कॉकटेल लाउंज : क्लासिक मार्टीनी / ड्राय मार्टीनी

सोत्रि's picture
सोत्रि in पाककृती
27 Oct 2011 - 5:20 pm

मोहितो...व्हाइट रशिअन...झणझणीत मरीआइ...अनारीटा... | बी 52...

‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “क्लासिक मार्टीनी”

पार्श्वभूमी:

घरात काम चालु असल्यामुळे बार बंद होता. आता काम झाले आणि बार चालु केला. :)
दिवाळीसाठी एक मस्त कडक कॉकटेल टाकावे असा विचार केला आणि समोर जीन दिसली. लगेच कॉकटेल ठरले “मार्टीनी”.

‘लेडीज ड्रिंक’ अशी हेटाळणी केली गेलेल्या ‘जीन’ पासुन बनवलेले हे कॉकटेल आहे. जीन हे लेडीज ड्रिंक असे म्हणणार्यांनी हे कॉकटेल प्यावे आणि मग जीनला लेडीज ड्रिंक असे म्हणण्याची हिंमत करून दाखवाववी. अतिशय जहाल, कडक (Potent) असे कॉकटेल आहे हे.
ऊगाच नाही 007, जेम्स बॉण्डचे आवडते ड्रिंक हे. :) पण त्याचे कॉकटेल जरा वेगळे असते, जेम्स बॉण्ड शेवटी तो, त्यात पुन्हा कट्टर ब्रिटीश, सामान्य माणसाप्रमाणे कसा काय वाग़णार तो ;)

प्रकार: जीन बेस्ड, क्लासिक कॉकटेल

साहित्य:

जीन – 2 औस (60 मिली)
ड्राय वर्मुथ – 15 मिली
बर्फ
3 ग्रीन ऑलिव्ह सजावटीसाठी / 1 टुथपिक
बार स्पुन
Hawthorne strainer किंवा गाळणे

ग्लास: – कॉकटेल (ह्या  ग्लासला मार्टीनी ग्लास  असेही म्हणतात)

कृती:

कॉकटेल ग्लासमधे बर्फाचे खडे टाकुन त्यात पाणी घालुन ठेवा. ह्यामुळे ग्लास चिल्ड आणि फ्रॉस्टी होइल.

मिक्सिंग ग्लास 3/4 बर्फाने भरून घ्या. आता त्यात जीन आणि ड्राय व्हर्मुथ ओता. बार स्पुनने व्यवस्थित स्टर करून घ्या. व्यवस्थित स्टर झाल्यावर Hawthorne strainer‌‌‌‌‌ वापरुन कॉकटेल ग्लास मधे गाळुन घ्या.
आता 3 ऑलिव्ह टुथपिकवर अडकवून कॉकटेल ग्लासमधे हळुच सोडा.

क्लासिक मार्टीनी तयार आहे:)
चियर्स!

प्रतिक्रिया

चिंतामणी's picture

27 Oct 2011 - 6:06 pm | चिंतामणी

मुड लागलेला दिसत आहे लिहायचा.

सोपी कृती आहे.

पण.......

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Oct 2011 - 7:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चिअर्स.....! चांगलं चालू आहे भो तुमचं. :)

-दिलीप बिरुटे

इष्टुर फाकडा's picture

27 Oct 2011 - 8:32 pm | इष्टुर फाकडा

मला वोडका-मार्टीनी (shaken not stirred :D ) जास्त माहितीतली आणि म्हणूनच जास्त जवळचीही आहे...पण आता हि 'पाक' कृतीही करून बघतो :)
बाकी तुमच्या फोटोंमुळे इमान चावळले :) मस्त मस्त !

सगळ साहित्य आहे घरात.
विकांती चाखुन पहायला हरकत नाही. :)

श्रावण मोडक's picture

27 Oct 2011 - 9:11 pm | श्रावण मोडक

!

इंटरनेटस्नेही's picture

27 Oct 2011 - 10:54 pm | इंटरनेटस्नेही

खल्लास पाकृ!

इंटरनेटस्नेही's picture

27 Oct 2011 - 10:54 pm | इंटरनेटस्नेही

खल्लास पाकृ!

इंटरनेटस्नेही's picture

27 Oct 2011 - 10:55 pm | इंटरनेटस्नेही

खल्लास पाकृ!

विलासराव's picture

27 Oct 2011 - 11:19 pm | विलासराव

मला तर लिंबु सरबतच वाटते आहे.

सोत्रि's picture

28 Oct 2011 - 10:01 am | सोत्रि

विलासराव,

आता वाटणारच सगेळे लिंबू सरबतासारखे ;)
सौ चुहे खाके बिल्ली चली हज को ... :) (कृपया ह.घे.)

- ( दारू ही लिंबु सरबत ना दिसता दारूच दिसणारा ) सोकाजी

विलासराव's picture

28 Oct 2011 - 12:47 pm | विलासराव

>>सौ चुहे खाके बिल्ली चली हज को ... Smile (कृपया ह.घे.)
खरय. तसेच हजला जाणारे कधी पोहोचतच नसावेत.

पण (कृपया ह.घे.) हा काय प्रकार आहे? की अजुन एखादं सरबत?
- ( दारू ही लिंबु सरबतच दिसणारा ) विलास

विलासराव's picture

28 Oct 2011 - 12:50 pm | विलासराव

.

शिल्पा ब's picture

28 Oct 2011 - 12:38 am | शिल्पा ब

मला ब्लु लगुन पण आवडते. ही सुद्धा छान दिसतेय.

मोहनराव's picture

28 Oct 2011 - 1:08 pm | मोहनराव

भारीच!!

नगरीनिरंजन's picture

28 Oct 2011 - 1:27 pm | नगरीनिरंजन

बाँडपटात खूपवेळा पहिलेले कॉकटेल आहे. अजून कधी आवर्जून प्यालो मात्र नाहीय. कृती बर्‍यापैकी सोपी वाटतेय, तर प्रयत्न करावा म्हणतो.

(शेकन, नॉट स्टर्ड)

मार्टिनी छान दिसतेय. अर्थात खास काही मिक्स्चर नाही पण त्यामुळेच कदाचित साधीसोपी चांगली लागत असेल.

या धाग्याच्या निमित्ताने शंका:

माझ्याकडे काजूची फेणी पडली आहे. गोव्यातल्या फेणींपैकी प्रीमियम म्हणून विकला जाणारा कोणतासा ब्रँड आहे.

१. तिचा वापर करुन काही क्रिएटिव्ह कॉकटेल बनेल का?
२. फेणी एकदा बाटली उघडली की किती दिवस पिण्यायोग्य राहते? फॉर दॅट मॅटर बाटली एकदा उघडली की सर्वच मद्ये कितीकाळात संपवावीत?

धन्यवाद.

गवि,

काजुची फेणी मी अजुन(ही) चाखली नाहीयेय :(
पण एकदा चाखुन चव कळली की काय मिक्स करून कॉकटेल बनवायचे ते ठरवता येइल.

जनरली लीकर्सचे (Liquor) शेल्फ लाइफ उघडल्यानंतर तसे बरेच असते.
जर ती खालील काळजी घेउन ठेवल्यास बरेच महिने (एक वर्षापर्यंत) चांगली राहु शकते:

1. तीव्र सुर्यप्रकाशाचा संपर्क येउ न देणे
2. एकाच तापमानात ठेवणे म्हणजे बाटली ठेवलेल्या ठिकाणी /जागी 'टेंपरेचर वरिएशन' नसणे
3. बाटलीचे बूच घट्ट लावून ठेवणे (‌हवेचा संपर्क येउ न देणे)

तरीही साधारण 5-6 महिन्यानंतर चवीत थोडाफार फरक पडू शकतो.

- (साकिया) सोकाजी

अप्पा जोगळेकर's picture

28 Oct 2011 - 2:43 pm | अप्पा जोगळेकर

छान आहे. जीन म्हटली की बाँडचे
मार्टिनी. शेक्ड नॉट स्टिअर्ड. हे शब्दच आठवतात.
जीन हे लेडिज ड्रिंक आहे हा जो समज सर्वत्र पसरलेला आहे बहुधा त्यामुळेच ती अत्यंत स्वस्त दरात उपल्ब्ध असते. त्यामुळे हा समज असाच राहावा असे वाटते. ब्ल्यू रिबन्ड तर अत्यंत चवदार असते.

पाण्यासारखी दिसते आणि नंतर तोंडाला फारसा वासही येत नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी सगळे मित्र मिळून कोणाच्यातरी घरी असाईनमेंट लिहिताना पाण्याच्या तांब्यात जीन ओतून ठेवत असू. बाटली फेकून दिली की काम तमाम. तांब्या स्वच्छ धुतला की त्याला सुद्धा वास राहात नाही.

सुनील's picture

28 Oct 2011 - 6:24 pm | सुनील

जीन हे लेडिज ड्रिंक आहे हा जो समज सर्वत्र पसरलेला आहे बहुधा त्यामुळेच ती अत्यंत स्वस्त दरात उपल्ब्ध असते
फोटोत दाखवलेली बाँबे सफायर स्वस्त नसते बर्र्का!!

बहुधा जीनला स्वतःचा स्ट्राँग वास नसतो म्हणून त्याला लेडीज ड्रिंक म्हणत असावेत (असा माझा अंदाज).

आताच पॉप टेट्सवरून आलो. मार्टिनी मेन्यू कार्डावर होती पण अर्थात मी लाँग आयलंड आईस टी घेतली.

अप्पा जोगळेकर's picture

28 Oct 2011 - 6:49 pm | अप्पा जोगळेकर

फोटोत दाखवलेली बाँबे सफायर स्वस्त नसते बर्र्का!!
असेल बुवा. काही कल्पना नाही. ब्लू रिबन्डची क्वार्टर ११० रुपयात मिळते इतकं माहिताय. कॉलेजात असताना ६५ मधे मिळायची.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

28 Oct 2011 - 10:55 pm | निनाद मुक्काम प...

सोकाजी राव लेख मस्त झालाय
पण आमच्या शेत्रासंबंधी आहे.म्हणून जरा माहिती देतो .
जीन चा उगम इंग्लड मध्ये झाला .व झपाट्याने त्यांचे लोण संपूर्ण देशात पसरले. अगदी लोक हातभट्टी लावून जीन बनवू लागले तेव्हा कुठे सरकारने दर्जा उत्कृष्ट राहण्यासाठी काही नियम बनवले व काही मोजक्या कंपन्या जीन बनवू लागल्या .गोर्दन ,बॉंबे सफाया , बीफितर हे जीन मधील प्रख्यात नाव
ह्यात बॉंबे जीन चा निर्मात्याने बॉंबे मध्ये आपल्या आयुष्यातील काही स्मरणीय काळ घालवला होता त्या प्रीत्यर्थ त्याने जीन ला बॉंबे हे नाव दिले.सफाया ( लिहिताना योग्य शब्द सुचला नाही.) हे नाव स्टार ऑफ बॉंबे ह्या हीर्यापासून पडले .

आणी बॉन्ड जे मार्टीनी कॉकटेल पितो त्याला बॉन्ड टिनी म्हणतात .
ह्यामागे बरीच मोठी आख्यायिका आहे.
मार्टीनी चा उगम अमेरिकेत झाला .हे कॉकटेल एवढे प्रसिध्द झाले की नीक्सन ने त्याला राष्ट्रीय पेय म्हटले होते .
मात्र इंग्लिश बॉन्ड हे कॉकटेल पिणार म्हणजे चक्क अमेरिकन ड्रिंक पिणार हे इंग्लिश जनतेला कसे आवडेल म्हणून त्यांनी बॉन्ड टिनी मध्ये वोडका वापर्याचे ठरवले .
आणी एक महत्वाचा बदल म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने मार्टीनी अमेरिकन पद्धतीची ही शेकर मधून न बनवता stir करतात म्हणजे काय काय जीन आणी मार्टीनी हे ग्लासात हळुवारपणे रिते करायचे .म्हणुनच जेम्स बॉन्ड ड्रिंक ऑर्डर करतांना त्यांचे जगविख्यात डायलॉग म्हणतो ''शेकन नॉट स्तर ''
हा डायलॉग पुढे प्रत्येक बॉन्ड सिनेमाचा अविभाज्य भाग झाला.
पण सध्याच्या काळात शेकन मार्टीनी पण लोकप्रिय आहे, कारण त्यात फ्लेवर मिसळता येतात.

जीन सोबत टोनिक वोटर तेही इंडियन आणी सोबत लिंबांचा काप हे अत्यंत लोकप्रिय ड्रिंक माझे सर्वात लाडके ड्रिंक आहे.
भारतात जीन च्या नावाखाली जे काही बनते ते पाहून किळस येते. मूळ चवीपेक्षा भिन्न अशी जीन भारतात बनते तिचा एकच फायदा म्हणजे ओरीजनल गोर्डन
मध्ये भेसळ करता येत नाही .
भारतात अनेक ठिकाणी स्कॉच मध्ये आर सी मिसळून देतांना पहिले आहे.

तुमच्यासारख्या या विषयातील विद्वानाचे लेखन
वाचायला आवडेल असे लिहिणार होते
. पण समजा लेख लिहिलेच तर तुमचेच फोटो .
,एक बार शेजारी, एक वेगवेगळे पदार्थ टाकताना, एक शेकर हलवता
ना, एक ग्लासात ओतताना , एक तो ग्लास सजवताना, ए
क तुम्ही त्याची चव घेताना , एक अ
साच छान दिसतो म्हणून वगैरेचा अति
रेक व्हायचा अन सांगितले तर परत थयथयाट करायचात
म्हणून तो मोह टाळला. याची कृपया नोंद घेणे.

असो.
सोकाजीराव, असेच लेख येउ द्या.

सुहास झेले's picture

29 Oct 2011 - 2:59 am | सुहास झेले

लै भारी... चिअर्स ;) :)

आत्मशून्य's picture

31 Oct 2011 - 9:21 pm | आत्मशून्य

.

मराठमोळा's picture

2 Nov 2011 - 3:04 pm | मराठमोळा

मस्त..
चांगली माहिती आहे. :)

धमाल मुलगा's picture

3 Nov 2011 - 4:35 pm | धमाल मुलगा

जगातलं आमचं सर्वात आवडतं कॉकटेल :)
अर्थात...शेकन. स्टर्डमधला अंमळ ओशटपणा नाही आवडला कधी.

सोकाजीरावा,
आता व्हेस्पर मार्टिनी कधी बनवताय तेव्हढं सांगा. बंगळूरात मिळाली तशी इथं काही कुठं मिळेना बॉ!

अवांतरः
पुण्यात बर्‍याच ठिकाणी मार्टिनी ऑर्डर करण्यापुर्वी कंटेट्स विचारुन घेणे. अगदी हिंजवडीतल्या Mezza 9 मध्येही खुळ्यात काढण्याचे धंदे चालतायत राव. मार्टिनी म्हणे 'टकिला' घालून करतात. हे ऐकून "स्मोक्ड मार्टिनी दे बाबा " असं म्हणाल्यावर व्हिस्की कोणती घालू विचारलं. मी म्हणालो, " स्टॅन्डर्ड कोणती वापरता?" ........पठ्ठ्यानं काय उत्तर द्यावं? 'नंबर वन' ! मी जागीच ठार!

ब्लू कराक्युओ घातलेली मार्टिनी कोणी ढोसलीये का? आहे हिंमत? मी केलीए!

गवि's picture

3 Nov 2011 - 4:48 pm | गवि

मध्यंतरी बाणेर रोडवर कुठेसे असलेल्या झिकोमोत गेलो. तिथे सॅटरडे नाईट स्पेशल डीजे सुरु होता. अरे जोरदार म्युझिक आम्हीबी ऐकलंय राव पण हे काय कानफाडू दणदणाट नुसता..

पदार्थांची टेस्ट उत्तम असूनही त्या आवाजाने डोक्याच्या शहाळ्यातली मलई निघाल्यावर अर्ध्या तासाने जेवढी ऑर्डर आली होती तेवढी बास म्हणून उठलो.

मग बांबूत जाऊन बसलो. तिथे यथासांग कर्म पार पडले. सुरमई चांगली होती. पण लाँग आयलंड गोल चषकात आणून दिलेला पाहून सर्द झालो.. मिश्रणही यथातथाच.. मग रिपीट नाय केले काहीपण.

गवि,

बांबु म्हणजे बांबु हाउस का?

मीही तिथे लाँग आयलंड मागवले होते. गोल चषक आणी पुर्ण कोकची चव.

जाउन बार टेंडरशी बोललो (भांडलो), तर मला म्ह्णाला 'कोक टाकल्यावर कोकची चव येणारच'.
टाळ्के सटकले, त्याला म्हटले मी करून दाखवू का तर हो म्हणाला.
केल्यावर त्याचा मॅनेजर म्हणाला 'एवढी दारू वापरल्याव[र परवडायचे कसे'? :lol:
कपाळावर हात मारून पुन्हा बाहेर कॉकटेल न पिण्याची शपथ घेऊनच घरी आलो.

जनरली भारतात एकदम हलक्या दर्ज्याच्या दारू वापरतात कॉकटेलमधे. वोड्का बेस्ड कॉकटेलसाठी अल्कझर बघितली एका बार मधे आणि सर्द झालो. आता ग्रे गुज मार्टिनी मागितल्यावर कशात बनवुन देतात कोण जाणे ;)

- (उच्च दर्जाची दारू वापरून बनवलेली कॉकटेल आवडणारा) सोकाजी

हो.. मॉडर्न कॅफेलगतचे बांबू हाऊस.

अगदी पूर्ण कोकची चव, म्हणजे ग्लास भरुन कोकाकोलाच म्हणा ना..

आणि ग्लासही उंच वाईनग्लाससारखा. लाँग आयलंड तशा ग्लासात बघून कसेतरीच झाले.

तुम्ही मला मागे या ठिकाणाविषयी स्पेसिफिकली कॉकटेल्सबाबत वॉर्न केले होते. तरीही दुसरे काही मागवण्यासारखे वाटेना म्हणून लाँग आयलंडच मागवला.

सल्ला न ऐकल्याचे फळ..

मराठमोळा's picture

4 Nov 2011 - 3:44 pm | मराठमोळा

>जेम्स बॉण्ड शेवटी तो, त्यात पुन्हा कट्टर ब्रिटीश,

इथे जर तुम्ही पिअर्स ब्रोसनन बद्दल बोलत असाल तर एक सुधारणा - तो ब्रिटिश नव्हे, आयरीश आहे. :)

मराठमोळा's picture

4 Nov 2011 - 3:44 pm | मराठमोळा

>जेम्स बॉण्ड शेवटी तो, त्यात पुन्हा कट्टर ब्रिटीश,

इथे जर तुम्ही पिअर्स ब्रोसनन बद्दल बोलत असाल तर एक सुधारणा - तो ब्रिटिश नव्हे, आयरीश आहे. :)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

4 Nov 2011 - 7:01 pm | निनाद मुक्काम प...

कॉकटेल मध्ये हलक्या दर्जाचे मद्य वापरतात ह्या बाबतीत सहमत .
अहो ब्लू कुरेसोव हे निळ्या रंगाचे संत्राच्या फ्लेवर चे लिक्योर.
मात्र अनेकदा कॉकटेल मध्ये त्याचे सिरप ( म्हणजे नॉन अल्कोहोलीक ) ही स्वस्त व भ्रष्ट नक्कल वापरतात .
१० वर्षापूर्वी मी हे करण्याचे कारण विचारले तर आमचे साहेब म्हणाले की ही परदेशातील मद्यांवर जबर कर लादला जातो त्यामुळे ह्या पळवाटा शोधाव्या लागतात
.
ह्या लोकांना कमी पैशात मुलांकडून कामे करून घेतात .अनेक मार्गांनी कर चुकवतात .अनेकदा ह्यांचे मालक धनदांडगे पान ३ वर झळकणारे असतात .तरीही दर्जेदार उत्पादन देण्यात कचराई करतात.
अपवाद आम्ही किशन मुलचंदानी , विजय मल्या ह्यांच्या पार्ट्यांमध्ये जेव्हा काम केले आहे तेव्हा १०० % शुद्ध माल वापरायची सक्त ताकीद असते .( ह्याचा पार्ट्या मध्ये काम करायला आम्ही तेव्हा फुकट सुद्धा तयार असायचो. रात्रीचे १ वाजून गेल्यावर सगळ्यांची विमाने अधांतरी गेल्यावर आम्हा बार टेंडर लोकांची पार्टी मध्ये पार्टी सुरु व्हायची .
आजूबाजूला जे काही चाललेले असायचे त्यांना आम्ही काय करत आहोत ह्याकडे अजिबात लक्ष नसायचे.