(करमणूक)

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
11 Sep 2008 - 1:35 am

सन्जोपरावांची 'मिरवणूक' बघून आमची करमणूक झाली आणी हे विडंबन प्रसवले! ;) गणपतीबाप्पा मोरया!! :B

असं कवितेशी इतकं तुटक राहून कसं चालेल
म्हणून चष्म्याची काच खाली घेतली
आणि लेखणीने ठेकाही धरला सूक्ष्म
एका अनोळखी नवकवीच्या कवितेवर

कवी आहेत, थोडी कविता करायचेच
म्हणून कौतुकाचाही प्रयत्न केला
काही बिचकणारी कडवी बघून
जरा कागदाचे कोपरे दुमडूनच
पण तरीही

आणि उलट्या पडलेल्या पेपरातल्या
एका मित्रांसह नवकवीलाही
हसून दाद दिली ओळखीची
बिचारा असेल कविगणांना
कवितांची रास दाखवायला आला
अशी समजूत काढत
स्वतःचीच

एरवी असतोच की आपण दर्दी
रसिक आणि काव्यप्रेमी
काही कविता अशाही
यमक, मात्रा, वृत्त यांचा संबंध नसलेल्या
असं म्हणत खोडून टाकली
ओघळणारी मुक्ताफळं
शेवटी कविता म्हणजे तरी काय
वगैरे वगैरे

आणि एका प्रतिक्रियेनं
हादरलो अचानक अंतर्बाह्य
टीकेचा एक ढग
विडंबनावर कोसळेपर्यंत
एक ललकारीही आली कानाशी, अंगाशी
गुरख्यांची, 'किंचित' नवकवींचीही

काच पुसता पुसता
पहिला सलाम केला तो
आपल्या बंडखोर बुद्धीभेदी वगैरे नवकवितेला
आणि दुसरा
खुद्द कवीलाच

म्हणालो मनापासून
विघ्नकर्त्या
ही उरलीसुरलीही नाळ
असलेली कवितेशी
कापून टाक बाबा
पुढच्या काव्यापर्यंत

मग लिही लवकर
किंवा तुला हवं तेंव्हा
'रंगाचं' विडंबन
तयार आहे

चतुरंग

कवितामुक्तकविडंबनप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

बेसनलाडू's picture

11 Sep 2008 - 2:32 am | बेसनलाडू

झाली. विडंबन असले तरी काहीसे गंभीर आहे. छान!
(आस्वादक)बेसनलाडू

सहज's picture

11 Sep 2008 - 7:00 am | सहज

विडंबन आवडले.

मूळ काव्यातील एकंदर व्यथेशी सहमत देखील.

सर्किट's picture

11 Sep 2008 - 7:27 am | सर्किट (not verified)

मिपाच्या चालकांशी खुन्नस घेणार्‍या सदस्यांचे साहित्य प्रकाशित करायचे नाही, चुकून केल्यास त्याला प्रतिसाद द्यायचा नाही, असे मिपाकरांनी आजवर पाळलेले धोरण आहे.

त्यामुळे त्यांच्या कवितांचे विडंबन येथे प्रकाशित करण्याविषयी काय धोरण आहे हे कळल्याशिवाय मत कसे प्रकाशित करावे बॉ ?

-- सर्किट

चतुरंग's picture

11 Sep 2008 - 8:20 am | चतुरंग

चालकांशी कोणाची खुन्नस ही चालक आणि ती व्यक्ती ह्यांच्यातली वैयक्तिक आणि खाजगी बाब आहे असे माझे मत आहे. त्याचे जाहीर प्रदर्शन मिपा वर होऊन इथले स्वस्थ्य बिघडू नये हे बरोबर.
किंवा तशाप्रकारचे आपापसात चिखलफेक करणारे साहित्य इथे येऊ नये हेही बरोबर. एक संपादक ह्या नात्याने मला ह्याची पूर्ण जाणीव आहे.
मी केलेले विडंबन किंवा मूळ काव्य हे कोणत्याही बाजूने ह्या कुठल्याही वादांच्या गोष्टीशी संदर्भ राखून आहे असे मला वाटत नाही. ती एक स्वतंत्र कविता आहे आणि त्यातल्या विचारांना विडंबनाद्वारे एक वेगळे परिमाण देण्याचा हा प्रयत्न आहे इतकेच.

(तात्या - माझे वरील स्पष्टीकरण योग्य वाटत नसल्यास हा धागा उडवून टाकलात तरी चालेल!)

चतुरंग

विसोबा खेचर's picture

11 Sep 2008 - 12:52 pm | विसोबा खेचर

रंगा,

उत्तम विडंबन रे! क्या बात है...

तात्या.

अवांतर - मला हे विडंबन इथे टाकण्यात काहीच गैर वाटत नाही.

रंगाच्या,

ती एक स्वतंत्र कविता आहे आणि त्यातल्या विचारांना विडंबनाद्वारे एक वेगळे परिमाण देण्याचा हा प्रयत्न आहे इतकेच.

या म्हणण्याशी मी सहमत आहे....

बाकी, मिपाच्या चालकांवर खुन्नस ठेवून असणारे अनेक आहेत. एवढंच नव्हे - तर मिपाच्या चालकांवर, मिपाच्या इतर काही सन्माननीय सदस्यांवर, आणि मिपावर मुक्त गरळ ओकणारी काही मंडळी परप्रकाशीत ब्लॉग्स्च्या द्वारे आजही मिपा आणि मिपाकराच्या जिवावर जगू पाहात आहेत, आपले आंतरजालीय अस्तित्व टिकवू पाहात आहेत! तेव्हा खुन्नसचं विशेष काही नाही! :)

तात्या.

सर्किट's picture

11 Sep 2008 - 9:35 pm | सर्किट (not verified)

रंगा,

विडंबन आवडले.

-- सर्किट

आजानुकर्ण's picture

11 Sep 2008 - 9:38 pm | आजानुकर्ण

विडंबन चांगले जमले आहे.

आपला,
(रसिक) आजानुकर्ण

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Sep 2008 - 9:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दुवा दिला नसता तर, कदाचित एक स्वतंत्र आशयाची सुंदर रचना वाटली असती.
असो, मुळ कवितेला न्याय दिला आहे.

चतुरंग's picture

11 Sep 2008 - 9:58 pm | चतुरंग

दुवा दिला नसता तर,...

विडंबन म्हटले की दुवा आलाच!!

चतुरंग

लिखाळ's picture

11 Sep 2008 - 9:50 pm | लिखाळ

चतुरंगराव,

बिचारा असेल कविगणांना
कवितांची रास दाखवायला आला
:) विडंबन मस्तच झाले आहे.

दोनही कविता आणि त्यावरचे इकडचे, 'तिकडचा' आता उडालेला प्रतिसाद वाचूनही करमणूक झाली.

काही प्रतिसाद पंख लाउनच येतात
संकेतस्थळाची उब त्याला उष्मा वाटायला लागते
आणि
ते उडुन जातात.

--(किंचित कवी) लिखाळ.

चतुरंग's picture

11 Sep 2008 - 9:56 pm | चतुरंग

काही प्रतिसाद हे अंड्यासारखे असतात
संकेतस्थळ त्या अंड्यांना उबवते
आणि 'वेळ' येताच विहंग जालावरुन उडून जातात! :)

चतुरंग

ऋषिकेश's picture

12 Sep 2008 - 12:34 am | ऋषिकेश

विडंबन आवडले :) फक्लास!

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

केशवसुमार's picture

12 Sep 2008 - 12:39 am | केशवसुमार

रंगाशेठ,
एकदम झकास विडंबन..आवडले!!
(अस्वादक)केशवसुमार
स्वगतः रंग्याने ही नक्की कुठल्या कवीची मिरवणुक काढली आहे शोधायला हवे..

प्राजु's picture

12 Sep 2008 - 12:43 am | प्राजु

थोडी गंभिरतेची किनार आहे.. आवडली कविता.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

कवटी's picture

12 Sep 2008 - 1:08 am | कवटी

रावांची कविता आणि रंगाशेठचे विडंबन दोन्ही आवडले.
विशेषतः रावांचि कविता सामाजिक आशय बघता उत्तम दर्जाची आहे. (हे मूळ कवितेला प्रतिसाद द्यायचे झाले तर तिकडे अकाउंट उघडा, प्रतिसाद द्या, आणि अनुमतीचि वाट बघा. येवढा द्राविडी करण्यापरास इथेच छान म्हणतो. ) आणि त्याला रंगाशेठने उत्क्रुष्ठ न्याय दिलेला आहे.
केशवाच्या निवृत्ती नंतर रंगा बर्‍यापैकी पोकळी भरून काढतोय. त्याचे अभिनंदन! पु.ले.शु.