बर्याच दिवसांपासून मित्र-मैत्रिणींकडून, नातेवाईकांकडून या कादंबरीबद्दल वाचून पहा अशी शिफ़ारस केली जात होती...( त्यावर निघालेले नाटक.."ग म भ न", नुकताच रिलीज झालेला सिनेमा, तोही हिंदी, " हमने जीना सीख लिया"..., बर्याच लोकांच्या नुकत्याच वाचलेल्या चांगल्या पुस्तकांत त्याचा समावेश..त्यामुळे उत्सुकता अधिकच वाढलेली होती)...शेवटी वाचनाचा मुहूर्त लागला या आठवड्यात...इथे यावर चर्चा झडलेली आहे की नाही ते मला माहित नाहीये, पण वाचून मस्त वाटलं, आणि ते इथे सांगावंसं वाटलं....
.....कादंबरीचा नायक एक नववीत गेलेला मुलगा आहे, नववीचे वर्ष नुकतेच सुरू झालेले आहे, (हा आणीबाणीचा १९७६ चा काळ आणि बहुधा हे डोंबिवलीतल्या एक शाळेचे वर्णन असावे...) हा बर्यापैकी हुशार आहे परंतु त्याचा एक मित्रांचा ग्रुप आहे, त्यात सारे अभ्यासू नाहीत.पण ग्रुप मजेदार आहे. (एकाला शास्त्रद्न्य व्हायचे आहे, एकजण श्रीमंत पण अजिबात अभ्यास न करणारा आणि आडदांड आहे, एकजण संध्याकाळी मंडईत भाजी विकणारा..वगैरे) हा ग्रुप टाईमपास करायला शाळेआधी रोज त्या रस्त्यावर बिल्डिंगवर बसतो आणि विविध विषयांवर चर्चा होते तिथे...त्यात मास्तर मास्तरणींना टोपणनावे ठेवणे, त्यांच्या जोड्या जुळवणे,काही मुलींना चिडवणे, मग आवडणार्या मुलीचा माग काढणे, तिला पटवण्याचे विविध प्रयत्न, "कोणतातरी क्लास लाव, आता दहावी आली" वगैरे घरून येणारे प्रेशर, ...वगैरे..
....................शिवाय शाळा भरल्यानंतरचे शाळेतले वातावरण, मोजके आवडते शिक्षक , खाष्ट मास्तरीण, कोणीही "डाउट खाउ नये" असे शिताफ़ीने आवडत्या मुलीकडे पाहणे, १४ -१५ वयाच्या या मुलांचे विविध लैंगिक प्रश्न, प्रत्येकाचा त्याकडे पहायचा आपापला द्रुष्टिकोन, अत्यंत चावट ( काहींना भयंकर वाटतील अशा) कोमेंट्स, हिरीरीने म्हटली जाणारी अश्लील गाणी....वर्गातून ओफ़ तासाला पळून जाणे; त्याचे परिणाम भोगणे, सामुदायिक कवायत, प्रार्थना, प्रिंसिपलच्या शिक्षा...
.....या सार्याला थोडी आणीबाणीची पार्श्वभूमी.....असो.... फ़ार सांगणे रसभंग होईल...ही कादंबरी वाचाच....
१९७५ सालीही शाळेत वापरला जाणारा "लाईन देणे" हा शब्द मी शाळेत असताना (’८९ साली नववीत) फ़ेमस होताच...म्हणजे मुलीला थेट समोर जाऊन विचारणे की ," का गं तू मला लाईन देते का?"....अहाहा...."मला लाईन देते का? " हा हा हा...( विकट हास्य).. हा शब्दप्रयोग किती जुना आहे कोण जाणे? आणि सध्या कोणता शब्द वापरला जातो मला ठाऊक नाही....
लेखकानं हे सारं कसं बिनधास्त अगदी खरं खरं लिहिलं आहे... वाचत असताना आपण त्या शाळेमधून सफ़र करून येतो..."शाळेत गेलेल्या सर्वांना" पुस्तक अर्पण केले आहे....पुस्तक मी एका बैठकीत संपवले... वाचताना मला माझ्या शाळेची फ़ार आठवण झाली...आमची शाळा all boys होती...( अर्थात सतलज हे आमचे टोपण नाव आहे). पोरे एक से एक सवाई वाईट होती, शिवीगाळ - मारामार्या यात पटाईत,( माझ्या वर्गात रिमांड होम मध्ये काही दिवस राहून आल्याचे अभिमानाने सांगणारा एक मुलगा होता सातवीत),..होती,चांगली थोडी होती, आम्ही होतोच की...मास्तर मन लावून शिकवणारे थोडे होते...म्हणजे सगळे नेहमीसारखेच.......पण हे पुस्तक वाचेपर्यंत मला माझ्या शाळेचा आणि तिथे असलेल्या किंवा बर्याचशा नसलेल्या शिक्शणाचा थोडा गंड वाटत असे...आता वाटत नाही....खरंतर आमची शाळा अगदी कादंबरीत लिहिल्यासारखीच होती ....मग खरंतर तिला वाईट कशाला म्हणायचे? बर्याचशा शाळा अशाच असतात....सगळ्या शाळा सारख्याच...जो तो पोरगा आपापल्या कर्त्रुत्त्वाने पुढे जातो, हेच खरे...
प्रतिक्रिया
25 Jan 2008 - 6:20 pm | प्राजु
परिक्षण वाचून मलाही आमच्या शाळेची आठवण झाली. पण कादंबरीची ही खूपच थोडी ओळख इथे दिली आहे आपण. नुसती शाळा कशी होती आणि त्या शाळेशी मुलाचा संबंध इतकाच विषय आहे की , त्यात त्या मुलाची कथाही आहे? बाकीचा पात्र परिचय थोडा आला असता तर आणखी उत्सुकता वाढली असती. असो..
भारतात आल्यावर मिळाली वाचायला तर बघू..
- प्राजु.
22 Aug 2008 - 6:34 pm | संदीप चित्रे
भेटलीस इतक्यात कधी तर देईन वाचायला... अर्थात एक मिसळ ह्या रिटर्न गिफ्टच्या बोलीवर :)
25 Jan 2008 - 8:23 pm | छोटा डॉन
काय झकास व थोडक्यात परिक्षण लिहले आहे राव तुम्ही... मान गये ऊस्ताद .............
आम्ही पण बरेच महिने झाले हे पूस्तक वाचण्याची मनिषा बाळगून आहोत, पण अजून योग जमला नाही... बरेच ऐकले आहे पूस्तकाविषयी, पण आज तुमचा लेख वाचून पूस्तक वाचण्याच्या ईच्छेला पून्हा एकदा "किल्ली दिली" गेली....
पूण्यात असताना हे पूस्तक कधी वाचयला मिळालेच नाही. आता पूण्यापासून दूर एकही मराथी शब्द न बोलला न जाणार्या भागात तर मिळण्याची आशाच सोडा...
हे पूस्तक "ऑनलाईन" विकायला असल्याची कोणास माहिती असल्यास संपर्क साधावा .....
1 Feb 2009 - 3:20 pm | माझी दुनिया
'पंकज कुरूलकरां'च्या ग्रंथायन ला विचारा की राव ! :)]
माझी दुनिया
19 May 2008 - 2:25 am | भडकमकर मास्तर
ओळख थोडी आहे हे खरंच्...फक्त "किती विस्ताराने सांगितल्यावर रसभंग होणार नाही!" याचा अंदाज घेत लिहिले इतकेच.... गोष्ट मुकुंद जोशी या मुलाचीच आहे, त्याच्या ग्रुपची आहे,त्याला आवडणार्या मुलीला पटवण्यासाठी , तिला इम्प्रेस करण्यासाठी (साधारणपणे नववीचे वर्ष सुरू झाल्यापासून नववीचा रिझल्ट लागेपर्यंत ) त्याने केलेल्या नाना खटपटी लटपटी यांची आहे....
..........जोशा चाळीत राहतो.....त्याला कॉलेजात जाणारी बहीण आहे, शिक्षण खात्यात नोकरी करणारे बाबा आहेत...आई आहे, तिला तो वर्णनात आईसाहेब म्हणतो...आणि त्याचा एक नरूमामा आहे, ( वयाने तरूण आणि मित्रासारखा) तो कॉलेजात इंग्रजी शिकवतो आणि "प्रेमात पडणार्यांनी कसे वागले पाहिजे , काय टाळले पाहिजे" याविषयी त्याला सल्ले देतो...
.......................शाळेतल्या मास्तरांची मास्तरणींची तर अप्रतिम शब्दचित्रे आहेत...."प्रिंसिपल च्या खोलीचे वर्णन आमच्या शाळेतल्यासारखेच कसे काय ?" असे वाटावे इतके तंतोतंत जुळले....
....सहज एक विचार आला की ( प्रकाश ना. संतांचा ) लंपन (वनवास, शारदासंगीत, झुंबर,पंखा) मोठा झाला की या मुकुंद जोशासारखाच होईल....सज्जन, सुसंस्कारी फ़क्त त्याला मोठं करून प्रेमात पाडायचे...
22 Aug 2008 - 2:33 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
....सहज एक विचार आला की ( प्रकाश ना. संतांचा ) लंपन (वनवास, शारदासंगीत, झुंबर,पंखा) मोठा झाला की या मुकुंद जोशासारखाच होईल....
आता तो मोठा होईल? :-(
25 Jan 2008 - 11:53 pm | सुनील
पुस्ताकाचे प्रकाशक, पृष्ठांची संख्या, किंमत तसेच उपलब्धता यावरही काही सांगा.
परीक्षण उत्कंठावर्धक आहे.
आम्ही लाईन देणे ऐवजी लाईन मारणे असा शब्द्प्रयोग वापरीत असू!
(भरपूर लायनी मारलेला) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
26 Jan 2008 - 12:04 am | एक
"..आम्ही लाईन देणे ऐवजी लाईन मारणे असा शब्द्प्रयोग वापरीत असू!..."
दोन्ही क्रियापदं बरोबर आहेत. पण त्यांचे कर्ते वेगळे आहेत ;-)
मुले लाईन मारतात (नेहमीच)
मुली लाईन देतात (फार फार दुर्मिळ प्रकार :-()
22 Aug 2008 - 2:56 pm | भडकमकर मास्तर
पुस्तक उपलब्ध होण्यासाठी हा दुवा मदत करेल काय पाहावे... http://kharedi.maayboli.com/shop/product.php?printable=Y&productid=16280...
....पुस्तक ३०० पानी आहे, किंमत २०० रू. ; मला वाटते मॆजेस्टिक प्रकाशन असावे...
____________________________________________
___________________________________________
त्या दिवशी मला कळलं की शाळेची मजा कशात आहे ते. वर्ग आहेत,बाकं आहेत, पोरंपोरी आहेत,सर आहेत,गणित आहे, भूगोल आहे,नागरिकशास्त्रसुध्दा; पण आपण त्यात कशातच नाही. आपण त्या गाईंच्या पाठीवर बसणार्या पांढर्या पक्ष्यांसारखे मुक्त आहोत.त्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते.खास एकट्याचीच . त्या शाळेला वर्ग नाहीत,भिंती नाहीत,फ़ळा नाही,शिक्षक नाहीत; पण त्यातलं शिकणं फार सुंदर आहे..............
___________________________________________
26 Jan 2008 - 12:17 am | भडकमकर मास्तर
मुले लाईन मारतात (नेहमीच)
मुली लाईन देतात (फार फार दुर्मिळ प्रकार :-()
26 Jan 2008 - 12:28 am | भडकमकर मास्तर
धन्यवाद प्प्राजु,छोटा डॊन आणि सुनिल आणि एक..
______________________________
आणखी एक सांगायचे राहिले, की मुलींनी मुलांशी अजिबात म्हणजे अजिबातच बोलायचे नसे त्या काळातल्या शाळेतल्या या घटना आहेत.... ज्या वाचकाला हे समजून घेणे अवघड जाईल ( सद्ध्या असले काही नसते म्हणे, माझा एक तरूण मित्र सांगतो की त्याच्या इंग्रजी शाळेत प्रत्येक मुलाला नियमाप्रमाणे एका मुलीच्या शेजारीच बसावे लागे, इच्छा असो वा नसो...) असा वाचक "जोशा आवडत्या मुलीशी एखादे वाक्य बोलता यावे म्हणून एवढ्या खटपटी करतो " त्या कशा समजून घेईल ??असे मला वाटते...
26 Jan 2008 - 12:32 am | वाटाड्या...
हेवा वाटतो तुमच्या सगळ्यांचा...आमच्या शाळेत पोरिच नव्हत्या..
2 Mar 2010 - 3:18 am | शुचि
आमच्या शाळेत मुलंच नव्हती.
दातार क्लासला मला एक लाल चुटूक स्वेटर घलणारा गोरापान , वर्गातील सर्वात हुशार मुलगा आवडायचा. वर्गात प्रश्न विचार्ला की याचा हात वर असायचा नेहेमी.
नंतर आता आम्ही एकमेकांचे बर्यापैकी म्हणजे ओके ओके मित्र आहोत. पण तो त्याच्या संसारात , मी माझ्या.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
12 Mar 2010 - 3:41 pm | इंटरनेटस्नेही
:( अशीच एक ओके ओके मैत्रीण आहे... जुन्या आठवनी जाग्या झाल्या....
26 Jan 2008 - 12:37 am | भडकमकर मास्तर
मौज प्रकाशनचे आहे हे पुस्तक....
26 Jan 2008 - 12:48 am | भडकमकर मास्तर
मिलिंद बोकिलांचे वैचारिक लेख असलेले एक पुस्तक अलिकडेच प्रसिध्द झाले. त्याचे नाव "समुद्रापारचे समाज". ...उदकाचिया आर्ती आणि झेन गार्डन पण त्यांचे खूप चांगले कथासंग्रह आहेत
22 Aug 2008 - 2:46 pm | स्वाती दिनेश
नुकतेच 'शाळा' वाचून संपवले. (मास्तरांचे परीक्षण वाचून ह्या भारतवारीतून ते घेऊनच आले होते.) शाळेच्या दिवसांची आठवण करून देणारे पुस्तक आहे. एका कुमारवयीन मुलाचे भावविश्व वाचताना काळाची पाने पलटून कधी मागे जातात ते समजतच नाही..
आणखी एक सांगायचे राहिले, की मुलींनी मुलांशी अजिबात म्हणजे अजिबातच बोलायचे नसे त्या काळातल्या शाळेतल्या या घटना आहेत....
अगदी ..
पुस्तक ३०० पानी आहे, किंमत २०० रू. ; मला वाटते मॆजेस्टिक प्रकाशन असावे...
मौज प्रकाशन
स्वाती
22 Aug 2008 - 4:58 pm | सुचेल तसं
मास्तर,
चांगल्या विषयाला हात घातलात तुम्ही. माझं अतिशय आवडतं पुस्तक आहे "शाळा". शेवट तर एकदम चटका लावणारा आहे. ("आणि उरतं दहावी नावाचं भयाण वर्ष" असं काहीतरी शेवटचं वाक्य आहे.) नववी-दहावीतल्या मुलाच्या भावविश्वाचे फार सुंदर वर्णन आहे. त्या वयातलं त्याला आणि त्याच्या मित्रांना वाटणारं मुलींबद्दलचं आकर्षण, प्रत्येकाला आवडणारी एक मुलगी . मग शाळेच्या अलिकडल्या एका बांधकाम चालू असलेल्या घरातून जेव्हा "ती" शाळेत जायची तेव्हा तिला पहायचं. शब्दप्रयोग तर केवळ अप्रतिम "इचिभना", "आंबे पाडले पाहिजेत", इत्यादि.
http://sucheltas.blogspot.com
22 Aug 2008 - 6:38 pm | संदीप चित्रे
मास्तर ... माझ्या एकदम आवडत्या पुस्तकाचा विषय काढलात ... धन्स :)
----------------
शाळा वाचल्यानंतर असं जाणवलं की नकळत मराठीमधे एक ट्रायोलॉजीसारखा प्रकार झाला आहे. तीन वेगवेगळ्या दशकांत, तीन वेगवेगळ्या लेखक...पण तीनही पुस्तके मस्त आहेत. जिज्ञासूंसाठी अधिक माहिती ---
'कोसला' -- भालचंद्र नेमाडे
'दुनियादारी' -- सुहास शिरवळकर
'शाळा' - मिलिंद बोकील
22 Aug 2008 - 6:54 pm | मुक्तसुनीत
कोसला हे स्वतंत्र पुस्तक.
कोसलाचा नायक : पांडुरंग सांगवीकर.
ट्रिलॉजी ची पुस्तके :
झूल
जरीला
बिढार
नायक : चांगदेव पाटील
26 Sep 2014 - 8:42 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
कोसला +२१९८७८२७८२७४८३४
कोसला जेव्हा जेव्हा वाचतो तेव्हा तेव्हा पांडुरंग सांगवीकर मला अस्वस्थ करुन जातो. दर वेळी त्या पुस्तकाचा एक नवाचं अर्थ लागत जातो.
22 Aug 2008 - 6:57 pm | शितल
पुस्तक परिक्षण आवडले. संदीप तु़झ्याकडे आहे ना मग ते पुस्तक आणि अजुन जी तु़झ्याकडे असतील ती मी आमच्या घरी आणण्याची व्यवस्थित व्यवस्था करीन. ;)
शाळा हा विषयच सर्वाच्या जिव्हाळ्याचा असतो.
22 Aug 2008 - 8:40 pm | मेघना भुस्कुटे
मास्तर, मस्त झालंय परीक्षण. पण जरा लहान झालंय. शिवाय बोकिलांच्या बाकीच्या कथासंग्रहांवरपण लिहा ना. बाय दी वे, तुम्ही त्यांची 'एकम' ही दीर्घकथा / लघुकादंबरी वाचलीय का हो?
कुणी वाचली असेल तर प्लीज आपलं मत सांगा. मला अजिबात नाही आवडलीय. बोकिलांच्या लौकिकाला अज्याबात साजेशी नाहीय.
23 Aug 2008 - 1:28 am | अभिज्ञ
"शाळा" कादंबरी अफलातुनच आहे.पौगंडा अवस्थेतील मुलांच्या भारलेल्या दिवंसाचे अतिशय वास्तविक चित्रण ह्या कादंबरीत जाणवले.वाचून तर चाटच पडलो.
लेखकाने दाखवलेला काळ हा आणिबाणीतला आहे ,साधारण १९७५-१९७६ च्या आसपासचा.
कादंबरितील वर्णने आमच्या वेळेसहि फिट बसतात.
परिक्षण आवडले.
अभिज्ञ.
अवांतर :
"शाळा" व "बाकि शुन्य" ची सुरुवातीची काहि पाने एकाच धाटणीची आहेत.
आधि "शाळा" वाचले अन मग "बाकि शुन्य" वाचले.
"शाळा" चा प्रभाव असेल का ते सांगता येत नाही परंतु "बाकि शुन्य" पहिल्या काहि पानातच "शुन्य" व "कृत्रिम" वाटू लागले.
"बाकि शुन्य" हे थोडेसे "भडक" रंग वापरून रंगवलेले वाटले.
23 Aug 2008 - 12:06 pm | विनायक प्रभू
झक्कास्स. रोज जगतो ही कादंबरी. फक्त जरा ऍडवान्सड आव्रुत्ती.
विनायक प्रभु
24 Aug 2008 - 12:26 pm | विसोबा खेचर
मास्तर,
छान लिहिलंय हो!
तात्या.
24 Aug 2008 - 5:22 pm | आपला अभिजित
मला पण भन्नाट आवडली `शाळा.' एकतर माझी वाचन परंपरा फारच अफाट आहे. सलग आणि संपूर्ण वाचलेली अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढी पुस्तकं आहेत माझी. `शाळा' उटी दौर्यात निलं होतं वाचायला. ट्रेनमध्येच वाचून पूर्ण केलं.
`शाळा'तले बरेच धंदे आम्हीही शाळेत केलेत. त्यामुळे अगदी भावलं पुस्तक. अगदी पोरींवर लायनी मारणं, तिच्या लाइन देण्याविषयी चर्चा, सायकल फास्ट मारून केलेलं शायनिंग, बायांना वेगवेगळी नावं ठेवणं अगदी मनापासून केलं. पण शाळेला दांड्या बिंड्या नाही मारल्या.
आठवणी खूप आहेत. एकदा वर्गात कुणीतरी खाजकुयली टाकली म्हणून अख्ख्या वर्गाला मैदानावर उभं केलं होतं. आम्ही टेक्निकलला ज्या दिवशी जायचो, नेमकी त्या दिवशी दुसर्या दिवसाच्या शाळेच्या वेळेत बदलाची नोटीस फिरवायचे. आमचे टेक्निकल शाळेबाहेर असल्याने आम्हाला तो निरोपच मिळायचा नाही. मग आम्ही निरोप कळला, तरी मुद्दाम नेहमीच्या वेळी शाळेत जायचो. या `बंडखोरी'बद्दल अनेकदा काळ्या यादीत पण जायचो. पण खुमखुमी जास्त होती.
ही कादंबरी वाचून शाळेतले सगळे धंदे आठवले. धमाल आली!
मी पण कादंबरीविषयी टॉपिक टाकणार होतो. पण मुहूर्त लागला नव्हता. भडकमकर मास्तरांचे अभिनंदन!
7 Oct 2008 - 8:59 pm | nandu bhangare
झकास आहे
8 Oct 2008 - 12:29 am | बिपिन कार्यकर्ते
आज हा धागा परत वर आला. त्या मुळे अजून हे पुस्तक वाचायचे आहे अशी टोचणी परत लागली आहे.
मास्तर छान ओळख करुन दिलीत.
बिपिन.
8 Oct 2008 - 12:47 am | मैत्र
पुस्तक वाचलंच पाहिजे आता... शाळा आणि ते सातवी ते दहावीचे मस्त दिवस.
आणि किमान बोकीलांच्या समान आडनावाला जागलं पाहिजे...
मास्तर धन्यवाद...
8 Oct 2008 - 11:11 am | विजुभाऊ
आमच्या शाळेत कशी कोण जाणे पण एक विचित्र प्रथा होती
दहावीतली मुले एकमेकाना वडीलांच्या नावाने हाक मारीत.
आणि ऐकणारालाही ते सवयीचे झालेले असायचे.
एकदा मी एका मित्राच्या घरी गेलो. त्याचे नाव सुधीर व त्याच्या वडीलांचे नाव मधुकर होते.
त्या मित्राला आम्ही मधु म्हणुनच हाक मारायचो. तो ही ओ द्यायचा
मी त्याच्या घरी गेलो आणि दारातुन हाक मारली मधु आहे का?
कोण हवे विचारत त्याचे वडील बाहेर आले.
मी पुन्हा विचारले की मधु आहे का ?
त्यानी पुन्हा विचारले कोण हवे आहे म्हणुन
मी पुन्हा तेच म्हणालो " मधु आहे का?"
त्यानी माझ्याकडे पूर्ण पाहिले. कसला तरी मजेदार चेहेरा करुन ते म्हणाले मीच मधु ...तुला बहुतेक सुधीर हवा असेल. तो दहावीत आहे.
एव्हाना तो मित्रही दारात आला होता.
मला आणि सुधीरला दोघानाही रामायणात घडले होते तसे धरती दुभंगुन आपण त्यात गडप व्हावे असे झाले होते.
8 Oct 2008 - 11:44 am | घाशीराम कोतवाल १.२
मास्तर तुम्हाला सान्गु इचितो कि या कादंबरी वर प्रथम एक एकांकिका लिहली गेलि ति होति ग्.म्.भ.न.
रुईया महविद्यालय त्यात प्रथम आले होते नंतर आले ते नाटक
माझ्याकडे त्या एकांकिके चि सिडि आहे....................
मी असा कसा असा कसा वेगळा वेगळा?
20 Dec 2010 - 11:22 pm | निनाद मुक्काम प...
http://www.youtube.com/watch?v=33oc3609Slw
अरे यु ट्यूब वर आहे ती एकांकिका
1 Mar 2010 - 2:22 pm | अनामिका
प्र का टा आ
"अनामिका"
25 Dec 2008 - 2:17 am | बिपिन कार्यकर्ते
बर्याच दिवसांपासून 'टू बी रेड' यादीत असलेली 'शाळा' कादंबरी ह्या भारतभेटीत लक्षात ठेवून विकत घेतलं. (खरं तर विसरलोच होतो, मुसुभाऊने आठवण नीट करून दिली होती.) पुस्तक घेऊन पण १-२ आठवडे गेले. परवा एक कंटाळवाणा प्रवास नशिबी आला होता. म्हणून प्रवासात वाचायला म्हणून घेतलं पुस्तक बरोबर. तेव्हा पासून आत्तापर्यंत दोनदा वाचून झालंय!!!
वरती मास्तरांनी पात्र परिचय दिलाच आहे. 'मुकुंद जोशी' ह्या नववीमधल्या मुलाची ही कथा. ही कथा साधारण सप्टेंबर ते एप्रिल (साल साधारण १९७६ असावं... आणिबाणीचे संदर्भ आणि मॅट्रिक संपून एसेस्सी नुकतीच सुरू झालेली असते) ह्या एवढ्याच कालावधीत घडते. ह्या छोट्या कालावधीत 'जोशा' एका खूप मोठ्या मानसिक (आणि शारिरीक) स्थित्यंतरातून जातो... त्या स्थित्यंतराची ही कहाणी. त्याचे 'बाबा', 'आईसाहेब' (आई) आणि 'अंबाबाई' (मोठी बहिण) असं हे कुटुंब. मित्रा सारखा वागणारा नरूमामा. शाळेतले ३ जवळचे मित्र आणि इतर मित्र. वर्गातल्या मुली आणी 'केवडा', 'शिरोडकर' वगैरे नामवंत मुली. चाळीतली इतर मंडळी, पोंक्षेकाका, वरच्या मजल्यावर राहणारे ३ जण आणि त्यांचे आणिबाणीविरोधातले काम ही अजून काही पात्रं. एवढ्या भांडवलावर लेखकाने अक्षरशः एक वेगळीच सृष्टी निर्माण केली आहे. अशी सृष्टी की शाळेत गेलेला / ली प्रत्येक जण तिथे काही काळ का होईना राहून आलेला / ली आहे आणि ही कादंबरी वाचल्यावर परत एकदा तिथे राहून येतो / ते.
जोशा आणि शिरोडकर ह्या दोघांच्या मधे काय चाललंय हा जरी मुख्य धागा असला तरी नववीतल्या मुलाच्या नजरेतून जग कसे दिसते आहे हे पण तितक्याच प्रभावी पणे लिहिले आहे. त्या अनुषंगाने ह्या मुलांच्या तोंडची भाषा पण हुबेहूब जमली आहे. (माझ्या ज्ञानात भर म्हणजे काही शब्द अमर आहेत... कधीच बदलणार नाहीत... 'लाईन', 'बाटली' वगैरे!!!) माझ्या पुरतं बोलायचं तर ह्यातल्या काही घटना हुबेहूब माझ्या बाबतीत पण घडल्या आहेत!!! साला ह्या मिलिंद बोकिलला कश्या कळल्या? हा माझ्याच शाळेत तर नव्हता?
प्रत्येकाने जरूर वाचावे असे हे पुस्तक. लोकप्रियतेचे एकच उदाहरण द्यायचे तर --- पहिली आवृत्ति १४ जून २००४ ........... सहावी आवृत्ति २० फेब्रुवारी २००८.... अजून काय लिहू?
शाळा
मिलिंद बोकिल
मौज प्रकाशन गृह
किंमत रू. २००/-
पृष्ठ संख्या ३०३
बिपिन कार्यकर्ते
25 Dec 2008 - 8:53 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मास्तर आणि बिपीनने पुस्तकाचा आत्मा पकडला आहे.
मी पण अलिकडेच पुस्तक वाचलं. हातात घेतलं आणि सोडवतच नव्हतं. रस्त्यात चालतानाही जरा कमी गर्दीचा रस्ता होता तिथे पुस्तक वाचत चालत होते.
26 Dec 2008 - 5:30 am | संदीप चित्रे
मस्त रे... खूप चांगलं केलंस की ते पुस्तक विकत घेतलयस.
अदिती म्हणाली तसं हे पुस्तक वाचायला घेतलं की खाली ठेववतच नाही.
तू भालचंद्र नेमाडेंचं 'कोसला' आणि सुहास शिरवळकरांचं 'दुनियादारी' वाचली आहेत का?
नसतील तर जरूर वाच.
2 Mar 2010 - 3:08 am | संदीप चित्रे
शाळा कादंबरीवर आधारित 'ग म भ न' ही रूईया महाविद्यालयाने सादर केलेली एकांकिक आपली मराठी या वेबसाईटवर पाहिली. कादंबरीचं सादरीकरण खूप छान केलं आहे. ’शाळा’च्या पंख्यांनी जरूर पहावी.
25 Dec 2008 - 11:07 am | बोका
वरील बहुतेक जणांना हे पुस्तक वाचून आपले शाळेतील दिवस आठवले. मलाही !
आणि आपण अनुभवलेले शालेय जीवन व कादंबरीतील वर्णन यातील साम्यामुळे ही कादंबरी अधिकच आवडते.
मिपा वरील बहुतेक वाचकवर्ग १९७५- १९९० या काळात शाळेत गेलेला असावा. त्यामुळे बहुतेकांना 'शाळा' आवडली.
मला पडलेला प्रश्न असा की, १९९०-२००० या काळात ९वी/१०वी त असलेल्यांना ही कथा / वातावरण जवळचे वाटेल का ?
'वर्गातल्या मुलामुलींनी आपापसात न बोलणे' या सारख्या गोष्टी त्यांना पचतील का ?
25 Dec 2008 - 11:32 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मला पडलेला प्रश्न असा की, १९९०-२००० या काळात ९वी/१०वी त असलेल्यांना ही कथा / वातावरण जवळचे वाटेल का ?
'वर्गातल्या मुलामुलींनी आपापसात न बोलणे' या सारख्या गोष्टी त्यांना पचतील का ?
बोकोबा, मी ९६साली दहावी झाले. ठाण्यातली मराठी माध्यमाची प्रसिद्ध शाळा आणि हेच असंच सगळं. अर्थात मी काही बिल्डींगमधे बसून मुलींवर कमेंटस मारायचे नाही! ;-) पण आमच्याही वर्गात मुलं-मुली एकमेकांशी बोलायचे नाहीत.
माझ्या बिल्डींगमधलाच एक मुलगा माझ्या वर्गात होता. लहानपणी अगदी झिंजा उपटणे, चिखल उडवणे, चिमटे काढणे इथपासून भांडणं केली, पुढेसुद्धा एकत्र बसून अभ्यास करायचो, पण वर्गात ... मी एकदा कधीतरी व्हरांड्यात त्याच्याशी बोलले तर घरी आल्या-आल्या त्याने मला दम मारला. माझा सख्खा भाऊ दोन वर्ष पुढे होता, मी ही एकदा त्याच्याशी बोलले तर घरी आल्यावर काय संकट कोसळलं होतं असा आव आणला होता.
26 Sep 2014 - 8:50 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
मी २००२ ला १०वी झालो. मराठी मीडीयम. १० वी च्या गॅदरींगपर्यंत मुला-मुलींनी एकमेकांशी बोलायची प्रथा नव्हती. गॅदरींगनंतर जरा मोकळेपणा आला तोपर्यंत शाळा संपुन पण गेली. तेव्हा आमचे गुर्जी गुर्जीणी शिक्षा म्हणुन दोन मुलींच्या मधे बसवायचे. वाळीत टाकल्यापे़क्षा भयानक शिक्षा वाटायची ही.
कॉलेजमधे गेल्यावर पण पहीली दोन वर्ष असा अवघडलेपणा असायचा. कॉन्व्हेंट मधले पोरं पोरी खुशाल डेट बिट करत फिरायचे. हेवा वाटायचा त्यांचा.
26 Dec 2008 - 8:34 am | आजानुकर्ण
बोकापंत,
आमच्या शाळेतही मुलामुलींनी एकमेकांशी बोललेले (आवडत असले तरी) खपवून घेतले जात नसे. त्यामुळे आम्ही कॉलेजात पण मुलींशी बोलायला (मास्तरांना आवडणार नाही असे वाटून) घाबरायचो.
आपला
(आज्ञाधारक) आजानुकर्ण
मात्र शाळेतल्याच काही मंडळींनी एकमेकांशी लग्ने केल्याच्या बातम्या आता कळत आहेत त्यामुळे बरेच छुपे रुस्तम यशस्वी झाल्याचा (व मास्तरांवर सूड उगवल्याचा) आनंद होत आहे. (व आम्ही तसे काहीच न करता पुस्तकात माना खुपसून बसलो याचे दुःख होत आहे)
मात्र त्यामुळेच ह्या कादंबरीतील वातावरणाला समजून घेता आले असे वाटते.
आपला
(गप्पिष्ट) आजानुकर्ण
25 Dec 2008 - 8:55 pm | आबा
"शाळेत गेलेल्या सर्वांसाठी" अशी या पुस्तकाचि अर्पणपत्रिका आहे
गणपतीच्या देवळातला प्रसंग फारच छान आहे.
बाकी मास्तर, परीक्षण सुरेख झालंय हो!
26 Dec 2008 - 12:34 pm | स्मिता श्रीपाद
तुम्ही लिहिलेला पुस्तक परिचय आणि मिपा सदस्यांच्या प्रतिक्रीया वाचुन आता कधी एकदा पुस्तक वाचेन असे झाले आहे...
खुप आभारी आहे....
अवांतर : लंपू ची आठवण करुन दिल्याबद्दल पण खुप खुप आभार...लंपू चे सगळे कारनामे मी ५३० वेळा तरी ( लंपूच्या भाषेत) वाचले आहेत..आज गेल्या गेल्या परत पुस्तक नक्की उघडणार :-)
....सहज एक विचार आला की ( प्रकाश ना. संतांचा ) लंपन (वनवास, शारदासंगीत, झुंबर,पंखा) मोठा झाला की या मुकुंद जोशासारखाच होईल....
आता तो मोठा होईल? :-(
हेच म्हणते :-(
-(लंपूची मैत्रिण)स्मिता
31 Jan 2009 - 2:54 pm | बबलु
मागच्याच आठवड्यात "शाळा" ३ वेळा वाचून संपवलं..... सूम मध्ये. या वेळच्या भारतभेटीत विकत घेतलं.
ज. ब. रा. कादंबरी.
आयला... हा मिलिंद बोकिल लैच भरी की राव. सालं... शेवटचं पान वाचून झालं की पुन्हा पहिल्या पासून सुरुवात आपली.
खास बोले तो खासच.
डाउट खायला जागाच नाही. कौतुक करावं तेव्हढं थोडंच आहे.
"A MUST READ".
....बबलु
31 Jan 2009 - 10:36 pm | मिहिर
मला पुस्तकाचा पुर्वार्ध (सुर्या वगैरे) आवडला नाही. मध्य ठीक. शेवट आवडला
1 Feb 2009 - 4:46 am | हुप्प्या
इतकी वर्षे होऊन गेली तरी चांगले काही मराठी वाचू असा विचार केला की नेहमीचेच पुल, चि.वि. जोशी, अत्रे, क्वचित गो नी दाण्डेकर अशीच नावे सुचायची. कुणी नवा लेखक का सापडत नाही आपल्याला अशी खंत वाटायची.
एकदा कुणीतरी हे पुस्तक सुचवले. मला इतके आवडले की काही विचारू नका. एक अगदी ब्रँड न्यू स्टाईल, वेगळा विषय, वेगळा काळ जो मी अगदी जवळून पाहिला होता. मलाही ह्यात वर्णन केलेल्या अनेक घटना अगदी माझ्या शाळेतल्याच आहेत असे वाटून गेले.
एक द्विधा मनःस्थिती झाली म्हणजे हे पुस्तक वाचायला लागल्यावर थांबूच नये असेही वाटायचे आणि पुस्तक संपू नये असेही वाटायचे. शेवट खूपच रुखरुख लावून गेला.
(माझ्याकरता) एका नव्या मराठी साहित्यिकाशी ओळख झाल्याचा आनंद झाला. बोकिलांची अजून काही पुस्तके कुणी वाचली आहेत का? कशी आहेत? पुढच्या भारतभेटीत आणखी काही वाचेन म्हणतो.
1 Feb 2009 - 10:36 am | बबलु
माझंही अगदी असच झालं.
हे पुस्तक वाचायला लागल्यावर थांबूच नये असंही वाटायचं आणि पुस्तक कधीच संपू नये असंही वाटायचं.
स्वतः मिलिंद बोकिलांशी या पुस्तकावर चर्चा करायला मिळाली तर किती बहार येइल असा विचार आला मनात.
("शाळे"चा जबरदस्त फॅन)
....बबलु
1 Mar 2010 - 11:05 am | अस्मी
अगदी कालच 'शाळा' वाचून पूर्ण केल आणि आज हे परीक्षण वाचनात आलं...
खरच मला खूप आवडल शाळा...
ह्म्म्म...मला पण आधी असंच वाटलं होत की मुल-मुली बोलत नाहीत म्हणजे... :?
पण तो काळ लक्षात घेता ते ठीक आहे....
- मधुमती
1 Mar 2010 - 11:33 pm | बेसनलाडू
मी १९९९ मध्ये १०वी पास झालो. त्यावेळीही मुले-मुली बोलत नसत. आमची शाळा फक्त मुलांची शाळा होती आणि मुलींची शाळाही आमच्या बाजूलाच होती. त्या शाळेतील मुली इयत्ता १ली ते ४थी पर्यंत आमच्याच वर्गात, आमच्याबरोबरच एकत्र शिकल्या होत्या. मात्र ५वी ते १०वी मध्ये शाळा वेगळ्या होत. त्यामुळे वर्गातील एखादा मुलगा त्यांच्या शाळेतील मुलींशी बोलताना आढळल्यास (शाळेबाहेर ट्यूशनच्या वगैरे निमित्ताने) तसेच एखदी मुलगी मुलाशी बोलताना आढळल्यास पुढे त्या दोघांवर काय परिस्थिती बेतायची याबाबत न बोललेलेच बरे ;)
आता हे चित्र बदलले आहे आणि दोन्ही शाळांमध्ये वर्गांमध्ये मुलामुलींचे 'नांदा सौख्यभरे' चित्र दिसते आहे. १९९३ ते १९९९ पर्यंतचे माझे शालेय जीवन लक्षात घेता याबद्दल काहीसे हळहळायला होते ;)
'शाळा' मी एका अमेरिका ते भारत प्रवासात जाताना-येताना अशी दोन वेळा वाचली. आता पारायणे झाली आहेत. पहिल्या पानापासून वाचायला घेतले की शेवट होईतोवर खाली ठेववत नाही. यावर आधारीत 'गमभन' ही एकांकिकाही पाहिली. ती फारशी आवडली नाही. मात्र सुर्याचे पात्र खास झाले आहे. पुस्तकातील चित्र्याचे पात्र जास्त आवडले. लेखकाच्या भगिनींचा 'अंबाबाई' असा उल्लेख फारच लक्षात राहण्याजोगा. घासू गोखल्या, बिबीकर, चिमण्या, शिरोडकर, सुकडी सगळीच मंडळी आपलीशी वाटणारी, लक्षात राहणारी. अंबाबाई नि शिरोडकरचे नाव शेवटपर्यंत कळत नाही, ही आणखी एक गूढ, मनोरंजक बाब. असो. 'शाळा' बद्दल जितके बोलावे-लिहावे तितके कमीच!
(शाळकरी)बेसनलाडू
2 Mar 2010 - 12:36 am | टारझन
हो का? मी अमेरिकेला जाताना दोन पेग मारुन झोपणे प्रिफर करतो यू नो :)
अहो खरं काय? माझ्या मित्राला पण असल्यास घाणेरड्या सवयी आहेत..पण बेला तुम्ही तसे वाटत नाही...म्हणूनच विचारले काय?
बाकी प्रतिसाद छाणच!
-(माळकरी) झेला
2 Mar 2010 - 5:58 am | पाषाणभेद
टार्या, मागे तू काही पेग वैगेरे घेत नाही असा उल्लेख केलेला आठवतोय. अन आपले पुणेरी पत्रकार यांच्या समावेत तुम्ही सगळे "बसलेले" असतांना तुझ्या पुढ्यात थंड असल्याचा फोटोही बघीतल्याचे आठवते.
खरे काय समजावे? आत्ताचे बोलणे की तो फोटो अन तो उल्लेख?
की आत्ता सुरू केलीय?
बाकी भडकमकर मास्तर खरे बोललात: "सगळ्या शाळा सारख्याच...जो तो पोरगा आपापल्या कर्त्रुत्त्वाने पुढे जातो, हेच खरे..."
आत्ताचे आमचे कर्तृत्व पाहून आमचे मास्तर अन आमची शाळा (त्यांच्या) तोंडात बोटेच घालतील.
डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
1 Mar 2010 - 3:41 pm | राजेश घासकडवी
बाकी सगळं आधीच इतरांनी लिहिलेलं आहे, त्यामुळे मला जे नवीन वाटतं तेवढंच लिहितो.
ही जरी त्या मुलाची गोष्ट असली, आणि पौगंडावस्थेत पदार्पण करण्याच्या वयाचा कॅनव्हास घेतला असला तरी ही जास्त व्यापक कथा आहे असं वाटलं. बालपणात, तारुण्यात जीवनाविषयी खूप अपेक्षा असतात. सगळीकडे काहीना काही रस घेण्यासारखं घडत असतं, इतकं की कुठे लक्ष देऊ आणि कुठे नको असं झालेलं असतं.
एक वेळ अशी येते की आपण जगरहाटीला जुंपले जातो. या गमतीजमती मागे पडतात आणि पुढे उरतं ते भकास कष्टप्रद सत्य जीवन. याची ही कथा आहे.
लेखकाने हे साधण्यासाठी तंत्र उत्कृष्ट रीतीने वापरलेलं आहे. घनिष्ठ मैत्र्या, स्वच्छंद जीवन, पहिलंवहिलं प्रेम, राजकीय घडामोडींशी जवळून संबंध, बिल्डिंगमधल्या लोकांची संगत या सगळ्या आकर्षक, तारुण्याशी संलग्न गोष्टी समांतरपणे खुलवलेल्या आहेत. शेवटच्या काही पानांत या सगळ्या एकामागोमाग एक मोडून पडतात. ते इतकं चांगल्या प्रकारे साधलंय की तो हे तंत्र वापरतो आहे हे जाणवत पण नाही. सगळी जादू उत्तम रीतीने गुंफलेल्या मोहक बारकाव्यांमध्ये आहे.
राजेश
1 Mar 2010 - 4:20 pm | शैलेन्द्र
अगदी अगदी,
शेवटच्या पानावरची काही वाक्य अगदी मनावर कोरली गेलीत,
"आता हळु-हळु माझ्या सगळ लक्षात यायला लागलं-----" आणि मग शिरोड्करच निघुन जाण, सुर्याचे मागे पडण, नरुमामाचं लग्न इत्यादी इत्यादी...
शेवट चटका देतो.
30 Jul 2014 - 12:27 pm | आशु जोग
अगदी बरोबर राजेश. तुम्ही नेमक्या शब्दात सांगितलेत.