पारंपारीक ज्ञानाचे जालीय ग्रंथालय

विकास's picture
विकास in जनातलं, मनातलं
19 Apr 2012 - 6:21 am

पूर्वपिठीका:

"पौराणिक विमाने" या चर्चेच्या निमित्ताने येथे माशेलकरांच्या संदर्भात प्रश्न विचारला गेला होता. त्यातील माझ्या लेखी महत्वाचा आणि व्यावहारीक भाग पेटंट्सच्या संद्रर्भात होता. त्याला मी जरी हा प्रतिसाद दिला होता, त्यातील माशेलकरांसंदर्भातील भागः

विकीवरील माहितीप्रमाणे, ‘Managing Intellectual Property’ च्या २००३ - २००५ च्या जागतीक सर्वेक्षणानुसार माशेलकर हे पेटंटक्षेत्रातील जगातील पन्नास दिग्गजांपैकी एक आहेत. त्यांनी भारतात या संदर्भात सरकारपासून औद्योगिक क्षेत्रात जागृती आणली.

भारतातील (आणि तेच इतरत्रही) अनेक नैसर्गिक साधनसंपत्तीचे पेटंट करण्याचा घाट आंतर्राष्ट्रीय कंपन्यांनी घातला होता/ आहे. त्यातील भारतासंदर्भात प्रसिद्ध असलेल्या घटना म्हणजे हळद आणि बासमती... या दोन्हींच्या संदर्भात त्यांच्या नेतॄत्वाखाली युएस (सरकारी) पेटंट संस्थेत आणि आंतर्राष्ट्रीय पेटंट संस्थेत त्यांनी लढत दिली. परीणामी हळद आणि बासमती वाचलेच पण नैसर्गिक साधन संपत्तीचे पेटंट कसे करावे आणि नाही करावे या संदर्भात नवीन धोरणे तयर झाली, ज्याची मदत इतर विकसनशील राष्ट्रांनाही झाली. पेटंट देताना अधिकारी आधी ते ज्ञान उपलब्ध

माझ्या लेखी त्यांनी हे काम अ‍ॅक्टीविझम/चळवळेपणा करण्याऐवजी, सध्याच्या नितीनियमांनुसार केले. सरस्वती आणि लक्ष्मी या एकत्र नांदायला हव्यात, थोडक्यात इंटलेक्चुअल प्रॉपर्टीचे रक्षण होऊन त्यातून वैभव निर्मिती होयला हवी असे काहीसे त्यांचे मत होते/आहे, जे त्यांनी त्यांच्या मर्यादीत क्षमतेत उद्योग आणि सरकारमधे जागृत केले आहे असे वाटते.

त्यावरून अधिक लिहीण्याची इच्छा होती. मात्र आधीच्या पुराणातल्या वानगीच्या चर्चेमुळे या अधुनिक आणि व्यावहारीक जगातील घडामोडीचे वांग्यातले भरीत होऊ नये म्हणून हा वेगळा लेखनप्रपंच. :-)

_______________________________

१९९३ साली मिसिसिपी विद्यापिठाशी संलग्न असलेल्या वैद्यकीय संस्थेने "Use of turmeric in wound healing " साठी अमेरीकन पेटंट संस्थेकडे पेटंट मागितले आणि तसे त्यांना मिळाले देखील. त्यानंतर भारतातील Council of Scientific and Industrial Research (सी एस आय आर) या संस्थेने १९९६ च्या सुमारास या पेटंट्च्या विरोधात अमेरीकन कोर्टात दावा केला की हे आमचे पारंपारीक ज्ञान आहे आणि अशा मुक्तस्त्रोत ज्ञानाचे पेटंट होता कामा नये. येथे अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहीजे की यात भारत सरकारने प्रत्यक्ष भुमिका घेतली नव्हती. सी एस आय आर ही निमसरकारी संस्था असल्याने फारतर सरकार अप्रत्यक्ष होते असे म्हणता येईल. पण खटला अमेरीकन पेटंट्स ऑफिसच्या विरोधात आणि अमेरीकन कोर्टात असल्याने अमेरीकन सरकार मात्र प्रत्यक्ष गुंतले होते. याचा दोन्ही देशात आणि जगात बराच गाजावाजा झाला. सरतेशेवटी कोर्टात सीएसआयआर जिंकले आणि कोर्टच्या आदेशामुळे युएसपेटंट ऑफिसला माघार घ्यावी लागली.

त्याच सुमारास बासमती चे टेक्स्टमती, नीम वगैरेचे पेटंट किस्से उदयास येऊ लागले. असे पेटंटचे हक्क कोणीतरी मिळवल्यावर मग कळणार आणि मग कोर्टात लढायचे... हे चित्र कसे बदलायचे हा प्रश्न होता. भारतापुरते त्याचे उत्तर १९९९ साली सीएसआयआर आणि तत्कालीन Ministry of Health & Family Welfare च्या अख्त्यारीतील Department of Ayurveda, Yoga and Naturopathy, Unani, Siddha and Homoeopathy (Dept. of AYUSH) ने तत्वतः शोधला. त्याचे नाव आहे: Traditional Knowledge Digital Library. (टीकेडीएल). इंग्रजी, डच, स्पॅनिश, फ्रेंच आणि जपानी भाषेत असलेल्या या ग्रंथसंग्रहालयात २००१ ते २०१० च्या काळात प्रामुख्याने वैद्यकीय वनस्पती आणि त्यांचे पारंपारीक ज्ञानाप्रमाणे असलेले उपयोग एकत्रीत केले आहेत. त्याच अनुषंगाने Traditional Knowledge Resource Classification (TKRC) देखील तयार केले गेले आहे. आयुर्वेदीक, उन्नानी, सिद्ध आणि योग अशा पारंपारीक शाखांमधले वैद्यकीय ज्ञान एकत्र करून ते पेटंट ऑफिसर्सना (जे पेटंट्स प्रस्तावाची ग्राह्यता तपासतात) यांना उपलब्ध करून दिले गेले आहे. १४८ पुस्तकांमधली ३४ मिलियन्स पाने संकलीत करून त्यांचे वर सांगितलेल्या भाषांमधे भाषांतर केले गेले आहे. युरोप, युके आणि युएस येथील पेटंट ऑफिसेसना ह्या माहितीचा उपयोग पारंपारीक ज्ञानाचा गैरवापर करून होणारी बायोपायरसी टाळण्यासाठी होत आहे.

वर्ल्ड बँकेच्या २००२ च्या अंदाजानुसार असल्या प्रकारच्या पेटंट्समुळे आणि तत्संदर्भातील जागतीक (TRIP) करारामुळे भारतापुरते बोलायचे तर अंदाजे $३ बिलीयन्सचा तोटा होता. मात्र टिकेडीएल सारख्या प्रकल्पामुळे आता असली पेटंट्स करणे अवघड होऊ शकले.

२०१० पर्यंत युरोपात ३६ तर अमेरीकेत ४० पेटंट्सच्या अर्जांमध्ये या विदाचा उपयोग केला गेला आहे. या संदर्भातील रोचक माहिती तसेच एकूणच या प्रकल्पाची टाईमलाईन येथे बघता येईल. काही उदाहरणादाखलः

Uniliver Nv,Netherland have withdrawn their application no EP1607006 for "Functional berry composition" dated 04 August 2009 after submission of TKDL prior art evidence( s ) .

Purimed Co. Ltd. Seoul, Korea have withdrawn their application no EP1781309 for "Nelumbinis semen extract for preventing and treating ischemic heart disease and pharmaceutical composition and health food containing the same" dated 30 October 2009 after submission of TKDL prior art evidences.

Clara's ApS, Denmark have withdrawn their application no EP2044850 for "Method for altering the metabolism characteristic of food products

Jumpsun Bio-Medicine (Shanghai) Co. Ltd, China have withdrawn their application no EP1889638 for "Medicaments and food for treatment or prevention of obesity and/or diabetes containing cicer arietinum extract"

MDIP LLC, Post Office Box 2630 Montgomery Village, MD, 20886-2630, US, filed a patent application with publication no. 20100291249 entitled "Pomegranate-derived Products for the Treatment of Skin Sores and Lesions", the Examiner rejected claims based on the TKDL evidences

अणि असे बरेच....

समाजविज्ञानशिक्षणसंदर्भमाहिती

प्रतिक्रिया

सहज's picture

19 Apr 2012 - 7:58 am | सहज

माहितीसाठी धन्यवाद.

प्रभाकर पेठकर's picture

19 Apr 2012 - 9:32 am | प्रभाकर पेठकर

अतिशय माहितीपूर्ण लेख. धन्यवाद.

मदनबाण's picture

19 Apr 2012 - 9:56 am | मदनबाण

माशेलकरांसंदर्भातील आणि त्यांच्या कार्या विषयी अत्यंत मोलाची माहिती.:)

जाता जाता :---
हल्ली हिंदुस्थानात डास मारण्यासाठी साध्या बॅटरीच्या रॅकेट्स मिळतात ! त्या चायना मेड असतात आणि या उत्पादनाचे देखील पेटंट चीनने घेतले आहे,पेटंट क्रमांक बर्‍याचश्या रॅकेट्सवर पहायला मिळतो.

(चित्र जालावरुन घेण्यात आलेले आहे.)

मस्त कलंदर's picture

19 Apr 2012 - 10:00 am | मस्त कलंदर

खरंच मोलाची माहिती. आवडले!

शिल्पा ब's picture

19 Apr 2012 - 10:02 am | शिल्पा ब

छान माहीती आहे.

अर्धवटराव's picture

19 Apr 2012 - 10:06 am | अर्धवटराव

याचा उपयोग व्हावा ही सदिच्छा :)

अर्धवटराव

प्रास's picture

19 Apr 2012 - 10:11 am | प्रास

उपयुक्त माहिती.

आता या इथे दिलेल्या दुव्यांचा अभ्यास आवश्यकच झाला.

धन्यवाद विकासराव!

बॅटमॅन's picture

19 Apr 2012 - 11:02 am | बॅटमॅन

सही!!!!! हा डेटाबेस इतका महत्वाचा आहे की काय बोलावे. त्याची लिंक दिल्याबद्दल लै धन्यवाद :)

ही खुप खुप मोलाची माहिती इथं डकवल्याबद्दल आणि तिच्याबद्दल लिहिल्याबद्दल अतिशय धन्यवाद.

नितिन थत्ते's picture

19 Apr 2012 - 11:32 am | नितिन थत्ते

महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

रानी १३'s picture

19 Apr 2012 - 11:41 am | रानी १३

British firm’s bid to patent ginger foiled

New Delhi: India has foiled an attempt by a British pharmaceutical company to claim a patent on using ginger for the treatment of cold.
While Indians have been gulping down ‘adrak chai’ for generations as a home remedy, Nicholas John Larkins, London, filed a patent application (GB2436063) titled “Pharmaceutical composition for the treatment of excess mucous production” on March 16, 2006 at the British patent office. The firm claimed a “unique finding” in the use of ginger (Zingiber officinale) and kutki (Picrorhiza kurroa) for the treatment of cough and lung diseases.
“Within two weeks of India providing evidence, the attempt to pirate India’s traditional medicinal knowledge was struck down by the UK patent office in 2011,” a health ministry official said.
Remedy Rebound
British pharma firm files for patent in 2006, claiming it
discovered use of ginger and kutki plant in treatment of cold
India cited medicinal texts dating back to the 18th century
on use of ginger to treat cough, asthma & lung diseases
British patent office accepts Indian evidence, throws out application 5 years later Ginger a popular cold remedy
New Delhi: An attempt by a British pharmaceutical company — Nicholas John Larkins, London — to claim a patent on using ginger for the treatment of cold was struck down by the UK patent office in 2011 following the evidence provided by India.
The department of AYUSH and Council of Scientific and Industrial Research (CSIR) intervened and provided evidence from age-old ayurveda and unani books, dating back to the 18th century that talked about ginger and kutki being used alone or in combination with other ingredients to treat cough, bronchial asthma and lung diseases.
The books that were referred to as evidence by CSIR included Ilaaj-al-Amraaz (18th century), Bhaisajya Ratnavali and Bharata Bhaisajya Ratnakara (1000 BC), Bayaaze-Kabir (1938 AD), Muheet-e-Azam (19th century) and Khazaain-al-Advia from the 20th century.“India through the Traditional Knowledge Digital Library (TKDL) submitted its prior art evidences on April 25, 2011. The examiner terminated the patent application before grant,” a health ministry official said.
Ginger has been a popular Indian home remedy for treating cough and cold. Ginger tea drunk hot is known to provide relief to the throat. At times, it is mixed with lemon and honey. The high concentration of vitamin C in the drink improves resistance levels, lowers toxicity of the infection and reduces duration of the cold.
Till about 10 years ago, around 2,000 wrong patents concerning indigenous systems of medicine were being granted annually at the international level due to lack of evidence provided by India.
The digital library has been a real boon for India. More than 2.26 lakh rare medical formulations which were part of the ancient Indian texts have been dug out, transcribed, documented and digitized into the path-breaking TKDL to protect them from bio-pirates.
This includes 1.22 lakh unani, 90,000 ayurveda and 15,000 Siddha formulations, which have been transcribed by the department of AYUSH and CSIR from ancient Indian texts written originally in Sanskrit, Arabic, Urdu, Persian and Tamil.

मी पेटंट analyst आहे . पेटंट अर्टीकल आवडला.....:)
Dear all,
Pl. follow the links:
http://goo.gl/BuKz8
http://goo.gl/HirA4

योगप्रभू's picture

19 Apr 2012 - 12:56 pm | योगप्रभू

पौराणिक विमानांच्या धाग्यात प्रतिक्रियेत मी याच माहितीसाठा प्रकल्पाचा उल्लेख केला होता. त्याबद्दल सविस्तर तपशील तुम्ही दिलात. मनापासून धन्यवाद.

क्लिंटन's picture

19 Apr 2012 - 1:07 pm | क्लिंटन

अत्यंत महत्वाची माहिती इथे दिल्याबद्दल धन्यवाद. या माहितीचा सद्यकालीन औषधनिर्माणशास्त्रात किंवा मेडिकल प्रोफेशनमध्ये उपयोग व्हावा हीच सदिच्छा.

माहितीपूर्ण लेखाबद्दल धन्यवाद.

उन्नानी = युनानी असे असावे.

विकास's picture

19 Apr 2012 - 8:08 pm | विकास

वाचक-प्रतिसादकांचे आभार...

@मदनबाणः चीनने डास मारण्याच्या रॅकेट्चे पेटंट घेतले यात नवल नाही. कारण इथे (अमेरीकेत) तर प्रत्येक गोष्टीचे पेटंट घेतात. त्यातूनच त्यांना धंदा करता येतो आणि चोर्‍या नियंत्रीत करता अथवा थांबवता येतात. पेटंट हा मोठा विषय आहे. त्यावर देखील चर्चा करायला हवी आणि सगळ्यांनीच समजून घेयला हवे असे हे प्रकरण आहे.

@प्रास आणि बॅटमॅन: इतका चांगला प्रकल्प राबवणारे चांगले अधुनिक संस्थळ का तयार करत नाहीत हे समजत नाही. :( तुम्हाला तो दुवा वाचनीय वाटतो आणि तसा तो आहे देखील. मात्र त्यातील ग्रंथसंपदा एकतर त्यांनी केवळ पेटंट ऑफिसर्सपुरतीच मर्यादीत ठेवल्याने सहज उपलब्ध नसावी अथवा त्याचे दुवे नीट नसावेत. पण ते नीट स्पष्टपणे सांगितलेले नाही. (हे मी केवळ ग्रंथसंपदेबाबत बोलत आहे, बाकी माहिती उत्तमप्रकारे उपलब्ध आहे). मी अनेक दुवे क्लिक करून पाहीले पण काहीच दिसले नाही. :(

@ रानी १३: वर प्रास/बॅटमनना जे लिहीले आहे त्या संदर्भात काही माहिती आहे का? तसेच अजून काही आपले अनुभव असले तर येथे (या धाग्यात अथवा त्याहूनही उत्तम, वेगळा लेख लिहून) अवश्य सांगावेत ही विनंती.

@क्लिंटनः सद्यकालीन औषधनिर्माणशास्त्रात किंवा मेडिकल प्रोफेशनमध्ये याचा म्हणजे आपल्याकडील तसेच जगातील इतरत्र अनेक देशातील पारंपारीक ज्ञानाचा उपयोग केला जात आहे. मध्यंतरी एकदा एम आय टी. हार्वर्ड मधले संशोधक तसेच या क्षेत्रांमधले यशस्वी उयोजक अशांच्या बरोबर रेस्तॉरंटमधे बसून गप्पा मारायची संधी मिळाली होती. त्यात अशा पद्धतीचे संशोधन एकत्रित करायला कंपन्या कशा चालू झाल्यात वगैरेची स्वानुभवी माहीती त्यांच्याकडून समजली. ज्या गोष्टींवर आपण (तुम्ही आणि मी देखील) विश्वास ठेवू शकणार नाही आणि विचार करायचे सोडून देऊ, अशा काही गोष्टींबद्दल पण त्यांची तितक्याच संशोधकी वृत्तीने चर्चा चालू होती. आपण बीजगणित-भुमितीत एक "इन्डायरेक्ट प्रूफ" हा प्रकार करायचो. म्हणजे एक गोष्ट सत्य (अथवा असत्य) आहे असे गृहीत धरायचे आणि समिकरणे मांडत जायचे. उत्तर विरोधात गेले तर ते इन्डायरेक्ट प्रूफ, उत्तराने सिद्ध झाले तर अर्थातच डायरेक्ट प्रूफ! पण प्रूफ शोधल्याशिवाय चूक अथवा बरोबर काहीच म्हणायचे नाही... असे काहीसे या लोकांचे संशोधकी वागणे वाटले.

@यकु: उन्नानी = युनानी असे असू शकेल. दुरुस्ती सुचवल्याबद्दल धन्यवाद.

------------------------

बाकी ह्या लेखाची सुरवात मी हळदीच्या पेटंटच्या केसने केली होती. त्यातील एक मजेशीर माहिती आता देतो: हा प्रकार घडला तेंव्हा अमेरीकन कंपन्या आणि अमेरीकन पेटंट सिस्टीम्सच्या विरोधात बरेच काही बोलले गेले. बर्‍याचदा ते खरे देखील असते. (उ.दा. मोन्सॅंटॉ सारखी कंपनी). हळदीच्या पेटंटसंदर्भात केलेल्या अर्जात हे संशोधक काय शोध लावला म्हणतात? "A method of promoting healing of a wound in a patient, which consists essentially of administering a wound-healing agent consisting of an effective amount of turmeric powder to said patient. "

पण गंमत म्हणजे हळदीचे पेटंट फाईल करणारे मिसिसिपी (अमेरीकन) विद्यापिठ असले तरी त्यातील संशोधक हे सर्व भारतीय / भारतीय वंशाचेच होते!

पिवळा डांबिस's picture

20 Apr 2012 - 12:56 am | पिवळा डांबिस

तुमचे शेवटचे वाक्य सत्य आणि महत्वाचे आहे...
पण ती गंमतीची नव्हे तर मोठ्या शरमेची गोष्ट आहे!!!
:(

बाकी उत्तम धागा आणि माहिती दिली आहे.

विकास's picture

20 Apr 2012 - 1:18 am | विकास

शरमेचीच बाब आहे. गंमत हे चांगल्या अर्थाने म्हणायचा उद्देश नव्हता तर कॉपी पकडणारे आणि कॉपीमास्टर्स दोन्ही भारतीयच होते असे अप्रत्यक्ष सांगाताना उपरोधाने वापरले होते.

पिवळा डांबिस's picture

20 Apr 2012 - 11:08 pm | पिवळा डांबिस

गंमत हे चांगल्या अर्थाने म्हणायचा उद्देश नव्हता तर कॉपी पकडणारे आणि कॉपीमास्टर्स दोन्ही भारतीयच होते असे अप्रत्यक्ष सांगाताना उपरोधाने वापरले होते.
मग चालू द्या....

पैसा's picture

19 Apr 2012 - 11:01 pm | पैसा

उत्तम माहितीपर लेख. लेखातले दुवे बरेच माहितीपूर्ण वाटताहेत. वेळ काढून नीट वाचले पाहिजेत.

सुनील's picture

20 Apr 2012 - 4:45 am | सुनील

हेच म्हणतो. दुवे शांतपणे नीट वाचायला हवेत.