म्हणून..

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
14 Feb 2012 - 3:14 pm

काही नाही रे भेंचोत.. आमचं नुसतं फ्रेंडलीये..
असं सगळ्या गँगला म्हणत म्हणत आणि आतल्या आत मोहरत जे काही केलं तेव्हाही व्हॅलेंटाईन डे येऊन गेले असणार बरेच..
लक्षात आलं नाही.. आमचं कॅलेंडर वेगळंच होतं.. म्हणून..

तेव्हाही सुरुवात झाली होती.. ग्रीटिंग कार्डांची चार्पाच दुकानं फोडायला..
पण फरक पडला नाही.. कारण ग्रीटिंग घ्यायचं नव्हतंच..
ग्रीटिंगबिटिंग कशाला.. भावनांचं प्रदर्शन नुसतं.. म्हणून..

चॉकलेटं.. हार्टशेपची नव्हती..
तिला दिलं होतं मी.. रावळगाव मला वाटतं.. अन तिनंही मला.. कॉफी बाईट..
रॅपर पडून आहे कपाटात खास कप्प्यात.. ठेवून उपयोग नसला तरी फेकायचं कुठे..
म्हणून..

दोन फेब्रुवारींच्यामधे पाऊस येतोच.. तेव्हाही यायचाच..
कानात गप्पकन दडा बसेस्तो भिजलो.. कधीकधी तर चक्क तिच्यासोबतही..
कॉलेज चुकवून.. करियरची कधी शाट पर्वा नव्हती...तिलाही..मलाही..
म्हणून...

त्या वेळच्या त्या घरच्या त्या बागेत लाल गुलाब होता तिज्यायला..वास अजून नाकात..
पण तोडला कधीच नाही.. सगळे आपोआप कोमेजू दिले..
तोडून कशाला कोमेजवायचे.. म्हणून..

शहराच्या नावावरुन अमेरिका की ऑस्ट्रेलिया कळत नसलं तरी कुठेतरी ती आहे..
कुठेतरी आहे तशीच फेसबुकवरही..
पोराचे हॅलोवीन की थँक्सगिव्हिंगचे फोटो अपलोडवत.. मीही टाकलेत मारुति आल्टो घेतली तेव्हाचे..
आली होती तिची फ्रेंड रिक्वेस्टही..
"नॉट नाऊ" क्लिक केलं..
"नेव्हर"चं बटण नव्हतं..
म्हणून..

भाषामुक्तकराहणीप्रकटनविचारप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

14 Feb 2012 - 3:21 pm | प्रचेतस

च्यायला गवि, हळवं केलंत राव.

आयला गवि, काय लिहितोयस रे....

आज सॉलिड मुहूर्त जमलाय मिपावर.

सकाळी सकाळी मधुबाला दर्शन, त्यानंतर श्रामोंचा रामदासकाकांवरचा लेख, त्या पूजा पवारांची व्हॅलेन्टाईनच्या पावसातली गोष्ट आणि तुझं टोटल व्हॅलेन्टाईनी स्वगत.....

अन्या म्हणतो तेच खरंय, च्यायला, आज मिपाकरांचा जीव घेणारेत तुम्ही लोकं.....

मुक्तक झकास उतरलंय हे वेगळं सांगायला नकोच.

अन्या दातार's picture

14 Feb 2012 - 3:25 pm | अन्या दातार

आज मिपाकरांचा जीव घेणारेत तुम्ही लोकं..

मिपावरील लेख वाचून आमचा जीव रोज रोज जावा अशीच इच्छा आहे. :)

टिवटिव's picture

14 Feb 2012 - 3:28 pm | टिवटिव

अनुमोदन.....

पक पक पक's picture

14 Feb 2012 - 3:24 pm | पक पक पक

वा! गवि खुप छान !! मस्त लिहील आहे मनोगत...

दोन फेब्रुवारींच्यामधे पाऊस येतोच.. तेव्हाही यायचाच..
कानात गप्पकन दडा बसेस्तो भिजलो.. कधीकधी तर चक्क तिच्यासोबतही..
कॉलेज चुकवून.. करियरची कधी शाट पर्वा नव्हती...तिलाही..मलाही..
म्हणून...

फारच भारी वाटल वाचायला....एक्दम रियल ,

इरसाल's picture

14 Feb 2012 - 3:30 pm | इरसाल

गेले ते दिन....

धमाल मुलगा's picture

14 Feb 2012 - 8:13 pm | धमाल मुलगा

झाला का बल्ल्या?
आता? ;)

चिगो's picture

15 Feb 2012 - 5:25 pm | चिगो

>>झाला का बल्ल्या?

गप ऽ किनी फुटलो की राव.. काय हे? गवि बिचारे हळुवार होऊन लिहीताहेत, आणि तुम्ही काड्या घाला साल्यो..

गवि, मुक्तक आवडलं..
(भिजलेला) चिगो

गणेशा's picture

15 Feb 2012 - 12:08 am | गणेशा

सेम हियर

स्पा's picture

14 Feb 2012 - 3:31 pm | स्पा

__/\__

...............
........................

मैत्र's picture

14 Feb 2012 - 6:09 pm | मैत्र

__/\__

...........................................................................................

छोटा डॉन's picture

14 Feb 2012 - 3:32 pm | छोटा डॉन

छान लेख

- छोटा डॉन

वपाडाव's picture

14 Feb 2012 - 3:33 pm | वपाडाव

नॉट नाउ क्लिक केलं... नेव्हरचं बटन नव्हतं... म्हणुन....

सस्नेह's picture

14 Feb 2012 - 3:34 pm | सस्नेह

अहो, ते जर फ्रेंडली न राहता पर्मनंट झालं असतं ना, तर हा हळवेपणा गेंडा झाला असता ना..?

सस्नेह's picture

14 Feb 2012 - 3:35 pm | सस्नेह

अहो, ते जर फ्रेंडली न राहता पर्मनंट झालं असतं ना, तर या हळवेपणाचा गेंडा झाला असता ना..?

रानी १३'s picture

14 Feb 2012 - 3:43 pm | रानी १३

__/\__ :( __/\__

मोहनराव's picture

14 Feb 2012 - 3:49 pm | मोहनराव

वाचला तुमचा लेख!! नेहमीप्रमाणेच उत्तम!!
गविंची लेखणी आहेच छान... म्हणुन!!

गवि's picture

14 Feb 2012 - 3:57 pm | गवि

...................

..लेखक कवी किंवा निवेदक याने "ब्लॉक युजर" असं बटण का दाबलं नाही अशी शंका येऊ शकते.. आणि विचार केल्यावर ती दूरही होऊ शकते..

मन१'s picture

14 Feb 2012 - 11:10 pm | मन१

*
काहीतरीच्चे नुस्तं...
मुळात सदर इसमाने फेसबुक अकाउंट हेच तिच्याकडून येणार्‍या फ्रेंड रिक्वेस्टच्या आशेने काढलेले नाही कशावरून?
आधी स्वतःहून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची हिम्मत झाली नाहिच, उलट जेव्हा खरोखर रिक्वेस्ट दारी चालत आली तेव्हा तिचा स्वीकार करण्याचीही हिम्मत झाली नाही.
मानवी मन हे असं घोटाळ्याचच का असतं हे (असलाच तर/ मानवाने निर्माण केलेला)देव जाणे.
*

दिल के अरमांऽऽऽऽऽ आंऽऽऽऽऽसुओं मे बेहे गये. ;)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

14 Feb 2012 - 4:20 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

...............!!!

__/\__

साबु's picture

14 Feb 2012 - 4:52 pm | साबु

_/\_

विजय नरवडे's picture

14 Feb 2012 - 4:59 pm | विजय नरवडे

_/\_

दंडवत

आकाशी नीळा's picture

29 Feb 2012 - 9:34 am | आकाशी नीळा

___/\___

क्षितीज's picture

14 Feb 2012 - 5:12 pm | क्षितीज

सुंदर आहे मित्रा

प्यारे१'s picture

14 Feb 2012 - 5:21 pm | प्यारे१

गवि........
आम्हाला खूप शोधूनही चेपु/ ऑर्कुट (हॅहॅ)वर सापडत नाहीए. तुम्ही नशीबवान! :)
आम्ही काय क्रावं ब्रं? :(

विश्वनाथ मेहेंदळे's picture

29 Feb 2012 - 5:42 pm | विश्वनाथ मेहेंदळे

अज्ञानात सुख असते भाऊ. कशाला शोधता? नका शोधू.

वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन, उसे एक खुबसुरत मोड देकर छोडना अच्छा !!!

दादा कोंडके's picture

14 Feb 2012 - 5:27 pm | दादा कोंडके

कमीत कमी शब्दांत भावना पोहचवण्याच कसब!

कपिलमुनी's picture

14 Feb 2012 - 5:34 pm | कपिलमुनी

सहजगत!!........खुप सुंदर

कोल्हापुरवाले's picture

14 Feb 2012 - 5:37 pm | कोल्हापुरवाले

आली होती तिची फ्रेंड रिक्वेस्टही..
"नॉट नाऊ" क्लिक केलं..
"नेव्हर"चं बटण नव्हतं..
................................... लयच भारी राव ....१दम घुसलच्..

किसन शिंदे's picture

14 Feb 2012 - 5:52 pm | किसन शिंदे

जबरा लिहलंय गवि. तसं तर ते तुम्ही नेहमीच लिहता, पण या वेळची गोष्टच वेगळी!
जाम आवडलं मुक्तक.

एकच शब्द रडवलत साहेब
खरच मनाला भिडणार लिहिलत साहेब
काळजाला भिडल साहेब
खरच रडवलत

रमताराम's picture

14 Feb 2012 - 6:18 pm | रमताराम

गविशेट एक नंबर. (शैली ढसाळ - ढिसाळ नाही ! - वाटली. ;) )

मी-सौरभ's picture

14 Feb 2012 - 6:21 pm | मी-सौरभ

डोळे पाणावले
गवि: कुठं फेडाल ही पाप..????

गाविंचे विमान व हवाई प्रवास यावरील लेख व आजचा लेख हे दोनीही वेग वेगळ्या क्षेत्रातील लेख ! पण सर्व लेख एकदम जबरदस्त !

स्वाती२'s picture

14 Feb 2012 - 6:35 pm | स्वाती२

सुरेख!

सानिकास्वप्निल's picture

14 Feb 2012 - 7:12 pm | सानिकास्वप्निल

जबरदस्त!!

अत्रुप्त आत्मा's picture

14 Feb 2012 - 7:28 pm | अत्रुप्त आत्मा

त्या वेळच्या त्या घरच्या त्या बागेत लाल गुलाब होता तिज्यायला..वास अजून नाकात..
पण तोडला कधीच नाही.. सगळे आपोआप कोमेजू दिले..
तोडून कशाला कोमेजवायचे.. म्हणून..

__/\__ __/\____/\__ __/\____/\__ __/\____/\__ __/\____/\__ __/\____/\__ __/\__

अरेरे.
झाल्या गोष्टीचं वाईट वाटलं पण लेखनात भावना चांगल्या उतरल्यात.

धमाल मुलगा's picture

14 Feb 2012 - 8:23 pm | धमाल मुलगा

पण आपण सालं होतोच असं निर्लज्ज, की ही अशी हवीहवीशी हुरहुर कधी फारशी दाटलीच नाही. कदाचित एखाद्या आनंदाला मुकलो बहुतेक.
पण आपलं म्हणजे सालं कसं, '...फिर मुहल्ले में हेमा आयीऽऽऽ...' सालं वासुनाका जगणार्‍यांना काय किंमत कळावी ह्या हुरहुरीची. काय बोलता?

५० फक्त's picture

15 Feb 2012 - 12:32 pm | ५० फक्त

+१००, कालेजात बाकी लोकांना शॉक देण्यातच दिवस गेले,आणि नंतर पैशाच्या मागं लागलो, ह्या असल्या हुरहुरी वगैरे जाणवु द्यायच्या भानगडीच पडलो नाही कधी. ही गोष्ट आणि मा.पुजा पवारांचे लेख वाचताना काहीतरी राहुन गेलंय हे जाणवलं, (तसं तर कुठल्याही पवारांकडं पाहिलं की काहीतरी राहुन गेलंय हे जाणवतंच ) थोडा वेळ, पण नंतर ती जाणीव देखील मागं पडली.

आणि आता तर काउंट डाउन सुरु केलंय, फेसबुकवर बरेच जण भेटलेत, सगळ्यांनी फ्रेंडशिप अ‍ॅक्सेप्ट केलीय, महिनाअखेरला भेटणार आहोत, त्याची तयारी सुरु आहे, दहा दिवसात पोट ३-४ इंच आत घेण्यासाठी काही उपाय आहे का कुणाकडे, नंतर पुन्हा वाढलेलं दिसलं तरी चालेल.

प्रास's picture

15 Feb 2012 - 2:47 pm | प्रास

दहा दिवसात पोट ३-४ इंच आत घेण्यासाठी काही उपाय आहे का कुणाकडे, नंतर पुन्हा वाढलेलं दिसलं तरी चालेल.

हे का नाही ट्राय करून बघत? बहुतेक तुमच्या अपेक्षेप्रमाणे परिणाम होईल ;-)

काही नाही रे भेंचोत.. आमचं नुसतं फ्रेंडलीये..
असं सगळ्या गँगला म्हणत म्हणत आणि आतल्या आत मोहरत जे काही केलं तेव्हाही व्हॅलेंटाईन डे येऊन गेले असणार बरेच..

एक नंबरी!!!!!!! =)) =)) =))

गवि,
मस्तच लिहिलंय

"नॉट नाऊ" क्लिक केलं..
"नेव्हर"चं बटण नव्हतं..
असतं तरी त्याने ते क्लिक केलं असतं का?

पैसा's picture

14 Feb 2012 - 9:56 pm | पैसा

एखाद्या कवितेसारखा जमून आलाय लेख!

जाई.'s picture

14 Feb 2012 - 10:56 pm | जाई.

कमीतकमी शब्दात भावना पोचवल्यात

_/\_

सूड's picture

14 Feb 2012 - 11:21 pm | सूड

छान लिहीलंय .

श्रीरंग's picture

14 Feb 2012 - 11:31 pm | श्रीरंग

"रॅपर पडून आहे कपाटात खास कप्प्यात.. ठेवून उपयोग नसला तरी फेकायचं कुठे..
म्हणून.."

क्लास!

पिवळा डांबिस's picture

15 Feb 2012 - 12:27 am | पिवळा डांबिस

ग्रीटींग.....आमच्या वेळेस त्याचं प्रस्थ नव्हतं.....
चॉकलेट.... कॅडबरी एक्लेयर्स!
पाऊस... भिजणं...कॉलेज चुकवून.... आयला डिट्टो!! मरीन ड्राईव्ह!!!
लाल गुलाब... त्याकाळी परवडत नव्हते!!!
अमेरिका की...कुठेतरी ती आहे.... हो, खरंय!!
आली होती तिची रिक्वेस्टही.... होय, डिनरला जायचंय आज!!!!

काही नाही रे भेंचोत.. आमचं अजूनही नुसतं फ्रेंडलीये.....
:)

=))
हा पिंडाकाका पक्का वस्ताद आहे.

चाणक्य's picture

15 Feb 2012 - 12:07 pm | चाणक्य

गवि तुम्ही भारी लिहिता (जस काय माझ्या प्रमाणपत्रावाचुन अडलंच होतं सगळ). या लिखाण बद्दल म्हणाल तर मला याची शैली आवडली. वेगळीच आहे.

आणि हो... झालं गेलं विसरून जा आता (ह. घ्या.)

हे एक आणि ते रामदास काका एक, जुन्या स्मुतींमध्ये रमतात !! चालु द्यात ;)

यकु's picture

15 Feb 2012 - 2:40 pm | यकु

.

मेघवेडा's picture

15 Feb 2012 - 3:00 pm | मेघवेडा

गविशेट - गॅरी सोबर्स, रवि शास्त्री, हर्शल गिब्ब्स, युवराज सिंह इ. लोकांच्या पंक्तीत जाऊन बसलात हे जे काही लिहिलंय त्याद्वारे!

आवड्याच.

विजुभाऊ's picture

15 Feb 2012 - 3:25 pm | विजुभाऊ

हल्कट साल्या का उगाच छळ करतोस....
रॅपर फेकून द्यायचे धाडस नसते................
ज्यांचे असते ते रॅपर साठवूनच ठेवत नाहीत

गवि's picture

15 Feb 2012 - 3:54 pm | गवि

:)

लेख म्हणून वाचू लागलो तर वाचता वाचता त्याची कविता झाली की हो ग.वि. शेट !
* ह्या लेखातील पात्राशी कोणा व्यक्तीचा सम्बध असला तर आपली साली सहानुभूती , नसला पार तुम्हाला "परकाया" प्रवेश करण्याची हातोटी लाभली आहे. लेखणी जोरात प्रसावावी .

आयला.. हे राह्यलंच होतं वाचायचं..
काळजाला हात घालता साहेब.. कसबी लेखन आहे. _/\_

राघव

चौकटराजा's picture

29 Feb 2012 - 9:23 pm | चौकटराजा

पोराचे हॅलोवीन की थँक्सगिव्हिंगचे फोटो अपलोडवत.. मीही टाकलेत मारुति आल्टो घेतली तेव्हाचे..
आली होती तिची फ्रेंड रिक्वेस्टही..
"नॉट नाऊ" क्लिक केलं..
"नेव्हर"चं बटण नव्हतं..
म्हणून..

गवि , आएशपाथ सांगतो आपली कथा याच्या एकदम उलटी ! आपली एक फ्रेंड रिक्वेस्ट ही काय ? तिला पण "णॉत णाउ"
च्यायला ....आपला कावळा कधीच शिवणार नाही. पोरानो तो कार्यक्रमच करू नका बाबानो !