कॉकटेल लाउंज : गाथा टकीलाची (भाग 3, अंतीम)

सोत्रि's picture
सोत्रि in पाककृती
30 Mar 2012 - 12:43 am

पहिल्या भागात (भाग १) टकीलाचा इतिहास बघितला दुसर्‍या भागात (भाग २) टकीलाचे विवीध प्रकार बघितले आता ह्या अंतीम भागात टकीला तयार करण्याची चित्रमय झालक आणि टकीला प्यायची पद्धत बघूयात.

टकीला तयार करण्याची प्रक्रिया (चित्ररूपात)


अगावेचे फळ (piñas) भट्टीत भाजण्यासाठी दोन तुकड्यांमध्ये तोडले जाताना


भट्टीत भाजले जाणारे अगावेचे फळ


भाजलेले फळ श्रेडरमध्ये टाकले जाताना.


भाजलेला आणि श्रेड केलेला अगावेचा गर


भाजलेला गर भरडण्यासाठी कन्वेअर बेल्ट वरून जाताना


भाजलेला गर भरडण्याचा पारंपारिक दगड


गर भरडून होणारा रस फर्मेंटेशन टॅंक मध्ये जाताना


फर्मेंट केलेला रस डिस्टीलेशन प्रोसेसमध्ये


मॅनुअल टकीला क्वलिटी कंट्रोल प्रोसेस


डिस्टीलेशन नंतर ओक कास्कमध्ये मुरवत ठेवलेली टकीला

टकीला शॉट घ्यायची पद्धत
टकीला पिताना मीठ आणि लिंबू खुप महत्वाचे आहे. चव बहारदार होण्यासाठी.

टकीला शॉट मारण्याआधी थोडे मीठ हात उपडा करून त्यावर टाकून ते चाटून घ्यायचे. ह्या मीठामुळे जीभेवरील पॅलेट्स (मराठी शब्द ?) टकीलाच्या चवीसाठी तयार होतात. त्यानंतर टकीला शॉटसाठी 45 मिली टकीला शॉट ग्लासमध्ये घेऊन झटकन एका दमात गिळून टाकायची. शॉट गिळताना टकीला पडजिभेवर आदळू द्यायची त्याने टकीलाचा गंध (अरोमा) दरवळून, स्वाद आणखिन खुलवतो. त्यावर लिंबाची फोड घेऊन, चोखून तीचा रस जिभेवर पसरू द्यायचा.
आता जी एक मस्त ब्रम्हानंदी टाळी लागेल तीची अनुभूती घेत घेत दुसरा शॉट भरण्याच्या तयारीला लागायचे. :)

आता जिची सर्वजण आतुरतेने वाट पहात होते ती एक थोडी चावट पद्धत. :)

टकीला बॉडी शॉट
साहित्यः
टकीला : ४५ मिली
लिंबाची फोड
मीठ
आणि सर्वात महत्त्वाचे ती, प्रेयसी किंवा सखी, ह्याशिवाय ही रेसिपी अपूर्ण आहे.

कृती:
१. थोडे मीठ तिच्या खांद्यावर नीट काळजीपूर्वक पसरावे.
२. लिंबाची फोड तिच्या ओठात ठेवावी.
३. आता तिच्या खांद्यावरील मीठ जिभेने हळूवार चाटून घेऊन झटकन टकीला शॉट घेउन गट्टम करून टाकावा.
४. त्यानंतर तिच्या ओठात ओठ मिसळून रस येई पर्यंत ( लिंबाचा बरं का ) किस करावा.
:)

नोट: सर्व चित्रे आंजावरून साभार

(समाप्त)

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

30 Mar 2012 - 1:01 am | अत्रुप्त आत्मा

@टकीला बॉडी शॉट >>> टाइट झालो हाय

नेहमीप्रमाणे अभ्यासपूर्ण लेख... :-)

अवांतर- दुसर्‍या फोटुमधे एकत्र दिसणारी ती अगावेची फळे बघुन कुठल्यातरी सर्पाची प्रजाती बहुसंख्येने एकत्र पकडुन ठेवल्यासारखी दिसते... भलेमोठ्ठे अ‍ॅनाकोंडा एकत्र सुस्त पडलेत असे वाटते...

आत्मशून्य's picture

30 Mar 2012 - 1:14 am | आत्मशून्य

सोत्री , आपल्या ध्यासाला कुर्निसात.

रेवती's picture

30 Mar 2012 - 2:01 am | रेवती

सगळी माहिती नविन.

धनंजय's picture

30 Mar 2012 - 3:35 am | धनंजय

वा. लेखचे निमित्त करून साधी तेकिला (बहुधा पहिल्यांदाच) घरी आणली. नाहीतर ग्लासला तिखट-लिंबू-मीठ लावणे हे चोचले हॉटेलातच करवून घेतलेले बरे, म्हणून आणत नाही.

साधारणपणे मी (भाग दोन मधली) मेस्काल - बाटलीत अळी असलेली - आणतो. अजून एकदाही अळी गिळलेली नाही. विचारानेच अंगावर काटा येतो, वगैरे, असे काही नाही. पण तो शेवटचा घोट प्रत्येक वेळी अळी वगळूनच घेतलेला आहे.

बॉडी शॉट, अंगावर चॉकलेटचा रस ओतून चाखणे... हे सगळे प्रकार आता म्हातारपणात आयत्या वेळी सुचत नाहीत. (मला वाटते दारू भराभरा - मूड मस्त शिथिल होण्यापूर्वी - डोक्यात चढे, तेव्हा असे प्रकार करण्याचा "फॉलो-थ्रू" अधिक असे.)

५० फक्त's picture

30 Mar 2012 - 7:42 am | ५० फक्त

छान लेखमालेचा उत्तम शेवट, धन्यवाद.

मद्याचार्य, तुम्ही महान आहात.

अन्या दातार's picture

30 Mar 2012 - 11:50 am | अन्या दातार

सगळेच भाग माहितीपूर्ण. भाजलेला गर भरडण्याचा पारंपारिक दगड बघून फौंड्रीतल्या सँड मुलरची आठवण झाली.

फक्त फ्रेंच पद्धत व्यनि न करता इथेच उलगडून सांगितल्याबद्दल णिशेध! ;)

विजुभाऊ's picture

30 Mar 2012 - 11:00 am | विजुभाऊ

ह्या मीठामुळे जीभेवरील पॅलेट्स (मराठी शब्द ?)
मराथी शब्द " रुचिकलीका" = टेस्ट बड्स

सोत्रि's picture

1 Apr 2012 - 10:31 am | सोत्रि

विजुभौ,
रुचीकलिकांपेक्षा रसग्रंथी हा शब्द बर्‍याच जणांनी सुचवला व तो जरा जास्त समर्पक वाटतो आहे.

- (सध्या सहन करणारा) सोकाजी

गणपा's picture

30 Mar 2012 - 1:03 pm | गणपा

वा वा वा सोत्री.. टकिला फॅक्ट्रीची धावती सफर आवडली बर्का.
चला आता इथे एक प्रेयसी शोधणे आले.

इष्टुर फाकडा's picture

30 Mar 2012 - 2:12 pm | इष्टुर फाकडा

शेवटच्या प्रक्रियेचा फोटो न टाकल्याबद्दल णीषेध ;)

काय?
तुला 'गणेशा' ज्वर जडला की काय?

चित्रे फक्त फॅक्टरीची आहेत.

कृतीची कुठे आहेत????????

सोत्रि साहेब, अफाट लेख.

जबरदस्त विश्लेषण व माहीती फार सुरेख.

सोत्रि साहेबानु , गोव्याची काजु फेणि पीउन बघा , तिल सोरा म्हणतात . सोरा म्हंजे पहिल्या धारेची अतिशय कडक.
आणि त्यावर कोलंबी तळलेली खाउन बघा व वेज असाल तर लांबड्या हिरव्या जाड मिरच्यांचि भजी.

सर्व माहिती अगदी व्यवस्थित दिल्याबद्दल सोत्रीचे अभिनंदन.....

टकीला बॉडी शॉट्स च्या फोटोंचे संपादन करण्यात आलेले आहे काय?
एकदम रोमँटीक पेय आहे.

सोत्रि's picture

1 Apr 2012 - 12:19 am | सोत्रि

ते फोटो इथे चढवले असते तर संपादकांनी माझीच गाथा लिहून माझ्या आयडीच्या फोटोला हार चढवला असता ;)

- (फोटोजेनिक) सोकाजी

चिंतामणी's picture

1 Apr 2012 - 1:04 am | चिंतामणी

व्यनी चेकवा.

यकु's picture

31 Mar 2012 - 11:29 pm | यकु

कुर्निसात!!!!

मी-सौरभ's picture

2 Apr 2012 - 4:24 pm | मी-सौरभ

आमच्या सारख्या मद्यप्रेमी (मद्यपी नव्हे) साठी सोत्रिंचे लेखन हे अतिशय मार्गदर्शक आहे.

चीअर्स!! / चांगभले!! :)

माझीही शॅम्पेन's picture

2 Apr 2012 - 10:47 pm | माझीही शॅम्पेन

" टकीला बॉडी शॉट "

व्ववा क्या बात क्या बात क्या बात !

संपूर्ण लेख मला प्रचंड आवडली ! अरे टकीला म्हणजे जीव की प्राण , ब्रँड इत्यादिचा डोक्याला शॉट ना लावून घेता टकीला भरपूर एन्जॉय करतो.. परवाच चार शॉट्स मारुन लेख आणि विकांत आम्ही सेलेब्रेट केला

हिरव्या नोटांच्या देशात एल-पेट्रन (?) आणि १-८०० ह्या ब्रँड ना अजुन मिस करतोय