कॉकटेल लाउंज : गाथा टकीलाची (भाग १)

सोत्रि's picture
सोत्रि in पाककृती
1 Mar 2012 - 1:02 am

कीला ह्या माझ्या अत्यंत आवडत्या मद्याची आणि माझी 'तोंड'ओळख फारच अनपेक्षितरीत्या झाली. 2000 साली पहिल्यांदा अमेरिकेत गेलो असताना जुन्या मित्रांचा न्यू जर्सी येथे गेट टुगेदरचा बेत ठरला. त्यातल्या एका मित्राला मायक्रो-सॉफ्ट मध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळाल्याबद्दल त्याने 'रेड लॉबस्टर' ह्या एका रेस्टॉरंटमध्ये आम्हा सर्वांना पार्टी दिली. तिथेच मला टकीला भेटली :)

त्या मित्राने जेवणाच्या ऑर्डरीबरोबरच मार्गारीटा कॉकटेलही मागवले होते. त्या कॉकटेल ग्लासबरोबर एक छोटा ग्लासपण सर्व्ह केला गेला होता. (त्याला शॉट ग्लास म्हणतात हे तेव्हा माहिती नव्हते) त्यात सोनेरी रंगाचे द्रव्य होते. आमच्याबरोबर असणार्‍या कोणाच्याही मागच्या सात पिढ्यांमधील कोणीही 'रेड लॉबस्टर' मध्ये जाऊन काहीही ऑर्डर करण्याची सुतराम म्हणतात तसली शक्यता नसल्याने त्या छोट्याश्या ग्लासात काय आहे हे कोणालाही माहिती नव्हते आणि कळलेही नव्हते. त्यामुळे आम्ही सगळेच जण, पु.लं. आणि त्यांचे मित्र मॉन्जीनीमध्ये गेल्यावर जसे बावचळून गेले होते, डिक्टो तसेच बावचळून गेलो होतो. त्या ग्लासात काय आहे आणि त्याचे काय करायचे ह्या टेन्शनमुळे समोरचा चवदार लॉबस्टरही गोड लागेना. त्यात ऑर्डर घ्यायला आणि सर्व्ह करायला होत्या अमेरिकन ललना, त्यामुळे आम्ही सर्वच जण आणखीनंच संकोचलो होतो. पण देवदयेने समोर मादक 'शराब'च्या जोडीने 'शबाब'ही असताना तसेच बावचळून जाणे आणि तसेच बसून राहणे मनाला काही केल्या पटेना. मग मीच जरा धाडस करून आमच्या वेट्रेसला (आमच्या म्हणजे आमच्या टेबलच्या) बोलावून त्या छोट्या ग्लासात काय आहे ते विचारले.

ती एक टीन एजरच होती. एकदम फसफसणार्‍या उत्साहात तिने सांगितले 'शुअर सर, इट्स टकीला'. ऑ, मी आणि सर? एक मित्र बोललाही 'च्यायला तुझा बाप शाळेत सर होता ना रे, तुला का सर म्हणतेय ती?' तोही मुंढेवाडी बुद्रुक सोडून पहिल्यांदाच गावाबाहेर आला असल्यामुळे त्याच्या त्या तिरकस बोलण्याला त्याचे अज्ञान समजून मी तिकडे दुर्लक्ष केले. आता त्या ग्लासात टकीला आहे हे तर कळले होते पण त्या छोट्या ग्लासात ती टकीला द्यायचे प्रयोजन काही केल्या कळेना. त्यांत पुन्हा ते सर म्हटल्यामुळे आता एक प्रचंड गोची झाली होती, त्या टकीलाचे काय करायचे ते विचारायचे कसे? एका हायस्कूलच्या सरांचा मुलगा असल्याने 'सरांना सर्व काही माहिती असते किंबहुना तसा आव आणायचा असतो' हे मला चांगलेच माहिती होते. मी तसा आव आणायचा प्रयत्न केलाही पण एकंदरीतच आमच्या भंजाळलेल्या अवतारावरून आम्ही सर्वजण कुठल्यातरी 'बुद्रुक' गावावरून आलो आहोत हे तिला बहुदा कळले असावे. 'एनी हेल्प,सर?' असे ती विचारती झाले. मग मात्र मी सर्व लाज सोडून त्या छोट्या ग्लासात दिलेल्या टकीलाचे काय करायचे ते तिला विचारून मोकळा झालो. तिने हसून 'शुअर सर' म्हणून त्या छोट्या ग्लासातली टकीला मार्गारीटामध्ये टाकून ते कॉकटेल अजून स्ट्रॉन्ग करू शकतो असे सांगितले. तसे करायचे नसल्यास नुसताच शॉट घ्यायचा असे ज्ञान वाढवले. नुसताच शॉट घ्यायचा हे तोपर्यंत बियर (तीही सुरुवातीला सोडामिक्स) पिणार्‍या मला काही झेपलेच नाही. 'नुसताच शॉट घ्यायचा म्हणजे कसे?' हे तिला विचारले. तिच्या मधाळ हसून बोलण्यामुळे नाही म्हटले तरी आता माझीही भीड जरा चेपली होतीच. :) तिने लगेच तो शॉट ग्लास उचलून गट्टम करून टाकला आणि परत एकदा मधाळ हसत म्हणाली 'असे!' मग तिला थॅन्क्स म्हणाल्यावर ती निघून गेली.

ती गेल्यावर मग सर्वांनी तसा शॉट घ्यायचे ठरवले. आता तिने माझा 'सर' केल्यामुळे आणि माहिती मिळवायचा गडही मी 'सर' केल्यामुळे सर्वप्रथम मीच तो शॉट ग्लास उचलून गट्टम करावा असा सर्वांनी कल्ला केला. मी ही मग धाडस करून तो शॉट ग्लास उचलून गट्टम केला. त्यानंतरचा अनुभव काय वर्णावा महाराजा! जसजशी ती टकीला घशातून उतरत पोटात जात होती तसातसा तो पूर्ण प्रवाह मला जाणवत होता. टीपकागदावर शाईचा थेंब पडल्यावर जसा तो अल्लाद, हळूवारपणे पसरत जातो अगदी तशीच उष्णतेची एक लहर माझ्या शरीराच्या रंध्रा-रंध्रातून अलगद पसरत जात होती. डिसेंबरचा महिना, बाहेर तापमान उणे 1 ते 2 म्हणजे भयंकर थंड. थंडगार पडलेल्या शरीरात पसरणार्‍या त्या उष्णतेच्या लहरीचा महिमा काय वर्णावा, निव्वळ शब्दातीत. त्यानंतर त्या चवीमुळे आणि त्या अनुभवामुळे आणखीन 2-3 शॉट्स मागवून ते गट्टम करण्यात आले. प्रत्येक शॉटबरोबर ओव्हरकोट, मफलर, स्वेटर असे प्रचंड थंडीमुळे घातलेले कपड्यांचे थर काढून टाकले, सर्वांनीच. ह्या अनुभवानंतर मी तर टकीलाचा कट्टर भक्त झालो.

त्यानंतर बर्‍याच वर्षांनी मदिरेचा महापूर असलेल्या जपानमध्ये जाण्याचा योग आला. तोक्योमध्ये रोप्पोंगी ह्या उपनगरात 'अगावे' नावाचा एक्सक्लूसिव्ह टकीला बार आहे. त्या बारमध्ये गेल्यावर टकीलाचे जे काही असंख्य प्रकार जगात अस्तित्वात आहेत ते सर्व एका छताखाली बघायला आणि चाखायला मिळाले. त्यावेळी चाळीस चोरांच्या गुहेत शिरल्यावर, तिथली अगणित संपत्ती बघितल्यावर अलीबाबाची जशी अवस्था झाली असेल तशीच माझी, टकीला भक्ताची, अवस्था झाली होती. :)

चला आता नमना नंतर मूळ गाथेकडे वळूयात.

टकीला ही मेक्सिको ह्या उत्तर अमेरिकेच्या दक्षिणेकडील देशाची देणगी आहे मद्यविश्वाला. टकीला, मेक्सिकोत, 'अगावे' ह्या निवडुंग (Cacti) सदृश्य, भरपूर प्रमाणात पैदास होणार्‍या, वनस्पतीच्या शर्करायुक्त फळापासून बनवली जाते. हे फळ अननसासारखे असते त्याला स्पॅनिश भाषेत 'piñas' म्हणजेच अननस असे म्हणतात.(हा piñas म्हणजेच pina colada मधला पिना)

ह्या टकीलाचा इतिहास फार रंजक आहे. फार पुर्वीपासून ह्या अगावेच्या फळाच्या (piñas) गरापासून, त्या गराला फर्मेंट करून (आंबवून) एक मादक द्रव्य मेक्सिकोचे स्थानिक लोक बनवत असत. त्याला पल्के (Pulque) असे ते म्हणत. अगावेच्या बर्‍याच प्रजाती आहेत. त्यां विवीध प्रजातींच्या मिलाफापासून (Blend) हे पल्के बनवले जात असे. पंधराव्या शतकात स्पॅनिश लोकांनी मेक्सिको पादाक्रांत केला. स्पॅनिश लोकांना हे पल्के आवडले पण ते पडले जातीवंत युरोपियन, त्यांनी त्याला 'युरोपियन टच' दिला. म्हणजे त्यांनी त्या फर्मेंटेशनला जोड दिली डिस्टीलेशनाची. स्पॅनिश लोकांनी मेक्सिको पादाक्रांत केल्यावर साधारण एका दशकात उत्तर अमेरिकेतले पहिले डिस्टील्ड मद्य ह्या अगावेपासून तयार झाले जे आजच्या टकीलाचे मूळ रूप, ज्याला 'मेझ्कल (Mezcal)' असे म्हटले जायचे, ते होय.

मेझ्कल ब्रॅन्डी -> अगावे वाइन -> मेझ्कल टकीला -> शेवटी आजची मॉडर्न टकीला असा आजच्या टकीलाचा सुधारीत आवृत्तींचा प्रवास झाला.

आता प्रश्न असा पडेल की हा सुधारीत आवृत्तींचा प्रवास का वा कसा? तर ह्याचे उत्तर दडले आहे अगावे ह्या वस्पतींच्या प्रजातींमध्ये. सुरुवातीला मूळ मेक्सिकन स्थानिक लोक बर्‍याच प्रकारच्या अगावेच्या प्रजातीपासून मेझ्कल बनवायचे. पण स्पॅनिश लोकांनी त्यावर युरोपियन मद्यसंस्कार केले :) त्यांनी अगावेच्या विवीध प्रजांतींच्या वापरामधे सुसूत्रता आणली. जसे जसे ह्या प्रजातींवर संशोधन होत गेले तसे तसे आजची सुधारीत टकीला तयार होत गेली.

अगावेच्या ह्या खालील प्रमुख प्रजाती आहेत.

Agave Tequilala : टकीलासाठी वापरली जाणारी अगावे


ह्यातली फक्त 'Agave Tequilala' ही प्रजात आजची मॉडर्न टकीला बनवण्यासाठी वापरली जाते.ह्या अगावेला 'ब्लु अगावे (Blue Agave)' किंवा टकीला अगावे असेही म्हणतात. ह्या प्रजातींच्या फळामध्ये शर्करा फ्रुक्टोजच्या रूपात मोठ्या प्रमाणावर असते त्यामुळे ही प्रजात टकीला बनवण्यासाठी एकदम परफेक्ट असते.बाजूच्या चित्रात दिसणारी ही ह्या वनस्पतीची ही पाने आहेत. ती वेळोवेळी कापली जातात ज्यामुळे त्याच्या फळाला जास्त एनार्जी मिळते आणि त्यातले शर्करेचे प्रमाण वाढते. ह्या झाडाला पिवळ्या रंगाची फुले येतात आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांचे परागीकरण वटवाघूळाकडून (आपले 'पुण्याचे वटवाघूळ' नव्हे, ते वेगळे ;) ) होते.


हाच तो piñas म्हणजे अगावेचे शर्करायुक्त फळ ज्याला 'अगावे हार्ट' म्हटले जाते.हे फळ साधारण ह्याच्या झाडाच्या वयाच्या साधारण बाराव्या वर्षी तयार होते. ह्या फळाची पाने काढून टाकल्यावर वजन अंदाजे 35-90 किलो पर्यंत असते. ही कापलेली पाने पुढच्या प्लांटेशनसाठी वापरली जातात.टकीला बनवण्यासाठी ह्या फळाचा गर, हे फळ भाजून काढला जातो.

भौगोलिक स्थानमहात्म्य


जसाजसा टकीलाला लोकाश्रय मिळून ती लोकप्रिय होत गेली तसा मेक्सिकोला एक उत्पनाचे साधन मिळून टकीला डिस्टलरीच्या उद्योगाने तेथे मोठे रूप धारण केले. मग ह्या टकीलाच्या स्वामित्वासाठी तिथले सरकारही जाग़ृत झाले आणि टकीलाची सरकारी मानके ठरली.मेक्सिको मधल्या जालिस्को (Jalisco) राज्यातील Los Altos (Highlands) ह्या पर्वतराशींच्या कुशीत असलेल्या 'टकीला' ह्या महानगरामधे बनलेली टकीला हीच स्वतःला अस्सल मॉडर्न टकीला म्हणवून घेउ शकते.

नोट: सर्व चित्रे आंतरजालावरून साभार

(क्रमश:)

प्रतिक्रिया

इष्टुर फाकडा's picture

1 Mar 2012 - 1:21 am | इष्टुर फाकडा

सोत्रि, लेख चढला !
हाही शॉट मस्त लागला आहे :D

निशदे's picture

1 Mar 2012 - 1:42 am | निशदे

<< जसजशी ती टकीला घशातून उतरत पोटात जात होती तसातसा तो पूर्ण प्रवाह मला जाणवत होता. टीपकागदावर शाईचा थेंब पडल्यावर जसा तो अल्लाद, हळूवारपणे पसरत जातो अगदी तशीच उष्णतेची एक लहर माझ्या शरीराच्या रंध्रा-रंध्रातून अलगद पसरत जात होती. डिसेंबरचा महिना, बाहेर तापमान उणे 1 ते 2 म्हणजे भयंकर थंड. थंडगार पडलेल्या शरीरात पसरणार्‍या त्या उष्णतेच्या लहरीचा महिमा काय वर्णावा, निव्वळ शब्दातीत. त्यानंतर त्या चवीमुळे आणि त्या अनुभवामुळे आणखीन 2-3 शॉट्स मागवून ते गट्टम करण्यात आले. >>

अगदी योग्य.....
टकीलाची माहिती देण्याचा कार्यक्रम संपल्यावर जरा ५-६ शॉट्सनंतर होणार्‍या वातावरणनिर्मितीचे वर्णन करावे....... त्यात अधिक मजा असते असे आमचे प्रायव्हेटमधले खाजगी मत........

पाषाणभेद's picture

1 Mar 2012 - 3:23 am | पाषाणभेद

>> प्रत्येक शॉटबरोबर ओव्हरकोट, मफलर, स्वेटर असे प्रचंड थंडीमुळे घातलेले कपड्यांचे थर काढून टाकले, सर्वांनीच.
पुढे काय केले असावे बरं????

सोत्री, त्या मागच्या बिअरच्या धाग्यातल्या प्रश्नाचे उत्तर देवून टाका ना गडे.

सोत्रि's picture

1 Mar 2012 - 9:18 am | सोत्रि

खव चेकवा!

- (साकिया) सोकाजी

अन्या दातार's picture

1 Mar 2012 - 7:51 am | अन्या दातार

वाचतोय. पुभालटा.

प्रचेतस's picture

1 Mar 2012 - 9:09 am | प्रचेतस

जबरी.
मद्याचार्य _ /\_

जेनी...'s picture

1 Mar 2012 - 9:22 am | जेनी...

टकीला शॉट ...मस्तच ....

वाचतेय .....

अत्रुप्त आत्मा's picture

1 Mar 2012 - 9:24 am | अत्रुप्त आत्मा

आयला हे' अगावे आपल्या घायताळी सारखंच दिसतय की,आंम्ही त्याची पानाची वरची काटेरी टोकदार चोच कट करुन ती वेताच्या बाणाला बसवुन त्यानी रानडुकरांना शॉट मारायचो... पण ह्याचा असाही शॉट लागतो..ह्ये म्हाइत नव्हत बुवा... बरीच आगाव..ए,ही घायाताळ, काय अजब दुनिया हाय ही मद्याची...! ---^---

पक पक पक's picture

2 Mar 2012 - 8:50 am | पक पक पक

काय अजब दुनिया हाय ही मद्याची...! ---^---


भट्जी बुवा कधी बसायच..... ;)

अत्रुप्त आत्मा's picture

3 Mar 2012 - 10:37 am | अत्रुप्त आत्मा

@भट्जी बुवा कधी बसायच..... >>> आंम्हास कायमचे उठवायच्या इचारात आहात काय..? अहो जो नंदीला बघुन एवढा फुरफुरतो,त्याने शंकराची गळा-भेट घेतली,तर कधी सोडेल का..?---शंकर त्याला ;-)

कृपया:- या पुढची प्रतिक्रीया खरडीत देणे,इथे आपणच टाइट होऊन फिरण बरं नाही दिसायचं ;-)

प्यारे१'s picture

1 Mar 2012 - 10:08 am | प्यारे१

२००० ते २०१२ - १२ वर्षात 'या विषया'त एकदम 'पी हेच्च डी' केलीस की रे सोत्रि तू... फारच अभ्यासू मुलगा आहेस नै! :)

सोत्रि's picture

1 Mar 2012 - 10:13 am | सोत्रि

फारच अभ्यासू मुलगा आहेस नै!

तर मग, एका तपाची तपश्चर्या आहे ही, उगाच नै काही :)

- ('तप'स्वी) सोकाजी

मराठमोळा's picture

1 Mar 2012 - 10:39 am | मराठमोळा

खल्लास!!
मार्टीनी मीदेखील पहिल्यांदा अमेरीकेतच चाखली होती आणी जाम आवडली होती.. गोल्डन टकीला सिल्वरपेक्षा जास्तच आवडते. :)
लेख माहितीपुर्ण.. आणि मस्त.. मार्टीनी सारखाच.. :) येऊ देत अजून..

सोत्रि's picture

1 Mar 2012 - 12:42 pm | सोत्रि

काहीतरी गल्लत होते आहे का?

मार्टीनी हे जीन बेस्ड कॉकटेल आहे. टकीलाचे कॉकटेल म्हणजे "मार्गारीटा"

- (साकिया) सोकाजी

मराठमोळा's picture

2 Mar 2012 - 5:31 am | मराठमोळा

अरेच्या खरच की,
स्लिप ऑफ माईंड झालं. लिहायचं मार्गारिटा होतं अनावधानाने मार्टीनी लिहिलं गेलं :)
मार्गारिटाच ती.. चूक सुधारल्याबद्दल धन्यवाद.
(बरेच दिवसांपासून मद्यापासून दूर राहिलं की असं होतं.) ;)

अमृत's picture

1 Mar 2012 - 11:51 am | अमृत

पण टकिलाच्या शॉट नंतर मीठ का खातात(चाटतात) ?

टिप : बरेच दिवसात तुमचा लेख नाही म्हणुन 'खव'णार होतोच तुम्हाला.

अमृत

यकु's picture

1 Mar 2012 - 12:08 pm | यकु

आता कसं गार गार वाटतंय!
यासाठीचे ग्लास कुठेत हो सोकाजी? ;-)

ग्लास क्रमशःच्या फडताळात अडकले आहे बहुतेक.
काढेल तो हळू हळू बाहेर. ;)

बाकी हा सोत्र मला अट्टल दारुबाज बनवायच्या मागे का लागला हे उमजेना?

चिगो's picture

1 Mar 2012 - 4:12 pm | चिगो

"रिपीट" झाल्याने प्रकाटाआ..

चिगो's picture

1 Mar 2012 - 12:10 pm | चिगो

मद्याचार्य सोत्रिंकी जय हो..
नोकरी लागल्याच्या पार्टीत बर्‍याचश्या मित्रांनी पहील्यांदाच टकीला शॉट्स मारले होते, आणि बिल पाहून माझ्या डोक्याला शॉट लागला होता... ;-)

येऊ द्यात..

प्रभो's picture

1 Mar 2012 - 12:45 pm | प्रभो

भारी रे.....

विजुभाऊ's picture

1 Mar 2012 - 1:57 pm | विजुभाऊ

माताय त्या धमाल मुलाने आम्हाला टकीला म्हणजे काहीतरी वेगळेच सांगितले होते.
व्होडका आणि उलट्या हाताला मीठ लावायचे असे काहीतरी होते. नक्की आठवत नाही. पण धम्याच्या बहुतेक कोणीतरी मस्त मोरु केलेला असावा आणि अज्ञानातून निपजलेल्या आत्मविश्वासाने त्याने आम्हा पामराना टकीला बद्दल एक दीएर्घ प्रवचन दिले होते शांग्रीलात

विवेक मोडक's picture

1 Mar 2012 - 3:29 pm | विवेक मोडक

विजुभौ,
धम्याने या विषयात पीहेच्डी केली आहे असं ऐकण्यात आले आहे त्यामुळे त्याचा इथे कोणि मोरु बनवेल हे अशक्यप्राय आहे.

वा मास्तर! ह्या लेखाने जुन्या आठवणी जाग्या झाल्या..

ह्या टकीलाच्या बाटलीत एक गांडूळासारखा दिसणारा प्राणी तरंगत असतो त्याबद्दल पण लिहावे

मोहनराव's picture

1 Mar 2012 - 4:19 pm | मोहनराव

अतिउत्तम शॉट (टकिला) आहे हा सोत्रिंकडुन!
ये लगा सिक्सर!

सुहास झेले's picture

1 Mar 2012 - 4:21 pm | सुहास झेले

सोत्रि, एकदम माहितीपूर्ण लेख..... पुढचा भाग येऊ देत लवकर लवकर :) :)

हिवाळा संपता संपता मला अगदी कंटाळा येतो.
आजकाल तसंच वाट्टय, त्यातच हा लेख आणि टकिला टाकल्यावर येणार्‍या उबेचं वर्णन वाचून मनाला बरं वाटलं हे नाकारत नाही.

माझीही शॅम्पेन's picture

1 Mar 2012 - 9:31 pm | माझीही शॅम्पेन

राखिव :) एक मोठी प्रतिक्रिया देतो (बुच मार्ल्यास हरकत नाही :)

माझीही शॅम्पेन's picture

1 Mar 2012 - 9:31 pm | माझीही शॅम्पेन

राखिव :) एक मोठी प्रतिक्रिया देतो (बुच मार्ल्यास हरकत नाही :)

५० फक्त's picture

2 Mar 2012 - 7:49 am | ५० फक्त

छान माहिती,

स्वाती२'s picture

2 Mar 2012 - 6:11 pm | स्वाती२

लेख आवडला.

Pearl's picture

3 Mar 2012 - 9:55 am | Pearl

लेख आवडला.
आणि माहिती पण इंटरेस्टिंग आहे. टकिलाचा इतिहास-भुगोल आवडला.
>>
त्यानंतरचा अनुभव काय वर्णावा महाराजा! जसजशी ती टकीला घशातून उतरत पोटात जात होती तसातसा तो पूर्ण प्रवाह मला जाणवत होता. टीपकागदावर शाईचा थेंब पडल्यावर जसा तो अल्लाद, हळूवारपणे पसरत जातो अगदी तशीच उष्णतेची एक लहर माझ्या शरीराच्या रंध्रा-रंध्रातून अलगद पसरत जात होती. डिसेंबरचा महिना, बाहेर तापमान उणे 1 ते 2 म्हणजे भयंकर थंड. थंडगार पडलेल्या शरीरात पसरणार्‍या त्या उष्णतेच्या लहरीचा महिमा काय वर्णावा, निव्वळ शब्दातीत.
>>

मस्त अनुभव वर्णन :-)

कॉमन मॅन's picture

3 Mar 2012 - 12:03 pm | कॉमन मॅन

आपला अभ्यास प्रशंसनीय आहे..

मन१'s picture

3 Mar 2012 - 9:30 pm | मन१

नुसते वाचूनच चढते आहे....

प्रभाकर पेठकर's picture

5 Mar 2012 - 6:46 pm | प्रभाकर पेठकर

ज्ञानात भर पडली. आता लवकरच 'अनुभवातही' पडो अशी इश्वरचरणी प्रार्थना.

वा. उत्तम लेख..

घायपात की काय म्हणतात तसं आगावे दिसतंय.. वर अ.आने म्हटल्याप्रमाणे.

गोव्यात हे आगावे बरेच उगवतात असं दिसतं.. तिथे गोव्याच्या मातीत उगवलेल्या आगावेपासून डेस्मंडजी नावाच्या ब्रँडचा टकीला बनवला जातो.

बादवे या उत्तम लेखाने फार्फार जुन्या "ताकीलाSSS" या धम्माल ट्यूनची आठवण झाली. तुनळी अ‍ॅक्सेस नसल्याने इथे शोधून एम्बेड करता येत नाही.. :( स्वारी... पण तुफ्फान ट्यून होती टकीलाची..

"ताकीलाSSS" अशा खर्जातल्या उच्चाराने आणि अधेमधे दणदणीत संगीताने भरलेली ही धून अनेक हिंदी सिनेमांनी मारामारी इ इ च्या ब्याक्ग्राउंडला वापरल्याचं आठवतं.. पण त्यात ताकीलाSSS चं शुद्ध "टकीला" असं रुपांतर केल्याचं आठवतं.

सोत्रि's picture

5 Mar 2012 - 11:27 pm | सोत्रि

गोव्याच्या मातीत उगवलेल्या आगावेपासून डेस्मंडजी नावाच्या ब्रँडचा टकीला बनवला जातो.

सही, हे माहितीच नव्हते. आता गोव्याला गेल्यावर चेक करून बघितलेच पहिजे!
ह्म्म्म... आता यासाठी गोव्याला जाणे आले ;)

- ('गोवा'प्रेमी) सोका़जी

हरकाम्या's picture

15 Mar 2012 - 1:59 am | हरकाम्या

मित्रा " सोत्रि " मी तुझा जबर्दस्त चाह्ता झालेलो आहे. तुझे लेख वाचल्यानन्तर मी अजुनपर्यन्त " वारुणीची "
चव का चाखली नाही याचे मला फारच वाईट वाटु लागले आहे.

सोत्रि's picture

15 Mar 2012 - 3:12 am | सोत्रि

धन्यवाद!

जास्तच वाईट वाटत असेल तर कधी भेटायचे बोला :)

- (अंमळ सेंटी झालेला) सोकाजी

श्रीरंग's picture

15 Mar 2012 - 10:47 am | श्रीरंग

मस्त लेखनशैली.
आठ आठ टकीला शॉट्स पीणार्यांच्या त्यानंतरच्या लीला पाहणे अत्यंत मनोरंजक असते, असा आमचा अनुभव आहे.