अबोलीच्या निमीत्ताने...

नीलकांत's picture
नीलकांत in जनातलं, मनातलं
19 Apr 2013 - 12:45 pm

नमस्कार,
अबोली नावाचा नवा विभाग मिपावर सुरू करायचे ठरले. पाडव्याला याची घोषणा झाली. आता एवढ्यात हा विभाग सुरू होईल.
अपेक्षेप्रमाणे मिपावर याबाबतीत उलटसुलट चर्चा सुरू झाली. मिपावर काही एक नवीन होतंय तर त्यावर मिपाकरांच्या प्रतिक्रिया अपेक्षीत आहेत. काहींना हा विभाग आवडला तर काहींना अजिबात नाही आवडला. काहींनी आपला संबंधच नाही त्यामुळे कोरड्या शुभकामना दिल्यात तर काहींनी विभाग कधी सुरू होतो अशी चौकशीसुध्दा केली. मात्र काही लोकांच्या प्रतिक्रिया जरा मर्यादा सोडलेल्या वाटल्या त्याचे वाईट वाटले. आता त्याचे कारण काय? याच्या खोलात जायला नको. मात्र तरीही काही विचार या निमीत्ताने मांडायचे आहेत.

मिपावर स्त्रीयांना त्यांच्या विषयावर बोलायला तेवढे मोकळे वातावरण नाही असा काहींचा सुर होता. मला असं म्हणायचं होतं की विषय जसा असेल तसा मिपाकर प्रतिसाद देतात. उत्तम विषय असला तर डोक्यावर घेतील आणि नाहीच पटलं तर 'वाढदिवसाच्या शुभेच्छा' देऊन चेष्टा करतील. मिपाची प्रकृती अशीच आहे. मात्र तरी प्रश्न त्यांचा उरतोच, की आमच्या रोजच्या आयुष्यात असं खुप काही असतं जे आमच्यासाठी खुप महत्वाचं असतं मात्र पुरूषांसाठी त्याची काहीच किंमत नसते. किंवा असे काही विषय आहेत की ज्यावर पुरूषांनी बोलणे सुध्दा अपेक्षीत नसते. मात्र मुख्य बोर्डावर अशी सुचना तर देऊ शकत नाही ना, की यावर केवळ निमंत्रीतांनीच बोलणे अपेक्षीत आहे... हे शक्य नाही... मात्र एक शक्य आहे की एक असा कप्पा तयार करता येऊ शकतो जेथे अश्या विषयांवर चर्चा होऊ शकते. अन्य लोकांना या भागात प्रवेश नसेल, कारण हे चर्चा विषय त्यांच्यासाठी नसतील, त्यांना ज्या विषयांशी संबंध नाही किंवा चर्चेत केवळ टर उडवायच्या शिवाय ज्यांना सहभाग देता येणार नाही त्यांना धागा अवांतरात नेण्याची मुभा नको. ह्या एका साध्या विचारावर हा विभाग आहे.

मात्र काल परवा उत्साहात निघालेल्या धाग्यांत जे तारे तोडल्यागेलेत ते वाईट वाटावेत असेच आहेत. त्यात असा विभाग काढायला नको होता इतपत बोलणे किंवा मतप्रदर्शन ठिक आहे, मात्र ज्या संकेतस्थळाच्या व्यवस्थापनाच्या निर्णयाचा निषेध करावासा वाटत असेल त्या संकेतस्थळावर आपण येऊच नये ना ! तसे मात्र नाही, येथे यायचे आणि उगाच राळ उडवत रहायची असा प्रकार हा आहे. मिपा व्यवस्थापन चालवून घेतय... मऊ लागतंय... असा प्रकार हा वाटतोय. मी कधी नव्हे तर एवढा कठोर बोलतोय मात्र यासाठी झालेला वैताग एवढा आहे की असं बोलावं लागतंय.

त्यानंतर ह्या विभागात काहीही गुप्त राहणार नाही असा प्रचार चालला आहे. खरं तर ह्या विभागात गुप्त राहण्यासारखे काहीच नसेल. ह्या विभागात 'त्यांना' वाचनमात्र ठेवावे ज्यांना या विषयात सामान्यतः रस नसतो म्हणून वेगळा विभाग, मग केवळ वाचनमात्रच न ठेवता प्रवेशच नको असा विचार केला. यात अगदी लिंगाधारीत अन्याय कारक रचना वगैरे असे काही नाही. आणि स्त्री- पुरूष समानतेचाही असा काही विचार आवश्यक नाही. कारण ह्या सरळ्या स्त्रीया मुख्य बोर्डावर लिहीणार आहेतच. त्यामुळे हा विभाग हॅक करून दाखवण्याच्या गप्पा करने सर्वथा अनाठाई आहे. स्त्रीयांच्या विशेष विभागात पुरूषांनी येऊ नये असा संकेत आपण ठरवतोय. याउप्पर कुणी घुसखोरी केलीच तर त्या विकृतीला आपण काय म्हणावं ? त्यामुळे ह्या विभागात काय चालतंय याच्याशी अन्य लोकांना काहीही रस असू नये. काही चुकीचं होणार नाही , वातावरण उत्तम रहावं यासाठी संपादक आहेत ते काळजी घेतील. या विभागाबाबत ज्यांना आपला विरोध नोंदवायचा आहे ते मला व्यनि करू शकतात. त्यामुळे माझ्या काही जवळच्या मित्रांना विनंती आहे की काळजी करू नका असा विभाग निघाल्यामुळे काही लागलीच जगबुडी होणार नाही.

ह्याच चर्चेत काही अश्या प्रकारची कागाळी झाली आहे की ज्याने संपादकांना बडवे वगैरे उपमा देण्यात आली आणि त्याला एका राजकीय उल्लेखाचा संदर्भ दिल्याने ते नकारात्मक उद्द्येशाने बडवे बोलल्यासारखे होते. हे अत्यंत चुकीचे आहे. आणि अजिबात मान्य नाही. संपादक आपल्यातीलच एक आहेत. आपला वेळ ते आपल्या मिपासाठी देतात. त्यांच्या कष्टांची कल्पना मला पुर्णपणे आहे. त्यामुळे त्या कमेंटवर व्यवस्थापन कारवाई तर करेलच मात्र अन्य सर्व सदस्यांना पुन्हा एकदा सुचना देतो की संपादकांविषयी काहीही बोललेलं खपवून घेणार नाही.

काही लोक कायम मिपावर येतात ते मिपाविषयी, मिपा व्यवस्थापना विषयी वाईट बोलायलाच येतात असे दिसते. कारण चांगल्या चर्चांत यांचा सहभाग नसतो. चांगले लेख यांना लिहीता येत नाही. मात्र नावे ठेवायलाच हे येतात असे दिसते. अश्या लोकांना सुधारण्यासाठी बराच वेळ दिलेला आहे. यापुढे खरडवहीत सुध्दा चुकीचे लिहीलेले आढळले तर अश्या लोकांवर कारवाई केली जाईल.

शेवटी पुन्हा एकदा सर्व सदस्यांना आवाहन आहे की मिपा व्यवस्थापन जे करते त्याबाबत चर्चा करण्याची आपले मत प्रदर्शन करण्याची सर्वांना मुभा आहे. मात्र मिपाचं वातावरण आपल्या लिहीण्याने गढूळ होत असेल तर असे लेखन जाहीर न करता मला व्यक्तिगत निरोप पाठवा. माझ्याशी चर्चा करा. मुख्य बोर्डावर निषेधाचे धागे, हॅक करण्याची आव्हाने आणि संपादकांना नकारात्मक पदव्या का म्हणून सहन कराव्यात?

मिपा आपलं आहे, ते सकारात्मक पुढे नेऊया. त्यासाठी सर्वांचं सहकार्य अपेक्षीत आहे.

- नीलकांत

हे ठिकाणधोरणमांडणीप्रकटनविचार

प्रतिक्रिया

अग्निकोल्हा's picture

21 Apr 2013 - 3:16 pm | अग्निकोल्हा

या विभागाबद्दल स्त्रिया अन थोरामोठ्यांनी परस्पर विचारांती घेतलेल्या निर्णयावर ४ शब्द आधिच बोलुन झाले असल्याने त्यावर आता पुन्हा टंकत नाही.

पण तुम्ही मनाचा कोते पणा बाजुला सारुन एक अतिशय महत्वाचे सत्य विधान केले आहे जे हाइलाइअट होणे गरजेचे वाटले. ते म्हणजे

कुठल्याही स्त्रीची दुसर्‍या कुठल्यीही स्त्रीबरोबर एक प्रकारची हार्मनी असते, पण ती अनुभवून कळते. ती अशी शब्दात सांगता येणार नाही.

म्हणजे स्त्रिया नैसर्गीकदृश्ट्याच पुरुषांशी जुळवुन घेण्याला (हार्मनी साधायला) कमी पडतात. पण याचा दोष मात्र पुरुषांच्या माथी मारला जातोय. थोडक्यात स्त्रि विभागाची स्थापना ही पुरुष स्त्रियांची करत असलेली टवाळी नसुन स्त्रियांच्या कोत्या मानसिकतेची निकड आहे हे स्पष्ट केल्या बद्दल विषेश आभार. टवाळी होण्यापेक्षा स्त्रियांना हर्मनी साधता येत नाहीये हेच प्रमुख कारण आहे, जर का स्त्रियांना हर्मनी साधता आलि तर होणार्‍या ट्वाळेकडे बघण्याचा द्रुश्टीकोनच मुळात सकारात्मक असेल व सेपरेट विभागाचे गरजच असणार नाही हे समस्त भगीनीवर्गाने कृपया लक्षात घ्यावे.

पिशी अबोली's picture

21 Apr 2013 - 4:49 pm | पिशी अबोली

पुरुषांचा आपला उगाच एक समज असतो की त्यांचं लॉजिक फार्फार भारी असतं..आता या प्रतिसादात हा जो अचाट निष्कर्ष आहे तो कोणत्या लॉजिकने काढला असेल बरं???

अग्निकोल्हा's picture

21 Apr 2013 - 11:52 pm | अग्निकोल्हा

तो कोणत्या लॉजिकने काढला असेल बरं???

स्त्रियांचा म्हणे सिक्स्थ-सेन्स स्ट्राँग असतो, असेल बुआ. पुरुषांचा मात्र कॉमसेन्स स्ट्राँग असतो. मला वाटतं हे एकमेव लॉजिक पुरेसं आहे.

असो :- विषयानुशंगाने सर्व काही बोलुन झाले असल्याने या धाग्यावरचा हा शेवटचा प्रतिसाद***.

*** जर वैयक्तीक पातळीवर प्रश्न अथवा शंका न विचारल्या गेल्या तर.

मस्त कलंदर's picture

22 Apr 2013 - 2:06 pm | मस्त कलंदर

माझा या विभागाला विरोध नाही आणि हवाच अशी असोशीही नाही. त्यामुळे मी समर्थन आणि विरोध दोन्हीही करत नाहीय.

कदाचित वरच्या ठळक टायपातल्या मानहानीकारक सरसकटीकरणामुळे काहीजणी लिहायला बिचकत असतील. वरचं वाक्य एक उदाहरण झालं, परंतु गेल्या चार दिवसांतच स्त्रियांना खिलाडूवृत्ती,अक्कल नसणे इ.प्रकार लिहून झाले आहेत,मग जुने धागे तर सोडूनच द्या.
इथे कोत्या मनोवृत्तीचे कोण आहे हे मी सांगायची गरज नाही,परंतु त्या एका उदाहरणावरून मी त्या लिंगी व्यक्तींचं, त्या व्यक्तीच्या मित्रपरिवाराचं सरसकटीकरण करत नाही. जे ते ज्या त्या व्यक्तीपुरतं(आयडीपुरतं) आहे हे मानणं, हा झाला कॉमनसेन्स. तो कॉमन नसतो असं लोकांचं म्हणणं आहे म्हणे!!!

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Apr 2013 - 2:50 pm | बिपिन कार्यकर्ते

:)

अग्निकोल्हा's picture

22 Apr 2013 - 3:13 pm | अग्निकोल्हा

एका उदाहरणावरून मी त्या लिंगी व्यक्तींचं, त्या व्यक्तीच्या मित्रपरिवाराचं सरसकटीकरण करत नाही. जे ते ज्या त्या व्यक्तीपुरतं(आयडीपुरतं) आहे हे मानणं, हा झाला कॉमनसेन्स

थोडक्यात रेफरन्स म्हणून सदर आयडीने , कुठल्याही स्त्रीची दुसर्‍या कुठल्यीही स्त्रीबरोबर एक प्रकारची हार्मनी असते, असे जे सरसकटीकरण असलेले विधान केलेय त्याचा तुम्ही करत असलेला निषेध/विरोध माझ्या प्रतिसादाला उत्तर म्हणुन का लिहलाय ?

तो कॉमन नसतो असं लोकांचं म्हणणं आहे म्हणे!!!

नसतोच मुळी. पण ज्या कोणाकडे तो असतो त्यात तो स्ट्राँग कोणाचा असतो याची खातरजमा अजुनही झाली नसल्यास. समज येइ पर्यंत व्यनितुन अवश्य चर्चा केल्या जाइल.

मस्त कलंदर's picture

22 Apr 2013 - 3:41 pm | मस्त कलंदर

एका आयडीने जे लिहिलं, त्याचं त्याव्यक्तीसापेक्ष काहीतरी आकलन असेल, ते माझं असायलाच हवं असं नाही. तुम्ही उधृत केलेलं माझंच वाक्य म्हणतं की

एका उदाहरणावरून मी त्या लिंगी व्यक्तींचं, त्या व्यक्तीच्या मित्रपरिवाराचं सरसकटीकरण करत नाही.

त्यामुळे माझा प्रतिसाद त्या वाक्याचं समर्थन/विरोध नसून तुमच्या स्ट्रांग कॉमनसेन्सने जो तुम्हाला निष्कर्ष काधून दिला आहे, त्या अनुमानासाठी आहे.

असो.. इतरांना समज येईपर्यंत त्यांच्याशी व्यनिमधून गप्पा हाणायला मला वेळ नाही.

अग्निकोल्हा's picture

22 Apr 2013 - 4:10 pm | अग्निकोल्हा

त्याव्यक्तीसापेक्ष अन प्रतिसादसापेक्ष विधान यात तुमची गफलत होतेय का ?

इतरांना समज येईपर्यंत त्यांच्याशी व्यनिमधून गप्पा हाणायला मला वेळ नाही.

मला आहे, म्हणून तर समज येइल याची खात्रि नसुनही मी चर्चेचा प्रस्ताव ठेवत असतो.

मस्त कलंदर's picture

22 Apr 2013 - 4:31 pm | मस्त कलंदर

मग स्वतःशीच व्यनी-मनीच्या गोष्टी खेळाल तर बरं..
असो.. तुमचं चालूच द्या.

अग्निकोल्हा's picture

22 Apr 2013 - 4:56 pm | अग्निकोल्हा

मग स्वतःशीच व्यनी-मनीच्या गोष्टी खेळाल तर बरं..

तुमच्या सवयी मला लावु नका.

असो.. तुमचं चालूच द्या.

तर काय. पक्का मुबैकर असल्याने शेवटचा शब्द माझा ठरत नाही तो पर्यंत चालुच राहणार.

गणपा's picture

21 Apr 2013 - 1:31 pm | गणपा

मुळात जालावर वा इतरत्रही वावरताना आपली (वैयक्तिक) माहिती कुठे आणि किती प्रमाणात उघड करायची याची जाण प्रत्येकाला असायला हवी. आंधळा विश्वास कुणावरही ठेऊ नये.

एखाद्या व्यक्तीचा फोन नंबर, रहाण्याचं ठिकाण आदी माहिती फक्त संकेत्स्थळावरुनच मिळते का?
इथल्या स्त्री सदस्यांच्या मागणीनुसार हा विभाग उभा रहातोय. शिवाय महिलांना या ईथे सामिल व्हा म्हणुन कुठलंही निवेदन केलेलं नाही. फक्त ज्या सदस्यांना सामिल व्हायचय, त्यांची त्या खरच महीला आहेत ही खात्री पटवण्यासाठी फोन नं मागितले आहेत.

काही जणांची सेफ्टीच्या दृष्टीने शंका रास्त आहेच पण तुम्ही त्यांना सावध करुन तुमची कामगीरी पार पाडलीत.
आता निर्णय त्या सदस्यांना घेऊद्यात ना. जर त्यांची इच्छा असेल तर होतील त्या सहभागी. जर विरोधाकांचा मुद्दा त्यांना पटला तर नाही होणार.
प्लीज आता हे पुराण थांबवा. अन आपली शक्ती अन वेळ दुसर्‍या चांगल्या कामासाठी वापरा ही विनंती.

प्रसाद गोडबोले's picture

21 Apr 2013 - 1:52 pm | प्रसाद गोडबोले

+१

बंडा मामा's picture

21 Apr 2013 - 7:11 pm | बंडा मामा

आपापला कॉमन सेन्स नीट वापरलात तर काहीही अघटीत घडण्याची शक्यता नगण्य होते. एवढे लक्षात ठेवा.

जेनी...'s picture

21 Apr 2013 - 9:03 pm | जेनी...

:( बास कि आता :( :(

प्यारे१'s picture

21 Apr 2013 - 9:11 pm | प्यारे१

अबोली पूजा.... खिक्क!

नीलकांत's picture

21 Apr 2013 - 10:47 pm | नीलकांत

अनेकांनी आपल्या सोईचे अर्थ काढून झाले असं दिसतंय आणि त्यावरून अनेक उपाध्या देऊनही झाल्या आहेत. आता सर्वांचं बोलून झालं असं गृहीत धरून अबोलीची कार्यपध्दती ठरवूयात.

सर्वात आधी हा विभाग स्त्रियांसाठी आहे हे नक्की, येथे त्यांना रस असेल त्या विषयावर त्यांची चर्चा होईल साधारणतः घर, परिवार , घरातली कामे वगैरे चर्चा होतील असे अपेक्षीत आहे. फक्त अबोलीमध्येच नाही तर मिपावर सुध्दा कुणीही आपली व्यक्तिगत माहिती देऊ नये अशी जाहीर घोषणा यापुर्वीच करून झाली आहे. तेच आता पुन्हा सांगतोय की मिसळपाव हे सामाजीक संकेतस्थळ आहे येथे आपली व्यक्तिगत माहिती देऊ नये.

अबोलीत सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या स्त्रीसदस्यांना कुणातरी स्त्री संपादकांशी संपर्क साधणे गरजेचे आहे. म्हणजे त्यांच्या संवाद होईल. त्या नंतर संपादक मला त्या सदस्यांची नावे देतील त्यांना अबोलीत प्रवेश दिल्या जाईल. लक्षात घ्या. मला कुणाचेही संपर्क तपशील देण्याची गरज नाही. मी प्रत्यक्ष संवादात कुठेही नसेन आणि तसे असण्याची गरज नाही. तांत्रीकबाबी व अन्य काही अडचण असल्यास मी असेन एवढंच. बाकी सर्व त्यांचा त्यांचा विभाग असेल.

पुन्हा एकदा सांगतो ज्या सदस्यांना इच्छा असेल त्यांनीच प्रवेश घ्या. प्रवेश घ्याल तर त्या विभागाच्या नियमांचं पालन करा. तसेच तो विभाग वेगळा आहे तरी सुध्दा आपलं खाजही असं काहीही जाहीर करू नका.
आणि अन्य सदस्यांना विनंती आहे की आता बस करा. आपण अन्य विषयांकडे वळूया.

- नीलकांत

मस्त कलंदर's picture

22 Apr 2013 - 12:14 am | मस्त कलंदर

ज्या उदात्त भावनेने हा विभाग चालू करत आहेस, त्याच्या नावाचा पुर्नविचार झाला तर आनंद वाटेल; सक्ती नाही.
आतापर्यंत सुचवण्यात आलेली क्रमवार नांवे-सुचवणार्‍यांची नावे.
१, मानिनी-- मस्त कलंदर
२. स्वच्छंदी-- बहुतेक सुबक ठेंगणी
३. मुक्ता- पेठकर काका

मी सर्वच धागे आणि सर्व प्रतिसाद वाचले नसल्याने काही नांवे हुकली असण्याची पूर्ण शक्यता आहे. जर कुणास आठवत असतील तर इथे ती दिल्यास बरे होईल.

नीलकांत's picture

22 Apr 2013 - 12:18 am | नीलकांत

याबाबत काही हरकत नाही. ठरवूया.

सुर's picture

22 Apr 2013 - 12:13 pm | सुर

स्वामिनी
माझं सगळ्यात आवडत नाव.

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Apr 2013 - 2:50 pm | बिपिन कार्यकर्ते

स्वच्छंदी समर्पक आहे!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

22 Apr 2013 - 12:32 am | निनाद मुक्काम प...

दामिनी किंवा सौदामिनी नाव मला योग्य वाटते,
किंवा सोनिया ठेवा
मग तुमच्या विभागाला
कितीही विरोध झाला , त्याविरुद्ध कितीही आदळआपट झाली तरी सरत शेवटी यश ,भरभराट , प्रगती तुमच्या विभागाला पाचवीला पुजल्या जातील.
नावातच विभागाचे अर्धे यश सामावले आहे.

जेनी...'s picture

22 Apr 2013 - 12:51 am | जेनी...

ह्म्म ... नाव नको अबोली .. मानिनी साठी माझं वोटिंग ...

प्रभाकर पेठकर's picture

22 Apr 2013 - 2:16 am | प्रभाकर पेठकर

इथे सर्व सदस्य महिलांना कुठलेही बंधन, दडपण, संकोच अनुभवास न येता मुक्तपणे विचार मांडण्यास/चर्चा करण्यास संधी मिळावी ह्या विचारातून 'मुक्ता' हे नांव सुचविले आहे.

नगरीनिरंजन's picture

22 Apr 2013 - 1:25 pm | नगरीनिरंजन

'मुक्ता'ला अनुमोदन

प्रतिसाद कोणत्या धोरणात बसला नाही ते कळेल का? की फक्त हो ला हो करणारेच प्रतिसाद द्यायचे?

मी वाचला होता तुमचा प्रतिसाद .... पण गावामागुन आल्यागत वाटला ... म्हणजे जे मुद्दे
तुम्ही मांडले होते त्यावर आधी चर्चा झाल्यागत वाटली ... सगळं झाल्यावरच निलकांत चा
प्रतिसाद आला होता ... त्यामुळे चोथा झालेल्या उसाला परत चावण्यात काहिच तथ्य
नव्हतं ... असो

बाकी नाव बदलण्याबाबत चर्चा व्हावी ....

श्रावण मोडक's picture

22 Apr 2013 - 8:54 am | श्रावण मोडक

निर्भया!
व्हा.

प्रकाश घाटपांडे's picture

22 Apr 2013 - 11:15 am | प्रकाश घाटपांडे

नीलकांत शी सहमत आहे. आपण आपल्या कुटुंबातील स्त्रियांना वेगळा अवकाश देतोच ना! पुरुषांनाही वेगळा अवकाश स्त्रिया देतातच ना! मिपा हे आपल एक कुटुंबच मानतो ना आपण?

या धाग्यावरचे काही प्रतिसाद वाचून अठराव्या शतकातल्या; न शिकलेल्या; बाहेरचे जग कधीही न अनुभवलेल्या; अडाणी, गरीब बिच्चा -या अब ला 'अबोली' (किंवा जे काही नाव ठरेल ते!) व्यासपीठाचा वापर करणार आहेत अशी एक शंका मनात यायला लागली आहे. :-)

अर्थात अशा अनेक स्त्रिया आजही आपल्या भवती आहेत - पण त्या कशाला आंतरजालावर येतील? म्हणजे इतक्यात तरी तशी शक्यता दिसत नाही.

या धाग्यावरचे काही प्रतिसाद वाचून अठराव्या शतकातल्या; न शिकलेल्या; बाहेरचे जग कधीही न अनुभवलेल्या; अडाणी, गरीब बिच्चा -या अब ला 'अबोली' (किंवा जे काही नाव ठरेल ते!) व्यासपीठाचा वापर करणार आहेत अशी एक शंका मनात यायला लागली आहे.

गरीब अन बिचार्‍या नाही तर वैतागलेल्या, काहीही बोलायला गेल की टांगायला नेण्याच्या वृत्तीला कंटाळलेल्या अश्या खमंग बायका असणार आहेत तिथे. मोकळेपणाने बोलतील. थोड्या रिलॅक्स होतील. नव्या दमाने, पुन्हा जगाला भिडतील.

आतिवास's picture

22 Apr 2013 - 12:22 pm | आतिवास

अपर्णाताई, आपण एकच गोष्ट वेगवेगळ्या शब्दांत आणि वेगवेगळ्या पद्धतीने म्हणतो आहोत :-)

हे सगळं वाचून आता संपादिका स्त्रीदालनाच्या होतकरू सदस्यांना "मिरांडा वॉर्निंग" सारखं काहीतरी वाचून दाखवतील असं वाटायला लागलंय!

सस्नेह's picture

22 Apr 2013 - 2:35 pm | सस्नेह

वरीलपैकी काही 'वडाप' छाप प्रतिसाद वाचून 'बातका बतंगड' किंवा 'काथ्याचा चोथा' म्हणजे काय ते प्रत्यक्ष अनुभवले...!

मला ह्या धाग्यावर संपादिकांचे आभार मानायचे आहेत. ते अशासाठी की आम्ही सगळ्यांनी अशा विभागाची मागणी केली, ती नीलकांतापर्यंत पोचवायचे काम तुम्ही केलेत - त्यानंतर पाठपुरावा करुन असा विभाग प्रत्यक्षात येईल ही चांगली बातमी मिळाली. त्यासाठीही आता तुम्ही काम कराल - थोडक्यात मिपाच्या प्रेमापोटी आपला वेळ घालवून लष्कराच्या भाकरी भाजाल. त्यासाठी कारण नसताना अपशब्द,टिंगल टवाळी ऐकून घेतलीत, इतकेच काय ज्या धाग्यावर नीलकांताने मिपाकरांशी "संवाद" साधायचे काम केले, त्याच धाग्यावर त्याने जे लिहिले आहे ते धाब्यावर बसवून तुमचे तारतम्यही काढले गेले.

तेह्वा हे इतके सगळे तुम्ही आमच्यासाठी सहन केलेत. मनापासून आभार आणि हा अबोली विभाग, त्यातील संभाव्य धोक्यांची शक्यता लक्षात घेऊनही यशस्वी करण्यासाठी माझे पूर्ण सहकार्य तुम्हांला नेहमीच देईन हे प्रॉमिस. :)

विसोबा खेचर's picture

22 Apr 2013 - 3:52 pm | विसोबा खेचर

नीलकांता.. तुझ्या सगळ्या योजनांना माझा पाठिंबा आहे..

अनेकानेक शुभेच्छा..

तात्या,
(मिपा संस्थापक)

नीलकांत's picture

22 Apr 2013 - 3:57 pm | नीलकांत

धन्यवाद तात्या. तुम्ही दिलेले सल्ले अजुनही लक्षात आहेत. त्यामुळे लोड घेत नाही :)

तुम्ही सक्रिय झालात हे उत्तम.