कबुतरांची सभा

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
6 May 2013 - 9:15 am

पर्वा एका सरकारी हापिसात
कामासाठी गेलो होतो
आणी नेहमी प्रमाणे वाट बघत
ताटकळत उभा होतो.

कडेला वाटलं माणसं बोलताहेत
पण कबुतरं बोलत होती
कालच्या दिवसात काय काय झालं?
याचे हिशेब तोलत होती

पहिलं दुसर्‍याकडे पाहुन
मिष्किलपणे हसत होतं
आणी त्यांच्या गमती पाहुन
तिसरं मधिच घुसत होतं

काल म्हणे पहिल्याला
आख्खं कणिस मिळलं
पण दुसर्‍यानं धक्का दिला
आणी ते हवेतच गळलं

थोड्याच वेळात कबुतरांची
भली मोठ्ठी सभा भरली
आणी आज चरायला कुठं जायचं?
यावरच पहिली चर्चा ठरली

कुणी म्हणलं किराणा दुकान
आजचा पहिला ठराव आहे
धान्यात दगडं-खायचा
तिथं चांगला सराव आहे.

दुसरा म्हणे सरकारि गोडाऊन
कशाला मोकळं सोडायचं?
पण त्या बेन्या शिपाया देखत
पहिलं पोतं कुनी फोडायचं?

होता होता...चर्चा करता
सकाळचे आकरा वाजले
मग कबुतरांच्या पोटात
कावळे ओरडायला लागले

हळू हळू एकेक जण
बाजु बाजुनी कटायला लागला
त्यामुळेच चर्चेचा तिढा
खर्‍या अर्थानी सुटायला लागला

शेवटी अध्यक्षच खुर्ची सोडून
फर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र करून उडून गेला
परंपरे नुसार सभासदांना
वार्‍या वर सोडून गेला

त्यानंतर विषय एकदाचा
मूळ मुद्याला आला
सगळे म्हणाले,मरु दे चर्चा
दाणे टिपायला चला

सरकारी भाषेतच एक बोलला
कृती कार्यक्रम हाती धरा
चर्चा कसल्या करताय?
उडा दुकानांकडं भराभरा

तेव्हढ्यात सरकारी हापिसातुन
''गुटुरगू गुटुरगू'' ऐकू आलं
आणी मला अंदाज आला...की,
हापिस एकदाचं सुरु झालं.

काम व्हावं म्हणुन गेल्या गेल्या
सायबाला दिला पेश्शल चहा
तेव्हढ्यात खिडकितलं कबुतर म्हणलं,
''दाणे नसतिल तर सावध रहा''...
=================================================================

हास्यकवितासमाजजीवनमानमौजमजा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

6 May 2013 - 9:31 am | प्रचेतस

=)) =)) =))
अगगगगग्गगग्गगगगगा

सुरुवातीची काही कडवी वाचून तिथे उपस्थित असलेल्या भलत्याच कबुतरांवर लिवलंय असं वाटलं. नंतर योग्य उलगडा झाला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 May 2013 - 9:33 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोणताच कशाचा काही उलगडा होत नसल्यामुळे लेखन सॉरी कविता डोक्यावरुन गेली.

-दिलीप बिरुटे

अत्रुप्त आत्मा's picture

6 May 2013 - 9:40 am | अत्रुप्त आत्मा

हम्म्म्म....
सरकारी हापिसातले कर्मचारी आणी त्यांची कामाची साधारण रीत (डेल्ली वर्किंग) कबुतरांच्या अंगावर घतली आहे.

ढालगज भवानी's picture

6 May 2013 - 11:48 am | ढालगज भवानी

छान आहे. हसू आले.

अग्निकोल्हा's picture

6 May 2013 - 3:37 pm | अग्निकोल्हा

जाए वय उडउडके...

ब़जरबट्टू's picture

6 May 2013 - 4:14 pm | ब़जरबट्टू

एखादी कबुत्तरी नव्हती का घोळक्यात ?? smiley

चौकटराजा's picture

6 May 2013 - 4:23 pm | चौकटराजा

बिलाशिवाय दाणे टिपायचं एखादं हाटेल सापडले काय कबुतराना ...... ??

स्पा's picture

6 May 2013 - 4:24 pm | स्पा

अच्चा
असं झालं तर

अत्रुप्त आत्मा's picture

6 May 2013 - 4:42 pm | अत्रुप्त आत्मा

हो..............!!! मग काय करायचं आपण आता? :-p

मग काय करायचं आपण आता?

धीर सोडू नका , काहीतरी मार्ग निघेलच :P

अत्रुप्त आत्मा's picture

6 May 2013 - 5:12 pm | अत्रुप्त आत्मा

ह ल क ट ..स्पा :-p

स्पा's picture

6 May 2013 - 5:13 pm | स्पा

तुमच स्वागत आहे :)

विसोबा खेचर's picture

6 May 2013 - 4:39 pm | विसोबा खेचर

मस्त..:)

तर्री's picture

6 May 2013 - 4:46 pm | तर्री

जाम आवडली.
धान्यात दगडं-खायचा
तिथं चांगला सराव आहे.
मस्त ....श्लेष तथा डबल मिनीग !
काम व्हावं म्हणुन गेल्या गेल्या
सायबाला दिला पेश्शल चहा
तेव्हढ्यात खिडकितलं कबुतर म्हणलं,
''दाणे नसतिल तर सावध रहा''...
सम मस्त गाठली गेली आहे !

लीलाधर's picture

6 May 2013 - 6:27 pm | लीलाधर

मिळुन काय आणताहेत याचीच (वाट) बघणारा लीलाधर :)) :-P :-D

मुक्त विहारि's picture

6 May 2013 - 6:55 pm | मुक्त विहारि

आवडली...

jaypal's picture

6 May 2013 - 7:03 pm | jaypal

गिर्रेबाज हो. ;-)
लगे रोहो. कविता आवडली.

पक पक पक's picture

6 May 2013 - 10:58 pm | पक पक पक

यक्दम्म झक्कास... :)

पाषाणभेद's picture

13 May 2013 - 10:32 pm | पाषाणभेद

आशयपुर्ण कविता आहे आत्माजी

पैसा's picture

13 May 2013 - 10:36 pm | पैसा

कविता आवडली.