कॉकटेल लाउंज : ब्लु गोवन हेवन

सोत्रि's picture
सोत्रि in पाककृती
1 Feb 2013 - 8:22 am

‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “ब्लु गोवन हेवन

पार्श्वभूमी:

काजु फेणीच्या चवीवर एक्सपेरीमेंट्स करताना ही कॉकटेल रेसिपी हाती लागली. ब्लु कुरास्सो वापरुन निळ्या रंगाची समुद्राची निळाई ह्या कॉकटेलला आकर्षक आणि दिलखेचक बनवते. ही रेसिपी माझे इंप्रोवायझेशन आहे. कंप्लीट, नावासकट.

प्रकार
काजू फेणी बेस्ड कॉकटेल

साहित्य

काजू फेणी
2 औस (60 मिली)

ब्लु कुरास्सो
0.5 औस (15 मिली)

लिंबाचा रस
10 मिली

बर्फ

मीठ (ग्लासच्या रिमवर लावण्यासाठी)

ग्लास
कॉकटेल ग्लास

कृती:

सर्वप्रथम कॉकटेल ग्लास फ्रॉस्टी करुन घ्या. त्यासाठी ग्लासमध्ये बर्फाचे खडे आणि पाणी टाकून फ्रीझरमध्ये 15-20 मिनीटे ठेवून द्या.

ब्लु गोवन हेवन - काजु फेणी

त्यानंतर फ्रॉस्टी ग्लासच्या रीमवर मीठ लावून घ्या.

ब्लु गोवन हेवन - काजु फेणी

आता काजू फेणी, ब्लु कुरास्सो आणि लिंबाचा रस कॉकटेल शेकर मध्ये बर्फ घालून व्यवस्थित शेक करून घ्या. ते मिश्रण कॉकटेल ग्लास मध्ये ओतून घ्या. हे कॉकटेल डबल स्ट्रेन करायचे आहे, त्यासाठी हॉथ्रोन स्ट्रेनर वापरावा लागेल.

ब्लु गोवन हेवन - काजु फेणी

हॉथ्रोन स्ट्रेनर वापरुन कॉकटेल ग्लास मध्ये मिश्रण गाळून घ्या.

1

ब्लु गोवन हेवन - काजु फेणी

अफलातून चवीचे आणि समुद्राच्या निळाईचे ब्लु गोवन हेवन कॉकटेल तयार आहे :)

ब्लु गोवन हेवन - काजु फेणी

कॉकटेल रेसिपी

प्रतिक्रिया

तर्री's picture

1 Feb 2013 - 8:44 am | तर्री

वीकांताची अशी फक्कड सुरवात .
बहारदार सोत्री. नेहमीप्रमाणेच.

किसन शिंदे's picture

1 Feb 2013 - 8:54 am | किसन शिंदे

ग्लासांच्या कडांना मीठ लावल्याने काय होतं? :)

(अडाणी)किसना

सोत्रि's picture

1 Feb 2013 - 11:47 pm | सोत्रि

फेणी जर शॉट ग्लास मधून घेतली तर टकीला प्रमाणेच आधि मीठ चाखल्यास चव खुलते.
त्याचप्रमाणे हे कॉकटेल चाखतानाही मीठ आवश्यक असते. रीमला लागलेले मीठ आधि चाखून त्यावर कॉकटेलचा घोट घ्यायचा. हा मुख्य उपयोग. दुसरा दुय्यम उपयोग म्हणजे सजावट :)

- (साकिया) सोकाजी

स्पंदना's picture

1 Feb 2013 - 8:54 am | स्पंदना

किती रसिकता ती! तो ग्लास फ्रॉस्टी काय करुन घ्यायचा, मग ते अगदी तोलुन मापुन मिसळायच काय!

आज मला कळला फार पुर्वी एक आर डी मध्ये जोक वाचला होता त्याचा अर्थ. जोक असा होता की नव वर्षाच्या काउंट डाउन साठी एका बार मध्ये एक सुंदर गायिका स्टेजवर उभी राहुन अनाउंस करते की आता लाईट बंद हितील अन काउंट डाउन सुरु होइल त्यापुर्वी तुम्ही तुमच्या अतिशय आवडत्या व्यक्तीबरोबर उभे रहा म्हणजे तुमच्या नववर्षाची सुरवात अत्यंत आवडत्या व्यक्तीच्या सहवासात होइल.......
द बार टेंदर गॉट किल्ड इन द फ्रेंजी ऑफ ऑल द गेस्ट ट्राइंग टु स्टॅड विथ हिम.

सुरेख! सुरेख! काय रंग आहे ड्रिंकचा! अफलातुन!

अत्रुप्त आत्मा's picture

1 Feb 2013 - 9:06 pm | अत्रुप्त आत्मा

@किती रसिकता ती! तो ग्लास फ्रॉस्टी काय करुन घ्यायचा, मग ते अगदी तोलुन मापुन मिसळायच काय! >>>>हेच हेच म्हणायचय मला....! सोत्री यु आर खत्री....!!! http://www.sherv.net/cm/emoticons/drink/martini-smiley-emoticon.gif

समांतर--- @त्यानंतर फ्रॉस्टी ग्लासच्या रीमवर मीठ लावून घ्या@>>>मी ही सत्यनारायणाच्या प्रसादाच्या द्रोणाच्या कडा अश्याच पिठिसाखरेत घोळवाव्या का? =)) या विचारात आहे. ;-)

सोत्रि's picture

1 Feb 2013 - 11:50 pm | सोत्रि

काउंट डाउन सुरु होइल त्यापुर्वी तुम्ही तुमच्या अतिशय आवडत्या व्यक्तीबरोबर उभे रहा म्हणजे तुमच्या नववर्षाची सुरवात अत्यंत आवडत्या व्यक्तीच्या सहवासात होइल

खि. खि.. खि... खरे कारण वेगळे असते अपर्णातै! ;)

द बार टेंदर गॉट किल्ड इन द फ्रेंजी ऑफ ऑल द गेस्ट ट्राइंग टु स्टॅड विथ हिम.

ते 'हिम' नसावे 'हर' असे असणार :)

- (काउंट डाऊननंतरच्या अंधारातली नववर्षाची सुरुवात अनुभवलेला) सोकाजी ;)

स्पंदना's picture

2 Feb 2013 - 12:34 pm | स्पंदना

अहो सोत्रीअण्णा आता बघा अश्या बहारदार सलिकेदार पद्धतिने जगाचा ताप व्याप नष्ट करणारी वारुणी देणारा बार टेंदरच सगळ्यांना प्रिय होता. तो अब की बार बचके रहियो!

नि३सोलपुरकर's picture

1 Feb 2013 - 11:31 am | नि३सोलपुरकर

मस्त इंप्रोवायझेशन आहे.सुरेख!
सुरेख रंग आहे ड्रिंकचा!

@अपर्णाताई - जोक आवड्ला +१००

योगप्रभू's picture

1 Feb 2013 - 2:46 pm | योगप्रभू

सोका,
गोव्याच्या समुद्राची निळाई सुरेख उतरलीय कॉकटेलमध्ये. मस्तच...

फेणीचा सदुपयोग करण्याबद्दल सोकाला 'फास्टर फेणी' किताब देण्यात यावा, असा प्रस्ताव मांडतो.

ते 'ब्लू गोवन हेवन' असलं विंग्रजी नाव देण्याऐवजी 'नीलफेणी' असं काहीतरी म्हणा की. गोव्याचे सुप्रसिद्ध कवी शंकर रामाणी यांच्या 'निळं निळं ब्रह्म' या कविता संग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे या कॉकटेलला 'निळं ब्रह्म' म्हणावं का? :)

कालच फेणीचा लाभ झाला आहे. :) त्यामुळे करुन पाहणं सहज शक्य आहे याचा आनंद होत आहे. अन्यथा आम्ही गोवाबाह्य सदस्य ही रेसिपी वाचून तरी एरवी काय करणार होतो नुसतेच मिटक्या मारण्याखेरीज..? ;)

अर्थात यावर एक छत्रीवाला स्ट्रॉ छान दिसेल अशी सूचना.

हाच प्रकार नारळाच्या फेणीपासून करता येईल का? दोन्ही फेणी एकाचढ एक मस्त असतात.

A

सोत्रि's picture

1 Feb 2013 - 11:53 pm | सोत्रि

स्ट्रॉची कल्पना भारीच आहे. पण ह्यावेळी स्ट्रॉचा स्टॉक संपला होता :(

- (साकिया) सोकाजी

अग्निकोल्हा's picture

1 Feb 2013 - 8:15 pm | अग्निकोल्हा

जणु निळ्या डोळ्यांची परीच समोर यावी.... ती सुध्दा असं मिठामधे न्हाउन अनं अजुनच नमकिन होऊन.... सही!

आजानुकर्ण's picture

1 Feb 2013 - 10:33 pm | आजानुकर्ण

झकास कॉकटेल

रेवती's picture

1 Feb 2013 - 10:48 pm | रेवती

सुंदर निळा रंग. अगदी समुद्राची निळाई उतरलीये.

निळा रंग अगदीच आकर्षक दिसतोय.

मुक्त विहारि's picture

2 Feb 2013 - 1:08 pm | मुक्त विहारि

झक्कास..

आता अबु धाबीला फेणी शोधणे आले..

फक्त तुमची रेसिपी वाचुन नेत्रसुख घेता येते. एकदा चव घ्यावी म्हनतोय...........

पैसा's picture

2 Feb 2013 - 8:35 pm | पैसा

फोटो छान! नेहमीप्रमाणेच!

भटक्य आणि उनाड's picture

20 Apr 2013 - 3:40 pm | भटक्य आणि उनाड

>मी ही सत्यनारायणाच्या प्रसादाच्या द्रोणाच्या कडा अश्याच पिठिसाखरेत घोळवाव्या का? या विचारात आहे.