झाली माझी गोष्ट

वामन देशमुख's picture
वामन देशमुख in जे न देखे रवी...
27 Dec 2012 - 6:14 pm

झाली माझी गोष्ट

एक होतं गाव
तिथं होतं पोस्ट
झाली माझी गोष्ट.

एक होती सासू
ती होती खाष्ट
झाली माझी गोष्ट.

एक होता नेता
तो झाला भ्रष्ट
झाली माझी गोष्ट.

एक होती नणंद
ती होती शिष्ट
झाली माझी गोष्ट.

एक होती प्रेयसी
ती झाली रुष्ट
झाली माझी गोष्ट.

एक होता शेतकरी
त्याने केले कष्ट
झाली माझी गोष्ट.

एक होता मुलगा
त्याने खाल्ले टोस्ट
झाली माझी गोष्ट.

एक होता वक्ता
तो बोलला स्पष्ट
झाली माझी गोष्ट.

एक होता सिद्धांत
तो होता क्लिष्ट
झाली माझी गोष्ट.

एक होतं साम्राज्य
ते झालं नष्ट
झाली माझी गोष्ट.

एक होतं बाळ
त्यानं खाल्लं उष्ट
झाली माझी गोष्ट.

एक होते नागरिक
ते होते ज्येष्ठ
झाली माझी गोष्ट.

एक होता बैल
तो होता पुष्ट
झाली माझी गोष्ट.

एक होता ग्रंथ
त्यात होते पृष्ठ
झाली माझी गोष्ट.

एक होता अंक
हो होता अष्ट
झाली माझी गोष्ट.

एक होता कवी
तो होता श्रेष्ठ
झाली माझी गोष्ट.

एक होती सुंदरी
तिला लागली दृष्ट
झाली माझी गोष्ट.

एक होता राक्षस
तो होता दुष्ट
झाली माझी गोष्ट.

एकदा आली आपत्ती
ती होती इष्ट
झाली माझी गोष्ट.

एक होता शुक्ल
त्याला लागले काष्ठ
झाली माझी गोष्ट.

एक होती ललना
लाल तिचे ओष्ठ
झाली माझी गोष्ट.

एक होता वेडा
त्यानं सांगितली गोष्ट
झाली माझी गोष्ट.

एक आहे सचिन
त्याने पिलं बूस्ट
झाली माझी गोष्ट.

हास्यहे ठिकाणकवितामुक्तकभाषाप्रतिशब्दशब्दक्रीडा

प्रतिक्रिया

गणपा's picture

27 Dec 2012 - 6:25 pm | गणपा

एक होता वेडा
त्यानं सांगितली गोष्ट
झाली माझी गोष्ट.

खीक्

लीलाधर's picture

27 Dec 2012 - 7:40 pm | लीलाधर

एक होता वामन
त्याला माझे नमन ----^----
झाले माझे स्तवन :)

पंडितांच्या पांडित्याला __/\__

अत्रुप्त आत्मा's picture

27 Dec 2012 - 9:51 pm | अत्रुप्त आत्मा

ओव्हन मधे घातली
एवढी मोठ्ठी पोश्टं
तीचा झाला कडक टोश्टं :-p

किसन शिंदे's picture

27 Dec 2012 - 11:04 pm | किसन शिंदे

ओव्हन मधे घातली
एवढी मोठ्ठी पोश्टं
तीचा झाला कडक टोश्टं

=)) =)) =))

कविच्या आडनावाचा आणि कवितेचा विरोधाभास वाटतोय. :)

५० फक्त's picture

30 Dec 2012 - 11:55 am | ५० फक्त

काय काय कडक करायला काय काय करतात बापरे, मोठा ओव्हन कशाला छोट्याश्या टोस्टर मध्ये कडक होईल की टोस्ट.

कुणाचा टोस्ट मोठया ओव्हनमध्ये कडक होईल तर कुणाचा छोटयाशा टोस्टरमध्ये. प्रत्येकाच्या टोस्टच्या कडक होण्यासाठीच्या तापमानाच्या, लागणार्‍या जागेच्या गरजा वेगवेगळ्या असतात.

धाग्याची एकूण लांबी-रुंदी व आशयघनता तसेच विषय-व्याप्ती पाहता मोठ्ठ्यात मोठ्ठा ओव्हनही पुरे पडेल काय शंका वाटते...!

धन्या's picture

30 Dec 2012 - 9:50 pm | धन्या

आजपर्यंत विषयाच्या व्याप्तीसंदर्भात "व्यासोच्छीष्टं जगत सर्वम" असं म्हटलं जायचं, कारण व्यासांनी महाभारतात मानवी मनाचे सर्व पैलू, कंगोरे वगैरे वगैरे हाताळले आहेत.

तेच आज इथे वामनपंडीतांनी केलं आहे. एक मिपाकर म्हणून मला वामनपंडीतांचा अभिमान वाटतो. काही नतद्र्ष्टांना यानिमित्ताने "यमक्या वामन" नावाचे इतिहासातील वामनपंडीत आठवण्याची शक्यता आहे. पण तिकडे आपण दुर्लक्ष करावे.

अत्रुप्त आत्मा's picture

2 Jan 2013 - 9:19 pm | अत्रुप्त आत्मा

@यानिमित्ताने "यमक्या वामन">>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif

आनन्दिता's picture

30 Dec 2012 - 10:25 am | आनन्दिता

गोळा केल्या चिंध्या
घातली त्यांना ठिगळं…
'गोष्टीच्या' खोक्यात
कोंबलंय भलतच सगळं…:)

तिमा's picture

30 Dec 2012 - 10:54 am | तिमा

कविता कळायला अंमळ कठीण आहे.

आपण आपली पुढील कविता, 'मानवी उत्क्रांतीवाद' किंवा ' कवितेतील वर्डस्वर्थचे स्थान' अशा एखाद्या सोप्प्या विषयावर करावी ही विनंती.

एस's picture

30 Dec 2012 - 10:21 pm | एस

.
.
झाला माझा प्रतिसाद!

वामन देशमुख's picture

2 Jan 2013 - 5:21 pm | वामन देशमुख

प्रतिसादकांचे आभार.

माझ्या पुतण्या-पुतणींना रिझविण्यासाठी मी अश्या बाळबोध रचना करायचो. त्यांना त्यांचा अर्थ कळत नसला तरी नक्कीच आवडायच्या. आता "गोष्ट" मालिकेतल्या जेवढ्या गोष्टी आठवल्या तितक्या इथे लिहिल्यात.

शाब्दिक गमतीजमती दोन ते पाच वयोगटातील मुलांना खूप आवडतात आणि त्यातून त्यांची Lateral thinking (?), तर्कशक्ती अधिक चांगल्या तऱ्हेने विकसित होते आणि एकूणच भाषेतील गोडी वाढते असा माझा अनुभव आहे.

एक होता वामन
त्याला माझे नमन ----^----
झाले माझे स्तवन

पंडितांच्या पांडित्याला __/\__

धाग्याची एकूण लांबी-रुंदी व आशयघनता तसेच विषय-व्याप्ती पाहता मोठ्ठ्यात मोठ्ठा ओव्हनही पुरे पडेल काय शंका वाटते...!

दिस इज मात्र टू मच हं!

आजपर्यंत विषयाच्या व्याप्तीसंदर्भात "व्यासोच्छीष्टं जगत सर्वम" असं म्हटलं जायचं, कारण व्यासांनी महाभारतात मानवी मनाचे सर्व पैलू, कंगोरे वगैरे वगैरे हाताळले आहेत.

तेच आज इथे वामनपंडीतांनी केलं आहे. एक मिपाकर म्हणून मला वामनपंडीतांचा अभिमान वाटतो.

दिस इज मात्र फारच टू मच हं! तरीही धन्स बरं का धन्याजी!

गोळा केल्या चिंध्या
घातली त्यांना ठिगळं…
'गोष्टीच्या' खोक्यात
कोम्बलंय भलतच सगळं…

हं, बरोब्बर ओळखलंत!

कविता कळायला अंमळ कठीण आहे.

सॉरी...!

आपण आपली पुढील कविता, 'मानवी उत्क्रांतीवाद' किंवा ' कवितेतील वर्डस्वर्थचे स्थान' अशा एखाद्या सोप्प्या विषयावर करावी ही विनंती.

हम्म्मम्म... गम्मत करताय नं!

ऋषिकेश's picture

2 Jan 2013 - 5:34 pm | ऋषिकेश

खिक्
बडबडगीत म्हणून म्हणायला मजा येईल :)

ह भ प's picture

2 Jan 2013 - 6:06 pm | ह भ प

आधि गेला सप्त
मग आला अष्ट
झाली माझी गोष्ट!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Jan 2013 - 6:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

माझ्या पुतण्या-पुतणींना रिझविण्यासाठी मी अश्या बाळबोध रचना करायचो. त्यांना त्यांचा अर्थ कळत नसला तरी नक्कीच आवडायच्या. आता "गोष्ट" मालिकेतल्या जेवढ्या गोष्टी आठवल्या तितक्या इथे लिहिल्यात.

हम्म... हा तुमचा मिपावरील वाचकांच्या सर्वसाधारण वयाचा अंदाज समजायचा का? +D

बॅटमॅन's picture

2 Jan 2013 - 6:43 pm | बॅटमॅन

एक होते पंडित
केलं सर्व विषयांना उष्टं
झाली माझी गोष्ट

मस्त "वामनी" कविता हो पंडितजी. आवडेश!

मनीषा's picture

2 Jan 2013 - 9:08 pm | मनीषा

ही गोष्टं छान आहे..
आता दूसरी सांगा .

५० फक्त's picture

2 Jan 2013 - 11:21 pm | ५० फक्त

दुसरा कब ? पैला सुकुल जाने लगे तब....

अरे ही आहे ती तरी पचनी पडुद्या मग दुसरी बघी...

मनीषा's picture

3 Jan 2013 - 10:13 am | मनीषा

नाही नाही पन्नासजी ...
तुमचा काहीतरी गोंधळ होतो आहे. ही इस्कूलात जाणारी न्हाई.. झाडाखाली पारावर राहणारी आहे..
एका पाठोपाठ एक आली तरी चालतीय .

वामन देशमुख's picture

3 Jan 2013 - 9:17 am | वामन देशमुख

हम्म... हा तुमचा मिपावरील वाचकांच्या सर्वसाधारण वयाचा अंदाज समजायचा का?

नाही हो, इस्पिकराव! मिपाकरांच्या वयाचा अंदाज कुणाला येऊ शकेल का? आणि आजकाल स्त्री-पुरुषांना वयं विचारायची नसतात ना!

मूकवाचक's picture

3 Jan 2013 - 5:15 pm | मूकवाचक

तीन शब्दांच्या काव्यात ...

कविला थोडेच कष्ट

आयडीया लै ब्येष्ट

सुटली गाडी फाष्ट

कवि होता ज्येष्ठ

त्याची बायको खाष्ट

लाल तिचे ओष्ठ

सासू सासरे शिष्ठ

कवि झाला रूष्ट

त्याने खाल्ले टोस्ट

त्यावर पिलं बूस्ट

झाला थोडा पुष्ट

मग बोलला स्पष्ट

तुम्ही आहात दुष्ट

विवाह संस्था भ्रष्ट

जळो हे शुक्लकाष्ठ

पुरे झाले कष्ट

एकटे राहणे इष्ट

संपली आमची गोष्ट!

अनिल तापकीर's picture

3 Jan 2013 - 5:18 pm | अनिल तापकीर

कविता आनि प्रतिसाद दोन्ही आवडले