हिंदुस्थानचे स्वातंत्र्य लक्ष्मीच्या पावलांनी आले असे म्हटले तर ते वावगे ठरु नये. १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्य समरातील पाउल होते राणी लक्ष्मीचे आणि १९४३ मध्ये आजाद हिंद ने केलेल्या इंग्रजी साम्राज्यावरील लत्ताप्रहारात पाउल होते ते झाशी राणी पलटणीच्या प्रमुख कॅप्टन लक्ष्मी यांचे.
हिंदुस्थानातील स्त्रीचे तेजस्वी रुप जगाला दाखविणारी आजाद हिंद सेनेची रणरागिणी कॅप्टन लक्ष्मी आज हरपल्या. २४ ऑक्टोबर १९१४ मध्ये मद्रास येथे जन्मलेल्या प्रख्यात वकील श्री एस स्वामिनाथन व समाजसेविका अम्मु कुट्टी यांच्या या कन्येने १९३८ साली वैद्यकिय पदवी मिळवली आणि १९४० डॉ. लक्ष्मी सिंगापुरात दाखल झाल्या. त्या सिंगापुरातुन चालविण्यात येत असलेल्या स्वातंत्र्य लढ्याकडे आकर्षित झाल्या. १९४३ मध्ये नेताजी सिंगापुरात येताच त्यांना असे समजले की नेताजींना स्वातंत्र्य संग्रामार्थ आपल्या सेनेत महिलांची पलटणही स्थापन करायची आहे तेव्हा त्यांनी नेताजींची भेट घेतली आणि डॉ लक्ष्मी या आजाद हिंद सेनेतील झाशी राणी पलटणीच्या प्रमुख कॅप्टन लक्ष्मी झाल्या
झाशी राणी पलटणही आजाद हिंद सेनेबरोबर ब्रह्मदेश मार्गे भारतिय सीमेकडे गेली.
नेताजींचे महिला सेनेचे स्वप्न साकार करणार्या कॅप्टन लक्ष्मी आजाद हिंद सेनेच्या हंगामी सरकारात सदस्या होत्या
१९४५ साली आजाद हिंदच्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीत इंफाळ सीमेकडून माघार घेताना त्यांना इंग्रजांनी कैद केले व हिंदुस्थानात आणले. १९४६ च्या सुप्रसिद्ध 'सेहगल, धिल्लाँ, शाहनवाज म्हणजेच आजाद हिंद विरुद्ध ईंग्रज सरकार या लाल किल्ला अभियोगात त्या मुक्त झाल्या. मार्च १९४७ मध्ये त्या कॅप्टन प्रेम सेहगल यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. स्वातंत्र्यानंतरच्या काळात त्यांनी समाजसेवेला वाहुन घेतले.
आज वयाच्या ९७ व्या वर्षी त्यांचे कानपूर येथे हृदय विकाराने निधन झाले. हिंदुस्थानच्या या विरांगनेला विनम्र मानवंदना.
(चित्रसौजन्य - क्र. १ द हिंदु, क्र. २/३/४ - द फरगॉटन आर्मी)
प्रतिक्रिया
24 Jul 2012 - 12:33 am | अर्धवटराव
वीरांगनेला श्रद्धांजली !!
नेताजी आणि त्यांच्या सहकार्यांनी आझाद हिंद सेनेच्या मार्फत ते अतुलनीय धाडस केलं... कल्पनेनेच अंग शहारतं.
अर्धवटराव
24 Jul 2012 - 12:37 am | कौशी
हिंदुस्थानच्या शुर विरांगनेला माझी मानवंदना!!!
24 Jul 2012 - 12:57 am | शिल्पा ब
श्रद्धांजली !!
आपल्या दुर्दैवाने आजाद हिंद सेना फार यशस्वी होउ शकली नाही पण या निमित्ताने स्त्रीसैन्याची स्थापना झाली हे सुद्धा कमी नाही.
24 Jul 2012 - 1:58 am | चतुरंग
झाशीच्या राणीला अभिवादन!! _/\_
नेताजींसारख्या महायोध्याबरोबर स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी असलेला शेवटचा कणखर दुवा निखळला. २०१२ हे साल आपल्यापासून फार चांगल्या गोष्टी हिरावून नेते आहे. :(
जाताजाता - वरती लेखात ज्या लाल किल्ला ट्रायलचा उल्लेख आला आहे तो एक रोमांचकारी प्रसंग होता. इतिहासात 'आयएनए ट्रायल' ह्या नावाने ओळखल्या जाणार्या ट्रायलमधे बचावपक्षात जवाहरलाल नेहरु, भुलाभाई देसाई, कैलाशनाथ काटजू आणि असफ अली असे खंदे बॅरिस्टर्स होते. त्यातली मुख्य बचावाची भूमिका भुलाभाई देसाईंनी निभावली. अस्खलित इंग्रजीमधे सलग कित्येक तास बोलताना भुलाभाईंनी सेनादलाचा कायदा, घटनात्मक कायदा आणि आंतरराष्ट्रीय कायदा यांचा कीस पाडला होता. बोलून बोलून शेवटी अतिताणाने ते डीहायड्रेट झाले होते. भुलाभाईंच्या बचावामुळे या तीघांवर भारताच्या स्वतंत्र भूभागाचे सैनिक आणि म्हणून युद्धकैदी असे समजून खटला चालला. अन्यथा इंग्रज सैन्याविरुद्ध बंडाळी असे रुप देऊन त्या तिघांना फाशी होऊ शकली असती. .
24 Jul 2012 - 5:21 pm | कवटी
रंगाकाका,
सुतकी धाग्यांचा उद्देश हा गेलेल्या विषयी किंवा अनुषंगाने अशी ओफ्बिट माहिती मिळावी असा असावा असे पहिल्या पासून वाटत होते. आयेनए ट्रायल विषयीच्या माहिती बद्दल धन्यवाद.
जमल्यास विस्त्रुत धागा टाकणेत यावा.
बाकी श्रद्धांजली आहेच.
24 Jul 2012 - 2:18 am | बॅटमॅन
रणरागिणीस विनम्र अभिवादन!
24 Jul 2012 - 5:37 am | सिद्धार्थ ४
श्रद्धांजली !!
24 Jul 2012 - 6:23 am | सहज
_/\_
24 Jul 2012 - 7:17 am | रेवती
खरच ग्रेट माणसे ही सगळी.
माझीही श्रद्धांजली कॅप्टन लक्ष्मी यांना.
24 Jul 2012 - 7:28 am | अत्रुप्त आत्मा
:-(
--^--^--^--
24 Jul 2012 - 7:37 am | संजय क्षीरसागर
तुमचं अभिनंदन आणि कॅप्टनला श्रद्धांजली; व्यक्तिमत्व इतकं ग्रेसफुल आहे की मनाचा निश्चय प्रत्येक छायाचित्रात व्यक्त होतोय
24 Jul 2012 - 7:57 am | ५० फक्त
विनम्र श्रद्धांजली, अशा व्यक्तिंपुढे विनम्र होणे याशिवाया दुसरं काही होणं नाही.
24 Jul 2012 - 8:19 am | नितिन थत्ते
अभिवादन !!!
24 Jul 2012 - 9:46 am | जाई.
श्रध्दाजंली !!
24 Jul 2012 - 9:52 am | मूकवाचक
_/\_
24 Jul 2012 - 10:01 am | पियुशा
आदरांजली __/\__
24 Jul 2012 - 10:24 am | मंदार दिलीप जोशी
आझाद हिंद सेनेने ब्रिटिशांचे जवळजवळ पेकाट मोडले. मग सैन्याने बंड केल्यावर ब्रिटिशांचा नाईलाज झाला व आपल्याला स्वातंत्र्य मिळाले.
या रणरागिणीला त्रिवार वंदन :(
24 Jul 2012 - 11:02 am | sneharani
श्रध्दांजली.!
24 Jul 2012 - 11:21 am | नि३सोलपुरकर
_/\_
24 Jul 2012 - 2:04 pm | कपिलमुनी
श्रद्धांजली !
24 Jul 2012 - 2:16 pm | मी_आहे_ना
श्रद्धांजली !
24 Jul 2012 - 2:47 pm | श्रीवेद
श्रद्धांजली कॅप्टन लक्ष्मी यांना.
__/\__
24 Jul 2012 - 3:34 pm | इरसाल
विनम्र श्रद्धांजली !!!!!
24 Jul 2012 - 5:10 pm | मदनबाण
_/\_
विनम्र श्रद्धांजली...
25 Jul 2012 - 12:32 am | मोदक
श्रद्धांजली !
25 Jul 2012 - 10:53 am | विजुभाऊ
इंग्रजी राज्यात, स्वकीयांचा विरोध असतानाही " आझाद हिंद सेना " स्थापन करणे / त्यासाठी विश्वासु आणि लायक मनुश्यबळ मिळवणे त्यांचे प्रशिक्षण आणि पोषण ह्या असामान्य गोष्टी आजच्या घडीला कल्पनेच्याही पलीकडल्या वाटतात.
25 Jul 2012 - 12:10 pm | मन१
रणरागिणीच नव्हे तर काळाच्या बरेच पुढे असलेल्या व्यक्तिमत्वास अभिवादन.
लष्करात स्त्रियांचे प्रमाण नगण्य असताना उभ्या राहिलेल्या पलटणीत सामील होणे, नेतृत्व करणे काळाच्या पुडह्ची गोश्ट आहे.
आज, २०१२ मध्येही एखादी मुलगी "मी मिलिटरी जॉइन करते " म्हटल्यावर लोकांची प्रतिक्रिया काय असेल कल्पना करा.
स्वातंत्र्यपूर्व काळात एखादी स्त्री हाती शस्त्र घेण्यास(पूर्ण वेळ लश्करी काम) तयार होलोकाही घटना किती वेगळी ठरली असेल.
25 Jul 2012 - 4:13 pm | स्पंदना
मलाही असच वाटतय. एका झुंझार व्यक्तीमत्वाला अभिवादन.
कॅप्टन लक्ष्मींबद्दल मलेशियाच्या दोघा बहिणींन कडुन ऐकण एक चित्तथराऱक अनुभव होता. जेंव्हा माघार घ्यायची वेळ आली तेंव्हा स्त्री दलाला पुढे ठेवुन त्यांच्या संरक्षणाला अतिशय महत्व देउन सुभाषचंद्र बोसनी या स्त्रीयांना सुखरुप परत आणल होत. कॅप्टन लक्ष्मी या मुलींना अतिशय प्रेमान अन लहाण बहिणीं प्रमाणे वागवत असत. त्यांच्या दलातली गाणी म्हणताना आजही त्या उभ्या राहुनच म्हणत होत्या. त्या मानान आपल्याला फारच कमी माहिती आहे या व्यक्तीमत्वांची.
25 Jul 2012 - 6:38 pm | पैसा
स्वातंत्र्यासाठी लढलेले आता फार कोणी राहिले असतील असं वाटत नाही. श्रद्धांजली.