहून तर असे स्टेटस लिहिणाऱ्या लोकांना ह्यापुढे अश्या लिहिण्याच्या मागील पोकळपणा जाणवेल.
ज्या दिवशी पाकिस्तान हा अण्वस्त्र सज्ज झाला त्याच दिवशी भारत व पाकिस्तान चा पारंपारिक युद्धाचा मार्ग निकाली लागला ,कारगिल च्यावेळी काय घडले
काही दिवस युद्ध चालले , दोन्ही देशाच्या अर्थ व्यवस्थेवर ताण पडला , जवानांचे बळी गेले. शेवटी अण्वस्त्र हल्ला होऊ नये म्हणून क्लिंटन ने मध्यस्थी केली.
ह्यात आपण व पाकिस्तान ने नक्की काय मिळवले व काय गमावले ,
एका अमेरिकी सैनिकी तज्ज्ञाचं तू नळीवर भाषण ऐकले,
त्याच्यामते १०० हून जास्त अण्वस्त्रे असलेल्या पाकिस्तान ने ती देशात सर्वत्र पसरवून ठेवली आहेत व त्यांचा रोख प्रथम ज्यू राष्ट्र व मग भारतावर आहे , ह्यामुळे पाकिस्तानी कोणत्याही अण्वस्त्र केंद्रावर कोणीही हल्ला केला तरी त्या १०० अन्वस्त्राच्या पैकी कोणतीही एक आपले लक्ष्य गाठू शकते ,
तेव्हा हल्ल्याने पाकिस्तान अण्वस्त्र मुक्त होणे नाही ,
ह्यामुळे युद्ध खोरी चे धोरण अमेरिकेची शस्त्र व्यापार
चालविण्यासाठी उपयुक्त ,पूरक असेल , भारताला हा खेळ परवडण्यासारखा नाही ,
मग पाकिस्तानी हल्ल्यांचे काय करायचे ह्या प्रश्नावर
सोप्पे उत्तर म्हणजे , ते ज्या पद्धतीचे युद्ध करतात त्याच पद्धतीचे छुपे युद्ध त्यांच्यावर लादायचे ,
ह्या सिनेमातून हेर संस्था त्यांचे कोवर्ट ऑपरेशन ह्यावर उत्तम प्रकाश टाकला आहे ,
गुजराल पंतप्रधान असतांना गुडविल म्हणून त्यांनी रॉ चा रोष पत्करून पाकिस्तानमधील रॉ च्या सर्व कोवर्ट मोहिमा हट्टाने थांबविल्या.
अनेक वर्ष अश्या मोहिमा राबविल्या जातात व त्या उभ्या करतांना अनेक गोष्टी पणाला लावल्या जातात. मात्र त्यावेळी केलेली चूक परत घडली नाही हेच काय ते आपले नशीब
रॉ व आयबी ने अश्या मोहिमा पाकिस्तानात अधिकाधिक राबविल्या पाहिजे ,
बलुचिस्तान मध्ये भारतीय हस्तक्षेप ह्या झरदारी ह्यांच्या आरोपावर भारतीयांनी अजिबात आडकाठी घेतली नाही व सामान्य जनतेने असे होत असेल तर करणे उचित नाही अशी महात्म्यांची भूमिका सुद्धा घेतली नाही ,
मुळात
ह्या सिनेमावर काही तामिळ संघटनांनी आक्षेप घेतला व तो योग्य होता , सिनेमा एकांगी बनवला गेला ,
ही संघटना रॉ ने उभी केली ह्याचा पुसटचा सुद्धा तेव्हा उल्लेख नाही आहे , व शांती सेनेच्या अपयशाचे प्रमुख कारण म्हणजे
लिट्टे शी सहानुभूती दाखवणारे व त्यांना समर्थन करणारे भारतात राजकीय नेते , लष्करी अधिकारी ते अगदी रॉ मध्ये सुद्धा वरिष्ठ अधिकारी होते , त्याचमुळे त्यांनी बिभीषणाची भूमिका पार पडली , ह्या सिनेमातील रॉ चा एक अधिकारी हनी ट्रेप ला बळी पडून देशाची गद्दार होतो असे दाखवले आहे ,
हेर जगतात हनी ट्रेप हे एखाद्या हेराला गद्दार करण्यासाठी सर्वात प्रभावी अस्त्र आहे ,, हि वस्तू स्थिती मान्य केली तरी
तरी ह्या सिनेमात हाच गद्दार त्या संघटनेला सहानुभूती असल्याने गद्दार झाला असे दाखवले असते तर सिनेमा खर्या अर्थाने समतोल झाला ,
माझ्या परिचयात लंडन व जर्मनीत अनेक तामिळ निर्वासित माझे चांगले स्नेही बनले , ह्यातले सामान्य नागरिक कोण , व एकेकाळी संघटनेची पट्टी डोक्यावर बांधणारे कोण हे न उलगडणारे कोडे आहे.
ज्यांनी आमच्या हाती शस्त्रे दिली त्यांनीच आम्हाला संपविण्यासाठी सैन्य का पाठवले , हा त्यांचा प्रमुख प्रश्न.
आणि काय गंमत होती , त्याचवेळी अनेक अफगाण निर्वासित आमच्या हॉटेलात काम करायचे , त्यांनी सुद्धा नेमका हाच प्रश्न विचारला होता . आता
रॉ आणि लिट्टे व आय एस आय व तालिबान एवढाच काय तो फरक होता.
बांगलादेशच्या संबंधी तू नळीवर के जी बी चा एका माजी हेराची मुलाखत पहिली , त्याने बांगला देश निर्मिती हे
के जी बी चे कारस्थान असून ह्यात पैसा व शस्त्रे भारतीय हेर संस्थेला पुरवली गेली असा उल्लेख केला ,
कलकत्ता येथील रशियन दूतावासात शस्त्रांचे साठे त्याने पहिले असल्याचे सुद्धा सांगितले ,
पैसा व शस्त्रे त्यांची असली तरी भौगोलिक स्थिती पाहता त्यांना रॉ ची मदत घेणे अनिवार्य होते ,
नुकत्याच जन्मलेल्या रॉ ला अश्या मोठ्या कोवेर्ट भूमिकेतून खूप काही शिकता आले ,
व रशियाचे दुर्दैव असे की अफगाण मध्ये त्यांच्या विरुद्ध अमेरिकेनं आय एस आय चा असाच वापर केला.
ह्या सिनेमात राजीव गांधी ह्यांच्या हत्येमागील एक कारण
परकीय कंपन्या , हेर संस्था , देश होते असे दाखविले ते फारच सूचक होते ,
राजीव ह्यांच्यावर रशियाचा प्रभाव , भारतासारखी मोठी बाजारपेठ
व ती रशियाच्या पतनानंतर मुक्त होणे हे परकीय कंपन्यांच्या साठी हिताचे होते , असा उल्लेख सुद्धा सिनेमात आहे ,तो ह्या सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर नेतो.
राजीव गांधी ह्यांच्या मृत्युनंतर त्यांच्या मंत्री मंडळातील
माजी परार्ष्ट्र मंत्री नरसिंह राव ह्यांनी पंतप्रधान झाल्यावर अभूतपूर्व अशी भारतीय परार्ष्ट्र धोरण बनवणे ज्यात लुक वेस्ट चा नारा व ज्यू राष्ट्रांशी संबंध व अर्थ व्यवस्था मुक्त करणे अश्या अनेक घटना पहिल्या की सिनेमात काही वाक्यांचा संदर्भ लक्षात येतो. एरवी राजीव ह्यांच्या कारकिर्दीत ह्याच नरसिंह राव ह्यांच्या मनात असून सुद्धा त्यांना लुक वेस्ट चा नारा देणे शक्य झाले नाही , आज ह्याच निर्णयाची आपण मधुर फळे चाखत आहोत , रशियाला न सोडता आज अमेरिका आपले मित्रराष्ट्र आहे ,
ज्यू राष्ट्राने भारताशी अनेक आघाड्यांवर सहकार्य केले आहे.
आज रशिया नंतर तेच आपले प्रमुख शस्त्र विक्रेते आहेत,
माझ्या साठी महत्त्वाचा मुद्दा ह्या सिनेमा पाहिल्यावर एवढाच उरला
की भारत स्वतंत्र झाल्यापासून बंदिस्त अर्थव्यवस्थेत ९० च्या दशकाच्या सुरूवातीपर्यंत आपण केलेली प्रगती व
१९९१ ते आजतागायत केलेली प्रगती त्यात एक मध्यम वर्गीय म्हणून १९९१ पासून आजतागायत माझ्या पिढीची झालेली भरभराट
महासत्तांच्या प्रमुख माझ्या देशात येउन नोकर्या मागणे.
व अश्या अनेक गोष्टी पहिल्या की एकच प्रश्न डोक्यात येतो
हीच मुक्त अर्थव्यवस्था १९९१ पेक्ष्या १९५१ साली भारतात अंगीकारली असती तर भारत कसा असता
आणि असाही प्रश्न डोक्यात येतो समजा
१९९१ साली ही मुक्त अर्थव्यवस्था जर आपण न स्वीकारता जुने मॉडेल आजतागायत राबवीत असतो तर आज भारत कसा असता.
29 Aug 2013 - 3:46 pm | कपिलमुनी
छान प्रतिसाद
ह्या विषयावर एक स्वतंत्र धागा काढाव अशी विनंती आहे ..त्यावर अधिक साधक बाधक चर्चा होइल ..
29 Aug 2013 - 4:14 pm | निनाद मुक्काम प...
Yuri Bezmenov, a Russian born, KGB trained subverter tells about the influence of the Soviet Union on Western media and describes the stages of communist takeovers. This interview was conducted by G. Edward Griffin in 1984.
ह्या इसमाची पूर्ण मुलाखत येथे उपलब्ध आहेत.
भारताविषयी ममत्व असलेल्या व भारतात के जी बी साठी काम केले असल्याने के जी बी च्या भारतात कारवाया , व अमेरिकेविरुद्ध कारवाया ह्यांच्या विषयी विस्तृत माहिती देतो ,
भारतीय विचारवंत , कॉम्रेड जे रशियात दौऱ्यावर यायचे त्यांना
के जी बी पोलिटिकल prostitute का म्हणायचे.
ह्यावर प्रकाश पाडतो.
1 Sep 2013 - 12:16 am | धर्मराजमुटके
निनाद,
कुठून शोधता तुम्ही असे कंटेंट्स ? पाताळयंत्रीपणा म्हणजे काय याचा रशियाहून दुसरा नमुना शोधूनही सापडणार नाही असाच विचार ही मुलाखत पाहून आला.
आपणच नाही तर अगदी अमेरीकन्सही रशियाच्या हातातले बाहूले आहेत की काय असा विचार आल्याशिवाय राहत नाही.
मात्र रशियाच्या विघटनानंतर परिस्थीती बदलली असेल अशी भाबडी आशा आहे.
5 Sep 2013 - 9:19 am | निनाद मुक्काम प...
धर्मराजमुटके
रशिया ने त्यांच्या कह्यातील देशांना जेवढे आपल्या जाळ्यात ओढले किंवा अमेरिकेला ओढण्याचा प्रयत्न केला तेवढाच प्रयत्न अमेरिकेने सुद्धा केला ,
कोल्ड वॉर ह्यालाच तर म्हणतात.
मात्र अमेरिकेची जगभर पसरलेली प्रसारमाध्यम व हॉलीवूड ला रशियाकडे तोड नव्हते.
के जी बी संपली
मात्र सी आय ए ला मोकळे रान मिळाले.
आज भारतात सी आय ए चे कितीतरी हस्तक प्रसार माध्यमे ते राजकीय नेत्यांच्या स्वरुपात असतील ,
ही क्लिप १९८४ मध्ये ह्या हेराने अमेरिकेत दिलेल्या मुलाखतीची आहे , ह्या क्लिप मधील त्यांचे सर्वात महत्त्वाचे विधान म्हणजे
जगातील कोणतीही ग्रास रूट चळवळ ही उस्फूर्त नसते , तर एक नियोजनबद्ध कारवाई असते.
सध्या अरब लीग मध्ये झालेली चळवळ असो किंवा आमच्या जर्मनीत झालेली सोलर एनर्जी ची असो त्यामागे अनेकांचे हात होते म्हणूनच
जर्मनी मधील ह्या आंदोलनावर लेख लिहितांना शेवटी मी अशी एक चळवळ लवकरच भारतात होईल असे लिहिले होते व एका वर्षाच्या नंतर लोकपाल ची चळवळ उभी राहिली .
पण आपले राजकारणी त्याला पुरून उरले.
15 Sep 2013 - 10:52 pm | अशोक पतिल
निनाद अप्रतिम प्रतिसाद !
आजच मद्रास कॅफे बघीतला . असे सिनेमे भारतामध्ये फार कमी बनले आहेत.
तुमच्या सविस्तर प्रतिसादात इन्सायडर स्टोरी म्हणजे काय असते ..
ते कळले. आज या युगात हे सर्व सामान्य नागरीकाला हे समजावयाला हवेच.
आज खुद्द अमेरीकेत नागरीक सिरीयन युद्धाला विरोध करतात ते हे त्यानां आता कळते म्हणुनच .
16 Sep 2013 - 4:50 am | निनाद मुक्काम प...
अशोक पाटील
आता कुठे भारतात अश्या पद्धतीचे सिनेमे बनविण्यात सुरवात झाली आहे ,
आता भारताच्या छोट्या पडद्यावर इतिहास घडवणारी भव्य मालिका २४ ही मालिका येत आहे . अमेरिकेत एका दिवसात घडणाऱ्या दहशतवादी घटना त्यामागील दहशतवादी संघटना ,ह्या संघटनेच्या नावाखाली आपला स्वार्थ साधणारे अमेरिकन राजकारणी अश्या गोष्टींचा उहापोह करणारी काल्पनिक मालिका अमेरिकेतच नाही तर जगभरात लोकप्रिय झाली
तिचे हक्क अनिल कपूर ज्याने ह्या अमेरिकन मालिकेत काम केले होते त्याने व कलर्स ने विकत घेतले आहे.
व आता ह्या किंवा पुढच्या महिन्यात भारतात हि मालिका सुरु होईल. हिचे आठवड्यात एका तासाचे भाग म्हणजे प्रेक्षकांना पर्वणी असतील ,
16 Sep 2013 - 4:22 pm | अग्निकोल्हा
२४ नेहमीच अतिरंजीत वाटली, अमेरिकेच्या आंटि टेररिस्ट स्कॉडचे लोक (एकमेकांसोबतही) इतके विक्षिप्त वागतात हे पाहुन तुफान विनोदी या द्रुष्टीकोनातुनच ही मालिका बघितल्या आहे. ज्यॅक बाउर म्हणजे जणू बिगर दॅन वन म्यान आर्मी. अगागा! :D
अवांतर :- तसही भारतिय निर्मीतिमुल्ये बघता हिला कितपत न्याय मिळेल ही उत्सुकता आहेच.
16 Sep 2013 - 8:50 pm | जॅक डनियल्स
अग्निकोल्हा पूर्णपणे सहमत !
"प्रत्येक" गोष्टीचा शेवट गोड दाखवला की त्यातील सत्य निघून जाते.
18 Sep 2013 - 6:11 am | निनाद मुक्काम प...
छोट्या पडद्यावर इतिहास ह्या अर्थी लिहिले की सासू सुनांच्या मालिकेत हि मल्टी स्टारर मालिका जिचे हक्क तब्बल दीडशे कोटी देऊन घेतले आहेत. व सध्याचा स्टार दिग्दर्शक अभिनय देव हा हि मालिका दिग्दर्शित करणार आहे , आपल्याकडे अजून सिनेमाचे बजेट अपवाद वगळता १०० करोडच्या वरती जात नाही ,
आता भारतीय मालिका म्हटले म्हणजे ते ओरीजनल २४ ला कितीसा न्याय देऊ शकतो हा प्रश्न आहे पण सध्याच्या छोट्या पडद्यावर ज्या मालिका आहेत त्यांच्या तुलनेत ही बरीच उजवी असेल
आणि राहिला प्रश्न अमेरिकन २४ चा तर त्यात ती मालिका असल्याने अतिरंजित असणे स्वाभाविक आहे , पण ह्या मालिकेचे कौतुक म्हणजे आपल्याच प्रशासनात आणि समाजात पैसा व सत्ता , ह्यांचा वापर अमेरिकन नेते , अध्यक्ष , व्यापारी करून अमेरिकन जनतेला दहशतवादाच्या बागुलबुवा दाखवून आपले उखळ कसे पांढरे करतात.
एका सिझन मध्ये त्यांनी असे दाखवले आहे की अमेरिकेतील लॉबी ला मुस्लिम राष्ट्रावर हल्ला करायचा असतो. म्हणून ते अमेरिकेत त्या राष्ट्रांच्या एका निरपराध मुस्लिम माणसाच्या घरात तो दहशतवादी असल्याचे पुरावे जमवून त्याच्या भावाला ओलिस धरून त्या माणसाला बाँब ने भरलेली पिशवी देऊन भूयारी रेल्वेत बसवतात.
निदान त्या मालिकेच्या धाडसाचे कौतुक करायला हवे , अमेरिकन जनतेला असे दाखवून हि मालिका यशस्वी करून दाखवली.
6 Nov 2013 - 12:56 pm | म्हैस
AC office मध्ये बसणार्यांना पाकिस्तानी दहशतवाद नष्ट व्हावासा वाटणं हा गुन्हा आहे का?
अण्णा चे लोक श्रीलंकेसाठी तामिळी दहशतवादी होते. परंतु त्यांच्या ह्या वागण्याला श्रीलंका जबाबदार नाही का?
श्रीलंकेत तामिलींवर जे अमानुष अत्याचार होत होते त्याच काय?
भारताच्या शांती सेनेचं काम काय होत? तामिलींवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी भारताने प्रयत्न का केले नाहीत?
श्रीलंकेतल्या दहशतवादाची अखेर करण्यामध्ये भारताने एवढी शक्ती वाया घालवण्यापेक्षा आपल्याच देशातला पाकिस्तानी दहशतवाद संपवण्यावर लक्ष द्यावं हि AC office मध्ये बसणाऱ्या लोकांची अपेक्षा रास्त नाहीये का?