स्वप्नांस बाप आहे .!

५० फक्त's picture
५० फक्त in जे न देखे रवी...
8 Mar 2012 - 2:23 pm

नमस्कार मंडळी,

ही आमची प्रेरणा misalpav.com/node/20935 अन ही आमची प्रतिभा (इथं आमची आदरार्थी नसुन अनेकवचनी आहे )

अवलीच छंद आहे, स्वप्नाकडे पहाणे..
स्वप्नास बाप आहे, घनदाटशा मिशांचा..

रुतले उरी नि पार्श्वी, ते रात्री मार खाणे.
झाला सराव आता, बांबूस सारण्याचा..

स्वप्नास रोग आहे, झोपेत चालण्याचा..
बापास शाप आहे, रात्रीस जागण्याचा..

गेल्या कितीक रात्री, उलटून जागताना.
झाला सराव आता, झोपेस टाळण्याचा..

त्या बापसास वाटे, तो यार मीच आहे.
स्वप्नास धाक देतो, आवशीस सांगण्याचा..

नजरेतले इशारे, जरि जाणिले तिच्या मी.
आहे खडा पहारा, गल्लीत सासर्‍याचा..

गच्चीत कोपर्‍याला , ती आज येत आहे.
तो खास बेत आहे, स्वप्नात चिंबण्याचा...

घेण्यास ताक जाता, भांड्यास का मी झाकू..
देहात आग आहे, अन ध्यास विझवण्याचा..

बाजार आज माझा, उठणार तातडीने..
कंपूस दे हाकारा , मदतीस धावण्याचा..

शृंगारहास्यकरुणकविताविडंबनमौजमजा

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

8 Mar 2012 - 2:38 pm | विजुभाऊ

झाली कितीक विडंबने सुमार चाळताना
झाला सराव आता. फुका स्वतःस पिळण्याचा

सुहास..'s picture

8 Mar 2012 - 9:11 pm | सुहास..

भलतीच मंद आहे, कशाकडे पहाणे..
डोक्यास ताप आहे, शिशुवर्गाच्या धाग्यांचा..

गुतले वरी नि माथी, ते साखर फुटाणे..
झाला वैताग आता, काव्यते वाचण्याचा..

आंजास रोग आहे, कात्री चालवण्याचा..
संमस शाप आहे, अंततो पाहण्याचा..

गेल्या कितीक बाय्टी, पलटून वाचताना.
आला कंटाळा आता, बूध्यांक चाळण्याचा..

येड चापसास वाटे, तो कंड मीच आहे.
वाचकांस ऊब येतो,जिलबीच टाकण्याचा..

काव्यातील नखरे, जेरि आणिले तिच्या मी.
आहे खडा मिठाचा, लेखणीत दर्जाचा

गच्चीत कोपर्‍याला , ती आज येत आहे.
म्हणे गच्चीला कोपरा, तोटा स्वप्नात राबण्याचा.

लेखनास कफ , स्क्रीनच का मी झाकू
बोटात कंड आहे, अन ध्यास बडवण्याचा

बाजार करी वाश्या, विडंबणार तातडीने..
कंपूस दे हाकारा , काव्यकंड शमवण्याचा ..

तर्री's picture

8 Mar 2012 - 2:48 pm | तर्री

जबरदस्त.

प्रचेतस's picture

8 Mar 2012 - 2:56 pm | प्रचेतस

जोरदार झालय.
बहारदार एकदम.

नगरीनिरंजन's picture

8 Mar 2012 - 3:11 pm | नगरीनिरंजन

जबरा!

बाजार उठवलेलाच आहे. =))

पण, "देहात आग आहे, अन ध्यास विझवण्याचा.." या ओळीत वृत्तभंग झाल्यासारखे का वाटतेय? ;-)

वृत्तीभंग म्हणायचे आहे काय?;)

तर्री's picture

8 Mar 2012 - 10:33 pm | तर्री

----------/\--------------

इरसाल's picture

8 Mar 2012 - 4:24 pm | इरसाल

प्रकाटाआ

वपाडाव's picture

8 Mar 2012 - 4:28 pm | वपाडाव

धुम धडाक !!

गणेशा's picture

8 Mar 2012 - 4:36 pm | गणेशा

स्वप्नास रोग आहे, झोपेत चालण्याचा..
बापास शाप आहे, रात्रीस जागण्याचा..

भारी एकदम ..
बिच्चारा स्वप्नाचा बाप !

सांजसंध्या's picture

8 Mar 2012 - 4:37 pm | सांजसंध्या

:) छान आहे विडंबन.

पहिल्या शेरात जमीन स्पष्ट झाली नाही.

चौकटराजा's picture

8 Mar 2012 - 4:38 pm | चौकटराजा

आम्हालाही एक ओळ सुचली -
किल्ल्यास ध्यास आहे " वल्ली" प्रवेशण्याचा

जबराट हो पन्नासराव.
संबंधीत यातून बोध घेऊन आपला आपला जिलब्यांचा रतिब कमी करतील अशी आशा आहे. :)

पैसा's picture

8 Mar 2012 - 5:54 pm | पैसा

लिहाव्या अश्याच तुम्ही, छान-छान कविता...
वाहुदे तुम्ह्च्याच कविंतेनी , मि.पा वरील कवितेंची सरिता....!

लै झाक....

भुण भुण भामा

गच्चीत कोपर्‍याला , ती आज येत आहे.
तो खास बेत आहे, स्वप्नात चिंबण्याचा...

इथे काहि चुकल्यासारख वाटतयं :P

:D

बाकी झक्कास ...

वपाडाव's picture

8 Mar 2012 - 8:35 pm | वपाडाव

गच्चीत कोपर्‍याला , ती आज येत आहे.
तो खास बेत आहे, स्वप्नात चिंबण्याचा...

त्या ऐवजी " बेधुंद* चुंबनाचा " आला तरी आपली काही हरकत नाय... हा का ना का !!!

*मदहोश, रसिक हे सुद्धा चालुन जाइल... (फ्रेंचबद्दल काय विचार आहे???) ;)

रेवती's picture

8 Mar 2012 - 8:40 pm | रेवती

किती ही धीटपणा.

अन्या दातार's picture

9 Mar 2012 - 3:15 am | अन्या दातार

ताक, भांडे इ. इ. आठवले ;)

पोरगा अगदी पटकन शिकला हो!

(वप्या, सांभाळून रे! श्रीमुखात भडकेपर्यंत ठिक आहे, पोलिस केस-बिस नको)

मी-सौरभ's picture

9 Mar 2012 - 11:19 am | मी-सौरभ

पर्भणित जाऊन, काही बाही बघून, धीटपणा वाढला हो पोराचा ;)

क ह र !!! इथल्या बालमनांवर वाईट परिणाम होईल की रे....

जेनी...'s picture

9 Mar 2012 - 12:01 am | जेनी...

'बेधुंद ' नको , तिथे ' स्वप्नात ' हाच शब्द हवाय कारन कवितेच नाव स्वप्नास बाप आहे अस आहे
म्हनुन स्वप्न शब्द हवाच .......बाकी एक्दम पर्फेक्ट.:P

( फक्त ५० ह्यानच्या सुध लेखनावरच्या पिरमानं घात केला राव हित , आन तस नसल ,तिथ त्योच शबुध पाहिजि आसल तर्र मन्ग त्यानीच हिथ येवुन सांगाव ,इनन्ति हाये ;)..)

धन्या's picture

9 Mar 2012 - 3:55 am | धन्या

( फक्त ५० ह्यानच्या सुध लेखनावरच्या पिरमानं घात केला राव हित , आन तस नसल ,तिथ त्योच शबुध पाहिजि आसल तर्र मन्ग त्यानीच हिथ येवुन सांगाव ,इनन्ति हाये ..)

शहरातील सुशिक्षीतांनी "इफेक्ट" आणण्याच्या नादात अस्तित्वात नसलेल्या बोली भाषेत लिहिलेले वाक्य वाचून अंमळ मौज वाटली.

वपाडाव's picture

9 Mar 2012 - 2:25 pm | वपाडाव

'बेधुंद ' नको , तिथे ' स्वप्नात ' हाच शब्द हवाय कारन कवितेच नाव स्वप्नास बाप आहे अस आहे म्हनुन स्वप्न शब्द हवाच .......बाकी एक्दम पर्फेक्ट.

मग 'स्वप्ना-स चुंबन्याचा' असेही करता येइल... गिव्ह इट अ थॉट...
इथे स्वप्ना(व्यक्ती) आहे...

अत्रुप्त आत्मा's picture

10 Mar 2012 - 11:32 pm | अत्रुप्त आत्मा

@मग 'स्वप्ना-स चुंबन्याचा' असेही करता येइल... >>>

एकमेका दगड मारण्याची प्रचंड येथे हौस आहे...
खत्री हाय हा धागा येथे प्रतिक्रीयांचा पाऊस आहे...

गच्चीत कोपर्‍याला , ती आज येत आहे.
तो खास बेत आहे, स्वप्नात चिंबण्याचा..

गच्चीत कोपर्‍याला , ती आज येत आहे.
तो खास तास आहे, बाहुत चेंबण्याचा..

असे ही चालले असते ;)

पियुशा's picture

9 Mar 2012 - 11:08 am | पियुशा

बाप रे !!!
काय खर नाय ब्वॉ या विभागाच ;)

चौकटराजा's picture

9 Mar 2012 - 4:40 pm | चौकटराजा

स्वप्नास बाप आहे , बापास शाप आहे
शापास धाक आहे धाकास आस आहे
आसास चाक आहे चाकास दाब आहे
दाबास माप आहे मापास टेप आहे
टेपास .......
चायला आम्ही कुठे आताशी सांजसंध्या यांच्याकडून गजल शिकत आहोत .
त्यामुळे पुढे काहीच येत नाही !

अत्रुप्त आत्मा's picture

9 Mar 2012 - 10:15 pm | अत्रुप्त आत्मा

@चायला आम्ही कुठे आताशी सांजसंध्या यांच्याकडून गजल शिकत आहोत .
त्यामुळे पुढे काहीच येत नाही ! >>> खपल्या गेलो हाय

सांजसंध्या's picture

10 Mar 2012 - 7:59 am | सांजसंध्या

चायला आम्ही कुठे आताशी सांजसंध्या यांच्याकडून गजल शिकत आहोत .
त्यामुळे पुढे काहीच येत नाही !

:D
काका मी काय तुम्हाला शिकवणार ? तुम्हीच मिपाला हातात बॅट घेऊन कविता शिकवताय कि ... हलकेच घ्या प्लीज :innocent:

यकु's picture

10 Mar 2012 - 8:17 pm | यकु

बाजार आज माझा, उठणार तातडीने..
कंपूस दे हाकारा , मदतीस धावण्याचा..

या कडव्यावर भाडकन फुटलो..!
आणि मला तिकीट देणारा कंडक्टर उडाला.. ;-)