विक्षिप्त ह्यांच्या गजलेचा 'कहर' बघून आसपासच्या आफिसातील काही नमुने डोळ्यांसमोर चमकले! ;)
टंच आहे टंकणारी बांधणीला
ढेर-टकल्या सायबाच्या दावणीला
आडलो नाही तसा मी बोलताना
आडला येऊन हुद्दा ऐरणीला
काय सांगू कहर हा झाला कशाने
का पुढे बसवून गेली ढापणीला?
ओठ मादक, केवढा अन् रंग त्यावर
बोलवी साहेब कसल्या चाचणीला?
ते भले मोठे नको रोखूस डोळे
संभ्रमी बघ कंप सुटतो पैरणीला
खोड 'रंग्याची' जुनी नाठाळ आहे
मार खाण्याची अखेरी वळचणीला
चतुरंग
प्रतिक्रिया
15 Aug 2008 - 1:13 am | धमाल सर्किट (not verified)
पैरणीला कंप, ढापणीला, हुद्दा, सगळेच मस्त ! वजन खूपच सुंदर सांभाळलेले आहे.
- (ढेर-टकल्या) सर्किट
16 Aug 2008 - 12:28 am | चतुरंग
(खुद के साथ बातां: हल्ली 'वजन' सांभाळताना केवढी 'कसरत' करावी लागते!;) )
चतुरंग
15 Aug 2008 - 1:13 am | प्राजु
बरंच लक्ष असतं हो तुमचं आजूबाजूला.. थांबा सांगते विभाला फोन करून.
मस्त विडंबन.. आवडले.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
16 Aug 2008 - 12:29 am | चतुरंग
(स्वगत - खातंय मार आता वळचणीला! ;)
चतुरंग
15 Aug 2008 - 1:54 am | बेसनलाडू
ज ब र द स्त!
फारच आवडले विडंबन!
ओठ मादक, केवढा अन् रंग त्यावर
बोलवी साहेब कसल्या चाचणीला?
हाहाहाहाहाहाहा!!!!!!!!!!!!!
टंच आहे टंकणारी बांधणीला सुद्धा लय् भारी!
(हसरा)बेसनलाडू
दुसर्या द्विपदीत 'आडलो' आणि 'आडला' ठळकपणे खटकते. 'अडकलो' आणि 'अडकला' चालेलसे वाटते;वजनातही बसते :)
(सुधारक)बेसनलाडू
16 Aug 2008 - 12:31 am | चतुरंग
चतुरंग
15 Aug 2008 - 2:05 am | केशवसुमार
रंगाशेठ,
केवळ उच्च विडंबन.. ९.५/१० गुण..
का पुढे बसवून गेली ढापणीला? हा ओळीत आजून रंगत आणता आली असती.. त्यासाठी १/२ मार्क कापला..
(आनंदी)केशवसुमार
16 Aug 2008 - 12:35 am | चतुरंग
(खुद के साथ बातां - रंग्या, सहामाही जवळ आली आहे नीट लक्ष देऊन वृत्त, मात्रा, वजन-बिजन बघून ठेव, कशाचं विडंबन करायला सांगतील सांगता येत नाही! उगीच अजागळासारख्या चुका करशील नाही तर! :B )
चतुरंग
15 Aug 2008 - 10:18 am | आनंदयात्री
टंच आहे टंकणारी बांधणीला
ढेर-टकल्या सायबाच्या दावणीला
टंचलेखिका .. सॉरी सॉरी ..चुकले टंकलेखिकेचे कडवे लैच भारी .. जपुन !! साहेब जर मराठी असेल अन चुकुन माकुन मिपावर येत असेल तर बोंबलले अप्राईजल तुमचे ;)
15 Aug 2008 - 10:26 am | सर्वसाक्षी
भन्नाट विडंबन! मजा आली
16 Aug 2008 - 12:37 am | चतुरंग
आणि आवडूनही न आवडल्यासारखे दाखविणार्या सर्व 'रसिकां'चे आभार! ;)
चतुरंग