सोत्रींचा दारूवरचा लेख आणि मी

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
31 Mar 2013 - 10:22 pm

सोमवारी मिसळपाववरचा सोत्रींचा दारूवरचा लेख वाचला. दारू म्हणजे काय या हे समजवून देणे काही सोपे काम नाही. ते दारू पिण्याइतकेच महत्त्वाचे आणि अवघड काम सोत्रीसारख्या माणसाने खुपच सोप्या पद्धतीने सांगितले आहे. आजकाल लिहीणे सोपे झाल्याने जो तो आपआपले अनूभव लिहीत बसतो. कुणी किल्यावर भटकंतीचे लेख लिहीतो, कुणी वेगवेगळे पदार्थ कसे करायचे ते सांगतो. हे असले अनुभव वाचल्यामुळे इतरांना किती त्रास होत असतो याची लिहीणार्‍याला काय कल्पना? लगोलग दारूवरचे सगळे लेख वाचून काढले. दारू कशी बनते, तीचे प्रकार कसे पडतात, दारू बनवण्याची शास्रीय विधी, ती पिण्यासाठी करावे लागणारे सामाजीक विधी, निरनिराळ्या देशांतल्या दारूबद्दलच्या संकल्पना आदी सारे त्या लेखांत होते.

गावठी दारू तशी काय आपल्याला नवीन नाही, तरीपण शासनाचे नियम वाचून थोडीफार करमणूक झाली. प्रतिक्रिया देणारेही दारूबाबतीत फार जाणकार दिसले. समाजात आपल्याइतकेच दारूत पट्टीचे बुडणारे आहेत हे पाहून आनंद झाला. बर्‍याचशा लोकांच्या खुपशा प्रतिक्रिया आभ्यासू होत्या. लेखक हलकट यांनी तर गावठी दारू बनवण्याची रेसेपी दिल्याने गावठी दारू घरच्या घरी बनवण्याची इच्छा होत होती. पण ती रसायने अन ते डबे, बॅरल, चुल, चाटू आदींचा सेट घरात लावायचा म्हणजे नसता डोक्याला ताप होता. अन मुख्य म्हणजे गावठी दारू तयार करणारा इसम गावठी दारू पाडतांना दारूच्या अंमलाखाली नसावा इतके या लेखातून कळले. दारू पिण्यापेक्षा दारू बनवणे अगदीच किचकट, चिकाटीचा अन बुद्धी शाबूत ठेवून करायचा प्रकार आहे हे माझे मत पक्के झाले. दारू तयार करणार्‍या लोकांबद्दल आदर वाढला. त्यातल्या त्यात गावठी दारू बनवणे हा प्रकार तर भन्नाट होता. कमीतकमी सामूग्री वापरून जास्तीत जास्त नशा देणारी दारू बनवणे हा खरोखरच भन्नाट प्रकार आहे यात शंका नाही. त्यातही जर असल्या दारूच्या भट्टीवर जर पोलीसांच्या धाडी पडल्या तर सगळी मेहनत यांच्या ओठी जाणार! कितीतरी रिस्क या धंद्यात आहे. पोलीसांचे हप्ते सांभाळून, समाजाप्रती आदर राखून, प्रॉफीट मार्जीन कमी ठेवून दारू गाळणे म्हणजे खरोखर लष्कराच्या भाकर्‍या भाजण्यासारखेच आहे. हा धंदा करणार्‍यांना शासनाने काही सवलती जाहीर कराव्यात. अर्थातच त्या सवलती इतक्याही असू नयेत की त्यामूळे असली गावठी दारू म्हणजे सरकारमान्य देशी दारू ओळखली जावू लागेल.

हे असले काही वाचले म्हणजे दारू पिण्याचे ते दिवस आठवतात. सरकारच्या कृपेने आम्ही एका बँकेत कामाला होतो. आमचा संपर्क शेतकरी वर्गाशी होता. आता आमच्या या बँकेत काम करणारी जमात म्हणजे अतिशय दुर्लक्षलेली. त्यांनी काम केले काय अन न केले काय सारखेच. शेतकरी कर्ज मिळवण्यासाठी त्यांची कागदपत्रे स्वःतच करवून आणत. काय शेतमाल गहाण वैगेरे ठेवायचा तो परस्पर गोदामात जमा करत. साहेबांच्या कृपेने आमचे काम केवळ सह्याजीरावाचेच होते. अशी सगळी अनुकूल परिस्थिती असल्याने त्यातही एकदोन सहकारी कर्मचारी आनंदमार्गाला लागलेले असल्याने त्यांच्याबरोबर आम्हालाही आनंदाची सवय जडली. आमची बदली ज्या गावी होती तेथे कुटूंब नेणे सोईस्कर नव्हते. इतर सहकार्‍यांचीही तीच स्थिती होती. त्यामूळे आम्ही सगळे सक्तीचे बॅचलर एकाच खोलीत राहत होतो. मग सकाळपासून आनंद मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू. घरापासून दुर असलो तरी आमच्या खोलीपासून आनंद मिळवण्याचे दुकान जवळ होते. अगदी बाजूची पाच-सहा घरे सोडली की आनंदप्राप्ती होत असे. नंतर नंतर दुकानदार ओळखीचा झाल्याने उधारउसनवार आनंद मिळे. पुढेपुढे तर आनंदाची इतकी सवय लागली की कर्ज मंजूर करवून घेणार्‍यांसमावेत कर्ज मंजूर झाल्याबद्दल कधी कधी स्वखर्चाने या आनंदाचे वितरण व्ह्यायला लागले. यथावकाश व्हिआरएस स्किम लागू झाल्यानंतर नोकरी सुटली. घरी आल्यानंतर आनंदाचे सेवनाचे प्रमाण कमी कमी होवून आताशा ते बंदही झाले. आनंदाचे व्यसनात रूपांतर झाले नाही ही आनंदाची बाब आहे.

दारू पिणार्‍यांचेही प्रकार पडतात. हौसेने दारू पिणारे, कधीतरी पिणारे, अट्टल बेवडे, केवळ पिण्याचे नाटक करणारे, एकटेच पिणारे व्यसनी, दारू पिणे सहन होत नाही तरी पिणारे आदी व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येकाला आपण किती प्यावी हे समजले पाहीजे. हे काही एकदम फुशारकीचे काम नाही की ते केले म्हणजे तूम्ही मोठे शहाणे, सभ्य वैगेरे. होणार्‍या शारिरिक, सामाजिक परिणामांचे भान राखूनच दारू सेवन केले पाहीजे किंवा न केले पाहीजे.

माझ्या दुरच्या नातेवाईकाचे गावाकडे काळा गुळ, इतर रसायने, मोहफुले खरेदीविक्रीचे दुकान आहे. मोहाची दारू घेण्याचा मोह आताशा होत नाही पण अजूनही त्यांच्याकडे गेल्यावर दुकानात जेव्हा जेव्हा जाणे होते तेव्हा तेव्हा जूने दिवस आठवतात.

एकुणच दारूच्या नशेत जाण्यापेक्षा दारूला आपल्या नशेत आणणे महत्वाचे.

(काल्पनिक)

- पाषाणभेद

समाजजीवनमानप्रकटनविचारप्रतिसाद

प्रतिक्रिया

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

31 Mar 2013 - 11:04 pm | निनाद मुक्काम प...

. मिपावर कुठल्याही विषयावर लिहीण्यास बंदी नाही - गांधीविरोधकांपासून ते हिंदूत्वविरोधकांपर्यंत, कुडमुडे ज्योतिषांपासून ते विज्ञानवाद्यांपर्यंत, सनातन्यांपासून ते नक्षलवाद...वगैरे वगैरे.
विकास ह्यांचे एका दुसर्या धाग्यावरील हे वाक्य येथे चपखल लागू पडते ,
ह्या काल्पनिक लेखामधील आवडलेला उतारा , व काही वाक्ये
व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येकाला आपण किती प्यावी हे समजले पाहीजे. हे काही एकदम फुशारकीचे काम नाही की ते केले म्हणजे तूम्ही मोठे शहाणे, सभ्य वैगेरे. होणार्‍या शारिरिक, सामाजिक परिणामांचे भान राखूनच दारू सेवन केले पाहीजे किंवा न केले पाहीजे. Cheers

आनंदाचे व्यसनात रूपांतर झाले नाही ही आनंदाची बाब आहे.
एकुणच दारूच्या नशेत जाण्यापेक्षा दारूला आपल्या नशेत आणणे महत्वाचे.
ह्या वाक्यांच्या साठी

Hand Clapping

मागील अनुभव पाहता
येथे अवांतर व वैयक्तिक हल्ले होऊ नये असे मनापासून वाटते , तेव्हा
Fingers Crossed

श्री गावसेना प्रमुख's picture

1 Apr 2013 - 9:19 am | श्री गावसेना प्रमुख

प्रत्येकाला आपण किती घ्यावी हे समजण्याइतके सर्वच हुश्शार नसतात.
बाकी धागा कर्त्यास माझ्याकडुन1
ज्यांना दारु पाडायची असेल त्यांच्यासाठी1

अत्रुप्त आत्मा's picture

1 Apr 2013 - 2:13 pm | अत्रुप्त आत्मा

सहिवरच्या फोटुमुळे सहि अगदी अन्वर्थक वाटतीये आज. ;)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

1 Apr 2013 - 4:01 pm | निनाद मुक्काम प...

प्रत्येकाला आपण किती घ्यावी हे समजण्याइतके सर्वच हुश्शार नसतात.
असे पण आहे होय ,बिचारे पाषाण भेद , त्यांना ह्याबाबत काहीच कल्पना दिसत नाही ,
त्यांनी अर्थ न समजून घेत बहुदा हे लिहिले असावे.
दारू पिणार्‍यांचेही प्रकार पडतात. हौसेने दारू पिणारे, कधीतरी पिणारे, अट्टल बेवडे, केवळ पिण्याचे नाटक करणारे, एकटेच पिणारे व्यसनी, दारू पिणे सहन होत नाही तरी पिणारे आदी व्यक्ती तितक्या प्रकृती

उद्यापासुन कालेजा कालेजाबाहेर किंवा हायस्कुल बाहेर दारु कशी चांगली, किती घ्यावी याचे फ्लायर वाटा. जर्मनीत असं करायला हरकत नसावी नै का!!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

7 Apr 2013 - 8:24 am | निनाद मुक्काम प...

आपले प्रतिसाद मी अलीकडे दुर्लक्षित करतो ,
कारण मुद्देसूद प्रतिसाद देण्यासाठी मूळ लेखात किंवा प्रतिसादात मुद्दा असावा लागतो.
सध्या मिसळपाव वर कंपू गिरी नाही आहे , व त्यामुळे अत्यंत चांगल्या वातावरणात येथे विविध विषयांवर प्रतिसाद देण्याकडे माझा कल असतो , मागे मी संपादक मंडळाकडे झाल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला होता. आता परत त्यांची पुनरावृत्ती करण्याइतका कोडगेपणा माझ्या नाहीत आहे. त्यामुळेच त्या खेदाला जागून मी आपल्याशी प्रतिवाद करायचे टाळत आहे.
आजचा आपला दिवस आपल्याला व आपल्या आप्तस्वकीयांना सुखाचा जावो ,एवढे खरडून मी आपली रजा घेतो.
Got to Go Bye

शिल्पा ब's picture

7 Apr 2013 - 10:27 am | शिल्पा ब

तुमची कंपुबाजी वगैरे कोडगी रडारड चालु द्या...बंद करा म्हंटलं तर ते तुमच्या डोक्यात जात नै त्यामुळे नाईलाज आहे.
पण हेच अति झाल्याने मला लिहावं लागलं.
बाकी दारु का चांगली हे नाहीच सांगता येणार हे सत्य आहे त्यामुळे बाकी प्रतिसाद हास्यास्पद (नेहमीप्रमाणेच) आहेत.

मुद्द्याचं म्हणाल तर लेखावरच तुमचा प्रतिसाद अन त्यावर माझा असं आहे जे तुम्हाला झेपणार नाहीच. असो.

मदनबाण's picture

1 Apr 2013 - 10:07 am | मदनबाण

दफोराव लयं भारी लिवलयं... ;)

अत्रुप्त आत्मा's picture

1 Apr 2013 - 2:11 pm | अत्रुप्त आत्मा

@एकुणच दारूच्या नशेत जाण्यापेक्षा दारूला आपल्या नशेत आणणे महत्वाचे.>>> http://www.mimarathi.net/smile/congrats.gifhttp://www.mimarathi.net/smile/congrats.gifhttp://www.mimarathi.net/smile/congrats.gif आंम्ही पा.भेंना भेदकपाषाण उगीच नै म्हणत... __/\__

मन१'s picture

1 Apr 2013 - 6:58 pm | मन१

वाचनीय...

श्री गावसेना प्रमुख's picture

6 Apr 2013 - 7:10 pm | श्री गावसेना प्रमुख

ह्या बातमी नुसार इवल्यासा केरळ राज्यात ८८०० कोटी ची दारु विक्री मागील वर्षात झालीये,

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

7 Apr 2013 - 8:38 am | निनाद मुक्काम प...

महाराष्ट्रात गावात लोकांना प्यायला पाणी नाही , आणि केरळात लोकांना पाणी व दारू मुबलक प्रमाणात मिळते हे वाचून आनंद वाटला , व दारू विकत घेण्याच्या इतके त्यांच्या कडे
पैसे आहेत हे पाहून आनंद द्विगुणित झाला.
हा आनंद आभासी जगतात साजरा केलाच पाहिजे.
Champagne popping

श्री गावसेना प्रमुख's picture

7 Apr 2013 - 8:45 am | श्री गावसेना प्रमुख

निनाद राव मानल हो तुम्हाला कुठल्याही परीस्थीतीत दारुच समर्थन कस काय जमत बुवा तुम्हाला,

तुम्हाला गुरु कराव असा मनात विचार आहे.

किती घ्याल

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

7 Apr 2013 - 8:54 am | निनाद मुक्काम प...

जाऊ द्या हो गाव सेना प्रमुख
ही अत्यंत लोकप्रिय कविता वाचा ,
पहा काही हृदयपरिवर्तन होते का
https://fbcdn-sphotos-a-a.akamaihd.net/hphotos-ak-ash3/534162_10151614853189789_1241848161_n.jpg

मधुशाला (अंश)
मृदु भावों के अंगूरों की
आज बना लाया हाला
प्रियतम अपने ही हाथों से
आज पिलाऊँगा प्याला;
पहले भोग लगा लूँ तेरा
फिर प्रसाद जग पाएगा,
सबसे पहले तेरा स्वागत
करती मेरी मधुशाला!
एक बरस में एक बार ही
जगती होली की ज्वाला,
एक बार ही लगती बाजी
जलती दीपों की माला,
दुनियावालों किन्तु किसी दिन
आ मदिरालय में देखो,
दिन को होली, रात दिवाली,
रोज मनाती मधुशाला!
मुसलमान औ हिंदू हैं दो,
एक मगर उनका प्याला,
एक मगर उनका मदिरालय,
एक मगर उनकी हाला,
दोनों रहते एक न जब तक
मस्जिद-मंदिर में जाते,
बैर बढाते मस्जिद-मंदिर,
मेल कराती मधुशाला!
ज्ञात हुआ यम आने को है
ले अपनी काली हाला,
पंडित अपनी पोथी भूला,
साधू भूल गया माला,
और पुजारी भूला पूजा
ज्ञान सभी ज्ञानी भूला,
किन्तु न भूला मरकर के भी
पीनेवाला मधुशाला!
मतवालापन हाला से ले,
मैंने तज दी है हाला,
पागलपन लेकर प्याले से
मैंने त्याग दिया प्याला,
साकी से मिल, साकी में मिल
अपनापन मैं भूल गया,
मिल मधुशाला की मधुता में,
भूल गया मैं मधुशाला!

हरिवंशराय 'बच्चन'
त्यांच्या सुपुत्राच्या धीर गंभीर आवाजातून ह्या कवितेचा काही अंश

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

7 Apr 2013 - 8:56 am | निनाद मुक्काम प...

त्यांच्या सुपुत्राच्या धीर गंभीर आवाजातून ह्या कवितेचा काही अंश

श्री गावसेना प्रमुख's picture

7 Apr 2013 - 9:11 am | श्री गावसेना प्रमुख

वृक्ष हों भले खड़े
हों घने, हों बड़े
एक पत्र छाँह भी
मांग मत! मांग मत! मांग मत!
अग्निपथ! अग्निपथ! अग्निपथ!

तू न थकेगा कभी
तू न थमेगा कभी
तू न मुड़ेगा कभी
कर शपथ! कर शपथ! कर शपथ!
अग्निपथ! अग्निपथ! अग्निपथ!

यह महान दृश्य है
चल रहा मनुष्य है
अश्रु-स्वेद-रक्त से
लथ-पथ! लथ-पथ! लथ-पथ!
अग्निपथ! अग्निपथ! अग्निपथ!

ही सुद्धा हरीवंशराय ह्यांचीच कविता आहे,किती फरक आहे दोन मानसिकतेचा

पाषाणभेद's picture

7 Apr 2013 - 8:11 pm | पाषाणभेद

कविच्या मनाचा ठाव कुणालाही लागत नाही हेच खरे. हे हरिवंशराय यांच्या वरील दोन भिन्न स्वभावी कवितांमधून दिसत आहे.
माझ्या(!) धाग्यावर प्रतिसाद देणार्‍यांचे आभार. (हा प्रतिसाद धाग वर आणण्यासाठी नाही तर प्रतिसादाशी कोठेतरी धागा जुळल्याने मला लिहावे वाटले. )

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

7 Apr 2013 - 8:22 pm | निनाद मुक्काम प...

ह्यात मानसिकतेत फरक कुठे आला जरी साम्य नसले तरी फरक सुध्धा नाही आहे ,
माझ्या अनेक प्रतिसादांतून अपयशाला कारणीभूत नकारात्मक मानसिकता असते ,अशी माणसे त्यातून पळवाट म्हणून दारू कडे व्यसन म्हणून पाहतात.
मात्र अग्निपथ कवितेतील शब्दाशब्दातून होकारात्मक विचारसरणी ,दिसून येते.
ज्याला ह्या कवितेचा भावार्थ उमजला तो दारू कडे व्यसन नाहीच पण कधीच तिच्या आहारी जाणार नाही.