कॉकटेल लाउंज : स्मूथ मॅन्गो टॅन्गो

सोत्रि's picture
सोत्रि in पाककृती
5 Apr 2013 - 10:25 am

‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “ स्मूथ मॅंन्गो टॅन्गो

पार्श्वभूमी:

उन्हाळ्याच्या चाहूलीबरोबरच आंब्याची चाहूलही लागली आहे. बाजारात आंब्यांची आवक हळूहळू सुरू झाली असली तरीही घरोघरी आंब्याचा मोहक दरवळ पसरायला म्हणावी तशी सुरूवात अजून झालेली नाहीयेय. ह्या वर्षीचा उन्हाळा, आंबे स्पेशल कॉकटेल्सनी, 'ग्रीष्म ऋतु लाउंजोत्सव' असा दणाणून सोडायचा विचार आहे. त्यातले हे पहिले कॉकटेल, स्मूथ मॅन्गो टॅन्गो.

खर्‍याखुर्‍या आंब्याचे नसले तरीही, आंब्याचे आइसक्रीम आणि आंब्याच्या रस यांचा वोडकाला दिलेला ट्वीस्ट म्हणजे आजचे हे कॉकटेल. हे माझे इंप्रोवायझेशन, 'लेडिज स्पेशल' कॅटेगरीमध्ये बसवायचे होते, त्यामुळे फक्त वोडका एवढाच बेस वापरून हा प्रयत्न केला आहे. त्यात पुढ्च्या कॉकटेल्समध्ये आणखिन प्रयोग करून 'मिक्सॉलॉजी'च्या वेगवेगळ्या खुब्या वापरून चव आणि लज्जत वाढविण्याचा प्रयत्न असणार आहे.

प्रकार
वोडका बेस्ड कॉकटेल, लेडिज स्पेशल

साहित्य

वोडका
1 औस (30 मिली)

आंब्याचा ज्यूस
2 औस (60 मिली)

आंब्याचे आइसक्रीम
2 स्कूप

बर्फ

ब्लेंडर

ग्लास
वाइन ग्लास

कृती:

खालच्या चित्रात दाखविल्याप्रमाणे ब्लेंडरमध्ये आइसक्रीम, आंब्याचा रस आणि वोडका ओतून घ्या.

ब्लेंडरमध्ये साधारण मध्यम वेगाने हे सर्व मिश्रण व्यवस्थित ब्लेंड करून घ्या. खालच्या चित्रात दाखविल्याप्रमाणे ब्लेंडरवर बाहेरून बाष्प जमा झाले की कॉकटेल तयार झाले असे समजावे.

आता हळूवारपणे ते मिश्रण ग्लासात ओतून घ्या.

आंब्याच्या अफलातून चवीचे स्मूथ अ‍ॅन्ड सिल्की कॉकटेल तयार आहे :)

प्रतिक्रिया

तर्री's picture

5 Apr 2013 - 10:33 am | तर्री

आधीच आंबे परवडत नाहित त्यात ही असली चित्रे पाहायची - त्रास !
ग्रीष्म ऋतु लाउंजोत्सव : दे धमाल !

सुहास झेले's picture

5 Apr 2013 - 12:34 pm | सुहास झेले

लई भारी...

प्रचेतस's picture

5 Apr 2013 - 12:36 pm | प्रचेतस

झकास.

बाकी आमच्यासारख्या लोकांसाठी एखादे मॅन्गो मॉकटेल पण येऊ द्यात.

सूड's picture

5 Apr 2013 - 2:05 pm | सूड

अगदी अगदी, एखादं मॉकटेल येऊद्याच आता.

सोत्रि's picture

5 Apr 2013 - 3:06 pm | सोत्रि

हुकुम सर आँखों पर !

-(हुकुमाचा ताबेदार) सोकाजी

दिल बाग बाग हो गया सोक्या. :)

कमाल हो सोत्रि राव. लय भारी कॉकटेल सांगलत बगा.

शिद's picture

5 Apr 2013 - 1:09 pm | शिद

बाजारातले आंबे परवडू लागले कि करुन बघण्यात येईल.

माझीही शॅम्पेन's picture

5 Apr 2013 - 1:29 pm | माझीही शॅम्पेन

वाह वाह झकास मस्त , मोहक आणि मादक

स्पा's picture

5 Apr 2013 - 1:42 pm | स्पा

कमाल आहे
आंबा + वोडका = खतरनाक चव :)

चैत्रातल्या आधुनिक हळदी कुक्न्वासाठी पेशल कैरीच पन्ह + वोडका असाही करता यील :)

अत्रुप्त आत्मा's picture

5 Apr 2013 - 2:07 pm | अत्रुप्त आत्मा

@चैत्रातल्या आधुनिक हळदी कुक्न्वासाठी पेशल कैरीच पन्ह + वोडका असाही करता यील>>> =)) कित्ति काळजी रे पांडू...तुला,महिलांची ;-)

बाकि नेहमीप्रमाणे...मद्याचार्य सोकू नाना की जय....! :)

पक पक पक's picture

5 Apr 2013 - 8:07 pm | पक पक पक

चैत्रातल्या आधुनिक हळदी कुक्न्वासाठी पेशल कैरीच पन्ह + वोडका असाही करता यील

वाट्ल्या डाळीत बंटा वगैरे कुस्करुन ..... :tongue:

सोत्रि's picture

5 Apr 2013 - 8:15 pm | सोत्रि

वाट्ल्या डाळीत बंटा वगैरे कुस्करुन .....

खीक्क... :D :D :D

- (बंटाधार झालेला) सोकाजी

प्रभाकर पेठकर's picture

5 Apr 2013 - 2:13 pm | प्रभाकर पेठकर

आता व्होडका आणतोच एकदाची.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

5 Apr 2013 - 2:32 pm | निनाद मुक्काम प...

आम्ही असाच प्रकार मोठ्या पार्ट्यांमध्ये करायचो ,
वोडका आणि फळांचा रस भन्नाट ,
आंबा व स्ट्रॉबेरी व कलिंगड अशी अनेक फळे ट्राय करू शकतात.
ह्याच धर्तीवर मालिबु हि नारळाच्या चवीची रम व अननसाचा रस व आईस्क्रीम
असा जबरी प्रयोग होऊ शकतो.

एका मोठ्या उद्योजकाचा उन्हाळी समुद्री पार्टीत आम्ही अश्याच पद्धतीचे कॉकटेल
पिंप भरून तयार केले होते , कारण दीडशे लोकांचा जमाव होता ,
पण त्यात नव्हते ,
मात्र ताज्या आंब्याचा रस व किती तरी बाटल्या वोडका त्यासाठी लागल्या हो त्या,

वा वा... ती बराच काळ वाट पाहात असलेली कोंकण कॉकटेल सीरीज सुरु झाली म्हणायची. उत्तम हो सोकाजीतात्या..

आता कोकमकोला, काजूक्रश आणि करवंद कॉकटेल्स सुरु होऊ देत.. :)

बाकी रासबेरी वोडका का बरं दर्शवली आहे फटूत? अशाच रंगाची १०० प्रूफ अ‍ॅबसोल्यूट परवाच अतातुर्कच्या ड्यूटीफ्री मधे पाहिली.

सोत्रि's picture

5 Apr 2013 - 8:02 pm | सोत्रि

ते टेबलक्लॉथवरचे पक्षी किती खुष दिसताहेत. अगदी अंघोळ झाल्या सारखे.
मस्त. पण एक विचारु? मधाळ आंब्याच्या रसाला चरचरीत व्होड़का कशी मॅच होणार?

वपाडाव's picture

5 Apr 2013 - 6:37 pm | वपाडाव

सोत्रि, वाइन ग्लास अन आंबे हे दोन्ही ज्या दिवशी घरी येतील त्या दिवशी हे बनविल्या जाइल...
तोपर्यंत, अशीच वोडका घ्यायला काय हर्कत आहे... चियर्स...

वप्या, लग्न झालं त्याला किती दिवस झाले?

रेवती's picture

5 Apr 2013 - 7:36 pm | रेवती

चांगला प्रकार आहे.

मुक्त विहारि's picture

5 Apr 2013 - 9:20 pm | मुक्त विहारि

झक्कास..