'कॉकटेल लाउंज' मालिकेतील आजचे कॉकटेल हे गटारी स्पेशल देसी धमाका कॉकटेल आहे, ह्याचे नाव आहे
झणझणीत मरीआई ( ब्लडी मेरी ला आपले देशी उत्तर ;) )
पार्श्वभूमी:
1. मागे एका प्रतिसादात कोणितरी विचारले होते झणझणीत कॉकटेल असते का?
2. शाहीर यांनी गटारी स्पेशल कॉकटेल टाका अशी खरड टाकली होती.
माग ह्या दोन्ही गोष्टींचा एकत्र डबल धमाका करावा असा विचार केला.
सर्वांना करता येइल असे सोपे आणि झणझणीत असे कॉकटेल टाकावे म्हणजे गटारीला पुण्य पदरात पडेल, हा स्वार्थ आहे ह्या 'गटारी स्पेशल देशी झणझणीत धमाका' कॉकटेल मागे आहे. तरी सर्वांनी हे गटारीला ट्राय करावे ही विनंती.
मी आज पहिल्यांदाच ह्या कॉकटेलचा एक्स्पेरीमेंट करून बघितला, 100% हिट आहे. गटारीच्या शुभेच्छा!
प्रकार: वोडका बेस्ड, कंटेम्प्ररी कॉकटेल, देशी धमाका
साहित्य:
वोडका 2 औस (60 मिली)
टोमॅटो 1/2 बिया काढलेले
हिरवी मिरची 1 लहान (आपापल्या मगदुराप्रमाणे घ्यावे हे प्रमाण)
कांदा ¼ सोललेला
ऑरेंज ज्युस 3 औस (90 मिली)
लिंबाचा रस 10 मिली
मीठ चिमूटभर
बर्फ एक वाडगे भरुन
पुदीना 1-2 पाने (सजावटी करीता)
हिरवी मिरची 1 (सजावटी करीता)
ग्लास ओल्ड फॅशन
कृती:
सर्व साहित्य ब्लेन्डर मधे टाकुन (बर्फासहित) व्यवस्थित ब्लेन्ड करुन घ्या.
3-4 मिनिटे ब्लेन्ड केल्यावर आणि ब्लेन्डरला बाहेरुन पाण्याचे थेंब आले की कॉकटेल तयार झाले असे समजावे.
आता हे ब्लेंड झालेले मिश्रण ओल्ड फॅशन ग्लास मधे गाळून घ्या. पुदीना आणि हिरवी मिरची सजावटीसाठी ग्लासमधे टाका.
देसी धमाका 'झणझणीत मरीआई' तयार :)
सदर क़ॉकटेलची कल्पना 'द टल्लीहो बुक ऑफ क़ॉकटेल्स' वरून साभार
प्रतिक्रिया
29 Jul 2011 - 5:37 pm | श्रावण मोडक
रंगानं बोंब केली. देसी मरीआई वगैरे कसं लालभडक हवं. ;)
बाकी, कॉकटेलविषयी प्रतिक्रिया नाही. :(
29 Jul 2011 - 6:02 pm | सोत्रि
पॉइंटाचा मुद्दा मान्य, हे कॉकटेल मी आज पहिल्यांदाच ट्राय केले त्यामुळे कंटेंट्स चा अंदाज हुकला. :cry:
लालभडक रंगासाठी साठी लाल भडक पिकलेले टोमॅटो वापरले पाहिजे किंवा टोमॅटो प्युरी.
- (हुकलेला) सोकाजी :cry:
29 Jul 2011 - 5:54 pm | स्मिता.
श्रामो म्हणतात तसं देशी मरीआइचा रंग ब्लडीमेरीच्या तुलनेत नाही. ते ऑरेंज ज्युसमुळे झाले असावे. त्यापेक्षा एखादा लाल ज्युस वापरला तर?
आणि कॉकटेलात कांदा!! ये बात कुछ हजम नही हुई :(
29 Jul 2011 - 6:06 pm | सोत्रि
स्मितातै,
ह्यात कांद्यामुळे एक मस्त तेजतर्रारपणा येतो. टेस्टेड अन्ड रेकोमंडेड.
आता रंगात हुकलो म्हनुन शेपुट घातल्या गेले आहे, त्यामुळे जास्त काही खरडत नाही :(
- (शेपुट घातलेला) सोकाजी
29 Jul 2011 - 6:11 pm | स्मिता.
आवो, एवढ्यानं कशाला शेपूट घालायला लागलाय? हे असं चालायचंच :)
टोमॅटो प्युरी योग्य राहिल.
29 Jul 2011 - 6:00 pm | नावातकायआहे
१ लंबर.
उद्याच्या शुभ दिवशी मरीआई.
ऑरेंज च्या जागी टोंमेटो चालेल का?.
29 Jul 2011 - 6:30 pm | खादाड
करुन बघणार नक्कीच !!
29 Jul 2011 - 9:04 pm | पंगा
'मरीआई' म्हणजे नक्की मेरीच का?
(नाही म्हणजे माझीही बरीच वर्षे अशीच समजूत होती पण तसे नाही असे मध्यंतरी कोठेतरी वाचले. पण मग नक्की कोण ते आता आठवत नाही.)
31 Jul 2011 - 5:03 pm | सोत्रि
मला आंबे खायला आवडतात, कुठल्या झाडाचे/गावाचे/नावाचे ते शोधण्यात मजा येत नाही आणि तेवढा वेळपण नाही.
- ('आंबे'चुख्या) सोकाजी
29 Jul 2011 - 9:42 pm | प्रास
आता ही देशी मरीआई तुम्ही ट्राईड अॅण्ड टेस्टेड करून प्रेझेण्टलीये हे कळालंय हो पण (या 'पिणे' प्रकारात काहीही गम्य वा अनुभव नसतानाही) माझी आपली नेहमी प्रमाणेच -
एक शंका :-
आधी ऑरेंज ज्युसात बनवलेली देशी मरीआई, रंग गंडल्याने तुम्ही टॉमॅटो प्युरीत बनवायला सांगितलीये.
मग आता आधीच्या बी काढलेल्या १/२ टॉमॅटो ऐवजी बी काढलेल्या २ किंवा ३ संत्र्याच्या फोडी घ्याव्यात का?
बाकी तुमचे अभ्यासपूर्ण लिखाण आवडते वाचायला आणि बघायलाही हे वेगळे सांगायला नकोय. ;-)
31 Jul 2011 - 5:01 pm | सोत्रि
हरकत नाही ट्राय करून बघायला.
पण टोमॅटो किंवा टोमॅटो प्युरीने खरी धमाल येइल. क़ारण हे कॉक्टेल जेवणाच्या आधि घ्यायचे असते.
टोमॅटो किंवा टोमॅटो प्युरीमुळे हे साधारण टोमॅटो सुप सारखे काम करून नीट जठराग्नी प्रज्वलीत करते.
- (ट्राईड अॅण्ड टेस्टेड) सोकाजी
31 Jul 2011 - 11:03 pm | पुष्करिणी
ऑरेंज ज्यूस ऐवजी रेड ग्रेपफ्रुट ज्युस वापरलं (बियांसकट केलेलं), थोडीशी कडवट चवपण येते. ग्रेप्फ्रुट ज्यूस जास्त आंबट असल्यान लिंबाचा रस नाही घातला.
एक्दम लालभडक नाही पण भगव्या रंगाची झाली होती मरीआई..देशी पण पॉश :).
झणझणीत, मस्त चव एक्दम...
1 Aug 2011 - 3:25 pm | सोत्रि
फोटो डकवायचे ना :(
मलाही झणझणीत चव खुपच आवडली होती ह्या रेसीपीची. एकदम बेस्ट.
- (रंगहीन) सोकाजी
1 Aug 2011 - 2:49 pm | गजा गाजरे
मरिआइच्या नावान चान्ग भल.........
चालु द्या.......
अम्हि मराठी ........हो का........मग मराठी तच बोला कि.........
(नुस्ति बघुनच टाइट झालेला) गजा
1 Aug 2011 - 3:23 pm | विजुभाऊ
ब्लेन्डरला बाहेरुन पाण्याचे थेंब आले की कॉकटेल तयार झाले असे समजावे.
ब्लेंडरला देखील मिरचीमुळे घाम फुटला
1 Aug 2011 - 3:27 pm | सोत्रि
विजुभाउ,
_/\_ _/\_ _/\_
मस्त!
-(घाम फुटलेला) सोकाजी
18 Jul 2012 - 8:29 pm | सोत्रि
नान्याने त्याच्या धाग्यात दिलेली कॉकटेल्स गटारीला साजेशी नव्हती म्हणून हा धागा वर काढतो आहे.
- (रोज गटारी करणारा) सोकाजी
18 Jul 2012 - 8:34 pm | मोहनराव
मला वाटलं नवीन धागा काहीतरी गटारीला टाकाल म्हणुन.. ;)
8 Aug 2018 - 1:20 pm | कपिलमुनी
गटारी स्पेशल धागे येणे बन्द झाले . मिपा सोज्वळ झाले आहे का ?