दुष्काळ
पाऊस अडतो, माती काळी
कातर वेळी, रिक्त झोळी
थोडीशी जमीन, थोडेसे आभाळ
मोठ्या चेहर्यावर, छोटे कपाळ
वितभर पोटास, पेरभर अन्न
मुठभर काळीज, सुन्न सुन्न
झकपक विज, शहरी वेग
गाव आंधळे, भुईला भेग
राऊळाशी रांग, लांबच लांब
विठू न राखे, त्याचाच आब
कां रे असे, जगणे विटाळ?
रात्र काळ, दिवस दुष्काळ!
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(०५/०३/२०१३)
टिपः माननीय स्पाराज टाकरे यांनी व्यक्त केलेल्या जाहीर अपेक्षाभंगाला
उत्तर म्हणून हि रचना देण्यात येत आहे. कवावे.माननीय स्पाराज टाकर्यांनी यावर आपले मत कळवावे, अशी मी विनंती करत आहे.
छान !!
वा!!!
सुरेख कविता.
ह्म्म्म
अप्रतिम अल्पाक्षरी
खरच विचार करायला लावणारी
+१ टू बालिका...
हं!
कविता विमनस्क करून गेली.
कविता छानच.
एक नम्र विनंती,
ह्म्म्म खरय दाद्या .. तु
अरेरे
दोन
:(
सत्यपरिस्थितीवरील कविता
तुमच्या आदिच्या कविअता वचल्या
मस्त रे...
अर्थपूर्ण कविता.
वास्तववादी कविता सुन्न करून
खुपच अर्थपूर्ण
>>>राऊळाशी रांग, लांबच लांब
मिसळलेला काव्यप्रेमी साहेब, अतिशय जबरदस्त आशय असलेली कविता