कॉकटेल लाउंज : बॉईलरमेकर (BoilerMaker)

सोत्रि's picture
सोत्रि in पाककृती
31 Aug 2012 - 6:38 am

'कॉकटेल लाउंज' मालिकेतील आजचे कॉकटेल आहे "बॉईलरमेकर (BoilerMaker)"

पार्श्वभूमी:

अगदी सुरुवातीला जेव्हा 'फक्त चढवण्यासाठी' पिण्याचे दिवस होते तेव्हा पेग सिस्टीम असलेल्या हॉटेलमध्ये गेल्यावर, पेगनुसार पिण्यामुळे 'पिण्यावर' मर्यादा यायची (खरेतर हे 'खिशाला न परवणारे असल्यामुळे' असे असयला हवे :D ). त्यावर उपाय म्हणून मी एक पद्धत माझ्यापरीने शोधून काढली होती. व्हिस्कीचा एक पेग मागवायचा आणि एक बियर मागवायची. पाणी किंवा सोडा ह्याऐवजी बियर व्हिस्कीमध्ये मिक्स करून प्यायची. ह्या एक पेग आणि एक बियर ह्या फॉर्म्युल्यामुळे काम एकदम 'स्वस्तात मस्त' होउन जायचे. त्यावर बियरचा आणखी एक टिन हाणला की मग तर काय एकदम इंद्रपुरीतच... रंभा उर्वशी डाव्या उजव्या बाजुला... ;)

आता साग्रसंगीत कॉकटेल्स बनवायला लागल्यावर ह्या भन्नाट कॉंबीनेशनचे काही कॉकटेल आहे का त्याचा शोध घेतला, त्याचा परिपाक म्हणजे आजचे कॉकटेल बॉईलरमेकर!

प्रकार
बियर कॉकटेल

साहित्य

कॅनेडियन राय व्हिस्की(पर्याय म्हणुन दुसरी कोणतीही व्हिस्की चालेल)
1 औस (30 मिली)

बियर
1 टिन

ग्लास
बियर ग्लास आणि शॉट ग्लास

कृती:

ह्या कॉकटेलचीची कृती अतिशय सोप्पी आहे. बियर ग्लास बिरयरने अर्धा भरून घ्या आणि शॉट ग्लास मध्ये व्हिस्की ओतून घ्या.

आता तो शॉट ग्लास अलगदपणे बियर ग्लासमध्ये सोडा. हा ग्लास खाली जाताना हलकासा 'डुब्बुक' असा आवाज करतो तो इतका खास असतो की शब्दात वर्णन करणे निव्वळ अशक्य...

आता उरलेली बियर ओतुन ग्लास टॉप-अप करा.

चलातर मग, पोटंट आणि थंडगार बॉइलरमेकर तयार आहे :)

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

31 Aug 2012 - 7:00 am | अत्रुप्त आत्मा

डुब्बुक... :-D

--^--^--^--^--^--^--^--^--^--^--^--^--^--^--^--^--^--^--^--^--

मी_आहे_ना's picture

31 Aug 2012 - 9:28 am | मी_आहे_ना

फ्रायडे मूडमध्ये 'डुब्बूक'ल्या गेलो आहे.... :)

बॅटमॅन's picture

4 Sep 2012 - 8:10 pm | बॅटमॅन

+१. असेच म्हणतो.

(टीटोटलर असूनही नादमयतेने नादावलेला) बॅटमॅन.

रम + बियर
ला काय म्हणतात हो?

सोत्रि's picture

2 Sep 2012 - 1:33 pm | सोत्रि

रम + बियर ह्या कॉकटेलला 'Gentleman' असे नाव आहे.

- ( साकिया ) सोकाजी

चिगो's picture

31 Aug 2012 - 12:56 pm | चिगो

एकदम सहज जमेबल आहे हे काॅकटेल.. आवडेश..

अच्छा तर याला बॉईलमेकर असं सोफेस्टिकेटेड नावही आहे तर....
बरेच जणांकडुन ऐकलं होतं की एका शॉटमध्ये, विमानाला रॉकेट्चं इंजीन लावलं की जे होईल तो इफेक्ट येतो म्हणुन हा प्रकार करुन पाहिला होता. पण छ्या राव दोन गल्लास संपवून बी काय फरक पडला नाय. अर्थात तुमच्यावानी गल्लासात गल्लास नटाकता सगळं एकत्र केल व्हतं. आता असबी करुन पाह्यतो.

धमाल मुलगा's picture

31 Aug 2012 - 3:03 pm | धमाल मुलगा

तुमाला सवयी लागल्यात स्कॊच अन् साजुक बियरच्या.
येक डाव रॊयल च्यालेंज /स्ट्यागचा स्मॊल आणि क्यानन धा हजारची बियर वापरुन ह्योच प्रयोग करुन मंग बोला. ;-)

सोकाजीआण्णा,
जुन्या दिवसांची याद दिलवलीस भैय्या!

चांगभलं,
धळिराम (सचिव, आ र्य मदिरा मंडळ)

गोंधळी's picture

1 Sep 2012 - 9:52 pm | गोंधळी

आयला गणपाभाउ_संपादक ही पी-रे-पी ह्या कंपुतले आहेत तर.

मोहनराव's picture

31 Aug 2012 - 1:26 pm | मोहनराव

एकदम सोप्प आहे.. करायला हरकत नाही...

उत्तम आहे. शॉट लागत असणार.. सोपंही आहेच. धन्यवाद.

प्रश्नोपनिषद सुरु:

-ग्लासात ग्लास टाकल्याने नजाकत किंवा प्रेझेंटेबिलिटी वाढते आहे का?
-एकात एक ग्लास टाकल्याने बाहेरचा मोठा (पक्षी बियरचा) ग्लास संपत आला की उलटा करुन पिताना अथवा बॉटम्स अप करताना आतला ग्लास घरंगळून ओठांवर तडमडत नाही का?
-शिवाय पहिलं संपलं की दुसर्‍यांदा हेच ड्रिंक घ्यायचं असल्यास आतला ओला ग्लास बोटांनी / चिमट्याने काढून घ्यायचा परत भरुन आत सोडायचा किंवा प्रत्येक रिपीटिशनला एक नवा मोठा ग्लास आणि एक नवा शॉट ग्लास घ्यायचा हे दोन्ही उपक्रम पिण्यात व्यत्यय आणतात का?
-की रिपीट करण्याची गरज भासत नाही?

त्यापेक्षा छोटा ग्लास भरुन व्हिस्की आधीच मोठ्या ग्लासात वतून वर बियरचा टॉप अप का करु नये?

प्रश्नोपनिषद समाप्त.

धमाल मुलगा's picture

31 Aug 2012 - 3:13 pm | धमाल मुलगा

अरे, काय तबियतीनं पिणं आहे की नाही?
आपण फक्त जाम रिचवण्याचा विचार करायचा, बाकीचे कश्ट घेण्यासाठी एखादी हसिंन साकी ठेवावी! ;-)

क्येम सोकाजी?

बियर ग्लास आणि शॉट ग्लास च्या ऐवजी फुलपात्र आणि दह्याची वाटी घेऊन करता येईल का ? ;-)
('अंड न घालता करता यील का?' महान मिपापरंपरेला स्मरून)

ओ मराठे, मग फुलपात्रात ताक आणि वाटीत काय खारी लस्सी घेण्याचा विचार हाय काय ? ;)

सोत्रि's picture

31 Aug 2012 - 10:59 pm | सोत्रि

पास!

- (साकिया) सोकाजी

सोत्रि's picture

31 Aug 2012 - 10:58 pm | सोत्रि

गवि,

ह्या सर्व प्रश्नोपनिषदाचे एकच उत्तर, एकदा घरी या आणि काय तो सोक्षमोक्ष लावा. हे आमंत्रणच समजा :)

असो,

ग्लासात ग्लास टाकल्याने नजाकत किंवा प्रेझेंटेबिलिटी वाढते आहे का?

नक्कीच, फ्लेयर बारटेंडींग हा एक प्रकार तो असतो आणि त्याच्या अंतर्गत हे मोडते.

एकात एक ग्लास टाकल्याने बाहेरचा मोठा (पक्षी बियरचा) ग्लास संपत आला की उलटा करुन पिताना अथवा बॉटम्स अप करताना आतला ग्लास घरंगळून ओठांवर तडमडत नाही का

नाही. ही एक कला आहे. जी फ्लेयर बारटेंडींगचाच एक भाग आहे.

-शिवाय पहिलं संपलं की दुसर्‍यांदा हेच ड्रिंक घ्यायचं असल्यास आतला ओला ग्लास बोटांनी / चिमट्याने काढून घ्यायचा परत भरुन आत सोडायचा किंवा प्रत्येक रिपीटिशनला एक नवा मोठा ग्लास आणि एक नवा शॉट ग्लास घ्यायचा हे दोन्ही उपक्रम पिण्यात व्यत्यय आणतात का?
-की रिपीट करण्याची गरज भासत नाही?

उत्तर एकच, ते बार टेंडरवर सोपवून खुषाल इंद्रपुरीत जायची तयारी करावी. :)

त्यापेक्षा छोटा ग्लास भरुन व्हिस्की आधीच मोठ्या ग्लासात वतून वर बियरचा टॉप अप का करु नये?

हीच तर खरी गंमत आहे. जेवणात मीठंच लागते चवीसाठी, मग ते पाककृतीत न टाकता, ते जेवण वाढल्यावर वरूनही घालता येईल की, पण आपण तसे करत नाही ;)

- ( साकिया ) सोकाजी

ह्याला(धाग्याला) खरचं पाक -क्रुती हा विभाग योग्य आहे का?

आनंदी गोपाळ's picture

31 Aug 2012 - 10:19 pm | आनंदी गोपाळ

तो क्या आप इसे ना-पाक क्रुती बोलेंगे?
तोबा तोबा!!

सोत्रि's picture

31 Aug 2012 - 10:42 pm | सोत्रि

अगदी माझ्या मनातला प्रश्न विचारलात!

मलाही ह्या विषयावरील प्रत्येक नविन धागा टाकताना नेमका हाच प्रश्न पडतो!

संमं ह्याचे त्वरेने निराकरण करावे अन्यथा रोषास तयार रहावे असा मी प्रस्ताव मांडतो!
(तो फाट्यावर मारला गेल्यअस अज्याबात हरकत नाही, ते मिपाधर्माला अनुसरूनच असेल ;) ).
- (मिपाधर्म पाळणारा ) सोकाजी

धमाल मुलगा's picture

1 Sep 2012 - 7:26 pm | धमाल मुलगा

'जे न चाखे रवि' असा विभाग सुरु करावा काय?

मयगृह
साकित्य
तर्रा
पिव्य
पेयकृती
दारू हे पुर्णद्रव्य
दारूदालन
पिटकंती
ढोसाना
नवे पेयन

आंबोळ्या या सर्वांपेक्षा हे नाव अगदी योग्य वाटेल
"कंदील"

तर्री's picture

31 Aug 2012 - 5:12 pm | तर्री

शिंपल हटके !

पैसा's picture

31 Aug 2012 - 10:57 pm | पैसा

यावेळेला अन्याच्या होस्टेल पुलावासारखी कमीत कमी वस्तूंमधे तयार केलेली पाकृ दिसतेय.

होय गं!

लैच तक्रारी होत्या की सगळ्यांन घरी जमेल अशी पाककॄती दे म्हणून...

- ( साकिया ) सोकाजी

श्रावण मोडक's picture

31 Aug 2012 - 11:02 pm | श्रावण मोडक

हे असंच अधिक काहीतरी हवय राव! ;-)

सोत्रि's picture

1 Sep 2012 - 12:03 pm | सोत्रि

श्रामो,

भावना पोहोचल्या :)

- (गदगदीत) सोकाजी

कुंदन's picture

31 Aug 2012 - 11:18 pm | कुंदन

मस्त रे सोकाजीराव.

शिल्पा ब's picture

31 Aug 2012 - 11:21 pm | शिल्पा ब

कोणतेही दोन वेगवेगळे अल्कोहोलिक ड्रिंक्स एकत्र केले की " टुण्ण" होता येत असावं का? लोकांना खुप वेळा " एकच काय ते प्या", "ड्रींक्स मिक्स करु नका" असं बोलताना ऐकलंय म्हणुन विचारलं.

बाकी पाकृ छान.

एस's picture

31 Aug 2012 - 11:48 pm | एस

tschüß

इंद्रवदन१'s picture

1 Sep 2012 - 2:39 am | इंद्रवदन१

साके बॉम्ब पण असंच असतं ना ? किरीन बीअर मध्ये गरम साके

सोत्रि's picture

1 Sep 2012 - 12:01 pm | सोत्रि

काय राव एकदम नॉस्टॅल्जिक केलेत तुम्ही. जपानमधले 'मद'भरे नशीले दिवस आठवून राहिले.

हा घ्या साके बॉम्ब...

- ('साके'या) सोकाजी

मुक्त विहारि's picture

1 Sep 2012 - 8:01 am | मुक्त विहारि

झक्कास..

ताडी निरा दारु ह्या गोष्टिंचा मिपा वर अतिरेक झाला आहे.
पुण्यात आताच ८०० मुलांच्या बाबतीत घडलेली घटनेवरुन बोध घ्यावा लागेल आपल्याला.
आता तरी मिपावरुन ह्या गोष्टी बंद होउ द्यात.

सर्वसाक्षी's picture

2 Sep 2012 - 12:00 pm | सर्वसाक्षी

निश साहेब

एखाद्या संध्याकाळी चार मित्र जमा करुन अंमळ दोन घोट घेतल्याने कुणी व्यसनी होत नाहीत वा अशी कृती वाचुन कुणाला मद्यपानाचा मोह होत नाही. आणि ज्याला मद्यपान करायचे आहे तो मिपावर आदेश येण्याची वाट पाहत नसतो. त्या ८०० मधले किती मिपाकर आहेत याचाही एकदा शोध घ्या.

मी स्वत: प्रसंगोपत्त बिअर घेतो अन्य काही नाही पण तरीही मी सोत्रिंच्या कॉकटेल लाउंजमध्ये आवर्जुन येतो आणि एखादा मनुष्य या विषयावर इतक्या व्यासंगाने लिहितो याचे कौतुक करतो. ज्यांना निरनिराळी पेये प्यायची आवड आहे ते सक्रिय दाद देत असतील आणि आनंद उपभोगत असतील. मी निरनिराळे रंग, पेले आणि पेये पाहण्यात आनंदी होतो.

निशभाऊ, संकेतस्थळावरील लेख, चर्चा, कविता, पाकृ, भटकंत्या, कलाकृति वगैरे सगळे स्वयंसेव्य भोजनासारखे असते (मराठीत त्याला बुफे म्हणतात). नाना रुचिचे नाना पदार्थ इथे सजवलेले आणि मांडलेले असतात. जे आपल्याला आवडेल ते त्याचा आस्वाद घ्यायचा, जे आवडत नाही ते सोडुन द्यायचे. उगाच जे आपल्याला आवडत नाही त्याला नावे का बरे ठेवावीत? ते पदार्थ दुसर्‍या कुणाला आवडत असतात आणि म्हणुनच ते ठेवलेले असतात.

इथे लोक येतात ते चार घटका विरंगुळा म्हणुन. इथले लेख वाचुन कुणी दारुडे होतील किंवा परमार्थाला लागतील असा विचार पटत नाही. समाजात मद्यपानाचे प्रमाण वाढते आहे, अल्पवयात मद्यपान सुरु करणे बरे नव्हे - कदाचित यामुळे कुणी उमेदीचे आयुष्य दारुतही वाया घालवु शकतो पण याला जबाबदार आहे ती बदलती सामाजिक परिस्थिती. याचबरोबर मद्यपान न केल्याने काही कमीपणा येत नाही हेही खरे आणि कुणाच्या आग्रहाला बळी पडुन पिऊ नका हे मुलांना सांगणे आवश्यक आहे हे खरे. तुमचा विचार चुकीचा नाही मात्र यासाठी जागरुकतेचे प्रयत्न करावेत. आपण इथे मद्यपानाचे वाढते प्रस्थ यावर चर्चेचा प्रस्ताव अवश्य मांडा पण अशा लेखात असे मतप्रदर्शन करुन रंगाचा भंग करु नका.

या लेखात काय असेल ते शिर्षकातच स्पष्ट आहे तेव्हा जे लोक लाउंज वाचायला येतात ते आवडीने येतात आणि आनंदी होतात. ज्यांना या विषयात रस नाही वा याचे कौतुक नाही ते येणारच नाहीत.

स्पष्टोक्तिबद्दल क्षमस्व!

सोत्रि's picture

2 Sep 2012 - 1:24 pm | सोत्रि

धन्यवाद सर्वसाक्षीजी!

खरंतर निश यांचा प्रतिसाद वाचल्यावर काय उत्तर द्यावे हेच कळत नव्हते. आणि अनुल्लेखाने टाळताही येत नव्हते.
पण तुमचा प्रतिसाद अगदी समर्पक आणि संयत आहे.

पुन्हा एकदा धन्यवाद!

- ( रस घेऊन मद्यपान करणारा ) सोकाजी

सर्वसाक्षी साहेब, मी रंगाचा भंग केला नाही आहे. मी सोत्री साहेबांचि आधिच माफी मागितली आहे माझ्या प्रतिसादात.
लक्षात घ्या मी नविन धागा काढुही शकलो असतो तुम्ही म्हणता तसा पण काय होत त्या धाग्यावर काही काही वेळा इतके थिल्लर प्रतिसाद येतात की हसाव की रडाव तेच कळत नाही. त्या धाग्याचा मुळ विषयच हरवुन जातो.
राहता राहीला तुमचा मुद्दा खर तर आंतरजालावर सगळे वाईट गोष्टी मुबलक प्रमाणात बघायला व वाचायला मिळतात माझा मुद्दा इतकाच होता की आपण स्वताहुन त्यात अजुन भर घालायचि कि मी भर घातल्यामूळे काय फरक पडणार आहे मी माफक प्नमाणात करतो माझ काय वाईट झाल असा विचार करुन पण सर सगळे च तसा नाही विचार करत दारु बाबतित ते लोक फार लवकर व्यसनी होतात. घाटात गाडी चालवताना रस्त्याच्या बाजुला फलक लावलेला असतो पुढे घाट आहे गाडि वेगात चालवु नका कारण पुढे अपघात होउ शकतो वेगामुळे होतो अस नाहीच पण फलक असतो सावध करण्यासाठि तसच समजा माझा वरिल प्रतिसाद. सोत्रि साहेबांकडे अतिशय उत्तम लेखन कला आहे. मी त्यांच्या लेखनाचा चाहता आहे. मला जे वाटल ते मी लिहिल त्यात त्याना दुखावण्याचा हेतु अजिबात नव्हता.

चिगो's picture

2 Sep 2012 - 5:21 pm | चिगो

"मी काय म्हणतो, थोडा घ्याच चहा..” सौ. सखाराम गटणे :-)

पप्पु अंकल's picture

1 Sep 2012 - 5:44 pm | पप्पु अंकल

झटपट गवि होण्याचा ऊत्तम मार्ग

(उडण्याच्या तयारीत असलेला)पप्पु

भा.प्र.वे.प्रमाणे शुक्रवारी संध्याकाळी पावणेसहाला खास जनहितार्थ हा धागा वर काढत आहे.

...धन्यवाद..

सौंदाळा's picture

19 Jul 2013 - 5:41 pm | सौंदाळा

काढा काढा,
गटारी पण जवळच आली आहे आता. ;)

माझीही शॅम्पेन's picture

20 Jul 2013 - 11:21 pm | माझीही शॅम्पेन

अरेरे आज हा धागा लवकर पहिला असता तर कॉक-टेल काय घ्याव हा प्रश्न निकालात निघाला असता ..
(पार्टी मिस झालेली माझीही अपसेट शेंपेन)