कॉकटेल लाउंज : लिंचबर्ग लेमोनेड (Lynchburg-Lemonade)

सोत्रि's picture
सोत्रि in पाककृती
3 Feb 2012 - 1:22 pm

मागच्या वर्षाच्या सरत्या संध्याकाळी पान धमाका कॉकटेल टाकल्यानंतर २०१२ मधे धमाकेदार सुरूवात करायची असे ठरवले होते, पण कार्यबाहुल्यामुळे जरा व्यस्त होतो. असो, आज शुक्रवार, सप्ताहअखेर, एक कॉकटेल का हक तो बनता है |

‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “लिंचबर्ग लेमोनेड

पार्श्वभूमी:

लिंचबर्ग हे एक अमेरिकेतील Tennessee राज्यातील शहर आहे. ह्याच शहरात 'जॅक डनियल्स' ह्या प्रख्यात बर्बन व्हिस्कीची डिस्टलरी आहे. ह्या व्हिकीमुळे आणि शहराच्या नावावरून ह्या कॉकटेलचे लिंचबर्ग लेमोनेड हे नाव पडले आहे.

ह्या कॉकटेलला खरंच एक भारी पार्श्वभूमी आहे. टोनी मेसन ( Tony Mason) ह्या एका कॉकटेल बारच्या मालकाने 1980 मधे हे कॉकटेल त्याच्या बारमधे बनवले आणि त्याचे हे नामकरण केले. त्याच्या म्हणण्यानुसार जॅन डॅनियल्स डिस्टलरीच्या एका विक्रेत्याने ह्या कॉकटेलची रेसिपी चोरली आणि ते ड्रिंक जॅन डॅनियल्सचेच आहे असे भासवून देशभर एक प्रमोशनल कॅंपेन चालू केले. घ्या, ह्या टोनीने चक्क डिस्टलरीच्या विरूद्ध कोर्टात फिर्याद ठोकली. (च्यायला, ह्या अमेरिकेत कोणीही उठून कोणावरही फिर्यादी ठोकू शकते.) 13 मिलीयन डॉलर्स नुकसान भरपाई मागीतली. कोर्टात केस तो जिंकला पण त्याला नुकसान भरपाई मिळाली नाही. मग तो वरच्या कोर्टात गेला आणि तिथल्या जजला वाटले की ह्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, त्याने खालच्या कोर्टाचा निर्णय फिरवून पुन्हा नव्याने केस चालू करण्याचा आदेश दिला. पुढे काय झाले, त्याला किती डॉलर्स मिळाले हे मात्र गुलदस्त्यातच राहिले, पराच्या अनेक क्रमश: कथांसारखे. ;)

असो, नमनाला घडाभर तेल भरपूर झाले.

प्रकार: बर्बन व्हिस्की बेस्ड कॉकटेल

साहित्य:

बर्बन व्हिस्की(जॅन डॅनियल्स)
1 औस (30 मिली)

कॉईंत्रु (दुसरा पर्याय – ट्रिपल सेक)
1 औस (30 मिली)

स्वीट अ‍ॅन्ड सार सिरप
1 औस (30 मिली)

स्प्राईट किंवा सेव्ह्न अप

बर्फ

अर्धी मोसंबी

कॉकटेल शेकर

बार स्पून

ग्लास: – कॉलिन्स किंवा हाय बॉल

कृती:

कॉकटेल शेकर 3/4 बर्फाने भरून घ्या. त्यात स्प्राइट सोडून बाकीचे सगळे सहित्य घालून व्यवस्थित शेक करून घ्या. शेकरला बाहेरून पाण्याचे थेंब आले के समजायचे, मिश्रण तयार झाले आहे. आता खाली दाखवल्याप्रमाणे कॉलीन्स ग्लास मधे अर्धा ग्लासभर बर्फ आणि मोसंबीचे काप घालून घ्या.

हे कॉकटेल करताना नविन धडा शिकलो, घरच्या फ्रिझमधला बर्फ वापरताना लिंबाचे काप किंवा मोसंबीची काप ग्लासात टाकले तर बर्फ वितळायला खुप वेळ लागतो आणि तो बर्फ लॉन्ग लास्टिंग होतो :)

आता शेकरमधील मिश्रण ग्लासमधे ओतून घ्या.

आता ग्लासमधे स्प्राइट टाकून ग्लास टॉप अप करा.

मनमोहक, दिलखेचक आणि चवदार लिंचबर्ग लेमोनेड तयार आहे. :)

प्रतिक्रिया

नगरीनिरंजन's picture

3 Feb 2012 - 2:03 pm | नगरीनिरंजन

सोत्रि इज ब्याक अँड हाऊ!!

मेघवेडा's picture

3 Feb 2012 - 2:31 pm | मेघवेडा

अगदी!

एकदम आवड्या!

मोहनराव's picture

3 Feb 2012 - 2:36 pm | मोहनराव

सोत्रि त्वाड्डा जवाब नही!! एकदम बेस्ट!

नि३सोलपुरकर's picture

3 Feb 2012 - 3:46 pm | नि३सोलपुरकर

सोत्रि साहेब,
बेस्ट,एकदम मस्त.सप्ताहअखेर जोरात !!!!

पक पक पक's picture

3 Feb 2012 - 4:16 pm | पक पक पक

येक्दम्म्म्म्म चिंन्न्न्न्न्न्न्न्न्ग !!

पुनरागमना यच....

इष्टुर फाकडा's picture

3 Feb 2012 - 4:30 pm | इष्टुर फाकडा

ज्याकी ला पाहुनच द्वाले पाणावले !!! कॉकटेल भारीच दिसतेय; पण आमच्या दृष्टीपुढे ज्याकीचा डबल ठाण मारून बसला आहे....शुक्रवार वसूल हो सोत्री, धन्स :)

सुहास झेले's picture

3 Feb 2012 - 5:00 pm | सुहास झेले

लैच भारी..... कॉकटेल आवडलं :) :)

मी-सौरभ's picture

3 Feb 2012 - 6:51 pm | मी-सौरभ

माझ्याकडे JD आहे.. तुमच्याकडे कधी घेऊन येऊ??
संपवून टाकु. हा का ना का :)

सोत्रि's picture

3 Feb 2012 - 7:47 pm | सोत्रि

नेकी और पूछ पूछ !

मंगळवार नंतर कधीही तो पर्यंत बिझी आहे :(

- (बैठकोत्सुक) सोकाजी

मोहनराव's picture

3 Feb 2012 - 8:51 pm | मोहनराव

माझ्याकडे JD आहे..

काय सौर्‍या, मला नाही सांगितलस ते? दोस्त दोस्त ना रहा!!

कपिलमुनी's picture

6 Feb 2012 - 7:43 am | कपिलमुनी

मला सोडून ?
पचणार नाही ...

@ मोहन : तुच आणलेली जेडी आहे रे ती ..सौर्‍या उगाच झैरात करतोय ..

मी-सौरभ's picture

6 Feb 2012 - 2:24 pm | मी-सौरभ

कप्या: तुला नाही सोडणार रे.. तुझ्याच गाडीतून जायचयं ;)

रेवती's picture

3 Feb 2012 - 8:31 pm | रेवती

आहे आहे दिलखेचक आहे हे पेय.
पराचा प्रतिसाद आला नाहीये अजून.;)
स्वीट अ‍ॅन्ड सार नवीनच समजले.
इथे सगळ्यांना होडन सावर म्हायतिये.;)

प्रभो's picture

3 Feb 2012 - 8:42 pm | प्रभो

लेखक परा साहेब साहित्य संमेलनाला गेले आहेत...त्यांचे प्रतिसाद आता ६ तारखेलाच.

चतुरंग's picture

4 Feb 2012 - 12:59 am | चतुरंग

वरती सोत्रींनी दिलेले सुद्धा एकप्रकारचे 'साहित्य संमेलनच' आहे की! ;)

('साहित्य'प्रेमी)रंगा

नंदू's picture

3 Feb 2012 - 8:42 pm | नंदू

ओहोहो..!!!
क्या बात है सोत्रिजी.
झक्कास.

अत्रुप्त आत्मा's picture

3 Feb 2012 - 11:17 pm | अत्रुप्त आत्मा

नेहमी प्रमाणेच माहितीपूर्ण आणी जबरदस्त...
सो.त्री.तुमची तयार केलेली कॉकटेल पाहुनच आंम्हाला प्यायल्याची नशा होते,,, त्यामुळे अमचा ---^---

(नुसत पाहुनच पिल्याचा भास झालेला) अत्रुप्त आत्मा

सोत्रि ... तुम्ही जिथे राहताय त्याच्या आजुबाजुला एखाद घर आहे का भाड्यानी राहण्यासाठी? विचार करतोय कि स्वःताच घर सोडुन तिथेच येवुन राहव आणि तुमच्या प्रत्येक बैठकिला आमचा एक रिकामा ग्लास घेवुन निर्लज्जपणे भेट द्यावी. :-)

मान गये उस्ताद.

--टुकुल

सुनील's picture

4 Feb 2012 - 12:45 am | सुनील

मस्त! विकांताला करून बघण्यात येईल!

अवांतर - जॅक डॅनियलची फॅक्टरी ज्या लिंचबर्ग परगण्यात आहे तो लिंचबर्ग परगणा मात्र "ड्राय" परगणा आहे. पिकते तेथे विकत नाही (खरे तर विकता येत नाही!), ही म्हण आठवते.

चतुरंग's picture

4 Feb 2012 - 1:00 am | चतुरंग

खरोखर मनमोहक आलाय बरं का रंग पेयाचा.
ट्राय करुन बघावसं वाट्टंय! ;)

(ट्रायलप्रेमी) रंगा डॅनिअल

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 Feb 2012 - 9:49 am | ज्ञानोबाचे पैजार

सोत्री तुमची आणि विजय मल्याची पार्टनरशीप आहे असे आमच्या कानावर येते आहे. तुमच्या या लेखमाले नंतर त्याचा खिसा सॉलीड गरम झाला असेल. हे खरं आहे का?

सोत्रि's picture

6 Feb 2012 - 7:54 pm | सोत्रि

तुमच्या या लेखमाले नंतर त्याचा खिसा सॉलीड गरम झाला असेल

हायला, आस्स हाय व्हय! तरीच हल्ली तो तोंड लपवतोय माझ्यापासून :)

- (पार्टनर) सोकाजी

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Feb 2012 - 9:01 pm | बिपिन कार्यकर्ते

च्यायची! या धाग्यवरच्या सगळ्याच प्रतिसादांना +१ असेल आपला!