कॉकटेल लाउंज : अ डे अ‍ॅट बीच

सोत्रि's picture
सोत्रि in पाककृती
18 May 2012 - 8:37 pm

'कॉकटेल लाउंज' मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “अ डे अ‍ॅट बीच

पार्श्वभूमी:

उन्हाळ्याचा तडाखा वाढतो आहे, मस्त समुद्रकिनार्‍यावर जाऊन पाण्यात डुंबावेसे वाटते आहे. डुंबता डुंबता मध्येच घसा ओले करणे ओघाने येतेच. पण तुम्हाला समुद्रकिनारी जायला जमणार नसेल तर आजचे कॉ़कटेल तुम्हाला समुद्रकिनार्‍याची आभासी सफर घडवून आणेल त्याच्या नुसत्या नावानेच.

मालिबू बेस्ड हे कॉकटेल वाढत्या उन्हाळयावरचा 'उतारा' म्हणून बीच वर न जाताही बीच वर गेल्याचे समाधान देईल. :)

प्रकार
मलिबू कोकोनट रम आणि आल्मन्ड (बदाम) लिक्युअर बेस्ड कॉकटेल

साहित्य

मलिबू कोकोनट रम
1.5 औस (45 मिली)

अमारेतो लिक्युअर (Amaretto Liqueur)
0.5 औस (15 मिली)

ग्रेनेडाइन (डाळिंबचे सिरप)
10 मिली

संत्र्याचा रस

बर्फ

स्ट्रॉ

ग्लास
कॉलिन्स किंवा हाय बॉल

कृती:

खालच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे कॉलीन्स ग्लास मधे अर्धा ग्लासभर बर्फ घालून घ्या. आता ग्लासात अनुक्रमे मलिबू कोकोनट रम, अमारेतो लिक्युअर ओतून घ्या. त्यानंतर संत्र्याच्या रसाने ग्लास टॉप अप करा.

आता ह्या मिश्रणात एक संततधार होईल अशा प्रकारे ग्रेनेडाइन ओता. ह्याची घनता जास्त असल्यामुळे हे तळाशी जाऊन बसेल.
पण जाता जाता, खालच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे, 'सनराइज'चा इफेक्ट देवून जाईल आपल्या कॉकटेलला.

चला तर मग, अ डे अ‍ॅट बीच तयार आहे. :)

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

18 May 2012 - 8:46 pm | श्रावण मोडक

खालच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे कॉलीन्स ग्लास मधे अर्धा ग्लासभर बर्फ घालून घ्या.

हा ग्लास मला दिसत नाही. सर्वरवर फोटो चढले नाहीत, की सर्वरला कॉकटेल चढले? की... ;-)
हा प्रतिसाद उतारा ठरला बहुदा. सर्वरने लगेच फोटो दाखवायला सुरवात केली. ;-)

मुक्त विहारि's picture

18 May 2012 - 9:16 pm | मुक्त विहारि

@ सोत्री,

एक तर आधीच सौदीत आणि वर ही अशी कॉकटेल्स. कुठे फेडशील ही पापे.तूझे अपहरण नक्की होणार आहे.

सोत्री तुम्हें इसकी सजा मिलेगी..जरूर मिलेगी..

सोत्रि's picture

18 May 2012 - 9:47 pm | सोत्रि

एक तर आधीच सौदीत

अरे मी सौदीवरून केव्हाच परत आलोय, सध्या चेन्नैत आहे :)

- ( सध्या लुंगीवाला ) सोकाजी

प्यारे१'s picture

19 May 2012 - 12:36 pm | प्यारे१

मुक्तविहारी असेल सौदीत... तू पण ना सोत्र्या!

आयचा घो खरंच की!

घ्या, हे असे होते बरेच दिवस दारू नाही प्यायल्यावर!

- (दारू न प्यायल्यामुळे हुकलेला) सोकाजी

मेघवेडा's picture

22 May 2012 - 4:30 pm | मेघवेडा

परोपकारी बंडू!

jaypal's picture

18 May 2012 - 10:00 pm | jaypal

कॉकटेल रेसीपी आणि एकदम कातील फोटो.

पैसा's picture

18 May 2012 - 10:46 pm | पैसा

आणखी काही कळत नाही!

एकदम झकास.
आता एकदा मॉकटेल पण येऊ द्यात.

या वेळी फोटू मोबाईलवर काढलेले दिसत आहेत.

अमृत's picture

19 May 2012 - 1:34 pm | अमृत

बघुनच इतकं छान वाटतय तर....... :-)

अमृत

अत्रुप्त आत्मा's picture

20 May 2012 - 2:58 pm | अत्रुप्त आत्मा

मॉकटेल... मॉकटेल पायजे अता...

जातीवंत भटका's picture

22 May 2012 - 4:02 pm | जातीवंत भटका

गेल्या विकांताला बिचवरच होतो... ;)

हृदय भेदी's picture

27 May 2012 - 8:53 pm | हृदय भेदी

मित्रहो,
ह्या काकटेलमधे दिलेले पदार्थ उदा: अमारेतो लिक्युअर ग्रेनेडाइन कुठे मिळतात हो?
मी वेगेवेगळ्या दारुच्या दुकानांमधे विचारले. पण त्यांनी हे पदार्थ ऐकलेलेही नव्हते!
याची काही वेगळी दुकाने असतात का हो ?....

जमल्यास पत्ते द्यावे !.....

सोत्रि's picture

27 May 2012 - 10:05 pm | सोत्रि

ग्रेनेडाइन म्हणजे डाळिंबाचा सिरप तो कुठल्याही सुपर मार्केट मध्ये सहज मिळेल.
अमारेतो लिक्युअर, ह्म्म्म... ही भारतात नेमकी कुठे मिळेल ते सांगणे कठीण आहे.

पुण्यात असाल तर कॅम्पात दोराबजी मध्ये मिळू शकेल बहुतेक.

- (साकिया) सोकाजी