'कॉकटेल लाउंज' मालिकेतील आजचे कॉकटेल आहे "ग्रे गूज मार्टीनी (Grey Goose Martini)"
पार्श्वभूमी:
क्लासिक मार्टीनीला दिलेला वोडकाचा ट्वीस्ट म्हणजे वोडका मार्टीनी किंवा वोडकाटीनी हे माहिती होते. पण ही ग्रे गूज मार्टीनी काय भानगड आहे?
ह्या भानगडीची मला ओळख झाली एका चित्रपटातून. माझ्या लाडक्या विल स्मीथचा, माझा एक लाडका चित्रपट 'हिच' (होय.. होय, तोच तो! गोविंदा आणि सल्लूचा पार्टनरची सिनेमा ज्यावरून 'इंस्पायर्ड' झाला तोच) त्या चित्रपटात हिच (विल स्मीथ) एका शुक्रवारच्या संध्याकाळी बारमधे गेला असताना त्याला एक आकर्षक तरुणी (इव्हा मेंडिस) दिसते. त्याला ती प्रथमदर्शनी आवडते. बारचा बार टेंडर तिच्याबद्दल माहिती देताना सांगतो की तिने 'ग्रे गूज मार्टीनी' ऑर्डर केलीय. त्यानंतरचा सीन निव्वळ लाजवाब आहे. पण आत्ता मुद्दा तो नाहीयेय. त्यावेळी ते 'ग्रे गूज मार्टीनी' ऐकल्यावर, च्यायला ही काय भानगड असा किडा डोक्यात वळवळला. शोध घेतल्यावर कळले की असे काही ट्रॅडिशनल कॉकटेल नाहीयेय. 'ग्रे गूज' ह्या विख्यात वोडका पासून बनवलेले चक्क वोडकाटीनी आहे. बहुदा ग्रे गूज वोडका बनविणार्या कंपनीने ब्रॅंड मार्केटिंगसाठी हिच चित्रपटाचा वापर केला असावा.
असो, हे कॉकटेल ह्या ग्रे गूज वोडका वर बेतलेले आहे. एकदम अफाट चवीची ही वोडका, बाटली डीप फ्रीझर मध्ये ठेवून थंड करायची आणि शॉट ग्लास मधून 'नीट' शॉट घेत गट्टम करायची घ्यायची. अफलातून फ्रूटी चव आहे, लाजवाब!
प्रकार
वोडका मार्टीनी
साहित्य
ग्रे गूज वोडका
2 औस (60 मिली)
ड्राय व्हर्मूथ (मार्टीनी)
10 मिली
बर्फ
ग्रीन ऑलिव्ह सजावटीसाठी
टूथपिक ( न वापरलेली ;) )
ग्लास
मार्टीनी (कॉकटेल)
कृती:
ह्या कॉकटेलचीची कृती अतिशय सोप्पी आहे. शेकर मध्ये बर्फ घालून त्यावर ग्रे गूज वोडका हळूवार ओतून घ्या. त्यात ड्राय व्हर्मूथ टाकून बार स्पूनने हळूवार स्टर करून घ्या. त्यानंतर चील्ड केलेल्या कॉकटेल ग्लासमध्ये ते मिश्रण ओतून त्यात ग्रीन ऑलिव्ह टूथ पिकला अडकवून ग्लासात सोडून द्या.
झक्कास आणि पोटंट ग्रे गूज मार्टीनी तयार आहे :)
प्रतिक्रिया
18 Jan 2013 - 9:43 pm | तर्री
सुरेख.
18 Jan 2013 - 9:49 pm | धमाल मुलगा
कधी येऊ? :-P
18 Jan 2013 - 9:57 pm | सोत्रि
आयचा घो! तु अवतीर्ण झालास? :o
8-13 फेब्रु. कधीही ये. :)
- (साकिया) सोकाजी
18 Jan 2013 - 9:56 pm | इष्टुर फाकडा
जियो जियो !!
18 Jan 2013 - 9:58 pm | रेवती
छान.
18 Jan 2013 - 10:02 pm | धन्या
चित्रे कातिल आहेत. :)
18 Jan 2013 - 10:17 pm | अग्निकोल्हा
आता नक्किच चाखणार!
18 Jan 2013 - 11:15 pm | पिवळा डांबिस
या वीकांताला नक्की करणेत येईल.
लोकांना इव्हाचं, तर सोकाला व्होडकाचं!!!
;)
18 Jan 2013 - 11:38 pm | सोत्रि
हा हा हा, पिडांकाका, तेव्हा, म्हणजे सिनेमा बघताना, इव्हावरुन नजर हटली नव्हती. (विल स्मिथ बरोबरच तिलाही माझी लाडकी न म्हणण्याचे कामह, माझ्याबायकोचा इथे वावर असतो).
जो किडा डोक्यात वळवळला, तो नंतर यथासांग इव्हा डोक्यातून उतरल्यावर ;)
- (व्होडकाबाज) सोकाजी
19 Jan 2013 - 8:46 am | प्रचेतस
मद्याचार्य _/\_
19 Jan 2013 - 9:36 am | स्पंदना
टेबलक्लॉथ आवडल.
19 Jan 2013 - 9:57 am | चाणक्य
तुम्ही हे सगळं मटेरिअल कुठुन आणता ? कारण साधी ग्लेनफिडिश घ्यायला पण लई वणवण करावी लागते.