'कॉकटेल लाउंज' मालिकेतील आजचे कॉकटेल आहे "वॉटर्मेलन मोहितो”
पार्श्वभूमी:
मला मनापासून आवडणारे एक रसाळ फळ म्हणजे कलिंगड. भरपूर पाणी असलेले हे रसरशीत फळ त्याच्या लाल रंगामुळे आणी हिरव्या आवरणामुळे कापल्यावर खुपच आकर्षक दिसते. कलिंगडाचे काप, त्यातल्या बिया अलगद तोंडातल्या तोंडात वेगळ्या करून खाण्यात जी मजा आहे तेवढीच मजा कलिंगडाचा रसही पिण्यात आहे. जर हा रस मजा देऊ शकतो तर मग त्याचे कॉकटेलही बहार आणणारच असा विचार येणे सहाजिकच आहे :)
तर आजचे कॉकटेल आहे 'वॉटर्मेलन मोहितो', क्लासिक मोहितोला दिलेला कलिंगडाचा फ्लेवर.
प्रकार व्हाइट रम आणि पुदिना बेस्ड (मोहितो) साहित्य व्हाइट रम २ औस (६० मिली) मोसंबी रस किंवा लेमन स्क्वॅश १.५ औस (४५ मिली) कलिंगडाचा रस (प्युरी) २ औस (६० मिली) ग्रेनेडाइन १० मिली सोडा किंवा स्पार्कलिंग वॉटर १५ मिली पुदिना ७-८ पाने बर्फ मडलर बार स्पून ग्लास कॉलिन्स
कृती:
सर्वप्रथम कलिंगडाचे काप करून मिक्सर किंवा ब्लेंडरमधून साधारण ६० मिली होईल इतका रस काढून घ्या. त्यानंतर कलिंगडाचे ३-४ छोटे छोटे तुकडे आणि पुदिनाची ३-४ पाने कॉलिन्स ग्लास मध्ये टाकून मडलरच्या सहाय्याने चेचून घ्या. त्याने पुदिनीच्या पानांमधले तेल (Oils) आणि कलिंगडाचा ताजा रस सुटा होऊन ते कॉकटेलला तजेलदार बनवेल.
आता ग्लासमध्ये बर्फाचे खडे टाकून घ्या. त्यात रम आणि मोसंबीचा रस किंवा लेमन स्क्वॅश टाका.
कलिंगडाच्या ताज्या रसामुळे रमला एक मस्त गुलाबी छटा येईल आणि ती तशीच गट्टम करून टाकावीशी वाटेल, पण जरा कळ सोसा. सब्र का कॉकटेल बढिया होता है| :) आता त्यात कलिंगडाचा रस ओतून घ्या मस्त लाल रंग येईल आता मिश्रणाला.
त्यावर आता ग्रेनेडाईन ओता. मिश्रण एकदम लालेलाल होऊन जाईल. बार स्पून वापरून मस्त ढवळून घ्या.
थोडासा सोडा किंवा स्पार्कलिंग वॉटर टाकून ग्लास टॉप अप करा. सजावटीसाठी पुदिन्याची काही पाने व कलिंगडाचा एक काप ग्लासाच्या कडेला लावा.
चला तर, लालचुटुक वॉटर्मेलन मोहितो तयार आहे :)
प्रतिक्रिया
6 Jul 2012 - 3:26 pm | मी_आहे_ना
मस्त! एकदा कल्याणीनगरातल्या हॉटेलात प्राशन केलेले. आपल्या सादरीकरणाला (पुन्हा एकदा) सलाम!
6 Jul 2012 - 4:07 pm | परिकथेतील राजकुमार
मस्त रे अण्णा !
एकदम कातिल.
6 Jul 2012 - 4:17 pm | नेहरिन
झकास!!!!!!!!!! नुस्त बघुन गार वाटल. पण हे "व्हाइट रम" न घालता करता येते का?? व्हाइट रम नाहि घातली तर काय होईल ???
6 Jul 2012 - 6:02 pm | श्रावण मोडक
एकदा रेड रम घालून पिऊन पहा. कळेलच व्हाईट रम न घालता केलं तर काय होतं ते...
प्रमाण मात्र हेच ठेवा. नाही तर काहीच कळायचं नाही! ;-)
6 Jul 2012 - 9:19 pm | नेहरिन
अहो मोडक मी असल्या गोष्टी नाहि ना पित. मी नारळाच पाणी पिते. त्यामुळे मला याचा काहिच उपयोग नाही करता येणार. पण हे प्यायच ठरवल तर काय कराव लागेल म्हणुन विचारल हो.
6 Jul 2012 - 10:40 pm | श्रावण मोडक
अरेच्चा... मग तुम्ही आपली सरळ कलिंगडं खा. कारण रम नसेल तर या पेयात राम असणार नाही. :-)
6 Jul 2012 - 6:17 pm | परिकथेतील राजकुमार
भाजीत मिठ नाही घातले तर जे होईल तेच.
6 Jul 2012 - 11:08 pm | चिंतामणी
तीला निट विचारता आले नाही.
तीला म्हणायचे असेच "मॉकटेल" असते का?
कॉलींग सोत्री अण्णा फॉर रिप्लाय.
7 Jul 2012 - 2:46 pm | परिकथेतील राजकुमार
भक्तप्रतिपालक , सदाशिवपेठनिवासी समर्थ सद्गुरु श्री श्री चिंतामणी महाराज की जय!!!!
7 Jul 2012 - 3:19 pm | चिंतामणी
तुझप्रत कल्याण असो.
:D
7 Jul 2012 - 6:49 pm | सोत्रि
रम ऐवजी तेवढ्याच प्रमाणात मोसंबी ज्युस वाढवता येऊ शकेल. थोडी पुदीन्याची पाने पण वाढवावी लागतील.
- ( साकिया ) सोकाजी
7 Jul 2012 - 6:54 pm | सोत्रि
.
7 Jul 2012 - 6:54 pm | सोत्रि
.
6 Jul 2012 - 5:07 pm | अत्रुप्त आत्मा
काय दिसू र्हायलं हो ते पेय्य...!
6 Jul 2012 - 5:27 pm | गणपा
वाह!!!
टोंडाला पाणी सुटल. ;)
6 Jul 2012 - 5:49 pm | मुक्त विहारि
अजून एक मजेदार कॉकटेल..
6 Jul 2012 - 6:35 pm | मन१
काहीतरी भारीच प्रकार दिसतोय.
6 Jul 2012 - 7:47 pm | आंबोळी
इथे संकष्टीमुळे आज बायकोने प्यायला बंदी घातलीय आणि तुम्ही असले कॉकटेली धागे काढून जळवताय...
सोत्रि कुठे फेडाल ही पापे?
अता उद्या व्हाईट रम आणावी लागणार!
6 Jul 2012 - 9:57 pm | पक पक पक
बघुनच गारेगार झालो :drunk: :drunk: :drunk: :drunk:
7 Jul 2012 - 2:49 pm | ५० फक्त
मस्त मस्त दिसतंय, धन्यवाद.
7 Jul 2012 - 9:23 pm | सुहास झेले
अल्टिमेट :) :)
7 Jul 2012 - 10:58 pm | अमृत
कलिंगडाचा मौसम संपायच्या टायमाला दिलीत.
कॉकटेल नेहमीप्रंआणेच शानदार.
अमृत
8 Jul 2012 - 12:37 am | मोदक
सोडा आणि स्पार्कलिंग वॉटर मध्ये काय फरक असतो?
गॅस कंटेन्ट?
8 Jul 2012 - 11:30 am | सोत्रि
सोडा कृत्रिमरित्या कार्बोनेटेड (CO2 मिसळणे, त्यामुळे पाणी बुडबडेदार होते) केला जातो.
स्पार्कलिंग वॉटर नैसर्गिकरित्या कार्बोनेटेड असते (झर्याचे मिनरल वॉटर). त्यामुळे ते सोड्यापेक्षा महाग असते.
अधिक माहितीसाठी.
- (स्पार्कलिंग) सोकाजी
8 Jul 2012 - 7:47 am | मराठमोळा
जबराट.....
सोत्रि... _/\_ दंडवत बुवा.. :)
8 Jul 2012 - 9:08 pm | JAGOMOHANPYARE
मोहित्यांची मेलना ... असेनाव देऊ या... रंग आवडला..
9 Jul 2012 - 5:38 pm | जातीवंत भटका
कडक में भडक !
(जातीवंत बेवडा)