भ्रमाचा भोपळा

डॉ अशोक कुलकर्णी's picture
डॉ अशोक कुलकर्णी in जनातलं, मनातलं
5 Aug 2012 - 6:58 pm

*
भ्रमाचा भोपळा

अध्यापन करणा-या कोणाच्याही आयुष्यात पहिलं लेक्चर हा अविस्मरणीय असाच प्रसंग असतो. विद्यार्थी असतांना आम्ही काही नवख्या अध्यापकांना सळो की पळो करून सोडलं होतं. पण आता बाजी उलटली होती. मी "रिसिव्हिंग एन्ड्ला" होतो. ही वेळ माझ्या माझ्यावर कधी ना कधी तरी येणारच होती. फक्त ती अचानक आली इतकंच!
*
विभाग प्रमुखांनी एक दिवस अचानक बोलावलं आणि ते म्हणाले: "आपले ते हे आज नाहीत. रजेवर आहेत. तू त्यांचं लेक्चर घ्यायचं" झालं! संपलं! इतकं बोलून ते आमच्या एका वरीष्ठ सहका-याशी चर्चेत गुंग झाले. तेंव्हा साडेबारा वाजले होते आणि मला दोन वाजता आयुष्यातलं पहिलं लेक्चर घ्यायचं होतं! मी बाहेर येवून चौकशी केली. मला लेक्चर घ्यायचं होतं ते बायोस्टॅटीस्टीक्स (वैद्यकीय संख्याशास्त्र) या विषयातल्या "प्रॊपॅबिलीटी ऍन्ड नॉर्मल डीस्ट्रीब्युशन" या संकल्पनेवर. आधीच बायोस्टॅटीस्टीक्स हा वैद्यकिय विद्यार्थ्यांना अवघड वाटणारा विषय आणि त्यात प्रॊपॅबिलीटी ऍन्ड नॉर्मल डीस्ट्रीब्युशन" ही समजावून सांगायला आणखीनच अवघड अशी संकल्पना. मला समजेना की ही जवाबदारी नेमकी माझ्यावरच कां आली? मग आठवलं की मागे विभाग प्रमुखांनी "तुला कोणतं लेक्चर घ्यायला आवडेल?" असं विचारलं होतं तेंव्हा मीच जरा जास्तच आगावू आत्मविश्वासानं बायोस्टॅटीस्टीक्स असं सांगितलं होतं. हा टॉपिक बहूदा वरीष्ठ अध्यापकाला दिला जातो. त्यामुळे आपल्यावर ती वेळ येणारच नाही असा मुत्सद्दी विचार कदाचित त्यामागे असावा! पण मुत्सद्देगिरी आता अंगलट आली होती!
*
मी भराभरा पुस्तकं चाळली. नोट्स काढल्या. लेक्चरचा आराखडा मनातल्या मनात तयार केला. शिकवतांना वातावरण हंसरं ठेवावं असं शिक्षणशास्त्र सांगतं. म्हणून अधून मधून जोक्स सांगावे असं ठरवलं. वैद्यकिय संख्याशास्त्रावरचे एक दोन हातखंडा जोक्स आठवून तयार ठेवले. वर्गात प्रवेश कसा करायचा, नोट्स कुठे ठेवायच्या यावर विचार केला. नोट्स न लपवता सर्वांना दिसतील अशा ठेवायच्या असं ठरवलं. कारण आमच्याच एका अध्यापकाला ऐन वेळी नोट्स सांपडेनात. त्यामुळे कोटाचे, शर्टाचे, पॅण्टीचे खिसे तपासूनही नोट्स सांपडेनात तेंव्हा त्यांचा झालेला केविलवाणा चेहेरा आणि त्या हजेरीपटा खाली आहेत असं मी मागच्या बाकावरून ओरडून सांगितल्यावर आणि त्या तिथं खरंच सांपडल्यावर त्यांच्या चेहे-यावर दिसलेला सुटकेचा आनंद पाहून सगळा वर्ग खो-खो हंसलेला मी विसरलो नव्हतो ! वेषभूषेचा विचार आता करणं शक्य नव्हतं कारण माझं घर बरंच लांब होतं आणि तेव्हढा वेळही नव्हता. पण हातरूमाल आहे ना, तो स्वच्छ आहे ना याची खात्री करून घेतली. आपण विद्यार्थ्यांना "गुड आफ्टरनून" म्हणायचं की ती संधी त्यांनाच द्यायची याचा निर्णय झाला नाही. तो ऐनवेळी घेवू असं ठरवलं . सुरूवातीस उगीचच खाकरायचे नाही हा निर्णय माझाच. कारण मी विद्यार्थी असतांना असाच एक लेक्चरर खोकलला तेंव्हा सगळा वर्ग खोकू लागला होता ! चपराशाला सांगून वर्गात पिण्याच्या पाण्याचा जग आणि एक पेला याची सोय करून ठेवली. हो, उगाच घसा कोरडा पडून आवाजावर परिणाम व्ह्यायला नको! दुपारी एक ही आमची जेवायची वेळ. पण ह्या सर्व तयारीच्या गडबडीत ते राहूनच गेलं
*
आमच्या विभागाच्या वरच व्याख्यान कक्ष आहे. विद्यार्थ्यांनी बाकं बडवायला सुरूवात केली की निघायचं असा सर्वधारण शिरस्ता. पण ही संधी त्यांना द्यायची नाही म्हणून पाच मिनिटं आधीच पोहोचलो. सगळे विद्यार्थी आत गेले आहेत याची खात्री झाल्यावर मी आत गेलो. दरवाजा बंद केला. हो, उगाच कुणी पळून जायला नको! (पळ्ताय कुठे? ते दोर मी कधीच कापून टाकलेत!) नंतर मी वळालो खरा पंण पायात पाय अडकून माझ्या हातातलं डस्टर, खडू इत्यादी साहित्य खाली पडलं. आता हंशा, टाळ्यांचा पाऊस पडेल या अपेक्षेनं मी वर न पहाता सगळं सामान गोळा केलं. काहीही आवाज झाला नाही. उलट शांतता (वादळा पूर्वीची? ) पसरली.
*
मी डायस वर गेलो. फळा चपराश्यानं आधीच साफ करून ठेवला होता. तरीही मी तो पुन्हा साफ केला. या गडबडीत ते गुड आफ्टरनूनचं राहूनच गेलं. हजेरी शेवटी घेवूत असं ठरवून मी विद्यार्थ्यांकडे वळलो. सगळा वर्ग माझ्याकडेच पहातोय असं दिसलं. सगळ्या नवशिक्यांना हा प्रकार गांगरवून टाकण्यास पुरेसा असतो. पण मी तो पर्यंत ब-याच नाटकात कामं केली होती. त्यामुळे उलट मजा वाटली. मनोमन कुलदेवतेचं स्मरण केलं आणि सुरूवात केली. आधी स्वता:चं नाव सांगितलं. व्याख्यानाचा विषय संगितला आणि धडाक्यात सुरूवात केली.
*
"Probability that I will die some day is hundred percent. Probability that I will swim Indian Ocean unaided is zero percent and probability that you would pass MBBS some day or the other is ....?" असं म्हणून मी एक पॉज घेतला. अपेक्षेनुसार सर्व जण एका सूरात ओरडले : "हंन्ड्रेड पर्सेंट !!!" हळूहळू मी प्रॊपॅबिलीटीची संकल्पना समजावून सांगायला सुरूवत केली. पत्त्याच्या डावात बावन्न पानात बदामचा एक्का येण्याची शक्यता, फासा फेकला असता सहाचं दान पडण्याची शक्यता आणि नाणेफेंक केली असता "छाप" पडण्याची शक्यता.... विद्यार्थी लक्ष्य देवून नुसतं ऐकतच नव्हते तर लिहून घेत होते!! एक दोघांनी तर बोटं उंचावून "सर, जरा हळू" अशी सूचनाही केली. एका टप्प्यावर मी थांबलो. काही शंका आहेत कां ते विचारलं. दोघा तिघांनी शंका विचारल्या. मला त्या प्रामाणिक शंका वाटल्या. मी त्यांचं निरसन केलं आणि पुढे सरकलो. यथावकाश लेक्चर संपलं. मी हजेरी घेतली आणि हॉलचं दार उघडलं. इथं काही टार्गट कॉमेंट्स अपेक्षित असतात. पण तसं काही झालं नाही. आश्चर्य करत मी डिपार्टमेन्ट्ला परत आलो.बहूदा माझ्या अमोघ वक्तृत्वाची आणि विद्वत्तेची विद्यार्थ्यांवर छाप पडली होती यावर माझ्या मनात कुठलीच शंका राहिली नव्हती.
*
विभागप्रमुखांचं बोलावणं आलं. पहातो तो त्यांचे समोर "रजेवर" असलेले आणि ज्यांचं लेक्चर मला घ्यावं लागलं ते वरिष्ठ सहकारी! हे असं होतं तर ! मला लेक्चर घ्यावं लागावं म्हणून केलेला तो बनाव होता तर ! सरांनी चौकशी केली. "कसं काय झालं लेक्चर?" काहीच गडबड न होता लेक्चर झाल्याबद्दल मला वाटलेलं आश्चर्य मी व्यक्त केलं. त्यावर हंसून विभागप्रमुख म्हणाले: " आरडा ओरडा होणं शक्यच नव्हतं. ती एक्झाम गोईंग बॅच होती !!" (त्या टर्मला ज्यांची युनिव्हर्सिटीची परिक्षा असते तिला एक्झाम गोईंग बॅच असं म्हणतात.) परिक्षेच्या तयारीच्या टेन्शन मुळे हे विद्यार्थी लेक्चर्स मधे गडबड गोंधळ करत नाहीत, मुकाट्यानं ऐकतात हा सर्वसाधारण अनुभव. माझ्या ते लक्ष्यातच आलं नव्हतं. आपल्या अमोघ अक्तृत्वापुढे आणि विद्वत्तेपुढे विद्यार्थी अवाक होऊन शांत बसले होते हा माझा भ्रमाचा भोपळा अशा रितीनं फुटला होता !!

-अशोक

नोकरीशिक्षणलेखअनुभवआस्वाद

प्रतिक्रिया

दादा कोंडके's picture

5 Aug 2012 - 7:54 pm | दादा कोंडके

लेख विनोदी अजिबात वाटला नाही.

पण मी तो पर्यंत ब-याच नाटकात कामं केली होती. त्यामुळे उलट मजा वाटली.

अशी "मीच भारी" छाप वाक्य वाचल्यानंतर,

आपल्या अमोघ अक्तृत्वापुढे आणि विद्वत्तेपुढे विद्यार्थी अवाक होऊन शांत बसले होते हा माझा भ्रमाचा भोपळा अशा रितीनं फुटला होता !!

हे वाक्य कै च्या कै वाटलं!

रामपुरी's picture

8 Aug 2012 - 11:00 pm | रामपुरी

अनुभव म्हणून लेख चांगला वाटला.
दादा कोंडके तुमची प्रतिसादाची जागा चुकलीच जरा. तुम्हाला जर खरा "मीच भारी" छाप भाषेचा नमुना बघायचा असेल तर तुम्हाला "अध्यात्म" (इथे मला "विनोदी" लिहावसं का वाटतंय??? ) विषयक लेखांकडेच वळायला हवं. (अशा लेखांवरचे लेखकाचे प्रतिसाद जास्त नमुनेदार असतात असा अनुभव आहे. उदा. मी जसं अमुकतमुक सोडलं तसं तुम्हाला सोडता येणार नाही पण प्रयत्न करून बघा.. इत्यादी :) :) )

डॉ अशोक कुलकर्णी's picture

12 Aug 2012 - 9:17 pm | डॉ अशोक कुलकर्णी

हम्म!!

डॉ अशोक कुलकर्णी's picture

5 Aug 2012 - 11:11 pm | डॉ अशोक कुलकर्णी

दादा कोंडके साहेब...
हा विनोदी लेख नसून माझा अनुभव आपल्याला सांगितलाय. आणि अनुभवात मी येणार नाही तर काय दादा कोंडके छाप संवाद येतील की काय?

संजय क्षीरसागर's picture

5 Aug 2012 - 11:55 pm | संजय क्षीरसागर

मलाही या गोष्टीची मोठी मजा वाटते. `मी' सर्वनाम आहे त्याचा `मी पणा' किंवा अहंकाराशी काहीही संबंध नाही. ज्या वेळी एखादी व्यक्तीगत गोष्ट लिहिली जाईल तेव्हा नॅरेटर `मी' च असेल त्याशिवाय वाक्यच तयार होणार नाही.

उदा. हे ऑब्जेक्शन असलेलं वाक्य घ्या : "पण मी तो पर्यंत बर्‍याच नाटकात कामं केली होती" आता ते वाक्य कर्मणी प्रयोगात लिहिता येणार नाही आणि कुणी तसं करु शकला तरी त्याचा अहंकार गेलाय असा अर्थ होत नाही.

अहंकाराचा इतका धसका असेल तर चारचौघात साधं बोलणंही मुश्कील होईल. स्वतःचं म्हणणं सुस्पष्ट आणि निर्विवादपणे मांडणं म्हणजे अहंकार नाही.

अशोकजी , तुमच्याशी सहमत आहे, तुम्ही बिन्धास्त लिहा.

पांथस्थ's picture

6 Aug 2012 - 2:27 pm | पांथस्थ

डॉ. लेख मस्त झालाय!

अहंकाराचा इतका धसका असेल तर चारचौघात साधं बोलणंही मुश्कील होईल. स्वतःचं म्हणणं सुस्पष्ट आणि निर्विवादपणे मांडणं म्हणजे अहंकार नाही.

अशोकजी , तुमच्याशी सहमत आहे, तुम्ही बिन्धास्त लिहा.

तुमची लिखाण शैली (माझ्या मते तरी) साधी आणी हलकी फुलकी आहे. तुमचे याआधी प्रकाशीत झालेले अनुभवात्मक लेखनहि मस्तच होते.

जर स्वतःचा (आणी स्वत:बद्दलचा) अनुभव कथन करायचा झाला तर तो थोडा-फार स्वकेंद्रीत असणारच. जर जाणुन बुजुन त्यातुन स्वतःला बाहेर काढले तर अनुभव कथन वास्तवदर्शी होणार नाही.

तुमचा लेख एकदम सरळ आणी ओघवता लिहिला गेला आहे. मला त्यात अहंकार जाणवला नाही. तेव्हा लिखते रहो !!!

प्रदीप's picture

6 Aug 2012 - 7:59 pm | प्रदीप

म्हणतो. पांथस्थ ह्यांच्याशी संपूर्ण सहमत आहे. तुमचे सगळे लिखाण अनुभवसिद्ध आहे, आणि त्यात कसलाही अभिनिवेश मलातरी कधी आढळला नाही. मुय्ख म्हणजे सांगण्यासारखे तुमच्याकडे खूप काही आहे, आणि ते तुम्ही ह्या लेखातून जाणवले तसे self deprecating स्टाईलने लिहीता. असेच लिहीत रहा.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

6 Aug 2012 - 8:25 pm | विश्वनाथ मेहेंदळे

येस्स, एकदम सहमत बघा !!!! डॉन्ची शैली आवडते.
त्यांची "चौथी विहीर" भयानक आवडली होती. (अनुभव अस्वस्थ करणारा असला तरी लेखन आवडले होते)
ती मिपावर कधी येते याची वाट पाहतो आहे.
तुमचीच होती ना हो ?

डॉ अशोक कुलकर्णी's picture

7 Aug 2012 - 9:45 pm | डॉ अशोक कुलकर्णी

मेहेंदळे साहेब....
धन्यवाद !
तुम्ही म्हणता त्या लेखाचं शीर्षक "अदृष्य भिंत" असं आहे. मिपा वर तो लेख ही यथावकाश टाकीन
-अशोक

दादा कोंडके's picture

6 Aug 2012 - 12:41 am | दादा कोंडके

सुरवातीला डस्टर खाली पडूनही परिक्षेचं टेंशन असल्यामुळं विद्यार्थी हसले नसतील.

पण अवघड विषय असुनही थोड्या वेळात भराभर पुस्तकं चाळून नोट्स काढणे, आराखडा तयार करणे, मुत्सद्दीपणाने पाच मिनीटं आधी जाउन दरवाजा बंद करणे, वरून नाटकात कामं केलेली असल्यामुळे सभाधीटपणा होता, त्यामुळे गांगरून न जाता, किचकट विषयाची सुरुवात काही रोजची उदाहरणं देउन करणे, नंतर त्यांच्या प्रामाणिक शंकांचं निरसन करणे एव्हडं सगळं केल्यावर भ्रमाचा भोपळा तयार होण्याचं कारण काय?

हे सगळं तुमच्या अमोघ कर्तुत्व आणि विद्वत्तेची साक्ष देत नाहीत काय? :)

संजय क्षीरसागर's picture

6 Aug 2012 - 12:48 am | संजय क्षीरसागर

बाकीच्या प्रश्नाला अशोकश्रींकडे माईक दिलाय

शैलेन्द्र's picture

6 Aug 2012 - 12:58 am | शैलेन्द्र

दाकों,..

लेखाचा अर्क काही तुम्हांला गवसला नाही बघा..
बाकी चालु द्या.. :)

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Aug 2012 - 11:23 pm | बिपिन कार्यकर्ते

डॉक्टर! मस्त खुसखुशित लिहिलं आहे. मजा आली.

जाई.'s picture

6 Aug 2012 - 12:07 am | जाई.

छान लिहीलय
आवडलं

खेडूत's picture

6 Aug 2012 - 1:20 am | खेडूत

:)
आवडले..

जयनीत's picture

6 Aug 2012 - 3:04 am | जयनीत

पहिला अनुभव नेहमीच लक्षात राहतो.
पु.ले.शु.

जयनीत's picture

6 Aug 2012 - 3:04 am | जयनीत

पहिला अनुभव नेहमीच लक्षात राहतो.
पु.ले.शु.

नवश्रीकृष्ण सध्याअतिकार्यमग्न मा. अआ यांचे प्रतिसादाचे वाट पाहात आहे.

चित्रगुप्त's picture

6 Aug 2012 - 9:14 am | चित्रगुप्त

प्रांजळ अनुभव कथन. आवडले.

शिल्पा ब's picture

6 Aug 2012 - 9:39 am | शिल्पा ब

अनुभव आवडला.

चिंतामणी's picture

6 Aug 2012 - 9:54 am | चिंतामणी

हल्ली अनेकांना मी कशी खेचली असे दाखवायची लहर(खरे तर झटके म्हणायला हवे) येत असते.

निर्व्याज लेखनाचा निखळ आनंद घ्यायचाच नाही अशी विकृती निर्माण झालेले अनेकजण दिसतील.

पण गोष्ट तीतकीच खरी आहे की असल्या कुजकट शेरेबाजी करणा-यांपेक्षा आनंद घेणारे जास्त आहेत. भले ती प्रतिक्रीय लिहीत नसतील.

मी_आहे_ना's picture

6 Aug 2012 - 11:26 am | मी_आहे_ना

अगदी अगदी.
(निखळ वाचनाचा आनंद घेणारा, बरेचदा वाचनमात्र असणारा) मी वाचणारा आहे ना.

पांथस्थ's picture

6 Aug 2012 - 2:36 pm | पांथस्थ

पण गोष्ट तीतकीच खरी आहे की असल्या कुजकट शेरेबाजी करणा-यांपेक्षा आनंद घेणारे जास्त आहेत. भले ती प्रतिक्रीय लिहीत नसतील.

सध्याच्या (म्हणजे ह्या धाग्याच्या आणी इतर सामाजिक) परिस्थितीमधे हे वाक्य डोक्यातुन अजिबात जात नाहि.

"History will have to record that the greatest tragedy of this period of social transition was not the strident clamor of the bad people, but the appalling silence of the good people."

--Martin Luther King, Jr.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

6 Aug 2012 - 8:46 pm | विश्वनाथ मेहेंदळे

In democracy, People get the government they deserve.
आणि
In open forum, सदस्य get the संस्थळ they deserve.

काय म्हणता ?

पांथस्थ's picture

8 Aug 2012 - 12:20 pm | पांथस्थ

माझ्या मते आपल्या देशात Passive Democracy आहे. नाही म्हणायला स्वातंत्र्य आहे, पण त्याचा योग्य वापर करण्यासाठि लागणारी सामाजिक शिस्त, जागरुकता, राष्ट्रभाव... यांचा पुर्णपणे* अभाव आहे. तेव्हा सद्य परीस्थिती बघता हा बदल केला आहे!

In democracy, People get the government they DON'T deserve.

In open forum, सदस्य get the संस्थळ they deserve

हम्म्म्म!

* - काहि अपवाद वगळता

डॉक्टरी पेहराव्याच्या बाहेर येउन लिखाण केले आहे... यात विषयाला धरुन तुम्ही...तुम्ह्चे विचार मस्त...डिसचा़ज्र केले आहे.
वाह... लिहित रहा

कवटी's picture

6 Aug 2012 - 10:44 am | कवटी

तुम्ह्चे विचार मस्त...डिसचा़ज्र केले आहे
डिस्चार्ज??? नशीब "विचारांना चांगला एनिमा दिलायत" असे नाही म्हणालात.... ;)

आशोकराव छान झालय अनुभव कथन...

शैलेन्द्र's picture

6 Aug 2012 - 11:34 am | शैलेन्द्र

+१

डॉ अशोक कुलकर्णी's picture

6 Aug 2012 - 12:44 pm | डॉ अशोक कुलकर्णी

अनुभव वाचून प्रतिसाद देणा-या सर्वांचे मनःपूर्वक आभार !!

भडकमकर मास्तर's picture

6 Aug 2012 - 12:55 pm | भडकमकर मास्तर

झकास्स लिहिले आहे हो... अजून लिहा

डॉ अशोक कुलकर्णी's picture

6 Aug 2012 - 1:28 pm | डॉ अशोक कुलकर्णी

भडकमकर मास्तर..... या बाबतीत तुमचा काय अनुभव ?

भडकमकर मास्तर's picture

6 Aug 2012 - 3:34 pm | भडकमकर मास्तर

भडकमकर मास्तर..... या बाबतीत तुमचा काय अनुभव ?

या बाबतीत म्हणजे "शिकवताना येणारे अनुभव" असे गृहित धरतो....
मी स्वतः फॉर्मल शिक्षक कधी नव्हतो त्यामुळे त्या बाबतीत फारसे अनुभव नाहीत....
कॉलेजात शिकताना मात्र प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गापुढे उभे राहून ( छोटेसे दहा पंधरा मिन्टाचे ) अभ्यासाच्या एखाद्या विषयाचे ( चार पाच दिवस तयारी करून वगैरे) भाषण करावे लागत असे, तसली ( आणि तितपतच) भाषणे केली...

अर्थात असल्या फुटकळ भाषणांकडे कोणी विद्यार्थी अजिबात लक्ष देत नसत , आपण एवढे कष्ट करून काही सांगत असताना हा समोरचा हरामखोर झोपला आहे, तो मागे चित्र काढत बसला आहे, एक जण त्याच्या मैत्रिणीकडे टक लावून पाहत बसला आहे, एक खिडकीबाहेर तंद्री लावून बसला आहे.... आणि सगळ्यात मजा म्हणजे या सगळ्यांना वाटत आहे की समोर शिकवणार्‍याला हे अजिबात समजत नाहिये... शिकवताना हे असले विचार सतत मनात येत असत.... :)

मीही लंचनंतरच्या तासाला प्रचंड झोपत असे... माझा समज असे की मास्तर लोकांन हे कळत नसावे.... स्वतः छोटीशी लेच्क्चर्स घेतल्यानंतर हे लक्षात आले की दहा फुटांवरून कोणता विद्यार्थी काय करत आहे , हे न कळायला लेक्चरर मूर्ख नसतो... फक्त प्रत्येकाला झापण्यात त्याला फारसा वेळ वाया घालवायचा नसतो...

शाळेत असताना बी एड करणारे काही तरूण शिक्षक तास घ्यायला वर्गावर येत असत, त्यांना अभ्यासातलेच पण वेडेवाकडे प्रश्न विचारून भंडावून सोडण्याचा आगाऊपणा करून खुनशी आनंद मिळवत असे , त्याचीही आठवण झाली... ( एक शिक्षिका अशा तासाला वर्गातच रडायला लागली आणि तास सोडून निघून गेली , हेही आठवते)
( अशा विचारांच्या शाळेतल्या मुलावर आणि त्रास देण्यतला फोलपणा त्याल कसा समजतो वगैरे वगैरे एक कथा लिहायचे डोक्यात होते .. असो)
"चांगले शिकवणे किती अवघड आहे हे कळण्यासाठी स्वतः थोडे शिकवणे सर्व शैक्षणिक ठिकाणी अनिवार्य असावे " ..वगैरे व्गैरे विचार मनात येतात...

लेख वाचून "तिसरी घंटा "मध्ये तोरडमल त्यांचे पहिले लेक्चर पोरांनी कसे उधळून लावले त्याची आठवण लिहितात ते आठवले...

डॉ अशोक कुलकर्णी's picture

6 Aug 2012 - 5:15 pm | डॉ अशोक कुलकर्णी

व्वा ! क्या बात आहे. आवडलं !

जयनीत's picture

18 Aug 2012 - 1:14 am | जयनीत

तुमचे अनुभव ऐकायला (वाचायला) आवडतील.
खर बोललात,
चांगले शिकवणे खुपच अवघड असतं.......
सहमत.

स्मिता.'s picture

6 Aug 2012 - 2:11 pm | स्मिता.

डॉक्टरसाहेव, अनुभव छान, खुसखुशीत शैलीत सांगितला आहे. असेच वेगवेगळे अनुभव लिहित रहा.

मूकवाचक's picture

6 Aug 2012 - 2:14 pm | मूकवाचक

+१

डॉ अशोक कुलकर्णी's picture

6 Aug 2012 - 5:24 pm | डॉ अशोक कुलकर्णी

माझे मिप वरचे इतर गद्य लेखन

१. पैठणचा ताजमहाल
http://www.misalpav.com/node/22363
२. घरचा आहेर
http://www.misalpav.com/node/22246
३. सायोनारा
http://www.misalpav.com/node/21999

मन१'s picture

6 Aug 2012 - 2:51 pm | मन१

मस्त मांडलात अनुभव.
तुम्हाला हे एवढं सगळं, इतके किस्से कसं काय बघायला मिळालं बुवा?

डॉ अशोक कुलकर्णी's picture

6 Aug 2012 - 8:01 pm | डॉ अशोक कुलकर्णी

तुम्हाला हे एवढं सगळं, इतके किस्से कसं काय बघायला मिळालं बुवा?
मन१

इथं "बघायला" ऐवजी "अनुभवायला" असं गृहीत धरतो. खरं सांगू? प्रत्येकाच्या आयुष्यात असं काही ना काही सांगण्या सारखे अनुभव असतातच. फक्त आप्ण सांगू की नको या संभ्रमापायी न सांगण्याचा निर्णय घेतो इतकंच. इंग्रजी साहित्य हे वेगवेगळ्या व्यावसायिकांच्या अनुभवानं समृद्ध आहे. मराठीत मात्र वकिल, अभियंते, शासकिय नौकरदार, व्यवस्थापक, बस कंड्क्टर, शिक्षक, पोलीस इत्यादीं पैकी काहींनीच आपले अनुभव शब्दबद्ध केलेत.....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Aug 2012 - 8:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉक्टरसाहेब, मस्त अनुभव आहे, आवडला.

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

7 Aug 2012 - 10:16 pm | पैसा

डॉक्टरांचा लेख सावकाशीने वाचण्यासाठी बाजूला ठेवला होता. मस्त! खूप आवडला. आणखी खूप लिहा!

किसन शिंदे's picture

9 Aug 2012 - 2:18 pm | किसन शिंदे

तुम्हाला आलेला अनुभव आणि तो मांडण्याची तुमची शैली दोन्ही छानच!

डॉ अशोक कुलकर्णी's picture

12 Aug 2012 - 9:16 pm | डॉ अशोक कुलकर्णी

धन्यवाद !