'कॉकटेल लाउंज' मालिकेतील आजचे कॉकटेल आहे "Almonda Amarita”
पार्श्वभूमी:
काल अस्मादिकांचा वाढदिवस होता, त्यानिमीत्ताने एक जबरदस्त कॉकटेल टाकायचा विचार होता पण कार्यबाहुल्यामुळे (कसले भारदस्त वाटते ना?) जमले नाही. पण शुक्रवारचा मुहुर्त साधता येतोय त्यामुळे काही हरकत नाही.
हे कॉकटेल हे माझे इंप्रोवायझेशन आहे म्हणजे पुर्णपणे माझी रेसिपी. बायकोने एकदा मुलांसाठी एक आइसक्रीम आणले होते बदामाचे. ते बघताना माझ्या डोळ्यासमोर एकदम अमारेतो, बदामापासून बनलेली लिक्युअर, आली. ती माझ्या मीनीबार मध्ये दाखल होतीच. लगेच मग काहीतरी प्रयोग करायचे ठरले. तो यशस्वी झाला तोच ह्या कॉकटेलच्या रूपात तुमच्यासमोर सादर करतो आहे. ह्या कॉकटेलला नाव देण्यासाठी बर्याच मित्र-मैत्रिणींशी चर्चा केली. पण कॉकटेल्सचे फोटों बघून हे नाव सुचवले ते आपल्या पैसातैने :) पैसातै, धन्यवाद गं!
प्रकार
व्हाइट रम आणि अमरेतो लिक्युअर बेस्ड, लेडीज स्पेशल
साहित्य
व्हाइट रम
२ औस (६० मिली)
अमारेतो
१० मिली
आल्मड क्रशड आइसक्रीम
२ स्कूप
काजू (सजावटीसाठी)
ग्लास
वाइन ग्लास
कृती:
ह्याची कृती एकदम सोप्पी आहे. सर्व साहित्य ब्लेंडरमध्ये घालून मस्त ब्लेंड करून घ्या. (कोण खवचटपणे म्हणतयं काजू पण का? ते सजावटीसाठी आहेत.)
खालच्या फोटोप्रमाणे ब्लेंडरवर बाहेरून बाष्प जमा झाले की व्यवस्थित ब्लेंड झाला आहे हे समजावे.
आता हे मिश्रण वाइनग्लास मधे ओतून घ्या. ग्लासच्या कडेला काजू सजावटीसाठी लावा. हे फारच जिकरीचे आणि कष्टप्रद काम आहे.
आता त्यात स्ट्रॉ टाकून घ्या. आइसक्रीम मुळे हे कॉकटेल खुप थंड असणार आहे. त्यामुळे स्ट्रॉने पिणे हे सोयिस्कर असते, थेट पिण्यापेक्षा.
चला तर, Almonda Amarita तयार आहे :)
डिस्क्लेमर: ह्या कॉकटेलसारखे कॉकटेल कोणी दुसर्या नावाने प्यायले असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
प्रतिक्रिया
3 Aug 2012 - 8:37 am | चिंतामणी
या कॉक्टेल बद्दल प्रतिक्रीया ते चाखुन देण्यात येइल.
3 Aug 2012 - 9:37 am | अर्धवटराव
माझ्या सारख्या सामान्य माणसाचे "दर्दी" वगैरे होण्याच्या इच्छा तुमच्यासारखे वस्ताद पुरवतात.
जय हो.
अर्धवटराव
3 Aug 2012 - 9:52 am | प्रभाकर पेठकर
सोत्रीसाहेब, प्रथम वाढदिवसांच्या शुभेच्छांचा स्विकार व्हावा.
Almonda Amarita नक्कीच 'टेसदार' असणार ह्यात शंका नाही. करुन पाहीन लवकरच.
अवांतरः धागा ०३/०८/२०१२ चा आहे पण छायाचित्रे १३-०४-२०१२ ची आहेत. वाढदिवस नक्की कधी होता?
3 Aug 2012 - 10:23 am | सोत्रि
वाढदिवास काल होता, काॅकटेल मागेच केले होते, पण वाढदिवसासाठी राखून ठेवले होते.
ह्याचे बारसे कारण्यातदेखिल खुप वेळ गेला होता.
असो, शुभेच्छांकरिता धन्यवाद!
-(साहेब असे बारसे झालेला) सोकाजी
3 Aug 2012 - 10:56 am | प्रभाकर पेठकर
धन्यवाद सोत्रीसाहेब.
4 Aug 2012 - 12:24 am | चिंतामणी
प्रथम वाढदिवस ????????????????
4 Aug 2012 - 2:08 am | प्रभाकर पेठकर
'प्रथम' नंतर स्वल्पविराम हवा होता. चुकलेच. क्षमस्व.
3 Aug 2012 - 11:09 am | नगरीनिरंजन
वाढदिवसाच्या उशीरा शुभेच्छा!
3 Aug 2012 - 1:59 pm | मुक्त विहारि
करून बघीन.
वाढदिवसाच्या शुभेच्छा.
3 Aug 2012 - 2:33 pm | मी_आहे_ना
सोत्री(साहेब)तुम्हाला वाढदिवसाच्या 'वाढत्या' शुभेच्छा! 'कातिल प्रयोग' फ्रायडेला टंकल्याबद्दल धन्यवाद.
3 Aug 2012 - 3:52 pm | परिकथेतील राजकुमार
कलेजा खलास झाला...
3 Aug 2012 - 4:12 pm | कवटी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
"तुम जिओ हजारों साल. साल के कॉक्टेल हो पचास हजार!!!"
तुम्ही एक वर्षाच्या आतल्या बाळांचे जसे दर महिन्याच्या त्या त्या तारखेला वाढदिवस साजरे करतात तसे का करत नाही?
3 Aug 2012 - 5:29 pm | आत्मशून्य
.
3 Aug 2012 - 5:14 pm | स्पंदना
नाव ठेवल?
वाढदिवस होता की बारस?
काय ग पैसाताई ? नाव ठेवतेस?
3 Aug 2012 - 6:42 pm | जे.पी.मॉर्गन
वाढदिवसाच्या बीलेटेड शुभेच्छा !
(माताय हा माणूस मला बेवडा करून सोडणार आहे)
जे पी
3 Aug 2012 - 6:51 pm | पैसा
नेहमीप्रमाणेच मस्त दिसतंय. मला त्यातल्या रममधे विंट्रेस नाय, पण लक्ष "अटरली बटरली डेलिशस अमूल" कडे गेलं! फोटो मस्तच आहेत. दारवा आणि आईस्क्रीम हे काम्बिनेशन करणारे फार कमी लोक असतील बहुतेक! डोकं चालवल्याबद्दल तुझं हाबिनंदण. पण बाळाचं नाव ठेवण्यात मी फार काही केलंय सं मला वाटत नाही!
3 Aug 2012 - 7:26 pm | वाचक
सो(बो)काजीराव
तुमचे हे सदर नेहेमी(च) वाचतो, हा ही प्रयोग उत्तम जमलेला आहे.
ह्यावरुन आमच्या 'बॅचलरहूड' ची एक गोष्ट (प्रयोग) आठवली.
वॅनिला आईस्क्रीम वर थोडी cognac (remy martin) घालून उत्तम पदार्थ तयार होतो, चमच्याने चाखत माखत खाणे :)
4 Aug 2012 - 11:11 pm | क्ष माणुस
पूण्यात हि दारु कुठे मिळते?
5 Aug 2012 - 8:20 am | शुचि
वाढदिवसाच्या शुभेच्छा.