कुमार जावडेकरांची 'नूर' गजल पाहून कोणे एके काळी आमचा बदललेला 'नूर' पुन्हा एकदा आमच्या आठवणीत आला!
दारावरुन गेली, पाहून हूर आलो
आता इथेच होती, शोधीत दूर आलो!
जाऊन बारमध्ये ना घेतली कशी मी
(पाहून तेथला मी आनंद-पूर आलो)
ही फौज बेवड्यांची, पाहू कशास आता
भेटीस 'पेजथ्रीं'च्या येथे चतूर आलो...
'तो भाग' शेकला पण ना बोललो कुणाला
घालून शेपटी मी काढून धूर आलो
थोडाच वेळ होतो, मी थांबलो तिथे, पण-
भलताच मैफिलीचा पाहून 'नूर' आलो
चतुरंग
प्रतिक्रिया
4 Aug 2008 - 4:55 am | रेवती
विडंबन चांगले झाले आहे, पण दारु व बार या शब्दांचा आता कंटाळा आला आहे. गटारिच्या निमित्तानेही हे शब्द बरेचदा वापरले गेले आहेत. वेगळ्या विडंबनच्या प्रतिक्षेत आहे.
रेवती
4 Aug 2008 - 7:57 am | प्राजु
'तो भाग' शेकला पण ना बोललो कुणाला
घालून शेपटी मी काढून धूर आलो
हे वाचून खूप हसले.. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
4 Aug 2008 - 3:41 pm | बिपिन कार्यकर्ते
असेच म्हणतो...
4 Aug 2008 - 10:25 am | फटू
'तो भाग' शेकला पण ना बोललो कुणाला
घालून शेपटी मी काढून धूर आलो
या ओळी तर एकदम जबराट... :P
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
4 Aug 2008 - 11:00 am | बेसनलाडू
'तो भाग' शेकला पण ना बोललो कुणाला
घालून शेपटी मी काढून धूर आलो
हाहाहाहाहाहाहा!!!!!
रंगाशेठ,विडंबनाचा विषय 'तो'च असला,तरी आहे मात्र जबराट!
(वाचक)बेसनलाडू
4 Aug 2008 - 11:12 am | मदनबाण
'तो भाग' शेकला पण ना बोललो कुणाला
घालून शेपटी मी काढून धूर आलो
जबराट....
मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
4 Aug 2008 - 12:59 pm | केशवसुमार
'तो भाग'
रंगाशेठ,
'हा भाग' एकदम झकास.. चालू द्या..
(चतुर )केशवसुमार
4 Aug 2008 - 3:24 pm | विसोबा खेचर
'तो भाग' शेकला पण ना बोललो कुणाला
घालून शेपटी मी काढून धूर आलो
हे बाकी सह्ही लिहिलं आहेस रे रंगा! :)