कॉकटेल लाउंज : जामुनटीनी

सोत्रि's picture
सोत्रि in पाककृती
8 Jun 2012 - 7:32 pm

'कॉकटेल लाउंज' मालिकेतील आजचे कॉकटेल आहे "जामुनटीनी”

पार्श्वभूमी:
मागच्या आठवड्यात सुट्टी घेऊन पुण्याला आलो होतो. आल्याआल्या बायकोने मंडईत जायचा फतवा काढला. सगळा असंतोष मनातल्या मनात दाबून टाकून हसर्‍या चेहर्‍याने पिशव्या हातात घेऊन गुणी नवरा असल्याचा साक्षात्कार बायकोला करून दिला. (अ‍ॅक्चुली ह्याला तोंड दाबून बुक्क्यांचा मार म्हणतात पण असो...)

जाऊदे, 'जे होते ते भल्यासाठीच' (हाही १२ वर्षाच्या लग्नाच्या अनुभवाने आलेला एक शहाणपणा). मंडईत गेल्यावर टप्पोरी जांभळे दिसली. जांभूळ म्हणजे माझे एक आवडते फळ, तोंडाला निळेशार करणारे! बर्‍याच वर्षांनंतर जांभूळ बघितले आणि बरे वाटले.

मग लगेच एक कॉकटेल आठवले, 'जामुनटीनी'. जेम्स बॉन्डच्या मार्टीनी ह्या कॉकटेलला दिलेला एक जबरदस्त देशी ट्वीस्ट.

प्रकार
जीन बेस्ड (मार्टीनी)

साहित्य

जीन (लंडन ड्राय)
२ औस (६० मिली)

मोसंबी रस
०.५ औस (१५ मिली)

सुगर सिरप
१० मिली

टपोरी जांभळे
४-५

बर्फ

मडलर

Hawthorne Strainer

ग्लास
कॉकटेल

कृती:

सर्वप्रथम कॉकटेल ग्लासमध्ये बर्फ आणि पाणी घालून फ्रीझ मध्ये ग्लास फ्रॉस्ट करण्यासाठी ठेवून द्या. त्यानंतर कॉकटेल शेकर मध्ये जांभळाचे तुकडे कापून घ्या.

आता मडलर वापरून जांभळाचे तुकडे चेचून जांभळाचा रस काढून घ्या

एका परसट बशीत मीठ आणि लाल मिरची पूड ह्यांचे मिश्रण करून पसरून घ्या. फ्रॉस्ट झालेल्या कॉकटेल ग्लासच्या कडेवर मोसंबी फिरवून कडा ओलसर करा आणि बशीतल्या मिश्रणामध्ये ग्लासची कडा बुडवून घ्या.

आता शेकर मध्ये बर्फ घालून त्यावर जीन, मोसंबीचा रस आणि शुगर सिरप घालून व्यवस्थित शेक करा.

शेक केलेले मिश्रण शेकरच्या अंगच्याच स्ट्रेनरने एका स्टीलच्या ग्लासमध्ये गाळून घ्या.

आता Hawthorne Strainer वापरून कॉकटेल ग्लासमध्ये मिश्रण दुसर्‍यांदा गाळून घ्या. (ह्याला डबल स्ट्रेनिंग म्हणतात.)

चला तर, चवदार जामुनटीनी तयार आहे :)

(सदर कॉकटेल 'टल्लीहो बुक्स ऑफ कॉकटेल्स' मधून साभार)

प्रतिक्रिया

सुहास झेले's picture

8 Jun 2012 - 9:12 pm | सुहास झेले

सोत्रि, नेहमीप्रमाणे एक हटके आणि अफलातून कॉकटेल.... चिअर्स :) :)

आवडलं. पण मिरचीपुड टाकल्याने तिखट नै का लागणार?

सोत्रि's picture

8 Jun 2012 - 11:21 pm | सोत्रि

अगं शिल्पातै,

ती मिरचीपूड बचकाभर नै कै टाकायची, ती फक्त चिमुट्भर टाकायची प्रामुख्याने रंगासाठी आणि किंचीत चवीसाठी :)

- (तिखट) सोकाजी

jaypal's picture

8 Jun 2012 - 10:59 pm | jaypal

आणि फोटो आवडले.
मागल्या इतवारी वरिजनल जांभलाची पिलाव. :-) तेची तुमी सय दिलाव. जांभलाची कवा चाखली का?

सोत्रि's picture

8 Jun 2012 - 11:15 pm | सोत्रि

होय जांभळाची ट्राय केली आहे.
तुम्ही कोठे रहाता? मी वसईला (आगाशी - विरार पश्चिम) येथे रहायचो त्यावेळी जांभळाची खुप वेळा प्यायली आहे.
एका आगरी मित्राच्या घरी त्याचे काका फक्त घरी पिण्याकरिता बनवायचे ती 'खास' ट्राय केली आहे.

- ('जांभलाची'च्या आठवणीने जांभळा झालेला) सोकाजी

jaypal's picture

8 Jun 2012 - 11:28 pm | jaypal

मी ठाणेकर. आमालाबी अशीच पेशल भेटलीव्ती त दिवशी. आता म्हवाची पन आर्डर दिली हाय.

jaypal's picture

8 Jun 2012 - 11:28 pm | jaypal

प्र.का.टा.आ.

च्यायला इथे तपकीरीपासून हवाबाण हर्डेपर्यंत सगळं काही मिळतं पण जांभळं काही मिळत नाहीत!!! कित्ती वर्षं झाली जांभळं बघुन!
- (जांभळांच्या आठवणीने किंचीत हळवा झालेला) मराठे

अत्रुप्त आत्मा's picture

9 Jun 2012 - 12:18 am | अत्रुप्त आत्मा

मद्य प्रयोगचिंतामणी सोकाजीराव की जय हो...!

प्रचेतस's picture

9 Jun 2012 - 8:35 am | प्रचेतस

सोकाजीराव ऑन द रॉक्स.

सोकाजीराव, जांभूळ म्हटल्यावर एक वेगळाच अफलातून रंग असेल असं वाटलं होतं.

आयडिया इनोव्हेटिव्ह आहे. चवही उत्तम असेलच. पण त्या शेवटच्या फोटोतल्या दिसणार्‍या दुधट गढूळ रंगाने एकदम अपेक्षाभंग झाला.

गवि त्यासाठी जांभळांचा गर जास्त प्रमाणात वापरायला लागेल असे मला तरी वाटते..

- पिंगू

जांभळाचा जांभळ्या रंगाचा अफलातूनणा येण्यासाठी भरपूर प्रमाणात जांभळे वापरावी लागली असती (पिंगू म्हणाला तसे) पण मग चव बोंबलली असती. असो, पण जर शेक न करता नुसते स्टर्र केले असते तर कदाचित जांभळी झाक आली असती.
पुढच्या वेळी तसे करून बघेन!

पण प्रतिसादाबद्दल धन्यावादच !

- (साकिया) सोकाजी

परिकथेतील राजकुमार's picture

9 Jun 2012 - 2:23 pm | परिकथेतील राजकुमार

सोत्रि म्हणजे साला मद्यकृती मधला कमलाबै ओगले आहे.

तुला 'मद्यपूर्णा' हा किताब देण्यात येत आहे.

पैसा's picture

9 Jun 2012 - 5:16 pm | पैसा

जांभळांचे फटु आवडले!

वा मस्त. या धाग्याने मिपावर खेचून आणले परत :)

या धाग्याने मिपावर खेचून आणले परत

ह्या अनमोल प्रतिसादाबद्दल लै वेळा धन्यवाद!

- (अंमळ हळावा झालेला) सोकाजी

सोत्रीची ट्राईड न टेस्टेड रेशिपी असल्याबे चवी बद्दल शंका नाही.
पण गविशी सहमत.
मस्त निळा जांभळ्या रंगाच द्रव्य असेल असं वाटालं होतं.

जांभळाचा असाही उपयोग होतो हे माहित नव्हता. बाकी सोत्री यु आर ग्रेट!

उमेश टेकाडे's picture

7 Jul 2012 - 4:42 pm | उमेश टेकाडे

पाणी कधी टाकता की नाही राव?

सोत्रि's picture

7 Jul 2012 - 7:36 pm | सोत्रि

पाणी कधी टाकता की नाही राव?

हा हा हा!

शक्यतो भेसळ न करण्याकडे कल असतो माझा :)

- (पानीकम) सोकाजी

ज्ञानोबाचे पैजार's picture

7 Jul 2012 - 5:02 pm | ज्ञानोबाचे पैजार

जियो मेरे सोत्री,
तुमच्या डोक्यातन काय काय अफलातुन कल्पना येतात...
गटारीच्या आधी अशा अजुन बर्‍याच रेसीपी येउ दे
म्हणजे गटारी नंतर आल्या तरी चालतील. पण मग तेव्हा प्रॅक्टीकल करुन बघणे थोडे अवघड होते इतकेच.