सुप्रभात .. शुभ रजनी ...

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
12 May 2012 - 11:29 am

सुप्रभात .. शुभ रजनी ...
कशासाठी दोस्त ?

अफजलगुरू कसाब
मजेत मस्त

आपण महागाईने
नेहमीच त्रस्त

गृहिणी टंचाईत
नित्य चिंताग्रस्त

सामान्यांची स्वप्ने
धुळीत उध्वस्त

नेतेमंडळीचे दौरे
कायम जबरदस्त

जनतेची कमाई
दलालाकडून फस्त

सभागृह नेहमी
गोंधळातच व्यस्त

गुड मॉर्निंग... गुड नाईट...
कशासाठी दोस्त ? "

करुणकवितासमाजजीवनमानराजकारणमौजमजा

प्रतिक्रिया

कवितेचे शीर्षक पाहून सुसकाळ, सुदुपार, सुसंध्याकाळ, सुरात्र असे म्हणणारे आमचे मिपाकर मित्र श्री. चचा उर्फ चतुर चाणक्य यांची आठवण झाली.

लीलाधर's picture

14 May 2012 - 8:20 am | लीलाधर

आमची आठवण आली हे महत्वाचे हो वल्लीदा सुसकाळ :)