बोला!! स्त्री मुक्ती आंदोलन, झिंदाबाद!!!

जहीर सय्यद's picture
जहीर सय्यद in जनातलं, मनातलं
11 Dec 2012 - 12:06 am

मानवतेच्या इतिहासात पुरुषांनी स्त्रियांना समान हक्क दिले नाहीत. त्यामुळे स्त्रियांवर अन्याय झाला. जसे जसे शिक्षणाचा प्रसार झाला माहिती ज्ञानाचा प्रसार झाला. मानवतेच्या एकूण जगाला समजून घेण्याच्या प्रक्रियेची उत्क्रांती होत आहे, लोकांची विचार करण्याची पद्धत बदलत चालली आहे. एकूण परिस्थिती बदलत आहे. २१ व्या शतकात देखील जर मनुष्य स्त्रियांना समान हक्क देवू शकत नसेल तर हे मानवतेच दुर्दैव समजावे. परंतु ह्या प्रश्नाची एक दुसरी बाजू देखील आहे. स्त्रियांना समान हक्क (Equality) देण्याच्या नावावर फेमिनीस्ट शक्ती स्त्री आणि पुरुषांना एकरूप (Identical) करण्याच्या घाट घालत आहेत किंबहुना ते त्याच्या हि पलीकडे कडे जाऊन ते Gynocentric (स्त्री केंद्रित) and Misandric (पुरुष द्वेषी) संस्कृती विकसित करीत आहेत.

एका वाक्यात मी असे म्हणेन कि हे जे काही चालले आहे ते "एका अतिरेकाचे उत्तर दुसर्या अतिरेकाने" देण्याचा प्रयत्न ह्या फेमिनीस्ट शक्ती करत आहेत. त्यासाठी त्यांनी अनेक घातक, अतिरेकी, अव्यवहारिक, हिंसक, द्वेषपूर्ण, मूर्ख आणि हास्यास्पद संकल्पना निर्माण केल्या आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत.

काही गोष्टी अश्या असतात कि ज्या तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाही म्हणून हा एक छोटासा प्रयत्न. जेंव्हा कोणतीही पाश्चात्य संकल्पना मिडिया वर स्वार होऊन आपल्या पर्यंत येते तर आपली गणती "मागासलेल्या विचारांचे" या सदरात होऊ नये म्हणून आपण लगेच हिर हिरीने त्या चर्चेत भाग घेवून तावा तावाने पाठींबा देतो कारण आपण "शिकलेले लोक" असतो. परंतु आपण कधी स्वतःचे डोके देखील चालवायला पाहिजे आपला देश, आपली संस्कृती, आपली गरज आपली माती आणि आपले प्रश्न त्याच बरोबर ह्या जगाचा वेग आणि दिशा याची योग्य ती सांगड घालून निर्णय घ्यायला पाहिजे असे मला वाटते.

फिलॉसॉफी ची प्रोफेसर Christina Hoff Sommers प्रसिद्ध अमेरिकन लेखिका, Who Stole Feminism? या पुस्तकाद्वारे फेमिनिझम चे दोन भिन्न वैचारिक शाखां वर प्रकाश टाकते. एक आहे Equity feminism आणि दुसरी आहे त्याच्या अगदी उलट Gender feminism

Equity feminism: फेमिनिझम च्या ह्या शाखेचा उद्देश आहे स्त्रियांना संपूर्ण नागरिक आणि वैधानिक समानता मिळावी. आणि ह्या शाखेचे मूळ तिच्या मते classical liberalism मध्ये आहे. या फेमिनिझम ची सुरवात साधारणता १९१३ च्या काळात झाली. या काळात जी चळवळ सुरु झाली तिला First-wave feminism म्हणतात. स्त्रियांना मतदानाचे हक्क मिळावे त्याच प्रमाणे शैक्षणिक तसेच आर्थिक क्षेत्रात स्वतंत्र मिळावे या साठी प्रामुख्याने ओळखले जाते. या काळात स्त्री पुरुष समानता यावर जास्त जोर होता.

Gender feminism: हे लेखिकेच्या मते Gynocentric (स्त्री केंद्रित) आणि Misandric (पुरुष द्वेषी) आहे. हि शाखा "लैंगिक भूमिकेची" (Gender role) आलोचना करते आणि त्याला समूळ नष्ट करण्याची भाषा करते. या प्रकारच्या फेमिनिझम ची सुरुवात साधारण १९६० पासून सुरु झाली तर ती १९८० पर्यंत कार्यरत होती. चळवळीच्या ह्या दुसर्या लाटेला Second-wave feminism म्हणून ओळखले जाते. ह्या लेखात आपण याच प्रकारच्या फेमिनिझम बद्दल ओळख करून घेणार आहोत. या फेमिनिझम मध्ये काळानुसार अनेक स्त्री फीलॉसॉफर,सैद्धांतिक, विचाराकांनी स्त्री मुक्तीवदाला स्त्री पुरुष समानते कडून हळू हळू Gynocentric (स्त्री केंद्रित) आणि Misandric (पुरुष द्वेषी) सिद्धांताकडे कसे कसे घेवून गेले आणि फेमिनिझम हे फेमिनिझम न राहता विद्रोह्वाद आणि उग्रवाद मध्ये याचे परिवर्तन कसे झाले हे आपण पाहणार आहोत. या सदरात ज्या काही संकल्पना ह्या फेमिनीस्ट विचारवंतांनी निर्माण केल्या आहेत, त्यांचा एक एक करून आढावा घेवूया

कट्टरपंथी स्त्रीवाद
स्त्री मुक्ती आंदोलन च्या मते पितृसत्ताक पद्धती हि एक शक्ती व्यवस्था आहे जी नाते संबंधाना जटील करून पुरुष वर्गाचे वर्चस्व स्थापित करून स्त्रियांचे दमन होईल अशी समाजाची रचना करते. त्यांची भूमिका अशी आहे कि समाजाची जबरदस्तीने समूळ क्रांतिकारी पुनार्व्यावास्थापण करून ह्या पितृसत्ताक पद्धतीला आव्हान देऊन उलथून टाकणे.
Willis, "Radical Feminism and Feminist Radicalism", p. 117.

कट्टरपंथी स्त्रीवाद असे सांगतो कि पुरुषांनी स्त्रियांना काबीज करून नियंत्रित ठेवण्यासाठी "लिंग भूमिका प्रणाली" (Gender Role ) स्थापन केलेली आहे आणि हि प्रणाली विनातक्रार चालण्यासाठी पुरुषांनी लग्न, कुटुंब, वेश्या व्यवसाय आणि विषम लैंगिक संबंध ह्यांची निर्मिती केलेली आहे म्हणून ह्या सर्व गोष्टी लवकरात लवकर नष्ट करून टाकले पाहिजे.
Willis, "Radical Feminism and Feminist Radicalism", p. 130–132.

एवढेच नव्हे तर पुढे जाऊन ह्या फेमिनिस्ट लोकांचे म्हणणे आहे कि पितृसत्ताक पद्धती जबरदस्ती क्रांतिने उलथून त्या जागी स्त्रियांनी सत्ता आपल्या हातात घेवून इतर स्त्री पुरुषांवर नियंत्रण ठेवावे.

Daly Mary एक अमेरिकन फेमिनीस्ट फिलॉसॉफर लैंगिक समानतेच्या विरोधात होती,तिचे म्हणणे आहे कि स्त्रियांनी पुरुषांवर राज्य केले पाहिजे आणि सर्व प्रकारचे राजनैतिक आणि सामाजिक शक्ती स्त्रियांनी पुरुषांकडून हस्तगत करून टाकायला हवी.
Daly, Mary, Gyn/Ecology: The Metaethics of Radical Feminism, pp. 15 & xxvi (p. xxvi in New Intergalactic Introduction (prob. 1990)).
Daly, Mary, Gyn/Ecology: The Metaethics of Radical Feminism, p. xxvi (New Intergalactic Introduction (prob. 1990)).

Shulamith Firestone हि एक उच्च कोटीची कँनेडियन फेमिनीस्ट होती जिने कट्टरपंथी स्त्रीवाद ह्या शाखेची स्थापना करण्यात खूप मोठे योगदान दिले लेखिका म्हणते:
“पितृसत्ताक समाज रचने मध्ये स्त्रियांवर लैंगिक असमानता लादली जाते ती स्त्रियांच्या "जीवशास्त्रा" मुळे. त्यानंतर भौतिक, सामाजिक और मनोवैज्ञानिक नुकसान लादले जाते ती गर्भावस्था, प्रसूती आणि त्यानंतर मुलांचे संगोपन करण्याच्या नावाने. या जैविक निर्धारित जबाबदारी पासून स्त्रियांना पळवाट काढण्यासाठी सुटका करून घेण्यासाठी ती सल्ला देते कि मूले जन्मालाच घालायची असतील तर त्यांना प्रयोग शाळेत जन्माला घाला आणि त्याचे संगोपन सरकारने केले पाहिजे. कारण ती प्रसुतीला बर्बरतापूर्ण समजते आणि म्हणते कि तिची एक मैत्रीण असे म्हणते कि बाळाला जन्म देणे तिला "भला मोठा भोपळा हगण्यासारखे वाटते."
Political Ideologies: An Introduction, Andrew Heywood, 2003, Palgrave Macmillan, ISBN 0-333-96178-1, pp 272.
Sydie, R. A., Natural women, cultured men: a feminist perspective on sociological theory, University of British Columbia Press, 1994, pp. 143-148. ISBN 0-7748-0491-2

अशी विचारधारा निर्माण करून तिचा प्रसार करून ह्या विचारांना फेमिनिजम चे उद्देश्य, लक्ष बनविणाऱ्या मध्ये प्रामुख्याने १९६० च्या दशकातील Andrea Dworkin, Phyllis Chesler, Monique Wittig, Mary Daly, Jill Johnston, आणि Robin Morgan ह्यांचा मोठा हाथखंड आहे.

फ्रेंच लेखिका आणि सिद्घांतकार Monique Wittig हि “बया” तर विज्ञानाला देखील बस्तानात गुंडाळून ठेवायला निघाली. ती "जैविक" निर्धारणालाच मानत नव्हती. स्त्रीत्व, पौरुषुत्वा असं काही नसत असे तिचे म्हणणे होते. जे लोक सत्तेवर आहेत (पुरुष) त्यांनीच आपल्या फायद्यासाठी म्हणजे आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी लिंग भेद आणि वंश भेद असे भेद भाव निर्माण केलेले आहे असे तिचे म्हणणे होते. Monique Wittig आणि तिच्या समकालीन समविचारी तथाकथित बुद्धीवादी सह्योगींचे असे म्हणणे होते कि समाजातील स्त्री पुरुषांना विभक्त करून टाकायला पाहिजे, एकमेकानपासून दूर करून टाकायला पाहिजे. कारण त्यांच्या नुसार स्त्री पुरुषातील सहजीवन, संबंध, नाते आणि भूमिका हेच स्त्रियांच्या दमनाचे प्रमुख कारण होय.
Hoagland, Sarah Lucia. Lesbian Ethics: Towards a New Value, Institute for Lesbian Studies, Palo Alto, Ca.
Claire Duchen, Feminism in France (1986) p. 23-4

लैंगिक अलगाववाद
आता हे हेतू साध्य करण्या साठी स्त्रीवादी चळवळीच्या काही तथाकथित बुद्धिवादी स्त्रियांनी एक नवीन विचारधारा जन्माला घातली "लैंगिक अलगाववाद"
आता हे "लैंगिक अलगाववाद" काय आहे. काही "अतिरेकी" विचार सरणीच्या तथाकथित बुद्धिवादी स्त्रियांचे असे म्हणणे आहे कि. स्त्रियांच्या दमन अत्याचारामागे समाजातील स्त्री पुरुषांचे विषमलैंगिक संबंध जबाबदार आहे. विषमलैंगिक संबंध नैसर्गिक नियम आहे. मानवतेच्या इतिहासाने वैध ठरवलेले आहे. जगातील सर्व अब्राहामिक आणि अब्राहामिकेतर धर्मांनी प्रोहोत्सान दिलेले. जगातील अनेक थोर संस्कृतीने मान्य केलेले. मानव संन्कृतीच्या इतिहासात कुटुंब संस्थेच्या परिघातील एका स्त्री पुरुषाचे कायदेशीर लग्नाच्या बंधानातील विषमलैंगिक संबंध हे एक सर्वसामान्य, सर्वमान्य, नैतिक आणि वैज्ञानिक दृष्टीने गरजेचे आहे. थोडक्यात ह्या अतिरेकी तत्वांना कुटुंब संस्था असा उल्लेख करायचा देखील तारतम्य उरलेलं नाही ते आता थेट "विषमलैंगिक संबंध आणि "समलिंगी संबंध" (म्हणजे लैंगिक संबंधावरच सर्व गोष्टी मोजायला लागले आहेत) ह्या स्थराला येवून पोहोचले आहेत, असो. तर पर्यायाने या "अतिरेकी" विचार सरणीच्या तथाकथित बुद्धिवादी स्त्रियांच्या म्हणण्या नुसार "कुटुंब संस्था" हीच स्त्रियांवरील अत्याचाराला कारणीभूत असल्यामुळे पितृसत्ताक कुटुंब संस्था आणि ह्या संस्थेला समर्थन करणाऱ्या "समाज" संस्थेलाच समूळ नष्ट, उध्वस्त करायला पाहिजे.
Bunch, Charlotte. Learning from Lesbian Separatism, Ms. Magazine, Nov. 1976

विषमलैंगिक अलगाववाद
१९६८ मध्ये Roxanne Dunbar हिने स्थापित केलेली "Cell १६" फेमिनीस्ट संगठना. हिने सर्वप्रथम स्त्रियांना अश्या पुरुषान पासून कि जे त्यांच्या विचारधारेला मानत नाही अथवा समर्थन देत नाही, अलग राहण्यासाठी उद्युक्त केले. हे कायम अलग होणे नव्हे काही काळा पुरते होते. आणि हीच खरेतर समलैंगिक अलागाववादी ची पहिली पायरी मानली जाते.
Dunbar, Leghorn. The Man's Problem, from No More Fun and Games, Nov 1969, quoted in Echols, 165

समलैंगिक अलगाववाद
Charlotte Bunch, एक अमेरिकन फेमिनीस्ट कार्यकर्ता आणि लेखिका हिने अलगाववादाला समलैंगिक स्त्रियां साठी एक रणनीती बनविली कि स्त्रियांनी आपले व्यक्तिगत विकासासाठी ठराविक काळासाठी मुख्य धारेची सक्रियते पासून (पुरुषान पासून, कुटुंबापासून कि समाजापासून???) अलिप्त राहेव. काही विचारवंत स्त्रिया ह्या रणनीतीला अस्थाई स्वरुपाची रणनीती मानत तर काही विचारवंत ह्या प्रथेला संपूर्ण जीवना मध्ये अमलात आणायला पाहिजे असे मानत.
Davis, Flora. Moving the Mountain: The Women's Movement in America since 1960, University of Illinois Press, 1999, ISBN 0-252-06782-7, p271

आणि एवढेच नव्हे तर पुरुषांना विशेष अधिकार देणार्या सर्व गोष्टी, पद्धती आणि सर्व तर्हेने त्यांच्या पासून अलग व्हायचे, अशी सर्व संस्था, नाते, भूमिका, गतीविधी पासून स्त्रियांच्या अटी प्रमाणे संबंध तोडून टाकायाचे थोडक्यात "असहकार" घोषित करायचा आणि पुरुषांना जेरीस आणायचे.

Marilyn Frye आपल्या एका लेखात ह्याच गोष्टीचे अश्या पद्धतीने वर्णन करते:
“separation of various sorts or modes from men and from institutions, relationships, roles and activities that are male-defined, male-dominated, and operating for the benefit of males and the maintenance of male privilege—this separation being initiated or maintained, at will, by women."
Marilyn Frye, "Some Reflections on Separatism and Power." In Feminist Social Thought: A Reader, Diana Tietjens Meyers (ed.) (1997) New York: Routledge, pp. 406-414.

The Furies नावाचे स्त्रीवादी वर्तमानपत्र स्त्रियांना अशी शिकवण देतो कि पुरुषां पासून सर्व प्रकारचे संबंध तोडून टाकावे आणि फक्त अश्या स्त्रियांशी संबंध ठेवायचे कि ज्या स्त्रिया पुरुषांना ज्यामुळे विशेष अधिकार, फायदा मिळेल अश्या सर्व गोष्टींशी संबंध तोडून टाकतील. आणि पुढे जाऊन हा वर्तमानपत्र असा सल्ला देतो कि स्त्रिया आपल्या भगिनींना धोका देवून पुरुषांशी संबंध ठेवून त्यांच्या पासून फायदे उकळू शकतात अर्थात इथे "भगिनी" त्यांना म्हटले आहे ज्यांनी पुरुषांशी पूर्णपणे संबंध तोडून "समलिंगी संबंध" प्रस्थापित केलेले आहे.
Bunch, Charlotte/The Furies Collective, Lesbians in Revolt, in The Furies: Lesbian/Feminist Monthly, vol.1, January 1972, pp.8-9

कट्टरपंथी स्त्री-समलैंगिकता
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या "अतिरेकी" विचारसरणीचे तथाकथित बुद्धिवादी पुरुषांशी सर्व संबंध तोडून टाकण्याची उपाययोजना देतात हि वयक्तिक पातळी साठी तर आहेच त्या पुढे जाऊन हि त्यांची एक "वैचारिक भूमिका" आणि त्याच बरोबर "रणनैतिक भूमिका" सुद्धा आहे.
Chicago Women's Liberation Union, Hyde Park Chapter. Socialist Feminism: A Strategy for the Women's Movement, 1972, booklet

प्रत्यक्ष अंमलबजावणी
अलगाववादी फेमिनिजम ने समलैंगिक फेमिनिस्ट ना कुटुंबसंस्था आणि पुरुषां पास्न विभक्त होण्याचे फक्त तत्वज्ञान दिले असे नाही तर प्रत्यक्ष विभक्त होण्यासाठी परावृत्त केले. १९७० च्या दशकात अनेक समलिंगी फेमिनीस्ट वेगळे वेगळ्या intentional community, land trusts आणि land co-ops स्थापना करून तिथे विस्थापित झाले.
McGarry & Wasserman, Becoming Visible: An Illustrated History of Lesbian and Gay Life in Twentieth-Century America, Studio, ISBN 0-670-86401-3, p190.
McGarry & Wasserman, Becoming Visible : An Illustrated History of Lesbian and Gay Life in Twentieth-Century America, Studio, ISBN 0-670-86401-3, p187

त्यांच्याच पैकी एक समलिंगी लेखिका Joyce Cheney हिने अश्याच एका वसाहतीत जाऊन अनेकांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यातूनच Lesbian Land हे पुस्तक जन्माला आले. त्यामध्ये Cheney सांगते कि ह्या लोकांच्या विस्थापित होण्यामागे महत्वाचे कारण होते कुटुंबसंस्था आणि पुरुषां पास्न पर्यायाने मुख्य धारा समाजापासून विभक्त होण्याची त्रिमितीय राजनीती.
Cheney, Joyce. Lesbian Land, Word Weavers Press, 1976
Valentine, Gill. Contested Countryside Cultures: Otherness, Marginalisation, and Rurality ed.: Paul J. Cloke, Jo Little, Routledge, ISBN 0-415-14074-9, pp109–110.

पुरुष द्वेष (Misandry)
Voltairine de Cleyre अराजकतावादी, फेमिनीस्ट लेखिका कुटुंब संस्था बद्दल असे विचार प्रकट करते:
“लग्न संस्था पुरुषांना कोणत्याही परिणामा शिवाय स्त्रियानवर बलात्कार करण्याची सूट देते, लग्न संस्था स्त्रियांना बांधील गुलाम बनवते. मग हि गुलाम आपल्या मालकाचे नाव धारण करते, आपल्या मालकाचे अन्न खाते, आपल्या मालकाच्या आज्ञेचे पालन करते आणि आपल्या मालकाच्या passion च्या पूर्तते साठी सेवा करते.”
De Cleyre, Voltairine (2005), Sharon Presley and Crispin Sartwell, ed., Exquisite Rebel: The Essays of Voltairine De Cleyre – Anarchist, Feminist, Genius, Albany: State University of New York Press, ISBN 0-7914-6094-0

ओस्ट्रेलीयन फेमिनीस्ट लेखिका Mary Daly म्हणते:
“हि धरती पवित्र करायची असेल तर "पुरुषांची" इथून सफाई करायला पाहिजे.”
In the interview, she said, "If life is to survive on this planet, there must be a decontamination of the Earth. I think this will be accompanied by an evolutionary process that will result in a drastic reduction of the population of males."
Bridle, Susan (Fall/Winter 1999). "No Man's Land". EnlightenNext Magazine.

Otep Shamaya अमेरिकन फेमिनिस्ट सिंगर, सॉंग रायटर, कवी, लेखिका आणि पेंटर आणि “ओटेप” या बँड ची लीड वोक्यालीस्ट आपल्या एका "Menocide" नावाच्या गाण्यात जागील पुरुषांना संपवून टाकण्याचे आवाहन करते. ती म्हणते कि पुरुष हे "Infectious Human Waste" आहेत आणि जे पिडीत आहेत त्यांनी पुरुषांचे खून करावे आणि पुरुष संहार करावा.
http://glennsacks.com/blog/?p=3180#more-3180

आणि जेंव्हा तिला विचारले गेले तुझे काही लिखाण हे पुरुषांचा द्वेष करणारे असतात तर तिने ते असे बोलून काबुल केले कि ती द्वेष पसरवते...
"I don’t see it that way. Indeed, I am an emotional person and I use angry words, but they are aimed (mostly) at IDIOTS and MONGRELS. Perhaps YOU equate men with the likes of those scourge. But not me. I am an equal opportunity dispenser of rage. Ha!"
http://web.archive.org/web/20090503190209/http://www.imnotamonster.com/2...

Susan Brownmiller हि एक अमेरिकन फेमिनिस्ट लेखिका, पत्रकार, कार्यकर्ता हिचे जगप्रसिद्ध पुस्तक Against Our Will: Men, Women, and Rape. ह्या पुस्तका द्वारे ती असे सांगते कि जेंव्हा कधी स्त्रियांवर बलात्कार केला जातो तर त्या मागचे कारण पुरुषांची वासना नसून संपूर्ण पुरुष जात पूर्व नियोजित पद्धतशीर पणे योजनाबद्ध रित्या स्त्रियांवर पुरुष जातीचे धाक जरब अथवा धमकी म्हणून बलात्कार करतात. तिच्या म्हणण्या प्रमाणे बलात्कार हा वासनेचा गुन्हा नसून हिंसा आणि सत्तेचा गुन्हा आहे.
Kathryn Cullen-DuPont (1 August 2000). Encyclopedia of women's history in America. Infobase Publishing. pp. 6–7. ISBN 978-0-8160-4100-8. Retrieved 4 February 2012.
Sally Moore (1975). "'Rape Is a Crime Not of Lust, but Power,' argues Susan Brownmiller". Archive.People. Retrieved 5 February 2012.

फेमिनिस्ट उग्रवाद आणि त्यांच्या अतिरेकी संकल्पना
ऑस्ट्रेलिया ची आधुनिक इंग्रजी साहित्याची विद्वान, लेखिका. पत्रकार Germaine Greer, Paladin च्या प्रस्तावने मध्ये स्त्रियांना मुक्त होण्यासाठी मार्ग दाखवतांना सल्ला देतेकी स्त्रियांनी उत्क्रांती पेक्षा क्रांती द्वारे बदल आणले पाहिजे. स्त्रियांनी आपले शरीर जाणून घेतले पाहिजे, आपल्या शरीराला कबुल केले पाहिजे, स्वतः च्या मासिक धर्माच्या रक्ताचा स्वाद घेतला पाहिजे. ब्रम्हचर्य आणि एकपत्नीत्व ( Celibacy and Monogamy ) सोडून दिले पाहीजे...
(Foreword to the Paladin 21st Anniversary Edition, 2006).

Judith Butler एक प्रख्यात अमेरिकन फिलॉसॉफर एक भलतीच महान फिलॉसॉफी देवून जाते जी वाचून सामान्य माणसाचे तर डोकेच काम करत नाही.
“ …that we have desires that do not originate from our personhood, but rather, from social norms. The writer also debates our notions of "human" and "less-than-human" and how these culturally imposed ideas can keep one from having a "viable life" as the biggest concerns are usually about whether a person will be accepted if his or her desires differ from normality. She states that one may feel the need of being recognized in order to live, but that at the same time, the conditions to be recognized make life "unlivable". The writer proposes an interrogation of such conditions so that people who resist them may have more possibilities of living.”
बट्लर असे सांगते कि “मनुष्याला काही गोष्टी मनापासून मान्य नसताना देखील फक्त समाजाच्या दाबावा मुळे कराव्या लागतात, पुढे जाऊन ती सांगते कि "मनुष्य" आणि "मनुष्या पेक्षा कमी (पशु)" असे काही नसते. आणि समाज किंवा संकृती उगाच "मनुष्य" च्या नावाने अश्या गोष्टी आपल्यावर लादते (नैतिकता) कि माणसाचे जीवन असह्य होवून जाते. कारण जर एखाद्याची इच्छा हि मनुष्याच्या इच्छे पेक्षा वेगळी असेल तर त्याला स्वीकारले जात नाही. एखाद्याला जगण्यासाठी मान्यताप्राप्त (कि हा मनुष्या आहे) होण्याची गरज भासू शकते परंतु हीच मान्यता मिळविण्यासाठी त्याला जी बंधने पाळावी लागतात ती बंधने त्याचे जीवन असह्य करून टाकतात. लेखिका पुढे जाऊन म्हणते कि अशी जी बंधने आहे त्याचा विरोध केला गेला पाहिजे, कारण जे लोक हि बंधने झुगारु इच्छितात त्यांचे जीवन तरी सुकर होईल.”
Butler, Judith (2004). Undoing Gender. New York: Routledge

“ The supposed obviousness of sex as a natural biological fact attests to how deeply its production in discourse is concealed. The sexed body, once established as a “natural” and unquestioned “fact,” is the alibi for constructions of gender and sexuality, unavoidably more cultural in their appearance, which can purport to be the just-as-natural expressions or consequences of a more fundamental sex.”
पुढे जाऊन हि बया नैसर्गिक लिंग स्त्री आणि पुरुष या मधील फरक हा समाजाने किंवा संकृतीने निर्माण केलेला आहे असे सांगते. ती म्हणते कि एकदा का कोणी जीवशास्त्रा नुसार स्त्री हि स्त्री असते आणि पुरुष हा पुरुष असतो असे बळजबरीने लोकांच्या मनात बिंबवले कि मग पर्यायाने स्त्रीजात आणि पुरुषजात हे वेगळे आहे असे सिद्ध होते आणि मग विषम लिंगी संबंध सुद्धा नैसर्गिक आहे असे सिद्ध होते पर्यायाने लग्न, कुटुंब व्यवस्था हि गरज आणि कायदेशीर बनते पर्यायाने स्त्रिया "स्वैर" राहुशकत नाही, बंधनात येतात. म्हणून तिचे म्हणणे आहे कि स्त्री जात आणि पुरुष जात वेगवेगळे आहेत असं काही नसत.
Gender Trouble: Feminism and the Subversion of Identity. New York: Routledge. pp. 135–41.ISBN 84-493-2030-5.
Gender Trouble: Feminism and the Subversion of Identity. New York: Routledge. pp. 163–71, 177–8. ISBN 84-493-2030-5.

Monique Wittig हि फ्रेंच लेखिका फेमिनीस्ट थिअरीस्ट होती. ती स्वतःची ओळख "कट्टरपंथी समलैंगिक" म्हणून देत असे. तिला स्त्री लेखिका म्हणून उल्लेख केला असता ती म्हणत असे
“मी फक्त लेखिका आहे स्त्री वगैरे नाही.कारण स्त्री वगैरे असे काही नसते कारण लेस्बिअन होण्यासाठी स्त्रियांना विषमलैंगिक संबंधामध्ये पुरुषाने बनविलेल्या स्त्रियांच्या "मानदंडातून" बाहेर यावे लागते . मला फक्त लेखिका म्हणा”. लेस्बिअन स्त्रियान बद्दल बोलताना ती म्हणते कि “लेस्बिअन ह्या इतर स्त्रियान बरोबर संधीबद्ध होतात, संबंध ठेवतात किंवा राहतात असे म्हणणे चुकीचे आहे कारण "स्त्री" हि फक्त विषमलैंगिक विचार प्रणाली आणि विषमलैंगिक आर्थिक प्रणाली च्या डोक्यातून आलेली कल्पना आहे.”
तीने मटेरिअल फेमिनिजम या शाखेमध्ये देखील "मोलाची भर" घातली ती म्हणणे विषम लैंगिक संस्था हि एक “राजनीतिक” व्यवस्था आहे जिने सामाजिक संहितेचे निर्माण केलेले आहे. आणि या सामाजिक संहितेला लेस्बियन राद्दबातील ठरवतात.
Kirkup, James (2003-01-09). "Monique Wittig". The Independent. http://news.independent.co.uk/people/obituaries/article123410.ece. Retrieved 2007-06-08.

Katie Roiphe अमेरिकन पत्रकार आणि लेखिका या फेमिनीस्ट शक्तींच्या आक्रमक आणि अतिरेकी वृत्तीचे असे दर्शन करवून देते फेमिनिझम खरे तर स्त्रियांना मुक्त करण्या साठी आले होते परंतु हार्वर्ड आणि प्रिन्सेटोन युनिवर्सिटी मध्ये विध्यार्थी म्हणून शिकत असतांना लेखिकेला धक्का बसला जेंव्हा हेच फेमिनिझम स्त्रियांवर हुकुम आणि बंधने घालू लागला कि स्त्रियांनी काय बोलावयास हवं, कस विचार करावा आणि त्यांच्या भावना कश्या असाव्या.
The Morning After: Sex, Fear and Feminism (ISBN 0-316-75432-3) 1993. It was reprinted in 1994.

समलैंगिकता आणि Free Love
Free love हि एक सामाजिक चळवळ आहे. हि चळवळ "लग्न" ह्या बंधन चा विरोध करते त्या पासून निर्माण होणार्या सामाजिक बंधनाचा विरोध करते. ह्या चळवळीचा प्राथमिक लक्ष्य हे आहे कि जन्म नियंत्रण, आणि व्यभिचार ह्या गोष्टींना सामाजिक स्तरावर आणि कायद्याच्या स्तरावर मान्यता देणे आणि लग्न किंवा कुटुंबसंस्था मोडीत काढणे.
The Handbook of the Oneida Community claims to have coined the term around 1850, and laments that its use was appropriated by socialists to attack marriage, an institution that they felt protected women and children from abandonment
McElroy, Wendy. "The Free Love Movement and Radical Individualism." Libertarian Enterprise .19 (1996): 1.

Emma goldman हि एक अराजकतावादी फेमिनीस्ट होती इतर बर्याच फेमिनीस्ट प्रमाणे तीही Free Love ची खंदी समर्थक अथवा प्रचारक होती.
Goldman, Anarchism, p. 224.
See generally Haaland; Goldman, "The Traffic in Women"; Goldman, "On Love".

एक जर्मन sexologist आणि चिकित्सक Magnus Hirschfeld लिहिते कि Emma हि पहिली आणि एकच अमेरिकन होती जिने सर्व प्रथम समलैंगिक संबंधाचे सर्व सामान्य जनते समोर समर्थन आणि बचाव केला.
Goldman, Emma (1923). "Offener Brief an den Herausgeber der Jahrbücher über Louise Michel" with a preface by Magnus Hirschfeld.

Simone de Beauvoir फ्रांस मधील प्रसिद्ध फेमिनीस्ट फिलॉसॉफर, जिचे पुस्तक THE SECOND SEX फेमिनिस्ट जगात नावाजलेले आहे. ती एक धडाडीची कार्यकर्ता देखील होती तिने कधीही लग्न केले नाही, त्यामुळे तिला अभ्यासासाठी, लेखनासाठी, भटकंती साठी, राजकीय कार्य साठी तसेच स्त्री आणि पुरुष अशे दोनीही प्रेमिंशी संबंध ठेवायला भरपूर वेळ मिळाला आणि ती आपले प्रेमी "शेअर" करण्यसाठी ओळखली जाते. तिने शिक्षिकेचा पेशा करत असतांना अनेक कमी वयाच्या मुलींशी तिचे "प्रेमळ" संबंध होते.१९३९ मध्ये अश्याच एका "प्रकरणात" तिच्या वर कार्यवाही झाल्या नंतर शिक्षिकेच्या नोकरीतून कमी करण्यात आले होत. मग तिने तिच्या समविचारी बुद्धिवाद्यांच्या बरोबर मिळून फ्रांस मधील कायदे अधिक "शिथिल" व्हयला पाहिजे याच्या साठी कायदेशीर प्रयत्न केले होते.
A dangerous liaison: Simone de Beauvoir and Jean-Paul Sartre, By Carole Seymour-Jones (London 2008), page 216 and 274
New studies agree that Beauvoir is eclipsing Sartre as a philosopher and writer, The Independent, by Lesley McDowell, Sunday, 25 May 2008
Contingent loves: Simone de Beauvoir and sexuality, By Melanie Hawthorne (London, 2000), pages 65–78
BBC Radio 4 Start the Week BBC Radio 4, Andrew Marr, 21 April 2008
Mémoires d'une jeune fille rangée (1994, LGF – Livre de Poche; ISBN 978-2-253-13593-7/2006, Balland; ISBN 978-2-7158-0994-9)
Tête-à-tête: Simone de Beauvoir and Jean-Paul Sartre, Hazel Rowley, HarperCollins, 2005 , page 130-35, ISBN 0-06-052059-0; ISBN 978-0-06-052059-5
1977–1979 petitions and signatures (in French)

भ्रूण हत्या
Mary Anne Warren प्रसिद्ध अमेरिकन फेमिनीस्ट लेखिका आणि फिलोसोफी ची प्रोफेसर भ्रूण हत्येच्या एकाप्रश्न वर उत्तर देतांना ती सांगते कि:
चेतना (शुद्धी/भान) असणे वस्तू आणि घटना बद्दल आणि वेदनेची जाणीव असणे.
विवेक असणे (जटील समस्येचे समाधान करण्या इतपत.)
स्व प्रेरित गतिविधि (कि जी अनुवांशिक आणि प्रत्यक्ष बाहेरून नियंत्रित केलेली नसावी)
व्यक्तिगत रित्या अत्माजागृकता.
संवादाची क्षमता (कोणत्याही विषयावर, कोणत्याही माध्यमातून)

वरील सर्व किंवा या पैकी काही गुण असणे आवश्यक आहे त्यालाच आपण “व्यक्ती” म्हणू शकतो. या नियमा
नुसार “भ्रूण” हि व्यक्ती नसून त्या जीवाला कोणतेही व्यक्तित्व नसते म्हणून भ्रूण हत्या करण्यात काहीही हरकत नाही.
Warren, Mary Anne. Biomedical Ethics (4th ed.). pp. 434–440. http://instruct.westvalley.edu/lafave/warren_article.html.

स्त्री मुक्ती वाद्यांची “हिरो” Valerie Solanas आणि तिचा SCUM Manifesto
हि एक अमेरिकन फेमिनीस्ट कार्यकर्तीच नव्हे तर फेमिनिझम ची “हिरो” होती तिने एक पुस्तिका लिहिले होती SCUM Manifesto हि पुस्तिका जगभर फेमिनिझम चे क्लासिकल लिटरेचर म्हणून प्रसिद्ध आहे.
ह्या Manifesto मधून ती असा संदेश देते कि ह्या पुरुषांनी जगाचा सत्यानाश करून टाकलेला आहे. ह्या पुरुषांची जिवंत राहण्याची जगाला काहीही गरज नाही, म्हणून ह्या पुरुषांना खून हिंसा करून जनावरासारखे पळवून पळवून त्यांचा पाठलाग करून त्यांची शिकार केली पाहिजे. पुढे ती म्हणते हे काम जितक्या लवकर होईल तितके चांगले.
Marmorstein, Robert, A Winter Memory Of Valerie Solanis (sic), op. cit., p. 9, col. 2 ("[t]he central theme of SCUM is that men have fouled up the world, are no longer necessary (even biologically), and should be completely destroyed, preferably by criminal means such as sabotage and murder .... [t]he quicker, the better.").
Jansen, Sharon L., Reading Women's Worlds from Christine de Pizan to Doris Lessing, op. cit., pp. 147–148 (quoting p. 147 (Solanas posited men as animals who will be stalked and killed as prey, the killers using weapons as "phallic symbols turned against men") (emphasis so in original)) ("men are the real animals", per id., p. 148 and see p. 208).

पुढे ती म्हणते:
"Life" in this "society" being, at best, an utter bore and no aspect of "society" being at all relevant to women, there remains to civic-minded, responsible, thrill-seeking females only to overthrow the government, eliminate the money system, institute complete automation and eliminate the male sex."
तिच्या म्हणण्या नुसार स्त्रियांनी सरकारे (पुरुषांची) उलथून टाकली पाहिजे, चलन प्रणाली बंद करून टाकायला पाहिजे, सर्व कामांचे ऑटोमेशन करून टाकायला पाहिजे आणि पुरुष जातच समाप्त करून टाकायला पाहिजे.
Solanas, Valerie, SCUM Manifesto (Valerie Solanas, 1967), p. [1] (self-published) (copy from Northwestern University)

तिच्या थेरी नुसार पुरुषांना xy असे दोन गुणसूत्र असतात स्त्रियान कडे xx असे दोन x गुणसूत्र असतात.या y गुणसूत्रा मुळे पुरुष हा एक "अपूर्ण स्त्री" आहे.
Solanas, SCUM Manifesto, Olympia Press, p. 31.

ह्या अपूर्णते मुळे पुरुष हा भावनात्मक स्तरावर खूप सीमित आहे, अहंकारपूर्ण आहे किंवा प्रामाणिक संपर्क साठी असमर्थ आहे. सहानुभूतीची कमतरता आणि शारेरिक उत्तेजना शिवाय दुसर्या कोणत्या हि गोष्टीशी संबंध प्रस्थापित करण्यात असमर्थ आहे.
Solanas, SCUM Manifesto, Olympia Press, p. 32–33.

पुढे ती म्हणते कि पुरुष आयुष्यभर स्त्री बनण्या साठी प्रयत्नशील असतो कि जेणे करून त्याची न्यूनता भरून निघावी. हे कार्य तो अश्या पद्दतीने पार पडतो कि तो निरंतर शोध घेत, स्त्रियांच्या मागे मागे हिंडून जबरदस्तीने मैत्री करून, सहवास वाढवत स्त्रियांशी मिलन घडवून आणतो.

पुढे ती म्हणते कि या पुरुषांनी जगाचे शेण (shitpile) करून टाकले आहे आणि पुरुषान विरुद्ध गुन्हांची एक लांब लचक यादी देते. पुढे ती सांगते कि या सर्व गुन्हांमुळे पुरुष जातीला या भू तलावरून समाप्त करून टाकणे हे (Moral Imperative) नैतिक अनिवार्य आदेश आहे.
Solanas, SCUM Manifesto, Olympia Press, pp. 67–70.

ती सांगते कि स्त्रियांनी पैसा-कार्य प्रणाली बंद करून त्या जागी ऑटोमेशन प्रणाली प्रचलित करावी
जेणे करून शासन व्यवस्था कोलमडून पडेल व पुरुषांची स्त्रियांवर राज्य करण्याची शक्ती संपुष्टात येईल.
Solanas, SCUM Manifesto, Olympia Press, pp. 70–71, 80–81.

ती पुढे सांगते कि पुरुषांची शक्ती नष्ट करण्यासाठी एखादा आक्रमक दल बनवावा लागेल कारण नुसत्या सविनय कायदेभंग चळवळ स्थापून काहीही उपयोग होणार नाही कारण समाजात छोटे मोठे बदल घडवायचे असतील तर अशी चळवळ चालेल परंतु ह्या मोठ्या कार्य साठी म्हणजे संपूर्ण प्रणाली उध्वस्त करण्यासाठी हिंसक कार्यवाही होणे गरजेचे आहे. या तोडफोड आणि प्रत्यक्ष कार्यवाहीची रणनीती अमलात आणणाऱ्या या हिंसक आक्रमक दलाला ती SCUM असे नाव देते. जेकी तिच्या पुस्तकाचे नाव आहे. आणि जेंव्हा हा आक्रमक दल प्रत्यक्ष हल्ला बोलेल तर तो राष्ट्रपतीच्या मूर्ख आणि गलिच्छ तोंडावर करेल, SCUM जेंव्हा आक्रमण करेल तर तो अंधारात सहा इंची सुऱ्या ने करेल.
Solanas, SCUM Manifesto, Olympia Press, pp. 71–80.

फेमिनिझम वर टीका
फेमिनिझम मुळे नैतिकतेचा र्हास होण्यास मदत झाली आणि समलैंगिक संबंध, अश्लीलता, अवैध संबंध व या सारख्या इतर अनैतिक गोष्टी सर्व सामान्य झाल्या.
Mary A. Kassian, The Feminist Mistake (2005) ISBN 1-58134-570-4
Carrie L. Lukas, The politically incorrect guide to women, sex, and feminism, Regnery Publishing, 2006, ISBN 1-59698-003-6, ISBN 978-1-59698-003-7

राजनीतिक दर्शन चे विद्वान, मानविकी चे प्रोफेसर, अनेक प्रसिद्ध पुस्तकांचे लेखक Paul Gottfried आपले पुस्तक "The Trouble With Feminism" मध्ये सांगतात कि Gender Femenism हि एक सामाजिक विपदा ठरत आहे जी कौटुंबिक संस्थेचा बळी घेत आहे. आणि कुटुंबा पासून तुटलेले अनेक व्यक्ती सामाजिक अनागोंदीमध्ये ढकलले जात आहेत.
Gottfried, Paul (2001). "The Trouble With Feminism". LewRockwell.com. Archived from the original on 20 September 2006. http://www.lewrockwell.com/gottfried/gottfried9.html. Retrieved 2006-09-30.

स्त्री मुक्ती आंदोलनाने आपले (समानतेचे) ध्येय गाठले आहे परंतु आता ते पुरुषां पेक्षाही जास्त उच्च स्तरावर काबीज होण्याचा प्रयत्न करत आहेत.
Wattenberg, B (1994). "Has Feminism Gone Too Far?". MenWeb. Archived from the original on 13 October 2006. http://www.menweb.org/paglsomm.htm. Retrieved 2006-09-30.

Pizzey, Erin (1999). "How The Women's Movement Taught Women to Hate Men". Fathers for Life. Archived from the original on 26 September 2006. http://www.fathersforlife.org/pizzey/how_women_were_taught_to_hate_men.htm. Retrieved 2006-09-30.
Janice Shaw Crouse (2006). "What Friedan Wrought". Concerned Women for America. http://www.beverlylahayeinstitute.org/articledisplay.asp?id=10088&depart.... Retrieved 2006-09-30.

प्रसिद्ध अराजकतावादी विचारवंत बॉब ब्लँक ह्या अलगाववादी फेमिनिजम विचाराच्या मूर्ख पणा बद्दल असे काही सांगतात:
“फेमिनिस्ट स्त्रियांचे पुरुषान पासून सामाजिकरित्या वेगळे होणे हे खरेतर निरर्थक आहे, विसंगतीने भरलेले आहे. आणि कोणत्याही अलागाववादीला पितृसत्ताक पद्धतीशिवाय अस्तित्व टिकवून राहणे शक्य नाही. आणि इतर कोनापेक्षा अलागावावादीच इतरांच्या कामात जास्त हस्तक्षेप करत असतात. “
Bob Black, Essay "Feminism as fascism", 1983.

प्रसिद्ध अमेरिकन स्त्रीवादी कार्यकर्ती आणि लेखिका Sonia Johnson, फेमिनीस्ट विचारधारेवर आक्षेप घेतांना असे सांगते:
“स्त्रीवादी अलगाववाद स्वतःला परिभाषित करण्याची जोखीमच घेतो कि कोणापासून हे स्वतःला अलग करतात, पुरुष (?).”
Johnson, Sonia (1989). Wildfire: Igniting the She/Volution.

प्रसिद्ध समलिंगी कावित्री Jewelle Gomez ह्याच्या Out of the Past नावाच्या एका लेखात ती सांगते कि जे आमच्या अस्तित्वाचा अंग / भाग होते त्यांच्या पासून अलग होणे हि एक अशी “भरारी” आहे कि जी (गोर्या स्त्रिया सोडून बाकी जगातील इतर स्त्रियांना) जमने शक्य नाही. (म्हणजे हे तिला कबूल आहे कि ते आपल्या अस्तित्वाच्या एक अंग किंवा भागा पासून (म्हणजे पुरुषा पासून) अलग होण्याचे "महान" कार्य करायला जात आहे. म्हणजे डोक दुखत असेल तर डोकेच कापून टाका अश्यातला भाग आहे हा.)
अमेरिकेची स्त्रीवादी विचारक आणि लेखिका Bell hooks सांगते कि अलागाववादी फेमिनिजम हे फेमिनिजम च्या अनेक मूळ उद्धेशाच्या म्हणजे स्त्री पुरुष समानतेच्या उलट दिशेने जाऊन “स्त्री केंद्रित” आणि स्त्रियांचे वर्चस्व असलेले आणि पुरुषांना वशीभूत करून पुरुष द्वेषाला मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य करते.
bell hooks (2000), Feminism is for Everybody: Passionate Politics. Cited in Austin, Hannah (2004) "Separatism: Are We Limiting Ourselves?", EM 4:2.

शैक्षणिक संस्थां मध्ये फेमिनिझम चा दहशतवाद
Professing Feminism (१९९४) च्या संस्करण मध्ये Daphne Patai (विद्वान आणि लेखिका) फेमिनीस्ट राजकीय अजेंड्याला शैक्षणिक कार्यक्रमात जबरदस्तीने घुसविल्याचा ती निषेध करते. विशेष करून ह्या फेमिनीस्ट शक्ती युनिवर्सिटी कॉलेजेस मध्ये भाषा स्वातंत्र्या वर गदा आणतात. तिचे म्हणणे आहे कि ह्या राजनीतिकरण मुळे शिक्षणाचा पायाच निघून जाईल आणि शिक्षणाच्या अखंडतेला धोका निर्माण होईल. त्याच प्रमाणे तिने २००३ च्या ह्याच पुस्तकाच्या नवीन संस्करण मध्ये शैक्षणिक संस्था मधील Women's Studies या विषयचा अभ्यास करण्यासाठी तिने अनेक फेमिनीस्ट प्रोफेसरांची मुलाखती घेवून खूप मोठ्या प्रमाणात दस्तावेज पुरावे गोळा केले त्यावरून असा निष्कर्ष निघतो फेमिनीस्ट शक्तींची पद्धत, प्रथा, व्यवहार हा शिक्षणाशी विसंगत आहे आणि ते फेमिनीस्ट शैक्षणिक संस्थां आणि शिक्षणाला साधन बनवून “माहिती” आणि शोधकार्याला राजकीय अजेंड्यासाठी नाकारत आहे. (Heterophobia: १९९८) या पुस्तकात ती लिहिते कि आजकालचा फेमिनीझम हा स्त्री आणि पुरुषांच्या विषम लैंगिक संबंधाच्या विरोधात शत्रुत्वाच्या विषाने भरलेला आहे.
Professing Feminism: Cautionary Tales from the Strange World of Women's Studies (written with Noretta Koertge; Basic Books, 1994)
Professing Feminism: Education and Indoctrination in Women's Studies (with N. Koertge; new and expanded edition; Lexington Books, 2003)
Heterophobia: Sexual Harassment and the Future of Feminism (Rowman & Littlefield Publishers, 1998)

फेमिनीस्ट विचार धारेबद्दल कोणी शैक्षणिक चर्चा केली जी त्यांच्या राजकीय अजेंड्या विरुद्ध जात असेल तर फेमिनीस्ट शक्ती अश्या लोकांना आणि त्यांच्या विचारांना अँटी-फेमिनीस्ट ठरवून त्यांचा आवाज बंद केला जातो
Patai, Daphne; Noretta Koertge. Professing Feminism: Education and Indoctrination in Women's Studies. ISBN 0-7391-0455-1.

Christina Hoff Sommers अमेरिकन विद्वान आणि लेखिका म्हणते कि आजकालचे फेमिनिझम पुरुषांबद्दल अतार्किक शत्रुत्व ठेवतात. तिचा ह्या शक्ती विरुद्ध असा आरोप आहे कि हे लोक तथ्य आणि आकडेवारी बद्दल निष्काळजीपणे व्यवहार करतात. फेमिनिझम हे सत्य नाकारतात कि स्त्री आणि पुरुष दर्ज्याने समान तर आहेत परंतु ते शरीराने आणि पर्यायाने कार्याने किंवा जबाबदर्याने वेगवेगळे आहेत.
Sommers, Christina Hoff (2008-11-19) (PDF). What's Wrong and What's Right with Contemporary Feminism? (Speech). Hamilton College. pp. 18-19. Archived from the original on 2012-02-01. http://www.aei.org/files/2008/11/19/20090108_ContemporaryFeminism.pdf. Retrieved 2012-02-01.

सारांश
वर मी जेवढे संदर्भ दिले आहेत, ज्या ज्या स्त्रियांचे नाव घेतले ज्या ज्या पुस्तकांचे नाव घेतले किंवा ज्या ज्या सिद्धांत आणि विचारधारेचा उल्लेख केलेला आहे ते सर्व कोण आहे माहित आहे तुम्हाला? ते कोणी गल्ली बोळीतील थातूर मातुर स्त्री मुक्ती आंदोलनाच्या सामान्य कार्यकर्त्या नव्हे तर जागतिक स्तराच्या फेमिनीस्ट विचारवंत, लेखिका, सैद्धांतिक आहेत. कि ज्यांच्या मार्गदर्शनावर हि चळवळ प्रगती करत पुढचे पूल टाकत आहे, ह्यांच्या सल्ल्या नुसार "युनो" कार्यक्रम आखत आहे कि ज्याची अंमलबजावणी संपूर्ण जगात होत आहे. ह्या फेमिनीस्ट कार्यकर्त्यांनी शैक्षणिक संस्था, मोठ मोठ्या जागतिक स्तराच्या युनिवर्सिटीज मध्ये आपले साम्राज्य पसरवून एकूण शिक्षण पद्धतीवर आणि लोकांच्या विचार करण्याच्या पद्धतीवर आपली पकड मजबूत केलेली आहे.
तर आपण वर जे काही वाचले त्याचा सारांश काय आहे ते पाहूया

सर्व प्रथम १९६८ मध्ये Roxanne Dunbar हिने स्थापित केलेली "Cell १६" फेमिनीस्ट संगठना. हिने सर्वप्रथम स्त्रियांना अश्या पुरुषान पासून कि जे त्यांच्या विचारधारेला मानत नाही अथवा समर्थन देत नाही, अलग राहण्यासाठी उद्युक्त केले. हे कायम अलग होणे नव्हे काही काळा पुरते होते. आणि दुसरे वैशिष्ट असे कि हे विषमलिंगी संबंधातून अलग होणे होते कारण तो पर्यंत ह्या स्त्रियांनी समलिंगी होण्यापर्यंत मजल मारली नव्हती. हीच फेमिनीस्ट अलगाववादाची पहिली पायरी होती.

काही फेमिनीस्ट विचार वाद्यांनी स्त्रियान साठी एक “रणनीती” बनविली कि स्त्रियांनी आपले व्यक्तिगत विकासासाठी ठराविक काळासाठी मुख्य धारेची सक्रियते पासून (पुरुषान पासून, कुटुंबापासून कि समाजापासून???) अलिप्त राहेव. काही विचारवंत स्त्रिया ह्या रणनीतीला अस्थाई स्वरुपाची रणनीती मानत तर काही विचारवंत ह्या प्रथेला संपूर्ण जीवना मध्ये अमलात आणायला पाहिजे असे मानत.कारण त्यांचे असे मानने आहे कि पितृसत्ताक कुटुंब संस्थेत राहून स्त्रियांची प्रगती होऊ शकत नाही. म्हणून आपले काही ध्येय गाठण्यासाठी अल्पकाळ ह्या बंधनातून फारकत घ्यावी किंवा मग कायमची फारकत घेवून टाकावी.

मग पुढे जाऊन ह्यांनी पुरुष जाती पासून संपूर्ण अलग होवून एक वेगळा स्त्री समलिंगी जग तयार करण्याचा घाट घातला. जेथे सर्व स्त्रिया समलिंगी असतील आणि त्यांना पुरुषांशी कोणताही प्रकारचे देणे घेणे गरज अथवा संबंध नसेल. अर्थात या पायरी पर्यंत ह्या विचारवंत मानत होत्या कि त्या स्त्रिया आहेत. आणि त्या आपल्या हक्काच्या रक्षणा साठी पुरुषां पासून अलग होत आहेत. इथे थांबतील ते स्त्री मुक्ती आंदोलन कसले त्यांनी लगेच पुढची पायरी चढायला सुरुवात केली.

पुढे जाऊन ह्या विचारवंत म्हणायला लागल्या कि स्त्री पुरुष असे काहीही नसते. दोन्हीही मनुष्यप्राणी आहे आणि हा तर तो पुरुष प्रधान समाज आहे जो स्त्रियांना लहान पणापासून तू मुलगी आहेस तू बाहुलीशी खेळ तू मुलगा आहे तू घोड्याशी खेळ असे वर्षानु वर्षे बिंबवून त्याने स्त्री ला स्त्री बनवून टाकले आणि पुरुषाला पुरुष बनवून टाकले. आणि हे अतिरेकी विचारवंत अगदी ह्या थराला गेले कि त्यांनी जीवशास्त्रातील स्त्रीलिंगी, पुल्लिंगी ह्या नैसर्गिक आणि वैज्ञानिक सत्याला देखील मानण्यापासून इन्कार करून टाकल. ते आता म्हणायला लागले कि स्त्री पुरुष असे काहीही नसते दोन्हीही सजीव आहेत त्यांच्या मधील कोणत्या हि प्रकारचा वैज्ञानिक फरक त्यांना मान्य नाही.

त्या नंतर स्त्री स्वातंत्र्याची गाडी थांबयाचेच नाव घेईना. या पुढे जाऊन त्यांच्या महान विचारवंतांनी असे सांगायला सुरुवात केली कि या जगात जे काही वाईट चालले आहे युद्ध, रोगराई, हिंसा, वंशवाद, पैसे, लग्न, अविश्वास, कुरूपता, द्वेष, शासन व्यवस्था इ. इ. ह्या सर्व वाईट गोष्टींचा जबाबदार पुरुष आहे. म्हणून या पृथ्वीतलावरून पुरुषांना संपून टाकण्यात यावे. जगाच्या भल्यासाठी या जमिनीवरून पुरुषांना समाप्त करणे खूप गरजचे आहे.

फेमिनिझम स्त्रियांना स्वैराचार, विवाह बाह्य, अनैतिक संबंध, समलिंगी संबंध, अराजकता, अँबॉर्शन, कॉनट्रासेप्शन, भ्रूण हत्या ह्या गोष्टींची शिकवण देते तर या उलट लग्न, कुटुंब, विषमलिंगी संबंध, सामाजिक बांधिलकी, नैतिकता ह्या गोष्टींपासून परावृत्त करते.

त्याच प्रमाणे फेमिनिझम विशेषता स्त्री आणि पुरुष असे दोन विरोधी गट बनवतो. आणि दोघांना एकमेकाचा शत्रू ठरवून पुरुष पूर्वनियोजित, योजना बद्धरीतीने स्त्रियांना काबीज करून नियंत्रणात ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने (उदा. बलात्कार करून, त्यांना वेश्या बनवून, त्यांच्याशी लग्न करून कुटुंबा मध्ये चूल मुल मध्ये अडकवून) तिच्यावर गुलामगिरी लादून तिची वयक्तिक प्रगती, व्यक्तिमत्व संपवून तो स्त्रियांवर शासन करतो म्हणून स्त्रियांनी पुरुषांच्या तथाकथित सत्तेविरुद्ध बंड पुकारायला पाहिजे आणि पुरुषांची सत्ता उलथून टाकायला पाहिजे. एवढेच नव्हे तर स्त्रियांनी पुरुषांना काबीज करून त्यांच्यावर सत्ता गाजवायला पाहिजे. त्याहीपुढे जाऊन पुरुषांचे खून करून हिंसा करून पुरुषांना मारून टाकले पाहिजे ह्या जगाला पुरुषांची गरज नाही त्यामुळे पृथ्वी तलावरून पुरुषांना संपवून टाकले पाहिजे. आणि तेही लवकरात लवकर (असे म्हणणारे ते फेमिनीस्ट विचारवंत आहेत ज्यांच्या विचार व सिद्धांतावरून फेमिनीस्ट आंदोलन चालत आहे प्रगती करत आहे. हे विचारवंत फेमिनीस्ट कार्यकर्त्यांचे "हिरो" आहेत) अश्या पद्धतीने फेमिनिझम पुरुष द्वेषाचे कार्य करत आहे.

फेमिनिझम ने शैक्षणिक संस्थांना काबीज करून तिथे दपटशाही करून आपली सत्ता निर्माण केली आहे. तिथे ते पुरुष द्वेष आणि विषमलिंगी संबंध च्या विरुद्ध आपले राजकीय अजेंडे राबवीत आहे. तेथील शिक्षणाचे राजकीयकरण करून माहिती आणि आकडेवारी शी तडजोड करून आपल्या सोयीचे शोधकार्य करत आहे. ह्या फेमिनीस्ट शक्ती युनिवर्सिटी कॉलेजेस मध्ये दबाव गट तयार करून भाषा स्वातंत्र्या वर गदा आणतात.

फेमिनीस्ट विचार धारेबद्दल कोणी शैक्षणिक चर्चा केली जी त्यांच्या राजकीय अजेंड्या विरुद्ध जात असेल तर फेमिनीस्ट शक्ती अश्या लोकांना आणि त्यांच्या विचारांना अँटी-फेमिनीस्ट ठरवून त्यांचा आवाज बंद करून टाकतात.

शेवटी जाता जाता ती गोष्ट सांगतो जिला वाचून मी स्त्री मुक्ती आंदोलन चा अभ्यास करणेच बंद करून टाकले म्हणजे माझी पुढे हिम्मतच झाली नाही. ह्यांना लग्नाचे बंधन नकोय, मातृत्वाचे बंधन नकोय, लिंग भूमिकेचे बंधन नकोय, लैंगिकसंबंधाचे बंधन नकोय, सामाजिक बंधन नकोय, धार्मिक बंधन नकोय परंतु जेंव्हा फेमिनिस्टांची इडियालॉजी असे सांगायला लागली कि मनुष्य आणि पशु असे काही नसते हे सर्व मानवाने तयार केलेले अवडंबर आहे आह्माला पशु सारखे मोकाट सुटू द्या ...

बोला!! स्त्री मुक्ती आंदोलन, झिंदाबाद!!!

समाजविचारलेखमतमाहिती

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

11 Dec 2012 - 12:32 am | अत्रुप्त आत्मा

अगं बाबौ........स्त्री मुक्तिवाल्यांच्यात हे असले बी खत्री पंथ तयार झालेत होय???

हारुन शेख's picture

11 Dec 2012 - 12:45 am | हारुन शेख

एक मीटर लांबीचा लेख ( थोडी जास्तीच पण कमी नाय ) आहे. ही पहिली प्रतिक्रिया. बाकी सावकाश वाचून नंतर. (पाशवी शक्ती रात्रीच्या सक्रीय झाल्यात.) :)

लेख पूर्ण वाचला. प्रकरण चक्क पाशवी शक्तींच्या विरोधात निघाले की राव तरीपण व्यक्तीशः मला अतिरंजित वाटला. एका टोकाकडून डायरेक्ट दुसरे टोक.

जेनी...'s picture

11 Dec 2012 - 1:25 am | जेनी...

काहिहि हं ! :-/

पूरुष संपले किंवा संपवले तर आम्हि छ्ळ कुणाचा करणार :-/

( आम्हाला मैत्री करणार का?? असा मेसेज कोण पाठवणार :-/ )

दादा कोंडके's picture

11 Dec 2012 - 1:51 am | दादा कोंडके

परंतु ह्या प्रश्नाची एक दुसरी बाजू देखील आहे.

दुसरी बाजू विचारात घेण्यासारखी परिथिती येण्यासाठी सद्यस्थितीत भारतात तरी अजून अनेक दशकं जावी लागणार आहेत हे नक्की. म्हणून आत्ताच आभाळ कोसळलं म्हणून आरडाओरडा करण्यात अर्थ नाही.

पदार्पणातच आणुबॉम्ब टाकलाय!

पदार्पण आहे का पुनःप्रवेश काय माहिती ?

राजेश घासकडवी's picture

11 Dec 2012 - 4:07 am | राजेश घासकडवी

अत्यंत अभ्यासपूर्ण लेख. यंदाचा 'मिपा-विचारवंत' पुरस्कार जहीर सय्यद यांना देण्यात यावा अशी मी परीक्षकांना विनंती करतो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Dec 2012 - 4:09 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

फक्त स्त्रीवादी लोकंच नव्हे, स्त्रियाही जगाचं आणि पर्यायाने मानवतेचं नुकसान करत आहेत हे मला पटलं. लवकरच मी लिंगबदल शस्त्रक्रिया करून घेते. माझे डोळे वेळेत उघडण्याबद्दल धन्यवाद. मानवता तुमची शतकानुशतके ऋणी असेल.

काहीच्याकाही आहे हा लेख...... लेख कसला............बरळणे आहे नुसते......

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Dec 2012 - 7:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सारांश पासून लेख वाचला. स्त्रीवादाबद्दलचे विविध मतमतांतरांचा चांगला आढावा घेतलेला दिसतो. आभार.
शेवटी जे तुम्ही जाता जाता जे मुद्दे विचारले आहेत, त्याबद्दल मात्र नेहमीच अधिक-उणे वाचायला मिळतेच अगदी जालावरही यावर चांगले काथ्याकुटले गेले आहेत, आणि पुन्हा इथे कोणी याबद्दल काही नवीन विचार मांडणार असेल तर वाचायला आवडेलच.

-दिलीप बिरुटे

अन्या दातार's picture

11 Dec 2012 - 8:55 am | अन्या दातार

सायटेशन दिलेले बघून छान वाटले.

प्रकाश घाटपांडे's picture

11 Dec 2012 - 9:57 am | प्रकाश घाटपांडे

लेख कसला हे तर पीएच डी चे संशोधनच दिसतय! वाचून दमायला झाले. मिळून सार्‍या जणी, पुरुषस्पंदन यांना हा लेख पाठवला पाहिजे. लेख विचार करायला लावणारा आहे यावर दुमत नसावे. त्यातील विचार पटो वा न पटो!

परिकथेतील राजकुमार's picture

11 Dec 2012 - 10:05 am | परिकथेतील राजकुमार

माऊसचा स्क्रोल मोडला भेंडी !

ह्या चार ओळीच्या लेखाचा सारांश कोणी दोन चार शब्दात सांगेल काय ?

सस्नेह's picture

11 Dec 2012 - 10:21 am | सस्नेह

लेख पूर्ण वाचण्याचे धाडस झाले नाही. जो काही थोडाफार चाळला त्यावरून हा सारांश असावा असे वाटते.
'पाशवी शक्ती मोकाट सुटल्या आहेत..पुरुषहो, सावधान !'
कुणाला यापेक्षा वेगळा अर्थ समजला असेल तर कृपया मला समजावून द्यावा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Dec 2012 - 10:24 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

तुला मोठ्या भोपळ्याचं डैरेक भरीत हवंय का काय?

लेख वाचला संपूर्ण वाचला नाही,वाचायची इच्छाही नाही !
एक पॅरा वाचला...
Shulamith Firestone हि एक उच्च कोटीची कँनेडियन फेमिनीस्ट होती जिने कट्टरपंथी स्त्रीवाद ह्या शाखेची स्थापना करण्यात खूप मोठे योगदान दिले लेखिका म्हणते:
“पितृसत्ताक समाज रचने मध्ये स्त्रियांवर लैंगिक असमानता लादली जाते ती स्त्रियांच्या "जीवशास्त्रा" मुळे. त्यानंतर भौतिक, सामाजिक और मनोवैज्ञानिक नुकसान लादले जाते ती गर्भावस्था, प्रसूती आणि त्यानंतर मुलांचे संगोपन करण्याच्या नावाने. या जैविक निर्धारित जबाबदारी पासून स्त्रियांना पळवाट काढण्यासाठी सुटका करून घेण्यासाठी ती सल्ला देते कि मूले जन्मालाच घालायची असतील तर त्यांना प्रयोग शाळेत जन्माला घाला आणि त्याचे संगोपन सरकारने केले पाहिजे. कारण ती प्रसुतीला बर्बरतापूर्ण समजते आणि म्हणते कि तिची एक मैत्रीण असे म्हणते कि बाळाला जन्म देणे तिला "भला मोठा भोपळा हगण्यासारखे वाटते."
विकृत विचारसरणी एव्हढेच म्हणु शकतो !

विकृत विचारसरणी एव्हढेच म्हणु शकतो !

शंभर टक्के मान्य ! मातृत्व ही काय दैवी गोष्ट आहे महाराजा !
आम्हाला आणि आमच्या मुलांना जन्माला घालणार्या स्त्री वर्गाचे आम्ही आजन्म ऋणी आहोत आणि राहू.
आम्ही त्यांची कूस धन्य केली नसूनही त्यांचे आजन्म प्रेम आम्हाला लाभते कारण आम्ही नशिबवान आहोत.
यातली भव्यता जर कळली नसेल तर विकृती तर आहेच .. करंटेपण म्हणावे लागेल.

पुण्याचे वटवाघूळ's picture

11 Dec 2012 - 10:40 am | पुण्याचे वटवाघूळ

लेख वाचला.काही मते पटली तर काही पटली नाहीत.पण

ह्यांना लग्नाचे बंधन नकोय, मातृत्वाचे बंधन नकोय, लिंग भूमिकेचे बंधन नकोय, लैंगिकसंबंधाचे बंधन नकोय, सामाजिक बंधन नकोय, धार्मिक बंधन नकोय परंतु जेंव्हा फेमिनिस्टांची इडियालॉजी असे सांगायला लागली कि मनुष्य आणि पशु असे काही नसते हे सर्व मानवाने तयार केलेले अवडंबर आहे आह्माला पशु सारखे मोकाट सुटू द्या ...

हे मत अगदी १००% पटले.कोणावरही जन्माला अमुक एका जातीचा/लिंगाचा किंवा अन्य कसला म्हणून आल्याबद्दल कुठलाही अन्याय नको हे मत अगदी १००% मान्य.पण त्या अन्यायाला उत्तर म्हणजे कसलीच बंधने नकोत असे म्हणणे म्हणजे व्हर्सायच्या तहात जर्मनीवर अन्याय झाला म्हणून पोलंडवरील हल्ल्याचे समर्थन करण्यासारखे झाले.

मी अनेक मराठी वेबसाईटवर आणि फेसबुकवरील ग्रुपवर वावरतो.सगळ्या चर्चा अगदी आवर्जून वाचतो.मला स्वतःला फार चांगले लिहिता येत नसल्यामुळे मी त्यात फार कधी भाग घेत नाही पण चर्चा तर नेहमीच वाचतो.मध्यंतरी अशीच एक चर्चा फेसबुकवरील कुठल्यातरी ग्रुपवर वाचली.त्यात माणूस सोडून इतर कोणत्याही प्राण्यामध्ये एकाच जोडिदाराबरोबर आयुष्यभर राहण्याची प्रथा नसते, ती प्रथा म्हणजे पुरूषप्रधान संस्कृतीतून जन्माला आली इत्यादी तर्कट वाचले.मला वाटत होते की स्वतंत्र बाण्याची लोकं इतर माणसांचेही अनुकरण करत नाहीत इथे तर असे लोक प्राण्यांचे अनुकरण करायला लागले की काय अशी शंका उगीच आली. (आणि माणूस सोडून इतर कोणताही प्राणी कपडे वापरत नाही म्हणून अशी मंडळी कपडे वापरणे बंद करणार की काय अशीही शंका आली :( ). एकूणच काय की यांना कसलीही बंधने नकोत.स्वतःच्या मनाला वाटेल ते यांना करायला हवे मग त्याचा इतरांवर काय परिणाम होत आहे/होईल याची पर्वा करायची नाही!! गाईचे वासरू जन्माला आल्यापासून तासाभरात स्वतःच्या पायावर उभे राहते.लहान असतना ते त्याच्या आईचे दूध जरूर पिते पण एकदा स्वतः चरायला लागल्यावर ते स्वतंत्र असते.माणसात तर अगदी स्वतःचे पोट स्वतः भरण्याइतके पैसे मिळवायची वेळ येईपर्यंत २२-२४ वय आलेले असते.आई आणि वडिल या दोन्हींचा सहवास आणि प्रेम मिळणे ही लहान मुलांची मानसिक आणि भावनिक गरज असते.पण इथे जर पालकच कसलीच बंधने नकोत-- मला माझा जोडीदार आवडेनासा झाला मी चाललो/चालले इतर कोणाबरोबर असे म्हणायला लागले तर अशा मुलांवर त्याचे काय परिणाम होतील याची पर्वा कोणाला? इतरांवर काही परिणाम झाले तरी चालेल मी म्हणेन तेच व्हायला हवे अशी हट्टी मनोवृत्ती आणि त्याला फार मोठे व्यक्तिस्वातंत्र्याचे नाव द्यायचे प्रकार चालू असतात.

स्त्रियांवर आणि मुलींवर त्या अमुक एका लिंगाच्या म्हणून कोणताही अन्याय नको हा मुद्दा मी 'गुवाहाटी आणि बागपत' या चर्चेतही मांडला आहे. पण असा अन्याय नको याचा अर्थ असा ढोंगी व्यक्तिस्वातंत्र्यवाद असा कोणी घेत असेल तर मात्र त्यालाही माझा अगदी कडाडून विरोध आहे. प्रत्येक माणूस हा समाजाचाच एक भाग आहे/असतो आणि आपल्या प्रत्येक कृतीचे इतरांवर परिणाम होत असतात हे लक्षात घ्यायलाच हवे.

५० फक्त's picture

11 Dec 2012 - 4:03 pm | ५० फक्त

लेख वाचला -

बास, एवढ्यासाठीच खास अभिनंदन आपले.

तुमच्या धारिष्ट्याला सलाम!

सर्व विषयाचा समग्र विचार केल्यावर तुमच्या लक्षात येईल की सार्‍या प्रश्नाचं उत्तर केवळ एका गोष्टीत आहे आणि ते म्हणजे स्त्रीला प्रणयात सर्वस्वी तृप्त करण्यात पुरूषाला आलेलं अपयश.

प्रणयतृप्त स्त्रीलाच स्वतःच्या स्त्रीत्वाचा अभिमान वाटू शकतो आणि त्या अनुषंगानं ती स्त्री देह आणि अपत्य जन्म या नैसर्गिक गोष्टींचा सहर्ष स्विकार करू शकते.

स्त्रिला प्रणयतृप्त करण्याच्या असामर्थ्यामुळे पुरूषानं स्वतःचं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी जी परिस्थिती निर्माण केली त्यातून Equity feminism चा जन्म झालाय आणि आता स्त्री त्याचं उत्तर Gender feminism नं देण्याचा प्रयत्न करतेय.

या सर्वाच मूळ प्रणय ही पुरूषाची गरज आहे या युगानुयुगे जोपासलेल्या अत्यंत चुकीच्या संकल्पनेत आहे.

तुम्ही दिलेल्या सर्व संदर्भातील सर्व लेखिका प्रणयातल्या पराकोटीच्या अतृप्तीनं ग्रस्त असतील हे मी निर्विवादपणे सांगू शकतो. त्यांनी कधीही सेक्शुअल ऑरगॅझम अनुभवला नसेल. या वैफल्यातनं स्त्री देहाबद्दलचा तिटकारा आणि त्यातून प्रथम Equity feminism आणि त्याचा परिपाक म्हणून Gender feminism या विचारसरणीचा उगम झालाय.

हा प्रश्न जागतिक भासला तरी तो अत्यंत वैयक्तिक आहे. जर प्रत्येक पती स्वतःच्या पत्नीला प्रणय तृप्त करू शकला आणि अत्यंत सूज्ञतेनं त्यानं Equity feminism मान्य केलं (ती आपसूक होतच) तरच कुटुंबव्यवस्था टिकू शकेल. या बरोबर स्त्रीनं देखील प्रणय ही पुरूषाची गरज आहे आणि स्त्रीत्व हा शाप आहे ही अत्यंत चुकीची मानसिकता सोडून स्त्री देहाचा सर्वस्वी स्विकार केला तर ती सुद्धा एक तृप्त आणि सार्थक आयुष्य जगू शकते.

मानवी जीवनातल्या या अत्यंत केंद्रीय विषयावर मी आतापर्यंत अनेक लेख वाचलेत आणि असंख्य विचारप्रणालींचा अभ्यास केलाय पण इतका तर्कशुद्ध आणि अभ्यासपूर्ण लेख वाचला नव्हता. या विषयावर लिहून तुम्ही संकेतस्थळ या अत्यंत प्रभावी माध्यमाचा योग्य उपयोग कसा केला जाऊ शकतो हे दाखवून दिलय. तुमचं मनःपूर्वक अभिनंदन!

परिकथेतील राजकुमार's picture

11 Dec 2012 - 11:50 am | परिकथेतील राजकुमार

हा एक नवाच विचार.

लय पुढे विचार केलास तर कळेल की पुरूष रोज सकाळी कारण नसतांना घराबाहेर पडतो मग नको तितकं उप्तादन करून ठेवतो त्यातनं श्रीमंत उप्तादक अधिक श्रीमंत होतात. अशा श्रीमंतीतून पुन्हा आर्थिक विषमता. त्यात पुन्हा आवशकता नसतांना कच्च्यामालचं पक्क्यामालात रूपांतर होतं मग ते विकण्यासाठी जहिरातबाजी. ती महागडी उत्पादनं असतील तर त्यातनं सामजात आर्थिक विषमता आणि इतरांना काँप्लेक्स. तो माल जर युद्ध सामुग्री असेल तर खपवण्यासाठी युद्ध. त्यातनं जागतिक अशांतता. पुन्हा अतृप्त स्त्रीला तृप्त करण्यासाठी अत्यंत फालतू वस्तुंची निर्मिती असे अनेक पैलू आहेत.

बॅटमॅन's picture

11 Dec 2012 - 12:01 pm | बॅटमॅन

हम्म......हा एक नवाच विचार...रोचक आहे.

पण तुमचे मत पाहुन मजा वाटली...
प्रणय हा स्त्री साठी ही महत्वाचा असतोच.. हा काही नवीन शोध नाही... पण प्रणय म्हणजे फक्त 'सेक्स' हे मत चुक आहे.. जो पुरुष आपल्या बायकोला सन्मानानी वागवत असेल, तिची काळजी घेत असेल, तिला तिचे मत आणि निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य असेल पण तो तिला "ऑगॅझम" देउ शकत नसेल तर ती पिसाळेल का? आणि ह्याच्या उलट, बायकोला "पायीची वहाण" समजणारा नवरा कितीही मदन का असेना, तीला तो आवडेल का हा प्रश्नच आहे.. ह्या ठिकाणी बाई शिकलेली आणि मुख्य म्हणजे स्वतःचे मत असणारी असेल तर पिसाळेल,आणि "पुरुषा शिवाय स्त्रीला अर्थ नाही" टाईप असेल तर गप्प बसेल..
थोडक्यात काय, तर स्त्री ही तिला मिळणार्या वागणुकीवर (आई, बाप, नवरा, भाउ... समाज...) आणि तिच्या जडण घडणी वर (शिक्षण , स्वतःचे मत / "पुरुषा शिवाय स्त्रीला अर्थ नाही" ) ठरवते की पिसाळायच की नाही..
नवरा आणि सेक्स हे आयुष्याचे छोटेसे भाग आहेत.. संपुर्ण आयुष्य नाही...
बाकी स्त्री- पुरुष समानता म्हणजे स्त्रीयांनाही "निर्णय घ्यायचा हक्क मिळणे " असा माझ्या लेखी आहे.. जे जे पुरुष करतात ते ते करायचा हक्क मिळणे म्हणजे समानता नाही.. स्त्री पुरुष मुलतः वेगळे आहेत, त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत हे लक्षात ठेवुनच समानते बद्दल बोलायला हवे...

( डेस्क्लेमरः- माझ्या ह्या प्रतिसादाला "पण मग पुरुषांच्या "समाधानाचे" काय??? त्यांचे दु:ख कोण समजुन घेणार??" अशा प्रतिक्रियांना उत्तर देण्यास मी बांधील नाही...)

परिकथेतील राजकुमार's picture

11 Dec 2012 - 12:49 pm | परिकथेतील राजकुमार

बायका 'पिसाळतात' हा अजूनच एक नवा विचार पुढे आलाय आता.

नवा माऊस आण आणि लेख मनलावून वाच

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Dec 2012 - 2:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

__/\__. एका बॉलमध्ये... नव्हे... वाक्यात १० गडी आऊट. तुम्ही मॅच दोन ईनिंग्जनी जिंकली आहे !

पिलीयन रायडर's picture

11 Dec 2012 - 1:17 pm | पिलीयन रायडर

हो तर...
तुम्ही "परिकथां" मधुन बाहेर आलात तर समजेल न...
लग्न करुन बघा मग कळेल की बायका पिसाळतात कशा ते..

परिकथेतील राजकुमार's picture

11 Dec 2012 - 1:20 pm | परिकथेतील राजकुमार

बायका कशा पिसाळतात हे कळण्यासाठी लग्नच केल पाहिजे असा काय नियम आहे का ? का फक्त लग्न झालेल्या बायकाच पिसाळतात असा तुमचा दावा आहे ?

पिलीयन रायडर's picture

11 Dec 2012 - 1:31 pm | पिलीयन रायडर

लग्न झालेल्याच पिसाळतात असं नाही.. पण लग्न झालेल्या बायका नवर्‍यावर नक्की पिसाळतात...
बाकी बहीण, आई, काकु, मामी , मावशी, आत्या आणि अगदी मैत्रीण सुद्धा त्या तोडीचा "फील" देउ शकणार नाहीत, म्हणुन "बायका कशा पिसाळतात हे कळण्यासाठी लग्नच केल पाहिजे"!
आणि तुमची स्वतःची हक्काची बायकोच तुमची हक्कानी वाट लावु शकते...

उत्तर असू शकेल.

आता असा विचार करा. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र, निर्णयाचं स्वातंत्र्य आणि सर्व आबादीआबाद असून देखील ..

पण लग्न झालेल्या बायका नवर्‍यावर नक्की पिसाळतात

आता सगळं तर तुमच्याकडे आहे. नवर्‍याला मधे आणण्याच कारण काय?

आणि तुमची स्वतःची हक्काची बायकोच तुमची हक्कानी वाट लावु शकते...

अशी वाट लावायचा विचार करून आपण काय साधतो?

पिलीयन रायडर's picture

11 Dec 2012 - 2:11 pm | पिलीयन रायडर

मला वाटलच होतं की एक डिस्क्लेमर टाकाव.. पण मेला कंटाळा..
"पिसाळणे" ह्या एका शब्दाचा चोथा होत होता, बाकी मुद्दा सोडुन एकच काहीतरी पकडुन बसायची सवय आहे इथे लोकांना..
आता तुम्ही "वाट लावणे" ह्या शब्दाला पकडा..
नंतर आपण "बायको" वर होणारे जोक्स शोधुन काढु आणि त्यावर विचार मंथन करु..की बाबा का बर अशी हीन वागणुक मिळते स्त्रियांना जोक्स मध्ये..असा विचार करून आपण काय साधतो?

परिकथेतील राजकुमार's picture

11 Dec 2012 - 2:31 pm | परिकथेतील राजकुमार

आम्ही तरी ऐकलेल्या बर्‍याच जोक्स मध्ये बाय्कोच नवर्‍याला हीन वागणूक देताना दिसते.

सस्नेह's picture

11 Dec 2012 - 4:38 pm | सस्नेह

अहो ते 'जोक्स' आहेत ....

बाबा पाटील's picture

11 Dec 2012 - 7:14 pm | बाबा पाटील

पराभाऊ जरा स्वताच्या बायकोसमोर दुसर्‍या बाईवर लाईन मारुन बघा , म्हणजे कळेल पिसाळन का काय ते काय असत...

विटेकर's picture

11 Dec 2012 - 3:08 pm | विटेकर

पटत नाही.
तुम्ही मानवाला ( ज्यात स्त्री देखील आली ) अगदी पशूच्या पातळीवर आणून ठेवले आहे ! मानवाच्यात काही सांस्कृतिक उत्क्रांती झालीच नाही की काय ?
काही मानव हे पशुवत असतील ही , पण म्हणून असे सार्वत्रिक ( जनरलाएज्ड ) विधान करणे केवळ धाडसाचेच नव्हे तर अन्यायकारक होईल.
शारिरीक गरजा ते आत्मसन्मान हा मोस्लेचा त्रिकोण तुम्हाला माहीत नसेल असे म्हणणे अवघड वाट्ते.

तुम्ही दिलेल्या सर्व संदर्भातील सर्व लेखिका प्रणयातल्या पराकोटीच्या अतृप्तीनं ग्रस्त असतील हे मी निर्विवादपणे सांगू शकतो. त्यांनी कधीही सेक्शुअल ऑरगॅझम अनुभवला नसेल. या वैफल्यातनं स्त्री देहाबद्दलचा तिटकारा आणि त्यातून प्रथम Equity feminism आणि त्याचा परिपाक म्हणून Gender feminism या विचारसरणीचा उगम झालाय.

आयला , हे तर भलतच झाले ! कायच्या कै ! याचा अर्थ असा की जगातील यच्च्यावत पुरुष आणि स्त्रिया देखील आपले सारे आयुष्य फक्त आणि लैगिक समाधान याचविषयावर केंद्रित करतात. बाकिच्या सार्या गोष्टी गौण आहेत. जगात काहीही मिळवले तरी आणि त्यामुळे कोणाचे ही समाधान होत नाही.

चिगो's picture

11 Dec 2012 - 3:57 pm | चिगो

संजयजी, प्रणयतृप्ती स्त्रियांसाठी (पुरुषांप्रमाणेच) महत्त्वाची असते हे मान्य.. कशाला, पुरुषांची त्यांच्या स्त्रीला प्रणयसुख देऊ शकण्याच्या क्षमतेबद्दलची साशंकता, हे योनीशुचीतेच्या आग्रहाचे आणि पुरुषप्रधानचे मुळ कारण आहे, हे मला वाटते. पण काही शंका..
1. शारिरीक आणि त्यायोगे येणारी मानसिक तृप्ती ह्याव्यतिरीक्तही एक माणुस म्हणून स्त्रीला तिचा सन्मान महत्वाचा नाही का? पिलीयन रायडर म्हणाल्याप्रमाणे पुरुष कितीही मदन असला तरी कुठली सुशिक्षीत आत्मसन्मानी स्त्री त्याच्याकडून छळ सहन करेल?

2. एकत्र कुटूंबपद्धतीत स्त्रीला तिच्या पतीव्यतिरिक्त बाकीच्या लोकांकडून मिळणारी वागणूक आणि पतीचा त्याबद्दलचा रिस्पाॅन्स महत्त्वाचा नाही का? सरकारने "घरेलु हिंसा” कायदा आणला कि राव ह्या विषयावर..

3. बायकोला पलंगात खुष ठेवली कि मग तिला 'पायातली वहाण' म्हणून वागवलं तरी चालतं हिच की ती पितृसत्ताक पद्धती.. ;-) ह्या 'टेकन फाॅर ग्रँटेट' अॅटीट्यूडचाच तर विरोध करते फेमिनीझ्म.. मग परत सगळ्या गोष्टी पलंगाशी जोडण्यात काय अर्थ..

माझ्या वाचण्यात,पाहण्यात आल्याप्रमाणेतरी स्त्रीला शरीरसुखासोबतच तिची कदर करणारा पुरुष आवडतो.. 'इंग्लिश विंग्लिश' मध्ये श्रीदेवी म्हणतेच की, "मुझे प्यार की जरुरत नहीं हैं, थोडी इज्जत चाहीये..”

वा संजय जी.. अतिशय.. वेगळाच विचार मांडलात तुम्ही .
तुमचे वेगळे विचार हे नेहमीच रोचक आणि मुद्देसूद असतात

( संजय जीनचा जोरदार पंखा ) स्पा

रामदास's picture

11 Dec 2012 - 12:10 pm | रामदास

लेख घाईगडबडीत वाचण्यासारखा नाही. एकदा वाचला .पुन्हा सावकाश वाचून वाचनतृप्त व्हावे असा विचार आहे.
जे वाचलं त्यावरून इतकेच समजले की लेखकानी गांभीर्यपूर्वक लिखाण केले आहे. लेखकाला शुभेच्छा.
(आमचं मास्तरडं कुठे गेलं आहे आजकाल माहीती नाही. त्यांचे विचारही मार्गदर्शक ठरले असते. आणि लेखाचा सारांश त्यांनी चार ओळीत संपवला असता )

प्यारे१'s picture

11 Dec 2012 - 6:43 pm | प्यारे१

>>>लेखाचा सारांश त्यांनी चार ओळीत संपवला असता

चार ओळी लिहून मास्तरांना अण्डरएस्टिमेट केल्याबद्दल रामदास काकांचा सौम्य निषेध (मिपावर पहिलाच असेन मी)

- मास्तर हे काम चार शब्दात करुन शकतात असा विश्वास असलेला प्यारे१ ;)

नितिन थत्ते's picture

11 Dec 2012 - 12:23 pm | नितिन थत्ते

काम (Calm) डाउन.....

जसा आयन रॅण्डसारख्यांनी मांडलेला भांडवलवाद आणि मार्क्सने मांडलेला समाजवाद प्रत्यक्ष जगात अस्तित्त्वात नाही तसाच वर लेखात मांडलेला अतिरेकी स्त्रीवाद केवळ थिअरीतच अस्तित्वात आहे.

आज स्त्रीवादी म्हणवल्या जाणार्‍या मेनस्ट्रीम गटांमध्ये अशी विचारसरणी नसते. लेखात ही अतिरेकी विचारसरणी वाढत जाईल अशी धारणा दिसते तसे नसून, पूर्वी असलेली असली विचारसरणी मॉडरेट झालेली आहे असे मला स्वतःला वाटते.

याचे आणखी एक समांतर उदाहरण हिप्पी वगैरे चळवळींचे वाटते. समाज-कुटुंबव्यवस्थेला नाकारणार्‍या या चळवळी फारश्या टिकलेल्या नाहीत आणि समाजव्यवस्थेत फारच थोडे बदल झाले आहेत.

संजय क्षीरसागर's picture

11 Dec 2012 - 1:14 pm | संजय क्षीरसागर

संसार करावा असं वाटणार्‍या मुलींची संख्या तीव्रतेनं कमी होतेय. फुल्ल चंगळवाद सर्वत्र दिसतोय आणि त्यातनं कुटुंबव्यवस्था संपत चाललीये.

नितिन थत्ते's picture

11 Dec 2012 - 1:52 pm | नितिन थत्ते

जुन्या प्रकारची कुटुंबव्यवस्था बदलत चालली आहे हे खरं. संसार करावा असं वाटणे म्हणजे नक्की काय?

संसार करावा असे वाटणार्‍या मुलींची संख्या तीव्रतेने कमी होतेय हे फारच उथळ विधान आहे.

आता लिव्ह इनला सुप्रीम कोर्टानं वैधता दिलीये. हे लिव्ह इन म्हणजे एकाशी संसार करण्याची, मुलं जन्माला घालण्याची, त्यांच संगोपन करण्याची अनिच्छा. सध्या हवा तितकी जोरात नाही पण जागतिकीकरणात ही लाट येते आहेच.

मी-सौरभ's picture

11 Dec 2012 - 7:04 pm | मी-सौरभ

याने लोकसंख्यावाढीला आळा बसेल हे चांगलेच नाही का?

जेनी...'s picture

12 Dec 2012 - 9:42 pm | जेनी...

संजय काका ...पण असं नै ओ :(
मला खरच करायचाय संसार :(
एक(च) नवरा आणि नीदान दोन(तरि) मुलं असावीत ...असं माझं छोटसं स्वप्न आहे :)
आई आणि पप्पानी जसं शुन्यातुन सगळं उभं केलं ,आम्हा भावंडाना घडवलं ..ते आणि तसच मलाहि सगळं करायचय .
त्यामुळे संसार करण्याची इच्छा संपणार्‍या मुली तिव्रतेने कमी होत चालल्यात ...या विधानाचा निषेध :-/

चित्रगुप्त's picture

12 Jan 2013 - 2:19 am | चित्रगुप्त

संजय उवाचः
.....संसार करावा असं वाटणार्‍या मुलींची संख्या तीव्रतेनं कमी होतेय. फुल्ल चंगळवाद सर्वत्र दिसतोय आणि त्यातनं कुटुंबव्यवस्था संपत चाललीये....
शंभर टक्के मान्य.
मुलांसाठी वधुसंशोधन करणार्‍या पालकांना अगदी हाच अनुभव येतोय.

युयुत्सु's picture

11 Dec 2012 - 12:26 pm | युयुत्सु

उत्तम लेख

फेमिनीस्ट विचार धारेबद्दल कोणी शैक्षणिक चर्चा केली जी त्यांच्या राजकीय अजेंड्या विरुद्ध जात असेल तर फेमिनीस्ट शक्ती अश्या लोकांना आणि त्यांच्या विचारांना अँटी-फेमिनीस्ट ठरवून त्यांचा आवाज बंद करून टाकतात.

+१

संजय क्षीरसागर's picture

11 Dec 2012 - 1:13 pm | संजय क्षीरसागर

प्रथम तुमच्या प्रतिसादाबदाल धन्यवाद!

नवरा आणि सेक्स हे आयुष्याचे छोटेसे भाग आहेत.. संपुर्ण आयुष्य नाही...

> विवाह ही सुरूवात आहे आणि तोच समाज निर्माण करतो. बाह्याकडून येणारं सर्व अस्वास्थ सामजिक (आणि पर्यायानं देश आणि जग यामुळे) आहे.

जर स्त्री तृप्त असेल तर कुटुंब समाधानी असेल. जर कुटुंब समाधानी असेल पुरूष अहिंसक होईल. प्रत्येक समाधानी कुटुंब स्वास्थपूर्ण संतती आणि पर्यायानं समाजाला आणि त्यामुळे शांततापूर्ण देशाला आणि जगाला जन्म देईल.

माझा विचार स्वप्नवत वाटत असेल पण तो इतका मुलभूत आहे की तुम्ही तो फक्त एकसंधपणे कल्पून पाहा मग तुम्हाला लक्षात येईल की समाधानाची सगळी मेख निव्वळ या एका गोष्टीत आहे.

अँड अनलेस इट इज सॉल्वड देअर इज नो गो.

पिलीयन रायडर's picture

11 Dec 2012 - 1:24 pm | पिलीयन रायडर

जर स्त्री तृप्त असेल तर कुटुंब समाधानी असेल

अहो पण स्त्री काय फक्त "प्रणयातुनच" समाधानी होते का? बाकी काही इच्छा अपेक्षा असतात की नाही?

जर कुटुंब समाधानी असेल पुरूष अहिंसक होईल

मी उलट म्हणेन की पुरुष अहिंसक झाला तर कुटुंब समाधानी होईल..
तुम्ही थोड्क्यात असं म्हणताय की "स्त्री रात्री समाधानी झाली तर दिवसा आक्ख घरदार समाधानी राहील... मग भले त्यांच्या स्वतंत्र आयुष्यात काही का घडेना"

"जिच्या हाती पाळण्याची दोरी , ती जगा ते उद्धारी " हे माहीती होतं, पण तो उद्धार असा होतो हे माहिती नव्हतं..!!!

>अहो पण स्त्री काय फक्त "प्रणयातुनच" समाधानी होते का? बाकी काही इच्छा अपेक्षा असतात की नाही?

जर प्रत्येक पती स्वतःच्या पत्नीला प्रणय तृप्त करू शकला आणि अत्यंत सूज्ञतेनं त्यानं Equity feminism मान्य केलं (ते आपसूक होतच) तरच कुटुंबव्यवस्था टिकू शकेल.

>तुम्ही थोड्क्यात असं म्हणताय की "स्त्री रात्री समाधानी झाली तर दिवसा आक्ख घरदार समाधानी राहील... मग भले त्यांच्या स्वतंत्र आयुष्यात काही का घडेना"

= माझं विधान मूलगामी आहे : अतृप्तीमुळे स्त्रीला स्त्री देह मान्य नाही!

तुम्ही लेख वाचलात तर तुमच्या लक्षात येईल की Equity feminism या विचारधारेनं बर्‍याच स्रिया आर्थिक दृष्ट्या (आणि तुम्ही म्हणता तशा निर्णयक्षमतेच्या दृष्टीनं) सक्षम झाल्यात. पण अशा सक्षमतेनं मूळ अतृप्ती कशी दूर होईल? त्यामुळे त्या आता Gender feminism या अत्यंत परस्परांना घातक विचारसरणीकडे वळल्या आहेत.

पिलीयन रायडर's picture

11 Dec 2012 - 2:05 pm | पिलीयन रायडर

अतृप्तीमुळे स्त्रीला स्त्री देह मान्य नाही!

आई शप्पथ.. मी स्वतः स्त्री असुन सुद्धा मी एवढं ठाम पणे असा काही म्हणणार नाही..
काका, देह वगैरे खरं असलं तरी, समाजातील स्थान, हक्क, स्त्री म्हणुन होणारी आर्थिक/शाररिक्/मानसिक पिळवणुक असे हजारो मुद्दे आहेत हो..
मला त्या हजारो मुद्द्यांबद्दल प्रोब्लेम आहे.. पण एक स्त्री म्हणुन मला माझा देह, त्या देहामुळे असणारे नैसर्गिक त्रास (मासिक धर्म/ प्रसुती )ह्या चा मला काहीही त्रास नाही.. स्त्रीया feminism बद्दल बोलतात ते "अतृप्तीमुळे" नाही.. (तुम्ही असं बोलुन फार मोठा आरोप त्यांच्या नवर्‍यावर करताय असं नाही वाटत का?) तर त्यांना पदोपदी मिळणार्‍या वागणुकी मुळे..

स्त्रीया feminism बद्दल बोलतात ते "अतृप्तीमुळे" नाही.. तर त्यांना पदोपदी मिळणार्‍या वागणुकी मुळे..

ज्या वागणुकीबद्दल तुम्ही बोलताय त्या विरोधात स्त्रीनं आर्थिक आणि निर्णयाच्या स्वातंत्र्य मिळवून, पार राजकीय सत्ता मिळवून प्रत्त्युत्तर देण्याचा हक्क मिळवलाय.

आता विषय Equity feminism कडून Gender feminism कडे वळलाय

आई शप्पथ.. मी स्वतः स्त्री असुन सुद्धा मी एवढं ठाम पणे असा काही म्हणणार नाही

तुमचं कौतुक आहे पण लेखात वर्णन केलेली लेखिकांची मतं वाचा, चक्रावून जाल.

(तुम्ही असं बोलुन फार मोठा आरोप त्यांच्या नवर्‍यावर करताय असं नाही वाटत का?)

जे आहे ते आहे, तो आरोप नाही.

पिलीयन रायडर's picture

11 Dec 2012 - 2:31 pm | पिलीयन रायडर

तुम्ही तुमचं मत सांगताय की लेखिकेच? आणि अब्जावधी स्त्रियांमध्ये २-४ जणींनी मांडली एक थिअरी.. तर तुम्ही ते ठाम सत्य असल्या सारख कसं सांगताय?

बॅटमॅन's picture

11 Dec 2012 - 1:18 pm | बॅटमॅन

मुळात हा स्त्रीवाद ज्यांच्यासाठी आहे, त्या स्त्रियांची संख्याच घटत चाल्लीये, ती वाढवायचं बघा कोणीतरी. आत्ता आहेत त्या बायकांचे डोके ठिकाणावर आहे की सटकलेय ही चर्चा नंतर निवांत करता येईल (पुणे महापालिकेच्या अंतर्गत उंदीर मारता मारता).

कवितानागेश's picture

11 Dec 2012 - 3:32 pm | कवितानागेश

कुणी कुणी हा लेख संपूर्ण वाचला? खर्रे खर्रे सांगायचे. :D

शैलेन्द्र's picture

11 Dec 2012 - 3:53 pm | शैलेन्द्र

हात वर.. एक अ‍ॅनासीन द्या.. पण कसा का असेना, गंभीर लेख.

जेनी...'s picture

11 Dec 2012 - 10:33 pm | जेनी...

मी नै बै वाचला ....
कशाला वाचायचा ?? :-/
मी कसलीच आंदोलनं न करता मुक्तय :D

मृगनयनी's picture

12 Dec 2012 - 8:37 pm | मृगनयनी

मी नै बै वाचला ....
कशाला वाचायचा ?? smiley
मी कसलीच आंदोलनं न करता मुक्तय smiley

हाहाहा!!.. लय भारी हं पू ssssss

नाहीतर काही बायका वर्शानुवर्ष स्त्री-मुक्ती'बद्दलचे लेख झोडत असतात.. आपण किती मुक्त आणि स्वैर विचारांच्या आहोत.. याचे वारंवार दाखले देत राहतात.. ;) ;) पण प्रत्यक्षात मात्र यांच्या पतिराजांना पश्चिमेकडील हुच्चभ्रू देशात नोकरीनिमित्त जावे लागल्यावर या बायका आपले करियर, स्त्री-मुक्तीवाद वगैरे सगळे विसरून गपगुमान नवर्‍याच्या मागे जातात.. आणि लग्नाच्या होमाला घातलेल्या फेर्‍यांपैकी कुठलीशी "रसम' निभावतात. ;) ;)

अश्या वेळी यांचा स्त्री-मुक्तीवाद कुठे जातो कुणास ठाऊक !!... बिच्चार्‍या .... :)

टीपः अर्थात इथे मी वरील न वाचलेल्या लेखाचा पुरस्कार करते.. असे अजिबात नाही... पण स्त्री-मुक्तीबद्दल बड्या बड्या गोष्टी करणार्‍या, इतर साध्या सरळ - व्यवस्थित संसार करणार्‍या स्त्रियांबद्दल नेहमी तुच्छतेने बोलणार्‍या बायकांना स्वतःवर वेळ आल्यावर मात्र नवर्‍याचे शेपूट धरूनच चालावे लागते... हे पाहून अम्मळ मौज वाटली !!!!
________

बाकी चालू द्या!...

पण स्त्री-मुक्तीबद्दल बड्या बड्या गोष्टी करणार्‍या, इतर साध्या सरळ - व्यवस्थित संसार करणार्‍या स्त्रियांबद्दल नेहमी तुच्छतेने बोलणार्‍या बायकांना स्वतःवर वेळ आल्यावर मात्र नवर्‍याचे शेपूट धरूनच चालावे लागते... हे पाहून अम्मळ मौज वाटली !!!!
________
१००% सहमत नैनी ...

मंदार दिलीप जोशी's picture

11 Dec 2012 - 3:36 pm | मंदार दिलीप जोशी

अत्यंत धेडगुजरी मराठी आहे. एकच उदाहरण देतो

अशी विचारधारा निर्माण करून तिचा प्रसार करून ह्या विचारांना फेमिनिजम चे उद्देश्य, लक्ष बनविणाऱ्या मध्ये प्रामुख्याने १९६० च्या दशकातील Andrea Dworkin, Phyllis Chesler, Monique Wittig, Mary Daly, Jill Johnston, आणि Robin Morgan ह्यांचा मोठा हाथखंड आहे

हाथखंड ??????????????????????????????? या वायझेड मराठी आहे हे राग

प्रस्तुत वाक्याच्या संदर्भात तो शब्द "वाटा" असा असायला हवा.

अशी विचारधारा निर्माण करून तिचा प्रसार करून ह्या विचारांना स्त्रीवादाचे उद्देश्य, लक्ष बनविणाऱ्या मध्ये प्रामुख्याने १९६० च्या दशकातील Andrea Dworkin, Phyllis Chesler, Monique Wittig, Mary Daly, Jill Johnston, आणि Robin Morgan ह्यांचा मोठा वाटाआहे

<<चे उद्देश्य, लक्ष बनविणाऱ्या >> म्हणजे काय? काहीही समजलं नाही.

इथं लोकांना स्त्रीमुक्तीचं पडलंय अन तुम्हाला मराठीचं ? गहन सामाजिक प्रश्नांचं भानच नाही तुम्हाला. (आणि मलादेखील)

श्री गावसेना प्रमुख's picture

11 Dec 2012 - 3:47 pm | श्री गावसेना प्रमुख

गळ्यात खर खर झाली हे वाचुन्,हे असे विषय अनादी व अनंत आहेत एव्हढे खरे.कितीही काथ्याकुट केला तरी कमी आहे.त्रुप्ती ही तर कोणत्याही गोष्टीची व्हायलाच हवी स्त्री व पुरुष दोघांची ,

घाशीराम कोतवाल १.२'s picture

11 Dec 2012 - 3:51 pm | घाशीराम कोतवाल १.२

मास्तुरे कुठे आहेत बर वर रामदास काकांनी म्हट॑ल्याप्रमाणॅ झटक्यात सारांश कळेल..
कॉलींग मास्तर कॉलींग .http://www.desismileys.com/smileys/desismileys_4513.gif

राही's picture

11 Dec 2012 - 4:52 pm | राही

मुळात हा लेख तीन चार इंग्रजी लेखांचे एकत्रीकरण आणि संक्षिप्त भाषांतर असल्यासारखा वाटतो.पुष्कळ अवतरणे उद्धृत करण्याची क्लृप्ती लेख ओरिजिनल नसण्याचे सत्य झाकून टाकू शकते कारण ही अवतरणे मुळातली आहेत आणि ती भाषांतरित करण्याची गरज होतीच.

राजघराणं's picture

11 Dec 2012 - 5:10 pm | राजघराणं

बदनामिचा कट.

पैसा's picture

11 Dec 2012 - 6:00 pm | पैसा

हाच लेख मीमराठीवर आला होता. लेखकांनी स्वतःच इथे दिला आहे त्यामुळे तशी तक्रार नाही. "जुने लेखन इथे देऊ नये" असा काही उल्लेख मिपाच्या धोरणात वाचल्याचं आठवत नाही. पण तीच चर्चा परत वाचणे बरेच कंटाळवाणे प्रकरण आहे.

इथे प्रतिसाद देणारे वेगळे आहेत, दृष्टीकोन वेगळे आहेत. जर चर्चा मुद्याला धरून झाली तर सर्वांना उपयोगी होईल.

सोत्रि's picture

11 Dec 2012 - 9:02 pm | सोत्रि

असहमत!
चर्चा 'तीच तीच' होऊ घातलेय, तशी ती व्हायला नको. बरेच रोचक मुद्दे आहेत चर्चा करायला लेखात, अर्थात चर्चा करायची असेल तर :)

-(पैसातैशी चक्क असहमत असलेला) सोकाजी

दादा कोंडके's picture

11 Dec 2012 - 11:42 pm | दादा कोंडके

सहमत.

पाकृ आणि कॉकृ आधाश्यासारखं सगळ्या संकेतस्थळावर टाकण्यापेक्षा लेखात चर्चेसाठी मुद्दे असल्यामुळे वेगवेगळ्या संकेतस्थळावर टाकणं बरं. प्रत्येक संकेतस्थळाचा पिंड वेगळा असल्यामुळे चर्चेची दिशा वेगळी असू शकते. ;)

सोत्रि's picture

11 Dec 2012 - 11:54 pm | सोत्रि

इथे अवांतर होईल, सविस्तर व्यनि करतो आहे!

- (गंभीर) सोकाजी

तिमा's picture

11 Dec 2012 - 6:50 pm | तिमा

दलितांवर हज्जारो वर्षे अन्याय झाला म्हणून जशी चळवळ उभी राहिली तशीच स्त्रियांवर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया येणारच.
जो समाज स्त्रीला सन्मानाने वागवतो त्याला या विचारसरणीची भीति वाटणारच नाही. जे अजूनही स्त्रियांना बंधनात ठेवत आहेत त्यांनाच याची भीति वाटेल.
लेख संपूर्ण वाचला आहे. त्याचा,सारांश एवढाच की, आपले वर्चस्व जाईल अशी भीति वाटणार्‍यांचा हा कांगावा वाटतो.

आबा's picture

11 Dec 2012 - 7:44 pm | आबा

अ‍ॅलन विलिसची आर्टिकल्स खरंच वाचलित का हो तुम्ही? संदर्भ सोडून वाक्य उचलली आहेत म्हणून विचारलं...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Dec 2012 - 8:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सार्‍या प्रश्नाचं उत्तर केवळ एका गोष्टीत आहे आणि ते म्हणजे स्त्रीला प्रणयात सर्वस्वी तृप्त करण्यात पुरूषाला आलेलं अपयश.

हम्म, काहीही म्हणा राव, या मुद्यात जरा दम वाटतो. प्रतिसाद जरा सविस्तर आणि मुद्देसूद येऊ द्या राव.

-दिलीप बिरुटे

कवितानागेश's picture

11 Dec 2012 - 8:54 pm | कवितानागेश

pendulum

सोत्रि's picture

11 Dec 2012 - 8:59 pm | सोत्रि

काही गोष्टी अश्या असतात कि ज्या तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाही म्हणून हा एक छोटासा प्रयत्न.

ह्याच मुद्द्यामुळे लेख प्रचंड भावला! मनापासून आवडला. अतिशय स्तुत्य प्रयत्न. बरीच नविन माहिती समजली.

पण लेखाचे शिर्षक आणि शेवटचे जाता जाता व्यक्त केलेले मत ह्याने लेखाचा पूर्ण टोन बदलून गेला आहे. वरच्या कोटेड वाक्यातली भावनाच त्याने नाहीशी झाली. त्यामुळे प्रतिसादांचे वारु ज्या दिशेला जाणे अपेक्षित होते त्याप्रमाणे ते नेमके तिथेच गेले.

बर्‍याच दिवसांनी काहीतरी वेगळा आणि आशय असलेला लेख मिपावर वाचायला मिळाला.
चर्चा 'योग्य आणि ओपन माइंडसेटने' मतं मांडून केल्यास फारच रोचक विषय आहे हा. स्त्री-मुक्ती ह्या नेहमीच्या, चर्चून गुळगुळीत झालेल्या विषयाच्या वेगळ्याच पैलूवर असलेली ही माहिती माझ्यासाठी तरी नक्कीच नविन आहे.

प्रतिसादांमध्ये संजय क्षीरसागर यांच्यासी बाडीस!

स्त्रिला प्रणयतृप्त करण्याच्या असामर्थ्यामुळे पुरूषानं स्वतःचं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी जी परिस्थिती निर्माण केली त्यातून Equity feminism चा जन्म झालाय आणि आता स्त्री त्याचं उत्तर Gender feminism नं देण्याचा प्रयत्न करतेय.

हा अतिशय सयुक्तिक मुद्दा त्यांनी मांडला आहे जो त्या स्त्री-मुक्तीवादी महिलांच्या मनोभुमिकेला एका वेगळ्या रितीने उलगडून बघण्याचा प्रयत्न करतो. त्यांचे ते मत 'जनरायलेझन' असे न बघता, नीट विचार केला तर आपल्या समाजात चर्चा करण्यास 'टॅबू (निषीद्ध ?)' असलेल्या मुद्याला नक्कीच स्पर्श करते. त्यानंतरचे त्यांचे प्रतिसादही चर्चेला रुळावर आणण्याचा प्रयत्न होता पण आधि म्हटल्याप्रमाणे लेखाचा टोनच बदलल्यामुळे लेखालाच सिरीयसली घेतले गेले नाही तिथे त्यांच्या प्रतिसादांची काय कथा.

असो, लेख आवडला!

- (मुक्त) सोकाजी

अवांतरः काही जणांच्या राखिव कुरणात, ह्या अनाहुत प्रवेशामुळे झालेली चिडचीड बघून अंमळ मौजही वाटली :)

अवांतरः काही जणांच्या राखिव कुरणात, ह्या अनाहुत प्रवेशामुळे झालेली चिडचीड बघून अंमळ मौजही वाटली

तंतोतंत!!!!

(अग्रिमचर्चापठनोत्सुक) बॅटमॅन.

पिवळा डांबिस's picture

12 Dec 2012 - 12:29 am | पिवळा डांबिस

माझी बायकू नाही मला छळत.
इतर बायका तेल लावत गेल्या,
मला फरक नाही पडत.......................................पीतबांडुंग

संजय क्षीरसागर's picture

12 Dec 2012 - 12:29 am | संजय क्षीरसागर

अनेक प्रतिसादांना एकावेळी उत्तर देतोय कृपया शांतपणे वाचून मग प्रतिसाद द्यावा ही विनंती

स्त्री देहाची रचना अशी आहे की तिचा ऑरगॅझम येण्याचा कालावधी पुरूषापेक्षा अती दीर्घ आहे (ही बायोलॉजिकल फॅक्ट सर्वांना माहिती आहे). त्यामुळे प्रणयात स्त्रीला तृप्त करणं पुरूषाला सहज शक्य नाही.

याही पुढे जाऊन स्त्री एका पाठोपाठ तीन ते चार वेळा पुन्हापुन्हा ऑरगॅझम उपभोगू शकते. स्त्री देहाची ही किमया सिंगल ऑरगॅझमिक देहामुळे कोणताही पुरूष उपभोगू शकत नाही. (तिला एकाच ऑरगॅझम पर्यंत नेऊ शकत नाही तर तिला मल्टिपल ऑरगॅझमनं प्रणयतृप्त करणं बव्हंशी अशक्य आहे)

अतृप्त स्त्रीच्या मनात प्रणय निव्वळ जननासाठी होतो आणि स्त्री देह त्यासाठी वापरला जातो अशी पक्की खूणगाठ आहे.

पुरूषाला प्रणयाची नैसर्गिक ओढ आहे पण स्त्रीला तृप्त करू शकत नसल्यानं त्याच्या मनात स्त्रीविषयी अत्यंत खोल भीती आहे. पुरूषानं स्वतःच्या या अपूर्णत्वाची परिपूर्ती पुरूषप्रधान समाज रचना निर्माण करून (विषेशतः `कामा' ऐवजी अर्थाला महत्त्वाचं स्थान देऊन) आणि स्रीला दुय्यम स्थान देऊन युगानुयुगं चालू ठेवली.

यातनं गेल्या शतकात Equity feminism सुरू झाली आणि स्त्रियांनी पुरूषांशी प्रत्येक क्षेत्रात बरोबरी साधली.

पण मूळ मुद्दा प्रणयतृप्तीचा होता तो तसाच राहिला. स्त्रीच्या मनातली `प्रणय निव्वळ जननासाठी होतो आणि स्त्री देह त्यासाठी वापरला जातो' ही भावना जरा देखील कमी झाली नाही.

आता त्यामुळे Gender feminism म्हणजे स्त्री देहच (त्याच्या सर्व नैसर्गिक क्रियांसकट) अमान्य करणं अशी अत्यंत घातक कल्पना मांडली जातीये आणि तो या लेखाचा विषय आहे.

आता काही गैरसमज दूर करतो :

बायकोला पलंगात खुष ठेवली कि मग तिला 'पायातली वहाण' म्हणून वागवलं तरी चालतं हिच की ती पितृसत्ताक पद्धती.

नाही. प्रणयतृप्त स्त्री आणि पुरूष यांच्यात एक अनोखा सौहार्द निर्माण होतो. एकतर स्त्रीला तृप्त करण्यापरता तिच्याशी कृतज्ञ होण्याचा दुसरा मार्ग नाही. इट इज द हायेस्ट गिव्हींग अ मेल कॅन ऑफर टू हिज बिलव्हेड.

तुम्हाला या सायकलॉजिचा थोडा विचार करायला लागेल. सेक्स इज द हायेस्ट शेअरिंग इफ बोथ आर इन अ गिव्हींग मूड. जे युगुल असं शेअरिंग करतं तिथे स्त्रिला दुय्यम लेखण्याचा, तिच्यावर वर्चस्व गाजवण्याचा विचारच संपतो. आणि सर्वात मजा म्हणजे हे केवळ मानवी संबंधात शक्य आहे इतर सजीवात त्या भावनाच नाहीत. असा कोणताही पुरूष स्वतःच्या पत्नीला कदापिही 'पायातली वहाण' म्हणून वागवणार नाही.

तुम्ही थोड्क्यात असं म्हणताय की "स्त्री रात्री समाधानी झाली तर दिवसा आक्ख घरदार समाधानी राहील... मग भले त्यांच्या स्वतंत्र आयुष्यात काही का घडेना"

याचा अर्थ ती दोघं दिवसभर प्रणयरत राहतात असा नाही तर त्या तृप्तीनं येणारं समाधान त्यांच्यात एक अनुबंध निर्माण करतं. त्यांच्यात मित्रत्वाचं नातं निर्माण होतं जे त्यांचा दिवस अनोखा करतं. किरकोळ गोष्टींना अर्थ राहत नाही. एकमेकांचा सहवासच इतका लोभस असतो की घराचं सगळं वातावरण अनायासे बदलून जातं.

अत्रुप्त आत्मा's picture

12 Dec 2012 - 9:39 am | अत्रुप्त आत्मा

सं-जय.....तुंम्हाला आत्म्याचा सलाम........

सोत्रि's picture

12 Dec 2012 - 8:17 am | सोत्रि

याचा अर्थ ती दोघं दिवसभर प्रणयरत राहतात असा नाही तर त्या तृप्तीनं येणारं समाधान त्यांच्यात एक अनुबंध निर्माण करतं. त्यांच्यात मित्रत्वाचं नातं निर्माण होतं जे त्यांचा दिवस अनोखा करतं. किरकोळ गोष्टींना अर्थ राहत नाही. एकमेकांचा सहवासच इतका लोभस असतो की घराचं सगळं वातावरण अनायासे बदलून जातं.

+१००००० वेळा सहमत!

- (तृप्त) सोकाजी

ते नमूद करताना माझा कोणताही व्यक्तिगत रोख नाही हे कृपया लक्षात घावे. माझा प्रतिसाद वाचताना त्यांचा संदर्भ उपयोगी होईल इतकेच.

हम्म, काहीही म्हणा राव, या मुद्यात जरा दम वाटतो. प्रतिसाद जरा सविस्तर आणि मुद्देसूद येऊ द्या राव

ही विचारणा पुरूषाचा प्रामाणिक आणि प्रातिनिधिक प्रतिसाद म्हणून पाहता येईल.

स्त्रीया feminism बद्दल बोलतात ते "अतृप्तीमुळे" नाही..तर त्यांना पदोपदी मिळणार्‍या वागणुकी मुळे..

बाकी स्त्री- पुरुष समानता म्हणजे स्त्रीयांनाही "निर्णय घ्यायचा हक्क मिळणे " असा माझ्या लेखी आहे

लग्न झालेल्याच पिसाळतात असं नाही.. पण लग्न झालेल्या बायका नवर्‍यावर नक्की पिसाळतात...

आणि तुमची स्वतःची हक्काची बायकोच तुमची हक्कानी वाट लावु शकते...

हे प्रतिसाद भारतीय स्त्रिला अजून ती Equity मिळाली नाही किंवा मिळाली असेल तरी Equity feminism नं ती समाधानी नाही असं दर्शवतात

हा प्रतिसाद अपत्यजन्मासारख्या निसर्गातल्या कमालीच्या सृजनात्मक प्रक्रियेबद्दल आणि स्त्री देहाबद्दल प्रगत देशातल्या स्रिया (जिथे Equity feminism परिपूर्ण आहे) काय विचार करतात ते दर्शवतो

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Dec 2012 - 10:07 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

हा प्रतिसाद अपत्यजन्मासारख्या निसर्गातल्या कमालीच्या सृजनात्मक प्रक्रियेबद्दल आणि स्त्री देहाबद्दल प्रगत देशातल्या स्रिया (जिथे Equity feminism परिपूर्ण आहे) काय विचार करतात ते दर्शवतो

नाही. तो प्रतिसाद लेखाबद्दल आहे, स्त्रीदेहाबद्दल नाही. बाकी चालू द्या.
(भारतीय आणि स्त्री) अदिती

अपत्यजन्मामधे प्रत्यक्षात फार सृजन वगैरे नसावं. सृजन म्हणायचंच असेल तर स्पर्म आणि ओव्हम मिळून एक सेल बनते, तिच्या दोन होतात आणि पुढे प्रचंड काँप्लेक्स असं शरीर निर्माण होतं त्याला म्हणा. प्रत्यक्ष जन्म देताना बायका ज्या काही यातना सहन करतात, त्या सहन करताना नवरा/पार्टनर, होणारं मूल यांना शिव्या वगैरे देतात त्याला सृजन म्हणता येईल. काही जातीत अशी श्रध्दा आहे की प्रसूतीच्या वेळी पतीला अश्लील शिव्या दिल्या की बाळ निरोगी जन्मते. (--विजय तरवडे, अर्धखासगी संवादात) या वेदनांना श्रद्धा बनवण्यालाही (उपहासाने) सृजन म्हणता येईल कदाचित.

आणि जमलंच तर थोडं सरसकटीकरण कमी केलंत तरी चालेल.

तो प्रतिसाद लेखातला अत्यंत हिणकस भाग अधोरेखित करतो.

या प्रतिसादात तुम्ही अदृष्य शाईत लिहिलेला भाग मात्र ती भावन अवेगानं व्यक्त करतो. मी आलेल्या प्रतिसादांना उत्तर देतोय आहे त्यामागे सरसकटीकरण नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Dec 2012 - 10:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> पुरूषाचा प्रामाणिक आणि प्रातिनिधिक प्रतिसाद म्हणून पाहता येईल.
माझा मुद्दा जरा वेगळा होता.

प्रणयाच्या बाबतीत खुलासा यासाठी म्हणत होतो की सिमॉन दी बुव्होच्या द सेकंड सेकस मधे एक उदाहरण आहे की, एक स्त्री श्रीमंत असते, स्वतः अनेक पुरुषांशी संबंध ठेवते, ती स्वतंत्र असते, तिच्यावर कोणतेही बंधन नसते, असलेल्या पुरुषांवर ती सत्ता गाजवते तरीही ती समाधानी नसते. आता या पेक्षा अधिक कोणतं स्वातंत्र्य स्त्रीला हवे असेल ? प्रणय आणि तृप्तीच्या पलिकडे अधिक काही आहे का ?

आपण प्रतिसादात कुठे उत्तर लिहिले असेल तर ते मी वाचलेले नाही.

-दिलीप बिरुटे

प्रतिसाद पुढच्या पानावर दिलाय, पहावा.

जेनी...'s picture

12 Dec 2012 - 9:17 am | जेनी...

संजय काका अतिशय सुंदर प्रतिसाद .
तुमचे काहि काहि प्रतिसाद वाचुन तुम्हाला पहाण्याची भारी इच्छा होते .

लिहित रहा . माझ्यासरखे अनेक वाचक आहेत इथे जे तुम्ही लिहिलेलं आवर्जुन वाचतात .

संजय क्षीरसागर's picture

12 Dec 2012 - 9:31 am | संजय क्षीरसागर

सर्वांना सहजीवनाचा आनंद कळावा म्हणून तर लिहलय. सुखी रहा.

सुहास..'s picture

12 Dec 2012 - 9:26 am | सुहास..

ही ही ही !

स्त्री मुक्तीच्या धाग्यावर , पुरुषांचेच जास्त प्रतिसाद ;)