गेल्या वेळेस टाकलेल्या ''माझ्या फुलांच्या रांगोळ्यां''ना स-मस्त मिपाकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. त्या नंतर हा भाग टाकेपर्यंत मधे बराच वेळ गेला.या वेळी टाकलेले फोटो हे गेल्या३ महिन्यात-म्हणजेच आमच्या भटजीगिरीच्या फुल्ल सिझन मधे काढलेल्या रांगोळ्यांचे आहेत,त्यामुळे थोडं रिपिटेशनं(ही) आलेलं आहे...असो,अता टॉस नंतरच्या समालोचनात फार वेळ न घालवता,डायरेक म्याच सुरु करतो...तेंव्हा लेट्स एंनजॉय दी गेम... :-)
सर्व फोटो मोबॉ-इल वरुन काढलेले आहेत,कृपया चांगले दिसवुन घ्यावेत ;-) (नवा क्यामेरा लवकरच येत आहे.)
प्रतिक्रिया
24 Nov 2012 - 3:17 am | मीनल
खूप सुंदर.
पण मला वाटते की सत्यनारायणाच्या चौरंगा समोर कमी फुले असावीत म्हणजे नमस्कार करून फुले वहायला जास्त लांब वाकायला लागणार नाही. आजूबाजूला मात्र छान रंगोळी असावी.
24 Nov 2012 - 9:55 am | अत्रुप्त आत्मा
@म्हणजे नमस्कार करून फुले वहायला जास्त लांब वाकायला लागणार नाही>>> आंम्ही आम्च्या यजमानांना, वहाण्यासाठे फक्त फुलांच्या पाकळ्या आणी तुळस ठेवायला लावतो.त्या लांब्वुन बरोब्बर वाहिल्या जातात.
24 Nov 2012 - 9:26 am | ज्ञानराम
खूप छान.... सकाळी सकाळी.. फोटो पाहून आत्मा त्रूप्त झाला
26 Nov 2012 - 12:44 pm | प्राकृत
एकदम अप्रतिम रांगोळया....