मागच्या भागात वाइनचे वर्गीकरण बघितले. आता एक एक कॅटेगरी बघुयात!
आज चर्चा करुयात व्हाइट वाइनची (श्वेत वारुणी)
जरी ह्या वाइनला व्हाइट वाइन म्हटले जात असले तरीही हिचा रंग श्वेत नसतो. हा रंग साधारण पिवळसर, हलका सोनेरी किंवा गवताच्या सुकलेल्या काडीच्या रंगासारखा असतो. हा श्वेतसदृश्य रंग ही वाइन बनवण्यासाठी वापरल्या जाणार्या द्राक्षाच्या प्रतीवर आणि प्रजातीवर अबलंबुन असतो.
व्हाइट वाइन ही प्रामुख्याने पिवळ्या किंवा श्वेतवर्णिय द्राक्षांपासुन बनवली आते. काही लाल रंगांच्या द्राक्षांच्या जातीपासुनही त्या द्राक्षाची साल न वापरता व्हाइट वाइन बनवली जाते. हे थोडे चमत्कारीक आहे पण खरं आहे. :)
आपल्या अंगात भिनणार्या प्रत्येक प्रत्येक व्हाइट वाइनला स्वतःचे असे एक अंग असते.
आता अंग म्हणजे काय? हे अंग म्हणजे वाइनचा चिकटपणा (Viscosity) किंवा प्रवाहीपणा.
ह्या अंगाचे प्रकार असे असतात:
- हलके अंग (Light-bodied) - शेलाट्या बांध्याची ही वाइन म्हणजे कतरीना कैफ :)
- मध्यम अंग (medium-bodied) - मध्यम बांध्याची ही वाइन म्हणजे उमेदीतली जुही चावला :)
- भरलेले अंग (full-bodied) - भरल्या अंगाची ही वाइन म्हणजे शिल्पा शिरोडकर :)
थोडक्यात अनुक्रमे दुध, सायीचे दुध आणि बासुंदी ह्यांच्यात जो फरक तोंडभर घोट घेतल्यावर कळेल तसाच फरक वाइन वाइन च्या अंगामधेही असतो.
हलक्या अंगाबरोबरच व्हाइट वाइन ही रेड वाइनच्या तुलनेत खुपच कमी ऍसिडीक म्हणजे अल्कोहोलचे कमी प्रमाण असणारी असते तसेच तुलनेने अंमळ गोड असते.
आता जरा "Top Eight" अश्या व्हाइट वाइनसाठी वापरण्यात येणार्या द्राक्षाच्या जाती (Varieties) बघुयात.
Chardonnay
व्हाइट वाइनसाठी वापरण्यात येणार्या सर्व प्रजातींमधे ही प्रजात "राणी" किंवा "Queen" म्हणुन ओळखली जाते. ह्या व्हाइट वाइनच्या लोकप्रियतेचे महत्वाचे कारण म्हणजे सर्व प्रकारच्या वातावरणात ह्या द्राक्षाच्या प्रजातीचे उत्पादन करता येउ शकते. त्यामुळे जगात जिथे जिथे वाइन तयार केली जाते तिथे तिथे ह्या प्रजातीचे उत्पादन करता येते.ह्या द्राक्षाची चव न्युट्रल असते त्यामुळे ह्या द्राक्षापासुन बनवलेल्या वाइनला ओक लाकडाचा स्वाद आणि गंध जास्त प्रमाणात असतो. (ओकच्या कास्क मधे मुरवल्यामुळे)
ह्या द्राक्षापासुन बनवलेल्या वाइन ह्या full-bodied म्हणजेच भरलेल्या अंगाच्या असतात. मध्यम ते जास्त अशी ऍसीडीटी असते ह्या वाइनची. ओक, वॅनिला, बटर अश्या वेगवेगळ्या चवीत शार्डने वाइन मिळते.
Chenin Blanc
फ्रान्स मधल्या Loire Valley तसेच अमेरिकेतील कॅलिफोर्निआ इथे तयार होणार्या ह्या द्राक्षापासुन तयार होणार्या वाइन्सना शिनेन ब्लांक असे नाव मिळते.ह्या वाइनची चव ही द्राक्षे कुठल्या वातावतणात आणि कुठ्ल्या प्रकारच्या मातीत तयार झाली आहेत त्यावर अवलंबून असते. म्हणज़े वेगवेगळ्या देशात तयार झालेल्या ह्या वाइनच्या चवीत फरक असतोच. फ्रान्समधे तयार होणारी शिनेन ब्लांक सर्वांत चवदार असते.
ह्या वाइन्स Light-bodied म्हणजेच हलक़्या अंगाच्या असतात.
Gewurztraminer
जर्मनी आणि फ्रान्समधे आल्प्स पर्वतराजींच्या कुशीत तयार होणारी ही द्राक्षे ह्या प्रांतातील थंड वातावरणात पिकल्यावर त्यांपासुन तयार होणारी वाइन म्हणजे Gewurztraminer (मराठी उच्चार करायच्या भानगडीत पडलो नाही). Gewurztraminer चा अर्थ स्पायसी असा आहे.ह्या वाइन्स Light-bodied म्हणजेच हलक़्या अंगाच्या असतात आणि नावाप्रमाणे जरा स्पायसी असतात.
Pinot Gris or Pinot Grigio
इटली मधे आणि फ्रान्सच्या Alsace प्रांतात तयार होणार्या द्राक्षांना पिनॉट ग्रीझो असे म्हणतात तर अमेरिकेत ह्या द्राक्षांना पिनॉट ग्रीस असे म्हणतात. ह्या द्राक्षापासुन तयार होणार्या वाइनची चव ते द्राक्ष कुठे तयार झाले आहे त्यावर खुपशी अवलंबुन असते.युरोप मधे तयार होणार्या ह्या वाइन्स Light-bodied असतात तर अमेरिकेत तयार होणार्या वाइन्स medium-bodied असतात.
Riesling
जर्मनी, फ्रान्सचा Alsace प्रांत आणि अमेरिकेत न्यु यॉर्क मधल्या Finger Lakes येथे ह्या द्राक्षांची पैदास मोठ्या प्रमाणात होते.
युरोप मधे तयार होणार्या ह्या वाइन्स Light-bodied असतात तर अमेरिकेत तयार होणार्या वाइन्स medium-bodied असतात.
ह्या वाइन्स मुरवत ठेवत नाहीत (No Aging) त्या 'तरुण' असतानाच त्यांचा लुत्फ घ्यायचा असतो. मुरवत न ठेवल्यामुळे ह्या वाइन्सना ओक लाकडाचा फ्लेवर आणि अरोमा नसतो.
Sauvignon Blanc
ह्या द्राक्षापासुन बनणारी वाइन फुमे ब्लांक (Fumé Blanc) म्हणुनही ओळखली जाते. ही द्राक्षे फ्रान्समधे Bordeaux आणि Loire प्रांतात होतात. तसे ती अमेरिका, न्युझिलंड आणि साउथ अफ्रिकेतही तयार होतात.
Semillon
फ्रान्स आणि अमेरिकेतील कॅलिफोर्निआ येथे तयार होणार्या ह्या द्राक्षांपासुन व्हाइट वाइन तयार केली ज़ाते.ह्या द्राक्षांचा Sauvignon Blanc ह्या द्राक्षांबरोबर ब्लेंड करुन "डिझर्ट" वाइन बनवतात.
Viognier
फ्रान्स आणि अमेरिकेतील कॅलिफोर्निआ येथे तयार होणार्या ह्या द्राक्षांपासुन व्हाइट वाइन तयार केली ज़ाते.ह्या वाइन्स मुरवत ठेवत नाहीत (No Aging) त्या 'तरुण' असतानाच त्यांचा लुत्फ घ्यायचा असतो.
व्हाइट वाइन कशी प्यावी
चांगल्या वाइन्स चुकीच्या पद्धतीने सर्व्ह केल्यास अथवा प्यायल्यास अतिशय वाइट लागु शकतात, तर सो सो वाइन्स ह्या योग्य पद्धतीने सर्व्ह केल्यास आणि प्यायल्यास अत्युच्च अनुभुती देउ शकतात. वाइन सर्व्ह करताना योग्य ग्लास वापरणे फार गरजेचे असते. तसेच योग्य तापमानाला वाइनचा स्वाद आणि गंध (दरवळ) खुलतो आणि वाइनची लज्जत वाढते.
व्हाइट वाइनचे योग्य तापमान
ह्या वाइन्स 'चिल्ड' घ्यायच्या असतात! पिताना वाइनचे तापमान 5-7 डिग्री सेल्शिअस असावे. ह्या तापमानाला स्वाद आणि गंध (दरवळ) 'गजब ढाता है' :)
व्हाइट वाइनसाठी वापरायचा ग्लास हा असा असावा:
व्हाइट वाइनसाठी वापरायचा ग्लास हा रेड वाइन ग्लास पेक्षा थोडा लंबुळका असतो. त्याचे तोंड हे लहान असते. तोंड लहान असण्याचे कारण हवेशी संपर्क कमी होउन ओक्सीडेशन कमी करणे. त्याच बरोबर व्हाइट वाइनचे तापमान कमी ठेवले जाण्यासही लहान तोंड मदत करते.
व्हाइट वाइन कधी प्यावी
व्हाइट वाइन जेवणापुर्वी आणि/किंवा जेवताना जेवणाबरोबर घायची असते. (जेवणानंतर घ्यायच्या डिझर्ट वाइन्स वेगळ्या असतात)
व्हाइट वाइन बरोबर काय खावे
"white wine with white meat" हा व्हाइट वाइन पिण्याचा 'थंब रुल' आहे असे म्हणण्यास हरकत नाही.
साधारणपणे सी फुड बरोबर व्हाइट वाइन्स मजा आणतात. शाकाहारी असाल तर साधारण गोड आणि क्रिमी ग्रेव्ही असलेल्या डीश बरोबर एकदम उत्तम.
नोट: सर्व चित्रे आंतर्जालावरून साभार
(क्रमश:)
प्रतिक्रिया
26 Sep 2011 - 6:17 pm | परिकथेतील राजकुमार
चित्र आंतरजालाव्रुन.
26 Sep 2011 - 6:40 pm | स्मिता.
आमच्याच अवतीभोवती वेगवेगळ्या वारूणीच्या एवढ्या व्हरायटीज असताना स्वतः जराही अभ्यास न करता केवळ ऐकीव (अर्थात कधीही चांगलीच) Bordeaux वर अवलंबून राहण्याची गरज नाही ;)
सोकाजी, हा लेखसुद्धा छानच! पुढचेही येवू द्यात.
26 Sep 2011 - 7:59 pm | Mrunalini
खुपच छान.. आता एकदम आवडत्या रेड वाइनच्या प्रतिक्षेत. ;)
26 Sep 2011 - 9:34 pm | nishant
काय झकास लिहिल आहे... व्हाइट , रेड बरोबर स्पारक्लिग ब्लु वाइनची पण माहिती द्यावी...
26 Sep 2011 - 9:42 pm | सोत्रि
विजुभाऊ
Mon, 26/09/2011 - 19:37
सोकाजी
वाईन नेहमी विशिष्ठ तापमानातच ठेवावी असे काही आहे का?
काही दुकानात कपाटातल्या वाइन ची बाटली चक्क उन्हात होती.
अशा मुळे वाईन अधीक फर्मेन्ट वगैरे होते का? त्याचा चवीवर काही परीणाम होतो का?
विजुभाउंनी खवत हा छान प्रश्न विचारला आहे. सर्वांना उत्तर कळावे म्हणुन इथे 'चोप्य पस्ते' करतो आहे :)
-------------------------------------------------------------------------------------------------------------
कोण म्हणे हा दुकानदार? त्याच्या थोतरीत ठेउन त्याचे लायसंस जप्त करा!
वाइन साठवायचं तापमान हे १५ - २० डीग्री सेल्शिअस इतके असावे लागते. म्हणजे रूम टेंपरेचर.
( भारतात हेच रूम टेंपरेचर 25-30 डीग्री सेल्शिअस असते.) :(
प्यायच्या आधि स्टोर मधुन काढुन फ्रिझ मधे पिण्यायोग्य तापमान करावे लागते.
परदेशात बहुतेक घरांना तळघर असते आणी तिथे वाइन्च्या बाटल्या स्टोअर करुन ठेवलेल्या असतात.
त्या तळघराच्या अंधार्या, कुंद वातावरणात ती वाइन मस्त टिकते.
उच्च तापमानाला वाइन खराब होते. तीच्या रंगावरून ते ओळखता येउ शकते. ती ब्राउन रंगाची होते खराब झाल्यावर.
27 Sep 2011 - 12:01 am | आत्मशून्य
पण मालक या वेळी लेखामधे खूस्खूषीतपणा मिस्कीलता कींचीत (एकदम कींचीत) कमी वाटली, कसयं लाउंजचे लेख वाचताना चकणा म्हणून त्येचाबी लय उप्योग अस्तू.
27 Sep 2011 - 10:47 am | सोत्रि
आत्म्शून्य, धन्यु!
मलाही ते जाणवले खरे!
पुढच्या लेखापासुन नक्की काळजी घेइन :)
- (मिस्कील) सोकाजी
27 Sep 2011 - 2:18 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
सोकाजी*, लेख उत्तम. माहितीचे संकलन आणि सादरीकरणाची पद्धत आवडली. (फक्त चित्रं कुठून घेतली त्याचा उल्लेख केलास तर उत्तम.)
वारूणींबद्दल बोलायचं तर अभ्यास पाहिजे. श्वेतवारूणींचा मी अभ्यास केलेला नाही त्यामुळे इथे बोलण्यापेक्षा रक्त वारूणींच्या लेखाची उत्सुकतेने वाट पहात आहे.
गेल्याच विकेण्डला तुझा लेख वाचण्याचा फायदा झाला. एका ओळखीच्या कुटुंबात गेलो होतो तिथे काकांनी विचारलं, "भारतातल्या कोणत्या वाईन्स तुला आवडतात?" तेव्हा रक्त वारूणींमधे झिनफन्डेलचं नाव घेतल्यावर झिनफन्डेल ही रक्तवारूणी का गुलाबी यावरून चर्चा झाली. धनंजयच्या प्रतिसादाला स्मरून मी विकीपिडीयावरच मी हे वाचलं हे सांगितलं.
*एवढी चांगली माहिती देणारा लेख लिहील्यावर तुला "सोक्या हलकटा" वगैरे कसं म्हणायचं? ;-)
27 Sep 2011 - 10:45 am | सोत्रि
धन्यु! लेख अपडेट केला आहे.
- (*) सोकाजी
27 Sep 2011 - 11:35 am | परिकथेतील राजकुमार
हा असला प्रश्न विचारणारे काका धन्य आणि त्यावर सखोल चर्चा करणारी पुतणी महाधन्य.
मुळात स्त्रीयांनी दारु प्यावीच कशासाठी ? आणि समजा दोन घोट घेतलेच, तर त्याची ही अशी जाहिर चर्चा करुन काय साध्य करायचे असते ? पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करण्यासाठी अजुन बरीच उत्तम क्षेत्रे मोकळी आहेत. नको तिथे बरोबरी कशाला ? आपण किती पुढारलेले आहोत हे दाखवण्यासाठी का विदेशातल्या प्रगल्भतेचा तोरा मिरवण्यासाठी ? हीच आपली संस्कृती आहे का ?
27 Sep 2011 - 12:32 pm | श्रावण मोडक
धर्म बुडाला. संस्कृती बुडाली. काय दिवस आलेत, पऱ्याशी सहमत व्हावं लागतंय. ;)
27 Sep 2011 - 2:31 pm | स्मिता.
स्त्रियांनी सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने माजी मारलेली बघून आपल्या मनात असुरक्षितता निर्माण झालेली वरच्या प्रतिसादातून दिसून येतेय. संस्कृती-संस्कृतीच्या नावाखाली किती दिवस स्त्रियांना आपल्या इच्छेनुसार कठपुतली बनवून वागवणार?
एखाद्या स्त्रिने केलेल्या कोणत्याही कृत्याने जर कुणालाच काही हानी होत नसेल तर त्या कृत्याबद्दल तिच्या मनात अपराधीभावना आणण्याचे कारण काय?
>>मुळात स्त्रीयांनी दारु प्यावीच कशासाठी ?
ज्यासाठी पुरुष पितात त्याचसाठी! ;)
27 Sep 2011 - 2:46 pm | परिकथेतील राजकुमार
वरिल प्रतिसादातून मी कुठेही कठपुतली बनवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसले तुम्हाला ? उलट मी संस्कृती, लज्जा ह्यांची स्त्रियांकडून असलेली अपेक्षा व्यक्त केली.
आणि असुरक्षितता कसली ? उलट इतर क्षेत्रातील स्त्रियांची प्रगती बघून आम्हाला अभिमानच वाटतो. राखी सावंत, पूनम पांडे, भंवरीदेवी, शबाना आझमी ह्यातर आमच्या फेवरेट आहेत.
परवाच एका स्त्री ने दारु पिऊन नवर्याचा खून केल्याची बातमी वाचनात आली. आमच्या एका काकांच्या चपला त्यांच्याच घरातून एके रात्री पार्टीनंतर नाहिशा झाल्या. त्या पार्टीतील एका स्त्री वर अजूनही बर्याच जणांन संशय आहे, की तिने अंमळ दारुच्या नशेत चपला बदलल्या.
ते जास्तीत जास्त वेळ घराबाहेर आणि सुखाने राहता यावे म्हणून दारु पित असतात ;)
27 Sep 2011 - 6:08 pm | सोत्रि
फुटलो! खपलो!! वारलो!!!
धर्म बुडाला. संस्कृती बुडाली. हे श्रामोंचे म्हणणे पटले हो!
- (दारू संस्कृती रक्षक) सोकाजी
27 Sep 2011 - 3:13 pm | गवि
स्त्रियांनी दारु पिऊ नये किंवा सिगरेट ओढू नये असं मला मुळीच वाटत नाही. किंबहुना असं सांगणारे आम्ही कोण?
आणि जणू स्त्रिया माझ्या, पराच्या किंवा इतर कोणाच्या सांगण्याची वाटच पाहताहेत.. किंवा आम्ही जणू त्यांना पिण्यापासून थांबवूनच धरलंय , न पिण्यापासून थांबवून धरलंय वगैरे वगैरे असं काही काही नाही.
मी माझ्या घराजवळच्या कॉलसेंटरबाहेर सिगरेट ओढणार्या मुली प्रत्येक वेळी येताना आणि जाताना पहात असतो.
मला वाईट वेगळ्या अर्थाने वाटतं. वर्षानुवर्षं स्त्री असण्यातल्या अनेक "गमावण्यां"सोबत किरकोळ नकळत फायदा म्हणजे "केवळ स्त्री असल्याच्या व्हर्च्यूने" ज्या अपायकारक गोष्टी (सिगरेट) स्त्रिया करत नव्हत्या त्या आता स्वातंत्र्य म्हणून करतात, म्हणजे त्यांचं या घातक गोष्टीपासून आपापतः इन्सुलेशन होत होतं ते नाहीसं झालं.
अर्थात त्याच्या बदल्यात मुलींना खूप चांगल्या गोष्टी मिळाल्या. मुलांसारखं कधीही कुठेही हिंडण्यातली मजा. रात्रीबेरात्री चहाच्या ठेल्यावर गरम वाफाळता ग्लास घेऊन गप्पा मारणं, चांगला पगार आणि आर्थिक लिबर्टी आणि बरंच काही जे पूर्वी नव्हतं. त्याचा आनंदच आहे.
पण व्यसनं पूर्वी नव्हती ती तशीच (नसलेली) ठेवली तर अधिकच विन स्थिती नाही का होणार?
27 Sep 2011 - 4:11 pm | स्मिता.
(या एकाच प्रतिसादात परा आणि गविंच्या प्रतिसादाला उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे.)
गवि, तुमचा मुद्दा बरोबरच आहे. आजवर जी आरोग्या करता घातक व्यसनं करण्यात स्त्रियांचं प्रमाण अत्यल्प होतं ते गेल्या काही वर्षात वाढलंय. पण तो प्रश्न वेगळा असावा असे वाटते.
म्हणजे वाढत्या व्यसनाधिनतेचीच काळजी करायची असल्यास सर्वांची मिळून करावी. जोवर केवळ पुरुष करत होते तोवर जास्त चर्चा करायची गरज नाही पण स्त्रियांनी केले की संस्कृती बुडाली म्हणणं याला माझा आक्षेप होता. ते स्त्रियांनी व्यसन करण्याला समर्थन नक्कीच नव्हते. (अवांतरः असंही अधूनमधून, प्रसंगानुसार केल्या जाण्यार्या मद्यपानाला व्यसन म्हणावे का?)
खाली पराच्या प्रतिसादातील वाक्ये जशीच्या तशी दिलेली आहेत.
मुळात स्त्रीयांनी दारु प्यावीच कशासाठी ? आणि समजा दोन घोट घेतलेच, तर त्याची ही अशी जाहिर चर्चा करुन काय साध्य करायचे असते ? पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करण्यासाठी अजुन बरीच उत्तम क्षेत्रे मोकळी आहेत. नको तिथे बरोबरी कशाला ? आपण किती पुढारलेले आहोत हे दाखवण्यासाठी का विदेशातल्या प्रगल्भतेचा तोरा मिरवण्यासाठी ? हीच आपली संस्कृती आहे का ?
यात मधल्या ओळीतील वाक्ये आपल्या मताशी समांतर आहे पण पहिल्या आणि तिसर्या ओळीतील वाक्यातून मला कुठेही व्यसनामुळे स्त्रियांच्या आरोग्यावर होणार्या परिणामांची काळजी दिसली नाही. म्हणून आधीचा प्रतिसाद लिहिला होता.
अर्थात पराची ही वाक्ये उपरोधाने असतील तर प्रश्नच मिटला.
अधिक चर्चा करायची असल्यास खव आहेच, सोकाजीच्या सुरेख माहितीपर धाग्यावर अवांतर चर्चा नको :)
27 Sep 2011 - 4:48 pm | परिकथेतील राजकुमार
नुसती स्त्रियांच्या आरोग्याचीच नव्हे, तर संस्कृती, स्त्रित्व आणी त्या स्त्रिच्या पूर्ण कुटूंबाची काळजी आहे मला. म्हणून तर पोटतिकडीने मी वरिल प्रतिसाद दिला आहे. आई शिकली की घर शिकते म्हणतात. 'एक स्त्री घरादारा साक्षर करी.' पण हीच स्त्रि जर हे असे काही शिकणार असेल तर त्याचा पुढील पिढीवर किती गंभिर परिणाम होईल बरे ?
आतून.. आतून आलेली खिन्न प्रतिक्रिया आहे ती.
अवांतर चर्चा आहे असे वाटत नाही.
धाग्याचा विषयच असा आहे की व्यसनाधीनतेवर चर्चा होणारच. आपली चर्चा देखील त्याचाच एक भाग आहे असे वाटते.
27 Sep 2011 - 6:28 pm | स्मिता.
नुसती स्त्रियांच्या आरोग्याचीच नव्हे, तर संस्कृती, स्त्रित्व आणी त्या स्त्रिच्या पूर्ण कुटूंबाची काळजी आहे मला. म्हणून तर पोटतिकडीने मी वरिल प्रतिसाद दिला आहे.
अधोरेखित शब्द सोडून बाकी सर्व शब्दांशी सहमत. स्त्रिच्या आरोग्याची आणि त्यावर अवलंबून असणार्या कुटुंबाची तुम्हाला काळजी आहे हे कौतुकास्पद आहेच. पण त्यातही 'संस्कृती आणि स्त्रित्व' हे मध्ये आणलेच आहे.
थोडक्यात काय, तर दारू-सिगरेटने जी काही मजा, नशा, समाधान मिळते ते संस्कृतीच्या नावाखाली स्त्रियांना मिळू नये. किंबहुना त्यात काहीच मजा नसून केवळ अपाय जरी असला तरी त्याचा तिला स्वतःला अनुभव घेवू न देता (आणि स्वतः पुरेपूर, वारंवार अनुभव घेवून) त्यापासून परावृत्त करण्यातला हा प्रकार आहे. अश्यामुळे आपण काहीतरी करायला/मिळवायला मुकतोय अशी भावना कायम तिच्या मनात घर करून राहिल.
आई शिकली की घर शिकते म्हणतात. 'एक स्त्री घरादारा साक्षर करी.' पण हीच स्त्रि जर हे असे काही शिकणार असेल तर त्याचा पुढील पिढीवर किती गंभिर परिणाम होईल बरे ?
घरादाराला पुढे नेण्याचा मक्ता काय फक्त स्त्रिनेच घेतलाय का? आईने मद्यपान केल्यास ते पाहून पुढच्या पिढीवर वाईट संस्कार होतात आणि वडिलांनी मद्यपान, धुम्रपान तसेच घरात बायकोला मारणे हे पाहताना पुढच्या पिढीवर कसले संस्कार होत असतील?
आणि मी पुन्हा म्हणतेय, की क्वचितप्रसंगीचे मद्यपान आणि व्यसन यात खूप फरक आहे.
अवांतर चर्चा आहे असे वाटत नाही.
धाग्याचा विषयच असा आहे की व्यसनाधीनतेवर चर्चा होणारच. आपली चर्चा देखील त्याचाच एक भाग आहे असे वाटते.
हरकत नाही. मी चर्चा करायला तयार आहे.
28 Sep 2011 - 1:50 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
पोटतिकडी म्हणजे?
27 Sep 2011 - 7:10 pm | सोत्रि
पुर्वीच्या काळी वतनदारांच्या, संस्थानिकांच्या बायकांनी हुक्का ओढणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जायचे. तो संस्कृतीचा भाग मानला जायचा.
बर्याच आदिवासी जमातीत अजुनही बिडी पिणे हे बायकांसाठी निषीद्ध नाहीयेय. तसेच स्पेशल सेलेब्रेशनच्या वेळी स्त्रीयांनीसुद्धा दारू पिणे हा ही त्यांच्या संस्कृतीचाच भाग आहे.
स्त्रीयांनी दारू आणि / किंवा सिगारेटी प्याव्या की नको हा त्यांचा वैयक्तिक मामला आहे असे मला वाटते.
फक्त प्रजननक्षमतेचा अधिकार हा निसर्गाने फक्त स्त्रीलाच बहाल केला असल्यामुळे त्यावर परिणाम होइल असे स्त्रीने काही करू नये असे मला वाटते. (अर्थात हे माझे वैयक्तिक मत झाले, कोणी ह्यास फाट्यावर मारण्यास माझी काहीही हरकत नाही ;))
बाकी जे जे मनाला आनंद देते, ते ते सर्व करावे जात-पात, स्त्री-पुरूष, उच्च-नीच ह्यापलीकडे जाउन! हे मी शिकलो जपानमधे जपान्यांकडुन :)
- ('आनंदी संस्कृती' रक्षक) सोकाजी
27 Sep 2011 - 3:37 am | चित्रा
माहितीपूर्ण लेख.
27 Sep 2011 - 11:22 am | मैत्र
वाईनप्रेमी पण अगदी बारीक तपशीलवार माहिती नसलेल्या माझ्यासारख्या असंख्य मिपाकरांना हा झकास वाईन फेस्टिवल आहे. सध्या भारतात काही कंपनी नाही वाईनची मजा घ्यायला :(
अवांतर / तळटीप : दक्षिण आफ्रिकेतल्या काही वाईन्स चांगल्या आहेत. कुमाला नामक एक वाईन बरीच आवडली होती... आणि इंग्लंडात / युरोपात मिळणार्या नॉर्थ अटलांटिक सी फिश जसे हॅडॉक / कॉड वगैरे बरोबर कुमाला ब्रँडची व्हाईट वाईन / शार्डोने हे बेष्ट समीकरण होते... अर्थात गेले ते दिवस :(
किंवा मीट / चीज बरोबर परंपरागत रक्त वारूणी फ्रेंच किंवा इटालिअन पोर्ट ... वा वा...
ऑस्ट्रेलियात जेकब्स क्रीक जरा full bodied प्रकारात आणि थोडी जास्त स्पायसी चांगली वाटली...
परंपरागत वाईन्स नंतर थोड्या इतर नॉन ग्रेप वाईन्स ची पण माहिती येऊ द्या... फ्रांकफुर्टात त्या हासेन प्रांतात अॅपल वाईन (apfel wien) मिळते... ती एकदम इंटरेस्टिंग असते...
नेमक्या ब्रँड्स / प्रकारात उतरल्यावर आमच्या सारख्यांना बराच फायदा होईल...
Org Chart सॉलिड आवडल्या गेला आहे.. धन्यवाद !
27 Sep 2011 - 12:22 pm | चिंतातुर जंतू
एक कळकळीची विनंती
दूध वगैरे गोष्टी अशा लेखांत आणू नका हो. मळमळायला लागतं. ;-)
पाश्चिमात्य संदर्भात हे बरोबर आहे, पण आपल्याकडे लाल तिखट आणि मसाले, आलं-लसूण वगैरे सढळ हस्तानं घालून केलेल्या white meatच्या संगतीत नाजूक चवीची व्हाईट वाईन हरवून जाते. तेव्हा मी असा नियम सुचवेनः कमी मसालेदार पदार्थांबरोबर व्हाईट वाईन आणि एरवी रेड वाईन. गावरान कोंबडी किंवा बांगड्याचा उग्रपणा पाहता असे पदार्थ कसेही शिजवले गेले, तरी त्यांबरोबर व्हाईट वाईनपेक्षा रेडच बरी. जेवणापूर्वी सॅलड किंवा फिश फिंगर, चीज + क्रॅकर वगैरे सर्व्ह केलं तर त्याबरोबर व्हाईट वाईन चांगली लागते.
फुल-बॉडीड वगैरे संज्ञांचं स्पष्टीकरण पुरेसं पटलं नाही, पण असो.
वाईनबद्दल बोलताना एखादं तुमच्या पसंतीचं चित्र दिलंत तर लेख अधिक बोलका होईल. उदा:
किंवा अधिक बोलकं चित्र हवं असलं तर रुचीनुसार:
किंवा हे ;-)

27 Sep 2011 - 12:34 pm | श्रावण मोडक
बुच लावूनच ठेवतो. बाटली केव्हा तरी सोयीनुसार उघडायला बरं पडतं.
तर, चिंतू पिण्याचं सोडून चर्चा कसली करत बसला आहेस?
27 Sep 2011 - 6:44 pm | सोत्रि
साधारण गोड आणि क्रिमी ग्रेव्ही असलेल्या डीश बरोबर एकदम उत्तम.
असे म्हटले आहे की लेखात ऑलरेडी.
आता रेड वाइनचा भाग पुढे येणार आहे त्यात पुन्हा योग्य तो उहापोह करीनच.
- (चिंता'दू'र करणारा) सोकाजी
27 Sep 2011 - 12:30 pm | परिकथेतील राजकुमार
काय हे चिंजं ?
अहो येवढी छान छान चित्रे इथे दिलीत आणि आंतरजालावरुन कुठून घेतलीत हे लिहायला कसे बरे विसरलात ?
(उद्या तुमच्यावर खटला भरला गेला, तर मात्र मग मी तुम्हाला ओळखतो हे नाकबूल करीन हो)
27 Sep 2011 - 1:40 pm | चिंतातुर जंतू
'बोले बहु त्याला म्हणती वाचाळ' या उक्तीचे पालन करीत उपरनिर्देशित ज्ञानकण योग्य स्थळी अगोदरच रुजू केलेले आहेत हे ज्ञान सुजाण वाचकांप्रती पोहोचविण्याहेतू हा प्रतिसादप्रपंच. प्रतिमेचे उगमस्थळ, चित्रकाराचे नांव व चित्राचे नांव हात जोडून दर्शन द्यावेत अशी ज्यांस मनीषा असेल अशा ज्ञानोत्सुकांनी प्रतिमेवर आपला (पक्षी: आपल्या संगणकाचा) मूषक नेऊन त्याचे उजवे गालावर हलकासा ठोसा मारावा आणि उपरोल्लेखित ज्ञानकण टिपावे ही नम्र सूचना. आस्थापूर्ण चौकशीकरिता धन्यवाद.
27 Sep 2011 - 2:11 pm | परिकथेतील राजकुमार
आम्ही सुजाण वाचक नाही ;)
आता बोला, उल्लेख का केला नाहीत ? :P
27 Sep 2011 - 3:26 pm | मदनबाण
सोक्या च्यामारी लयं भारी लिवतोयस रं ! ;)
व्हिस्की पाठोपाठ आता वाईनचा हा लेख वाचला...झिंग चढल्या सारखे वाटुन राहिले आहे बघ ! ;)
कोणताही अभ्यास न करता मला आता मदिरा चाखुन पहायची इच्छा झाली आहे. ;)
@ परा :--- परा कशाला उगा त्रास करुन घेतोस ? ;) मी फळांचा राजा हापुस आंबा छान असतो म्हंटल की तू म्हणायच की त्याला फळांचा राजा म्हणण्याचे धैर्य होत नाही...पेरुच छान लागतो.! ;) कळलं का काही ? ;)
27 Sep 2011 - 3:31 pm | परिकथेतील राजकुमार
तेच तर करत असतो मी आजकाल ;)
त्याशिवाय आपले वेगळेपण लोकांना कळणार कसे ?
बाकी ज्या द्राक्षांपासून अगदी देवदेवतांना देखील सुख देणारे द्राक्षासव बनते, त्या द्राक्षांना सोडून गर कमी आणि कोय जास्ती असणार्या आंब्याला फळांचा राजा का म्हणत असावेत ?
जुन्या राजे राजवाड्यांच्या कथा / शिणीमात देखील राजा / राणी हे कायम द्राक्षे खातानाच दाखवले जायचे. कदाचित ह्या फळांचा राजा प्रकरणा मागे कोकणस्थांचा काव असू शकतो.
27 Sep 2011 - 3:38 pm | मदनबाण
जुन्या राजे राजवाड्यांच्या कथा / शिणीमात देखील राजा / राणी हे कायम द्राक्षे खातानाच दाखवले जायचे. कदाचित ह्या फळांचा राजा प्रकरणा मागे कोकणस्थांचा काव असू शकतो.
नारायण !!! नारायण !!!
सॉरी सॉरी आय मीन टू से...
परशुरामा !!! परशुरामा !!! ;)
हे वाचुन माझे चित्त थोडेसे कलुषित झाले बघ ! ;)
बाकी तुझा राजा-राणी आणि द्राक्षाचा घड हा अभ्यास करण्याचा विषय वाटतोय मला ! ;)
27 Sep 2011 - 3:50 pm | गवि
मुख्य समस्या अशी येते की या वायनींच्या नावाचा उच्चार कसा करायचा. हे उच्चार म्हणजे "कुलकर्णी" असं लिहून "अलबुकर्क" असा उच्चार करायचा अशा प्रकारातले असतात.
Chantilli नावाची व्हाईट वाईन मला अत्यंत आवडते. वेळोवेळी मी अनेक वर्षे तिचा आस्वाद घेतो पण "चँटिली" असा स्पष्ट उच्चार करुन ती मागतो. इलाज नाही. भीड बाळगून काहीच मिळणार नाही.
वाईन फेस्टिवलमधे वाईनचे तीसेक प्रकार तरी चाखतो. तेव्हा मात्र नाव उच्चारण्याची समस्या येते. पूर्वी बाटलीला बोट लावून मागायचो. पण त्यामुळे बोटाच्या रेंजबाहेरची बाटली चाखताना संकोच आड यायचा.
नंतर शार्दोने.. शनय ब्लाँ.. असे कायकाय ठराविक उच्चार करण्याचा प्रयत्न केले.
शिराझ उच्चार करायला सोपी.. पण अशी कडवट आणि अगोड की ज्याचे नाव ते.
पण ते ग्लास भरणारे स्टॉल्सवरचे पठ्ठे तरी काय , इथलेच लोक ना ते.. चेनिन ब्लँक द्या म्हटलं तरी इमानदारीत देतात ;)
तीन वर्षे फेस्टिवलला जाऊन आता भीड चेपली आहे. सरळ सुचेल तसा उच्चार करुन मागतो. पुणे वाईन फेस्टिवल हे एक धमाल ठिकाण आहे हे खरं.
27 Sep 2011 - 9:46 pm | मदनबाण
मुख्य समस्या अशी येते की या वायनींच्या नावाचा उच्चार कसा करायचा. हे उच्चार म्हणजे "कुलकर्णी" असं लिहून "अलबुकर्क" असा उच्चार करायचा अशा प्रकारातले असतात.
खी खी खी...खरयं !
व्हाईट वाईन चाखण्याचा योग मी डेन्मार्कमधे असताना आला होता, तसेच रेड वाईनची चव देखील चाखली होती.
रेड वाईनच्या बाटलीचे बुच ( बहुतेक त्याला कॉर्क का असेच काहीसे म्हणतात...) उघडताना हालत खराब झाली होती ! ओपनर तर होता पण त्याचा वापर कसा केला जातो याचा अनुभव माझ्याकडे नव्हता ! कारण वाईन पिण्याचा अनुभव नव्हता, ;) थंडी पासुन बचाव करता येईल हा विचार आल्यानेच वाईन आणली होती.शेवटी बाटलीच्या आत ते ढकलुन वाईन प्यावी लागली. ;) त्यावेळी माझा रुम पार्टनर व्होडका ढोसत होता ! त्याने मला विचारले ट्राय करणार काय पण आधी कधीच न प्यायलेले हे द्रव माझ्या पचनी पडेल काय असा विचार डोक्यात आला, तरीही दोन घोट घेतलेच ! ( त्या आधी माझी वाईनची आख्खी बाटली रिचवुन झाली होती !) मग काय होणार तोच परिणाम झाला !
जाम चढली मला !!! ;) ख्रिसमस असल्याने बाहेर पडायचे ठरवले... मी रुमच्या बाहेर आलो ! थोड्या वेळाने माझा पार्टनर बाहेर आला तर पाहतो ते काय मी कसा बसा स्वतःला सावरुन उभा होतो ! एक माळा लाकडी जिनावरुन मी खाली कोसळुन उभा होतो आणि हात मोडला आहे का, हे सतत चढलेल्या अवस्थेतही तपासुन पहात होतो. नशिबाने तसे काही झाले नव्हते.! कोपन हेगन चालत चालत पार पालथे घातले... दुसर्या दिवशी सॉलिट्ट अंग दुखत होते ! नंतर कळले की आदल्या रात्री बाहेर हिंडताना जाड कोट घालायचा विसरलो होतो आणि बाहेर -२० तापमान होते, पण चढलीच इतकी होती की !!! ;) ( माझ्या ब्लॉगवर मीच कमी जात असल्याने आता हा भाग मी लिहला आहे की नाही ते आठवत नाहीये मला, वाचकांसाठी लिंक :---http://goo.gl/bZaze )
सध्या तरी सोमरसाच्या नावाने तोबा केलेल्या आहे. ;)
27 Sep 2011 - 3:56 pm | मोहनराव
सोकाजिराव लेख आवड्ला. वाईन पित असुनसुद्धा इतकी माहीती अवगत नव्हती.
वाईनच्या गल्लासाचा रह्स्य आता उमगले!!! :)
अगदि खल्लास झालो!!!
अजुन येउदेत. वाचतोय.
आणी वाईनचे पेले रिचवतोय!! ;)
28 Sep 2011 - 1:09 pm | बिपिन कार्यकर्ते
सोक्या सोक्या, तुझे पांग कसे फेडावे? आमची एक मैत्रिण नुस्त्याच फुशारक्या मारते की वाईन वैग्रेबद्दल सग्गळं सग्गळं कळ्तं म्हणून, पण कधी असं नीटपणे सांगत नाही ब्वॉ!
28 Sep 2011 - 1:09 pm | गणपा
'गाढवाला गुळाची चव काय?' म्हणतात ते बहुतेक खर असावं.
आम्हाला हा वारुणी प्रकार बिल्कुल आवडत नाही.
परंतु लेख एकदम माहिती वर्धक आहे. :)
1 Oct 2011 - 6:27 pm | स्वाती२
हा भागही आवडला.
2 Oct 2011 - 7:52 pm | विलासराव
आम्ही प्यायचं बंद केल्यावर्च सुबुध्दी झाली का तुम्हाला?
का करु चालु परत?
पण सुरवात फुकट मिळाली तर चांगली होते.
बोला कधी बसायचं?