पाऊस अडतो, माती काळी
कातर वेळी, रिक्त झोळी
थोडीशी जमीन, थोडेसे आभाळ
मोठ्या चेहर्यावर, छोटे कपाळ
वितभर पोटास, पेरभर अन्न
मुठभर काळीज, सुन्न सुन्न
झकपक विज, शहरी वेग
गाव आंधळे, भुईला भेग
राऊळाशी रांग, लांबच लांब
विठू न राखे, त्याचाच आब
कां रे असे, जगणे विटाळ?
रात्र काळ, दिवस दुष्काळ!
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(०५/०३/२०१३)
टिपः माननीय स्पाराज टाकरे यांनी व्यक्त केलेल्या जाहीर अपेक्षाभंगाला
उत्तर म्हणून हि रचना देण्यात येत आहे. कवावे.माननीय स्पाराज टाकर्यांनी यावर आपले मत कळवावे, अशी मी विनंती करत आहे.
प्रतिक्रिया
11 Mar 2013 - 12:27 pm | फिझा
आवडली कविता !
11 Mar 2013 - 12:31 pm | यश पालकर
छान आहे कविता!!!!
11 Mar 2013 - 12:34 pm | प्रचेतस
सुरेख कविता.
यावर्षी तरी पुरेसा पाऊस पडावा हेच त्या निसर्गाकडे मागणे.
11 Mar 2013 - 12:57 pm | स्पा
काय बोलू सुचत नाहीये
भावना थेट पोचल्या .
अंगावर आली कविता
रोज दुष्काळी बातम्या पाहून .. जाम जीव जळतोय. स्वतः २४ तास पाणी वापरताना सारखा 'त्यांचा' विचार मनात येतो. जमेल तसे पाणी जपून वापरायला शिकलोय, भांड्यातले उरलेले पाणी झाडांना घातले जाते.
दुष्काळ ग्रस्त लोकांसाठी सरकारने जी रोजदारी वर काम सुरु केली आहेत, त्याची रोज्दारीही त्यांना मिळत नाही . हंडाभर पाण्यासाठी शाळेतली मुलं सर्व सोडून दिवस दिवस वणवण भटकतात .
तर दुसर्या बाजूला अजून एक बातमी :- तहान भागवायला मुंबईकरांसाठी अजून एक धरण. काय बोलायचे ...
शब्दच खुंटले. पाण्याची सर्वात जास्त नासाडी मुंबईत होते . तरी मुंबईला २४ तास पाणी .
11 Mar 2013 - 2:56 pm | अभ्या..
__________/\__________
पोहोचली रे मनापर्यंत.
11 Mar 2013 - 9:02 pm | जेनी...
खरच विचार करायला लावणारी कविता आहे मिका दादा ! :(
आवडली म्हणायलाहि कससच होतय .... खोलवर पोहोचली म्हणेन .
15 Mar 2013 - 3:07 pm | अत्रुप्त आत्मा
+१ टू बालिका...
12 Mar 2013 - 4:56 am | स्पंदना
हं!
मिका कोष फुटतोय, पंखांची चाहुल आहे या कवितेत. कुठंस वाचल होतं, कोष फुटताना फुलपांखरांची पंख मऊ असतात. पण त्याच पंखांनी तो कोष फोडायचा असतो. जर बाहेरच्याने मदत करुन कोष फोडुन दिला तर त्या पंखांना बळ येत नाही. अन त्या फुलपाखराच जीवन छोट होत म्हणे.
12 Mar 2013 - 6:27 am | इन्दुसुता
कविता विमनस्क करून गेली.
12 Mar 2013 - 7:16 am | किसन शिंदे
कविता छानच.
12 Mar 2013 - 8:30 am | ५० फक्त
एक नम्र विनंती,
तुम्ही लोकक्षोभाला बळी पडुन वगैरे कविता करु नयेत. हल्ली कुणाचे कुठं कसे कधी अपेक्षाभंग होतील ह्याची खात्री नाही. तुम्ही आपलं प्रेमाबद्दल लिहित रहा, छान छान, दुष्काळ अन दुख जगभर आहेच की आम्हाला, तुम्हीपण त्याच वाटेवर घेउन चाललात तर कसं व्हायचं आमचं ?
12 Mar 2013 - 9:16 am | जेनी...
ह्म्म्म खरय दाद्या .. तु असल्या कविता नको करत जाऊस :(
५० कधी कधी(च) मनातलं बोलुन जातात ..
12 Mar 2013 - 9:25 am | स्पा
अरेरे अपेक्षाभंग झाला वाटत.
खरय अगदी =))
15 Mar 2013 - 11:58 am | मिसळलेला काव्यप्रेमी
दोन वेळा उत्तर द्यायचा प्रयत्न केला, दोन्ही वेळेस मिपा गंडले.
तर झाले असे कि, मी स्टार माझा वर एक स्पेशल रेपोर्ट पाहीला मराठवाडा, विदर्भातील दुष्काळावर. त्यातली काही दृश्य अगदी हादरवून गेली. त्यातून हि कविता उमटली.
नंतर आठवले स्पारावांनी अशी काहीतरी सूचना केली होती, म्हणून सहज गंमत म्हणून ती टिप टाकली. असो.
सर्व प्रतिसादकर्त्यांचे मनापासून आभार.
12 Mar 2013 - 2:23 pm | अनिदेश
खुप वास्तववादी आहे कविता...भीषण आहे परिस्थिती :(
13 Mar 2013 - 6:19 am | पाषाणभेद
सत्यपरिस्थितीवरील कविता
13 Mar 2013 - 6:44 am | साऊ
तुमच्या आदिच्या कविअता वचल्या. चछन होत्या.
ही पन छन आहे.
13 Mar 2013 - 8:52 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिटरमधे थोडी गंडली आहे. पण, आशय छान.
(आमचा धोंडोपंत मित्र यांनी देवद्वार छंदाबद्दल घेतलेला तास इथे)
-दिलीप बिरुटे
15 Mar 2013 - 12:23 pm | कवितानागेश
अर्थपूर्ण कविता. :)
15 Mar 2013 - 2:25 pm | क्रान्ति
वास्तववादी कविता सुन्न करून गेली.
15 Mar 2013 - 3:18 pm | अनय सोलापूरकर
------------------
झकपक विज, शहरी वेग
गाव आंधळे, भुईला भेग
------------------
खुपच अर्थपूर्ण ..!
19 Mar 2013 - 9:51 pm | प्यारे१
>>>राऊळाशी रांग, लांबच लांब
विठू न राखे, त्याचाच आब
तू तरी सोड रे 'त्या'ला!
कविता सुन्न करणारी
20 Mar 2013 - 10:45 am | निश
मिसळलेला काव्यप्रेमी साहेब, अतिशय जबरदस्त आशय असलेली कविता.
तुमच्या कवितेत दुसर्यालाही विचार करायला लावणार बळ आहे. अतिशय सुन्न व्हायला लावणारी कविता.
सशक्त आशय मोजक्या पण काळजाला थेट भिडणार्या ओळीत तुम्ही व्यक्त केला आहे.
दुष्काळावर अतिशय बोलक भाष्य करणारी कविता.