इलाहींचा आशीर्वाद...

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
23 Jul 2008 - 4:48 pm

जखमा कश्या सुगंधी, झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा

अंदाज आरशाचा वाटे खरा असावा
बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा

मंडळी, या ओळी आहेत सुप्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांच्या!

मिपाचे एक सन्माननीय सभासद धोंडोपंत हे त्यांचे अगदी जवळचे स्नेही आहेत. पंतांमुळेच आमचाही जमादारसाहेबांशी परिचय झाला, बातचित झाली. आम्ही आमच्या बोलण्यातून त्यांना आपल्या मिसळपाव या संकेतस्थळाविषयी सर्व माहिती पुरवली. हे ऐकून त्यांना मनापासून आनंद वाटला व त्यांनी मिपाला अगदी भरभरून शुभेच्छा दिल्या!

त्यांच्यासारखी असामान्य प्रतिभा लाभलेल्या कलाकारचा आशीर्वाद हा मिसळपावकरता मोलाचा वाटतो!

असो,

आपला,
तात्या.

हे ठिकाणसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

23 Jul 2008 - 4:53 pm | आनंदयात्री

वर उल्लेखलेल्या ओळी सुंदर आहेतच अन काल मिपाच्या मुखपृष्ठावरच्या इलाहींच्या ओळी देखील खुप सुंदर होत्या.

मनस्वी's picture

23 Jul 2008 - 5:24 pm | मनस्वी

हेच म्हणते!

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

अमोल केळकर's picture

23 Jul 2008 - 5:14 pm | अमोल केळकर

आपले अभिनंदन
यापुढे ही मराठी साहित्य , संगीत , नाट्य विश्वातील जाणकार लोकांचे आशिर्वाद / मार्गदर्शन मिळुन
मिपाची वाटचाल अधिक दैदिप्यमान होवो या शुभेच्छा .

आपला
अमोल

--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Jul 2008 - 9:01 am | बिपिन कार्यकर्ते

तात्या, जमादारांसारख्या माणसाचा आशिर्वाद आपल्या मिपा ला मिळाला हा मिपाचा फार मोठा सन्मान आहे. मिपाच्या उत्तरोत्तर प्रगतीमधे हा एक महत्वाचा टप्पा आहे असे वाटते.

जखमा कश्या सुगंधी, झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा

अप्रतिम.

बिपिन.

स्वाती दिनेश's picture

23 Jul 2008 - 9:06 am | स्वाती दिनेश

तात्या, जमादारांसारख्या माणसाचा आशीर्वाद आपल्या मिपा ला मिळाला हा मिपाचा फार मोठा सन्मान आहे. मिपाच्या उत्तरोत्तर प्रगतीमधे हा एक महत्वाचा टप्पा आहे असे वाटते.
हेच म्हणते,
स्वाती

प्राजु's picture

23 Jul 2008 - 10:22 pm | प्राजु

अप्रतिम आहेत ओळी.
त्या कविवर्यांना सा. न.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/