कॉकटेल लाउंज : गोवन समर

सोत्रि's picture
सोत्रि in पाककृती
23 Nov 2012 - 12:32 am

‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “गोवन समर

पार्श्वभूमी:

मागच्या आठवड्यात 3-4 दिवसांचा गोव्याचा दौरा करून आलो. ह्यावेळी येताना काजू फेणीच्या दोन बाटल्या आणल्या. पहिल्यांदाच काजू फेणी ट्राय केली म्हणजे चव घेतली. ह्या आधि काजू फेणीबद्दलचे माझे मत बरेचसे पूर्वग्रहदूषीत होते (त्याचे कारण दुसर्‍या लेखात). आता ते सर्व ह्या काजू फेणीच्या उत्कृष्ट चवीमुळे बदलून गेले आहे. काजूच्या गराची एक मस्त चव जिभेवर रेंगाळत ठेवणारी अफलातून (सेक्सी) चव आहे काजू फेणीला. मागे एकदा गविंशी काजू फेणीच्या कॉकटेलबद्दल ओझरती चर्चा झाली होती. मात्र त्यावेळी काजू फेणी चाखली नसल्याने त्या चर्चेला म्हणावा तसा रंग भरला नव्हता.

आता फेणी चाखली असल्यामुळे, तिच्या चवीप्रमाणे काय कॉकटेल करता येइल ह्याचा अंदाज आला. ही रेसिपी माझे इंप्रोवायझेशन आहे. कंप्लीट, नावासकट, माझी रेसिपी.

प्रकार
काजू फेणी बेस्ड कॉकटेल

साहित्य

काजू फेणी (Cazcar Brand)
2 औस (60 मिली)

कॉइंत्रो
0.5 औस (15 मिली)

लिंबाचा रस
10 मिली

लिम्का

बर्फ

मीठ

लिंबाचा काप (सजावटीसाठी)

ग्लास
कॉलिन्स किंवा हाय बॉल

कृती:

सर्वप्रथम लिंबाचा काप ग्लासाच्या कडेवर फिरवून घेवून ग्लासची कडा मिठ असलेल्या प्लेट मध्ये बुडवून घ्या आणि हलकेच झटका. खालच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे ग्लासच्या रिमवर मीठ लागलेले असले पाहिजे.

आता काजू फेणी, कॉइंत्रो आणि लिंबाचा रस कॉकटेल शेकर मध्ये बर्फ घालून व्यवस्थित शेक करून घ्या. त्यानंतर ग्लामध्ये क्रश्ड आइस घालून त्यात ते मिश्रण ओतून घ्या.

आता ग्लासमध्ये लिम्का टाकून ग्लास टॉप अप करा.

लिंबाचा काप ग्लासला सजावटीसाठी लावून कॉकटेल सजवून घ्या.

अफलातून चवीचे गोवन समर कॉकटेल तयार आहे :)

प्रतिक्रिया

सुहास..'s picture

23 Nov 2012 - 12:39 am | सुहास..

लई भारी !

बाकी ग्लास ची रिम मिठाने रिम करताना , एक लिंबु रिम वर गोल घासुन सरळ मिठ असलेल्या प्लेट मध्ये टाकावा आणि मग झटकावा ( आयरिश कॉफी :) करताना करतो तसे ! ( उल्लेख नाही :( )

एक प्रश्न ...ग्लास मध्ये फुल्ल क्रश्ड आईस, मग वर फेणी आणि मग हळुच कॉन्त्रू सोडले तर कॉकटेल ला कलर कॉम्बिनेशन येईल का ? नंतर मग लेमनेड ई. मिक्स मारता येईल :)

सोत्रि's picture

23 Nov 2012 - 2:11 am | सोत्रि

एक प्रश्न ...ग्लास मध्ये फुल्ल क्रश्ड आईस, मग वर फेणी आणि मग हळुच कॉन्त्रू सोडले तर कॉकटेल ला कलर कॉम्बिनेशन येईल का

कलर कॉम्बिनेशन येणार नाही कारण कॉन्त्रूचा रंग दुसर्‍या द्रवपदार्थाला देण्याइतका गडद नसतो. सध्या काजू फेणीच्या कॉकटेल्सवर प्रयोग चालू आहेत ;) कलर कॉम्बिनेशनची कॉकटेल्स येतीलच :)

रिमबद्दलचा बदल केला आहे. :D

- (साकिया) सोकाजी

चिंतामणी's picture

23 Nov 2012 - 12:43 am | चिंतामणी

जास्त काही लिहीत नाही.

अभीप्राय आपल्या भेटीतच देइन.

यातले काही समजत नसले तरी फोटू बघायला बरे वाटतात. ;)

नाना च्या वरुन कॉकटेलावर आलेत ..भरुन आलय अगदी ..

शेवटचा फोटु
एकदम अफलातुन (......) ;)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

23 Nov 2012 - 2:50 am | निनाद मुक्काम प...

भारत भेटीत एक मैफल जमवायला हवी ह्या साकीया सोबत
काजू फेणी बनवायच्या पद्धतीत थोडे तांत्रिक बदल केले तर ती टकीला पेक्षा जास्त लोकप्रिय होईल असे जागतिक कीर्तीचे बार टेंडर आम्हाला कॉलेजात एका सेमिनार मध्ये म्हणाले होते. त्याची आठवण झाली.
प्रयोग चालू ठेवा
आम्ही
भारतातून फेणी घेऊन जाऊ आणि गोर्‍या लोकांमध्ये रिसबूडगिरी करू.

काजू फेणी बनवायच्या पद्धतीत थोडे तांत्रिक बदल केले तर ती टकीला पेक्षा जास्त लोकप्रिय होईल असे जागतिक कीर्तीचे बार टेंडर आम्हाला कॉलेजात एका सेमिनार मध्ये म्हणाले होते

एक नंबरची सहमती.

निनाद पुढच्या भारत भेटीत तुझ्याशी ह्यावर चर्चा करायची आहे. मला खरंच फेणीला टकिलासारखी प्रतिष्ठा मिळालेली बघायची खूप इच्छा आहे.

- (फेणीप्रेमी) सोकाजी

हेच म्हणतो. इतकं उत्कृष्ट पेय, पण ऐला गोव्याच्या हद्दीबाहेर मिळतही नाही, प्रसिद्ध होणं पुढची बात.. :(

फेणीला बेक्कार वास येतो.

कॉइन्त्रोचा स्वतःचा अ‍ॅरोमा आणि टेस्टच अफलातून आहे.

`कॉइन्त्रो ऑन क्रश्ड आईस' (अनलिमिटेड, संपूर्ण मूड आकाशी होईस्तोवर), न संपणार्‍या रात्रीचा निवांत माहौल, सोबतीला सखी (आपल्याच चषकातून मधेमधे एखादा घोट घेणारी) आणि मग सावकाश होत जाणारी पहाट हे स्वर्गीय काँबिनेशन आहे

सोत्रि's picture

23 Nov 2012 - 11:07 am | सोत्रि

फेणीला बेक्कार वास येतो.

तीव्र आक्षेप! तीव्र आक्षेप!! तीव्र आक्षेप!!!
माझाही हाच पूर्वग्रह होता एकेकाळी. पण तसे अजिबात नाहीयेय. मी तर आता फेणीच्या प्रेमात पडलो आहे.

कॉइन्त्रोबाबत मात्र पूर्ण सहमती. :)

- (फेणीप्रेमी) सोकाजी

अत्यंत सहमत. फेणीचा काजूच्या फळासारखा (कॅश्यू अ‍ॅपल) गोड वास लहानपणी काजविणीच्या आडव्या फांदीवरच बसून खाल्लेल्या काजूफळाची आठवण करुन देतो.

कदाचित बनवण्याच्या पद्धतीनुसार रॉ बनवलेली फेणी पिण्यात आली तर तीव्र वास असू शकेल. कल्पना नाही.

बाकी कॉकटेलविषयी:

सोत्रि.. दोन थेंब मुंबईच्या दिशेने शिंपडलेस ना रे??

सोत्रि's picture

23 Nov 2012 - 11:47 am | सोत्रि

सोत्रि.. दोन थेंब मुंबईच्या दिशेने शिंपडलेस ना रे??

:) :) :)
हो..हो..
अ‍ॅक्चुली हे कॉकटेल तुलाच अर्पण केले आहे ;)

- (कॉकटेलप्रेमी) सोकाजी

फेणीचा गोव्याला गेल्यावर पुनर्विचार करण्यात येईल

मी_आहे_ना's picture

23 Nov 2012 - 2:23 pm | मी_आहे_ना

अगदी अगदी...मीही मागच्या आठवड्यात प्रथमच गोव्याला जाण्यापूर्वी 'फेणीला वास येतो' असं ऐकून होतो, प्रत्यक्ष घेतल्यावर आवडली.
सोत्रि, झकास कॉ.कृ.
:)

मागच्या वेळी एका मित्रानं आणलेली फेणी नुसती बाटली उघडली तरी नकोनको करून सोडायची

सोत्रि's picture

23 Nov 2012 - 3:37 pm | सोत्रि

फेणीत देशी आणि विदेशी असे प्रकार आहेत का?

फेणीची गाथा येइपर्यंत जरा कळ काढा :)

-(साकिया) सोकाजी

फेणीला बेक्कार वास येतो ह्याच्याशी पुर्ण सहमत. लहानपणी गोवन शेजार्याच्या क्रुपेमुळे ह्या वासाने खुप डोके उठवले होते. म्हणुन आतापर्यन्त फेणीपासुन दुरच राहिलो. पण आता ही नवीन पद्धतिची फेणी चाखावि म्हणतो.

आँ !!! मग ...मग माझ्या सगोत्रीकरणाला काय शिल्लक राह्यले आहे की नाही ?

अमृत's picture

23 Nov 2012 - 12:42 pm | अमृत

मस्तच आहे कॉकृ.

(अवांतर) बाकी तो बॅकग्राऊंडचा भिंतीचा रंग आवडला अगदी TV ad मधे दाखवतात तसाच आहे :-)

अमृत

आता या अश्या धाग्यांवर आम्हा सोज्वळ मंडळींनी काय प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा आहे सोत्री?
(सो जळ-जळ झालेला)- गण्या

प्यारे१'s picture

23 Nov 2012 - 3:02 pm | प्यारे१

>>>आम्हा सोज्वळ मंडळींनी

व्याख्या बदलल्या का शब्दांच्या???????
- प्यारे जळजळीत!

कपिलमुनी's picture

23 Nov 2012 - 2:16 pm | कपिलमुनी

कॉकटेल आवडले !!

पण सोत्री, एवढी थंडी आहे ...मस्त गरम, घसा उबदार करणारं कॉकटेल टाका की ..पुणे ८-९ सेल्शियस झाला आहे ...

अत्रुप्त आत्मा's picture

23 Nov 2012 - 2:49 pm | अत्रुप्त आत्मा

कॉक-टेल http://www.sherv.net/cm/emoticons/drink/smiley-face-making-cocktail.gif महाराज सोकाजीबाबा की जय..........! ;-)

आनंदी गोपाळ's picture

23 Nov 2012 - 9:33 pm | आनंदी गोपाळ

तकीलासारखी दिसते आहे.
या ब्र्यांडची प्याली नाहीये कधी. पण होस्टेलला असताना फेणी फक्त आधीच टुण्ण झाल्यानंतर किंवा कुणा बुभुक्षिताला कटवण्यासाठी वापरत असू. लई ब्येक्कार वास मारीत असे ब्वा. ग्रह नाही, अणुभव आहे.
बाकी सोकाजीराव म्हंत्यात तर चांग्ली लागत आसल.
महूची पण तशीच अस्ते. चांगली मिळाली तर मधुर मदिरा. नैतर नवसागराचं वंगाळ वंगण..

पैसा's picture

23 Nov 2012 - 10:07 pm | पैसा

बाकी काय माहित नाही. शक्य झालं तर सोत्रि अण्णाला फेणीच्या गाथेसाठी फटुंची मदत करण्यात येईल. पण प्रॉमिस करणार नाही. :(

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

24 Nov 2012 - 12:35 am | निनाद मुक्काम प...

आपल्याकडे मद्य निर्मिती ला सरकार पाठिंबा देत नाही म्हणून फेणी आंतरराष्ट्रीय स्तरावर जात नाही ,
पण ती भारतात सर्वत्र उपलब्ध करायला काय हरकत आहे .
आमच्याकडे इंडियन दुकानात पंजाबी देशी दारू ची बाटली स्कॉच पेक्षा महाग मिळते.
काळाचा महिमा
तशी फेणी मिळावी ह्या प्रतीक्षेत
निनाद ,मुक्काम पोस्ट जर्मनी
फेणीवर एखादा फक्कड पैकी लेख येउदे

दादा पेंगट's picture

24 Nov 2012 - 8:34 am | दादा पेंगट

संस्कृतीभक्षक लेकाचे !! ;)

फेणी एकदाच घेतलीये. फेणीचा घाणेरडा वास तर कधी आला नाही, पण चवीला छान मंदधुंद वगिरे लागली होती.

तुषार काळभोर's picture

24 Nov 2012 - 8:42 pm | तुषार काळभोर

बायगो बायगो
इलायति नाय गो
फेणीची हाय गो...वायली मजा!

माम्लेदारचा पन्खा's picture

25 Nov 2012 - 11:07 pm | माम्लेदारचा पन्खा

कान्त्रीयू ची किंमत आंतरजालावर पहिली.....
डोळे पांढरे झाले....
लय महाग रेशिपी हाय..........

संजय क्षीरसागर's picture

25 Nov 2012 - 11:57 pm | संजय क्षीरसागर

कान्त्रीयू ची किंमत आंतरजालावर पहिली.....
डोळे पांढरे झाले....

शौक असा केला की त्याचं व्यसन होत नाही!

मंदार कात्रे's picture

25 Nov 2012 - 11:34 pm | मंदार कात्रे

लय भारी कॉकटेल सोकाजिराव ! गोव्याला जायचा प्लॅन आहे ओमानस्थित मित्राबरोबर भारतभेटीत ,गोव्याला कुठे असे कॉम्बिनेशन आइते तयार मिळू शकेल का? जरासं सविस्तर सांगा बुवा!

मंदार कात्रे's picture

25 Nov 2012 - 11:37 pm | मंदार कात्रे

किंवा आपली भेट भारतात कुठे होवू शकेल ते कसे कळेल? व्यनि कराल का?

धन्यवाद!