मागच्या भागात (भाग १) टकीलाचा इतिहास (पल्के, अगावेचे फळ, भौगोलिक स्थान वगैरे) बघितला. आता ह्या भागात बघूयात टकीलाचे वेगवेगळे प्रकार. मागच्या भागात बघितल्याप्रमाणे टकीला ही ब्लु अगावेपासून बनवतात. ह्या ब्लु अगावेच्या वापरल्या गेलेल्या प्रमाणामुळे टकीलाचे ढोबळमानाने २ मुख्य प्रकार पडतात.
१. टकीला : ह्या प्रकारात ब्लु अगावेचे प्रमाण १००% असते.
२. मिक्सटो : ह्या प्रकारात ब्लु अगावेचे प्रमाण कमीत कमी ५१% इतके असते. बाकी उसाचा रस किंवा वेगळ्या ग्लुकोज किंवा फ्रुक्टोज रुपातील साखर असते.
टकीला NOM
मेक्सिको सरकारने टकीलावर स्वामित्व प्रस्थापित करण्यासाठी टकीलाची मानके ठरवली आहेत त्यांना NOM (NORMA OFICIAL MEXICANA) असे म्हणतत. प्रत्येक बाटलीवर NOM नंबर असावा लागतो. हा नंबर मेक्सिको सरकार प्रत्येक डिस्टीलरीला देते. NOM + हा नंबर टकीलाचे 'ओरिजिनल'त्व ठरवतो.
ह्या ओरिजिनल टकीलाचे मुरवण्याच्या कालावधीनुसार पाच वेगवेगळ्या प्रकारात बॉटलिंग केले जाते.
१. सिल्वर - प्लाटा [Blanco - White | Plata - Silver]
ह्या प्रकाराला Blanco (White) असेही म्हणतात.
डिस्टीलेशन नंतर लगेचच किंवा जास्तीत जास्त दोन महिने स्टील टॅंक मध्ये ठेवून बाटलीबंद केलेली ही टकीला सिल्व्हर किंवा व्हाईट म्हणून ओळखली जाते. म्हणजेच कास्कमध्ये न मुरवल्यामुळे हीचा रंग सोनेरी नसतो. त्यामुळे ह्या टकीलाला १००% अगावेचा गोडवा असतो. कास्कमध्ये न मुरवल्यामुळे अल्कोहोलचा हार्शनेस असतो ह्या टकीलाला. म्हणूनच ह्या प्रकारची टकीला शॉट ग्लासमधून एका झटक्यात रिचवायची असते.
२. गोल्ड - ओरो [Gold - Oro | Young - Joven]
हा प्रकार बनविण्यासाठी ब्लांकोत कॅरॅमल कलर्स, ओक लाकडाचा अर्क आणि वेगवेगळी साखरेची सिरप्स वापरून सोनेरी(ओरो) रंग आणला जातो बाटलीबंद करण्याआधी. ह्यामुळे मुरलेल्या टकीलाचा आभास निर्माण होतो. ह्या जास्त करून मिक्सटो, ५१% अगावे वापरलेल्या, टकीला असतात. अगावे व्यतिरीक्त वापरलेल्या ह्या अतिरीक्त घटकांमुळे अल्कोहोलचा हार्शनेस कमी होतो व ती थोडी स्मुथ होते. टकीलापासून बनणार्या कॉकटेल्ससाठी टकीलाचा हा प्रकार जास्त वापरला जातो.
३. रेस्टेड - रेपोसॅडो (Reposado)
ब्लांकोला २ महिन्यांपसून ते जास्तीत जास्त १ वर्षांपर्यंत कास्कमध्ये मुरवूत ठेवून नंतर बाटलीबंद केला जाणारा हा प्रकार सर्वात जास्त विकली जाणारी टकीला आहे. गोल्ड किंवा ओरो ह्या प्रकाराच्या उलट, कास्कच्या लाकडाचे गुणधर्म घेऊन ह्या टकीलाला रंग आणि गंध नैसर्गिकरीत्या प्राप्त होतो. टकीला मुरवण्यासाठी वापरण्यात येणारे कास्क्स अमेरिकन किंवा फ्रेंच ओक लाकडापासून बनवलेले असतात. हे कास्क्स नविन लाकडापासून बनवलेले असतात पण काही कंपन्या बर्बन, स्कॉच आणि कोन्यॅक मुरवण्यासाठी वापरलेले जुने कास्क्स वापरतात. जुन्या कास्कमुळे त्यांच्यामध्ये असलेल्या मुळ मदिरेचा किंचीत स्वाद टकीलाला प्राप्त होतो आणि चव आणखिन मजेदार होते.
४. एज्ड(विंटेज) - अनेजो (Añejo)
१ वर्षापेक्षा जास्त आणि जास्तीत जास्त ३ वर्षांपर्यंत कास्क मध्ये मुरवत ठेवून त्यानंतर बाटलीबंद केलेली ही टकीला लाकडाशी जास्त काळ संपर्कात येऊन खूपच कॉम्प्लेक्स होते. ही टकीला खूपच 'रीच' असते चवीला. ह्या प्रकारची टकीला चवीला खुपच कोम्प्लेक्स आणि रीच असल्यामुळे शॉट ह्या पद्धतीने पिण्याऐवजी स्निफ्टर ग्लास किंवा Ouverture Tequila glass ह्यांतून मस्त एक एक सीप घेत अनुभवायची असते.
५. एक्स्ट्रा अनेजो ( Extra Añejo)
हा प्रकार २००६ पासून मान्यता प्राप्त झाला आहे. कमीत कमी ३ वर्ष मुरवत ठेवून मग ही टकीला बाटलीबंद केली जाते. ही अतिशय उच्च दर्जाची टकीला असते त्यामुळे तेवढीच महागही असते.
वर्म टकीला
टकीलाच्या बाटलीमध्ये एक अळी (Worm) असलेली टकीला असते अशी एक वंदता आहे. पण खर्या आणि ओरिजिनल टकीला मध्ये कधीही अळी नसते.
मेझ्कल
अळी असणारी, अगावे (Agave Americana) पासून बनणारी मदिरा असते मेझ्कल. ही मेक्सिकोच्या टकीलाची पाच राज्ये सोडून इतर राज्यांमध्ये बनते. हीला टकीला म्हणता येत नाही कारण ही ब्लु अगावेपासून बनत नाही. Gusano de Maguey नावाची अळी ह्या मेझ्कल मध्ये असते. ही अळी हे एक मार्केटींग गिमीक आहे. ही अळी अल्कोहल कंटेंट किती स्ट्रॉन्ग आहे दर्शवते. जर बाटलीच्या तळाशी असलेली अळी खराब झालेली नसेल तर अल्कोहोल कंटेंट खुपच ग्रेट असे दर्शवायचे असते.
टीपः बाजूच्या चित्रात बाटलीच्या तळाशी अळी आहे.
टकीला पिण्यासाठीचे वेगवेगळे ग्लासेस
टकीला शॉट ग्लास
टकीला ओव्हर्चर ग्लास
मार्गारीटा कॉकटेल ग्लास
नोट: सर्व चित्रे आंजावरून साभार
(क्रमश:)
प्रतिक्रिया
26 Mar 2012 - 12:26 am | JAGOMOHANPYARE
छान
26 Mar 2012 - 9:39 am | पैसा
या विषयात एवढा अभ्यास करण्यासारखं आहे हेच माहिती नव्हतं. दारवांच्या बाटल्या आणि ग्लासांचे आकार छान दिसतात हे नक्की!
26 Mar 2012 - 2:16 pm | निश
सोत्रि साहेब, तुमचो लेख आवडल्यानी पण...
तुमचे लेख चांगले असता वाचुक पण एक सांगा माका सोत्रि साहेबानु ,एक सारखे दारु वरचे लेख लिहुन तुमका कंटाळो येणा नाय?
तरीही तुमचे लेख वाचुक बरे वाटतत माहीती म्हणुन चांगले असतत.
नाहीतर माझ्या सारख्या दारु न पिणार्याक हे लेख वाचुनच झिंग चढता ताही नसे थोडक्या.
26 Mar 2012 - 2:22 pm | प्यारे१
२४७ वा चने आणि ३ प्रतिसाद?
कुछ तो गडबड है दया कुछ तो गडबड है|
तोड दो दरवाजा! ;)
26 Mar 2012 - 2:26 pm | पैसा
सोत्रिचे गेले ३ धागे वाचून पब्लिकला सामाजिक जाणिवेची नशा चढली होती. हा सोबर धागा पाहून ती उतरली!
26 Mar 2012 - 6:44 pm | अत्रुप्त आत्मा
@हा सोबर धागा पाहून ती उतरली!>>>
बाकी सोत्री---नेहमीप्रमाणे रॉक्स...!
26 Mar 2012 - 4:21 pm | माझीही शॅम्पेन
राखिव :)
26 Mar 2012 - 7:23 pm | तर्री
नेहमी प्रमाणे धुंद करून सोडणारे लेखन.
दारवांचे अप्रुप नाही आणि मध्यपींचे वावडे नाही तरी ही सोत्री चा लेख एकदम कडक हे मात्र खरेच.
26 Mar 2012 - 8:29 pm | सोत्रि
चिंकांनी हा मुद्दा माझ्या खरडवहीत मांडला होता. त्याचे उत्तर:
साखरेचे सिरप्स म्हणजे एक्झक्टली डोळ्यासमोर येतात तशी सिरप्स नसतात.
फ्लेवर म्हणजे चव वाढवण्यासाठी साखरेचे सिरप्स बेस्ड द्रव्ये वापरली जातात. त्यामुळे ही टकीला हलक्या दर्जाची असते आणि कॉकटेल्स करण्यासाठी वापरली जाते.
26 Mar 2012 - 8:43 pm | आत्मशून्य
एकदा ऑफिसच्या पार्टीमधे गप्पात टकिलाचा विषय आला त्याबरोबर एक मुलगी एकदम उसळुन चित्कारली की तिला एक विचीत्र पध्दत माहीत आहे टकीला प्यायची. याबरोबर टीएलने तिला हसुन दुजोरा देत म्हटले की हो हो त्यालाही ते माहीत आहे. पण प्लिज इथं ते सांगण्यासारख नाहीये म्हणुन यावर बोलायला नको.(वरील संवाद हिंदीत घडला).
चायला ? डोक्याला शॉटच लागला, अशी कोणती गोश्ट आहे टकीला पिण्याच्या विशीष्ठ पध्दतीबाबत जीची चर्चा चक्क ऑफीसपार्टीत उघड उघड होऊ नये म्हणुन टीएलनेही हस्तक्षेप केला ? काही क्लु आहे का या विचीत्र प्रकाराबाबत ? का उगाचच केलेली हाइप होती ती ? कारण नंतर कोणाकडुनच यावर जास्त माहीती मिळाली नाही ?
26 Mar 2012 - 10:34 pm | सोत्रि
आहे आहे एक फ्रेंच पद्धत आहे, व्यनी करतो :)
- (फ्रेंच) सोकाजी
26 Mar 2012 - 11:01 pm | वाटाड्या...
दादा मला पण फार उत्सुकता आहे. आमच्या ऑफिसमधे सुद्धा एक कार्ट आहे जे मला सारखं म्हणतं त्या पद्धतीबाबत पण लेकाचं कधी डिटेल्स देत नाही...जरा मला पण सांगशील का?
- वा
26 Mar 2012 - 11:59 pm | किचेन
आयला, दारू प्यायची अशी कोणती जगावेगळी पद्धत जी व्यनी करून सांगावी लागते?आमि पित नाहि पण असू द्यावं जनरल नॉलेज!
27 Mar 2012 - 12:35 am | आत्मशून्य
सोकाजीराव व्यनीबद्दल मनापासुन धन्यवाद. सगळेच मिपाकर रसीक आहेत अशी श्रध्दा मनात बाळगून शक्य झाल्यास सर्वच रसीकांना आपल्या माहीतीचा लाभ द्यावा ही विनंती.
27 Mar 2012 - 12:46 am | किचेन
आम्हाला पण टाका व्यनी आम्ही जपानी पद्धतीने नमस्कार करू!
27 Mar 2012 - 12:54 am | आत्मशून्य
असं व्यनीमधील संभाषण विनापरवानगी उघड करणं संस्थळाच्या नियमा बाहेर असल्याने माझे हात बांधील आहेत. ;)
28 Mar 2012 - 7:26 pm | सोत्रि
विनंतीचा मान राखून, खास लोकाग्रहास्तव, टकीलाच्या भाग ३ (अंतीम) मध्ये ही माहिती टाकतो :)
- (विनम्र) सोकाजी
28 Mar 2012 - 7:33 pm | मी-सौरभ
वाट बघितल्या जाईल :)
27 Mar 2012 - 12:04 am | किचेन
दोनही भागात तुम्ही ताकीलाची किवा दारूची महती आणि माहिती सांगताय अस आजीबात वाटल नाही.अगदी तीर्थाचा उगम कसा झाला, तीर्थ बनवण्याची पाककृती इतक सोबर वाटल.कुठेही भडकपणा नाही.खूप चान.आता मलाही एकदा टेस्ट करावीशी वाटतीये.पण वपुंच एक वाक्य कायम लक्षात ठेवून असते.' दारू सोडायचा क्षण हा दोरूचा पहिला घोट घेण्याआधी येतो'
27 Mar 2012 - 6:43 pm | इष्टुर फाकडा
हि स्वीडन ची पद्धत आहे. बघा जम्तीये का ;)
http://www.youtube.com/watch?v=qq6iEKVLzWY&feature=fvst