कॉकटेल लाउंज : गाथा ब्रॅन्डीची

सोत्रि's picture
सोत्रि in पाककृती
11 Jan 2012 - 2:13 pm

ब्रॅन्डीची ओळख सनातन महाराष्ट्रातील बहुजन समाजाला आचार्य अत्र्यांनी 'ब्रॅन्डीची बाटली' ह्या सिनेमाची कथा लिहून करून दिली. त्यानंतर बहुजन समाजाला खोकला झाला की चमचाभर ब्रॅन्डी घ्यायची असा शोध लागला. त्यामुळे ब्रॅन्डी ही चमचाभर औषध म्हणून घेण्यापलीकडे दारू किंवा मादक द्रव्य म्हणून माझ्या खिजगिणतीतही नव्हती. त्यात देशी दारूमध्ये ब्रॅन्डी जास्त विकला जाणारा प्रकार आहे (अजून एक ब्लेंडी नावाचा प्रकार असून तोही ब्रॅन्डीच्या नावावार खपतो असे जाणकार सूत्रांकडून कळते). आमच्या वाड्यात राहणारा एक जहाल बेवडा ही ब्रॅन्डी पिऊन आमच्या वाड्याच्या दारात नेहमी पडलेला असायचा त्यामुळे ब्रॅन्डी तशी 'डोक्यात' गेलेली होती.

पण एकदा माझ्या बॉसने त्याच्याकडे गेल्यावर कोन्यॅक दिली तीही एकदम साग्रसंगीत 'स्निफर' ग्लासमधून. काय आहे ते माहिती नव्हते पण एक घोट घेतल्यावर भन्नाट लागली आणि काय आहे ते बॉसला विचारल्यावर त्याने सांगितले ब्रॅन्डी. एकदम चकितच झालो आणि एवढ्या चांगल्या दारूला उगाचच पूर्वग्रहदूषित नजरेने पाहिल्या बद्दल स्वतःचाच राग आला. त्या गुन्ह्याचे परिमार्जन करण्यासाठी ही ब्रॅन्डी गाथा समर्पित करतो आहे.

असो, नमनाला घडाभर तेल जाळून झाले आहे, आता मूळ कथेकडे वळूया.

ब्रॅन्डी ही डच लोकांची देणगी आहे दारू विश्वाला. ब्रॅन्डीचा फॉर्म्युला काही डच व्यापाऱ्यांकडून व्यापारात केल्या गेलेल्या तडजोडींमुळे अचानकच शोधला गेला. ते म्हणतात नं 'करायला गेलो एक...' अगदी तसेच झाले.

सोळाव्या शतकात नेदरलँड्सला (हॉलंड) फ्रान्समधून वाइन मोठ्या प्रमाणात आयात केली जायची. पण ती आयात करताना डच व्यापाऱ्यांना बर्‍याच अडचणी येत असत. फ्रान्समधील ज्या परगण्यांतून ही आयात केली जायची तेथील नद्यांतून वाइन घेऊन जाण्यावर बरेच कर भरावे लागत असत. एवढे कर भरून झाल्यावरही समुद्री चाच्यांकडूनही लुटालूट फार मोठ्या प्रमाणावर व्ह्यायची. फ्रान्समधून नेदरलँड्सला जायला लागणार्‍या कालावधी मुळे बर्‍याचवेळा वाइन खराबही व्हायची (वाइनमधल्या पाण्यामुळे). अशा ह्या तिहेरी संकटाचा सामना करण्यासाठी काहीतरी करणे आवश्यकच होते. बनिया, अगदी आपल्या कच्छ-मारवाडातला असो किंवा युरोपातला, नुकसान कसे काय होऊ देणार?

ह्या व्यापार्‍यांनी मग ही वाइन डिस्टील करायला सुरुवात केली. म्हणजे वाइनमधला पाण्याचा अंश काढून टाकायचा. त्यामुळे

  • आकारमान कमी होऊन कर बचत
  • कमीत कमी कार्गो स्पेस मध्ये आयात करणे सुलभ,
  • चाच्यांना असल्या वाइनमध्ये काही रुची नसायची त्यामुळे त्यांच्या त्रासापासून मुक्ती
  • आणि आता वाइन 'कॉन्संट्रेटेड' (डिस्टील्ड) असल्यामुळे खराब व्हायचा ही धोका नाही.

अशी भन्नाट कॢप्ती त्यांनी शोधून काढली. ह्या कॢप्तीला डचांच्या स्थानिक भाषेत 'Brandewijn' असे म्हणतात. म्हणजे 'Burnt Wine'. ह्या Brandewijn चाच पुढे अपभ्रंश होऊन 'ब्रॅन्डी' असे नामकरण झाले.

ब्रॅन्डी कशापासून बनवली आहे त्यावरून तिची तीन मूलभूत प्रकारात विभागणी होते.

1. ग्रेप ब्रॅन्डी :

ही ब्रॅन्डी नावाप्रमाणेच द्राक्षांपासून बनवतात. फर्मेंट केलेल्या द्राक्षाच्या रसाला डिस्टील्ड करून ही ब्रॅन्डी बनवली जाते. ह्या डिस्टील्ड झालेली ब्रॅन्डी रंगहीन असते. तिला ओक झाडाच्या लाकडापासून बनवलेल्या ड्रममध्ये मुरवत ठेवले जाते. त्या लाकडामुळे तिला वैषिट्यपूर्ण रंग आणि गंध प्राप्त होतो. मुरवत ठेवण्याचा कालावधी 2 वर्ष ते 20 वर्ष एवढा असू शकतो.

2. पोमेस (Pomace) ब्रॅन्डी :

वाइनसाठी क्रश केलेल्या द्राक्षांच्या उरलेल्या चोथ्यापासून म्हणजे, रस गेलेला गर, साली, द्राक्षांचे देठ ह्यापासून पोमेस ब्रॅन्डी बनवली जाते. ही ब्रॅन्डी फार कमी काळासाठी मुरवली जाते त्यामुळे चवीला जरा रॉ (अपक्व) असते. तसेच ही लाकडाच्या ड्रममध्ये मुरवत ठेवली जात नाही त्यामुळे मूळ द्राक्षाच्या चवीशी इमान राखून चवीला फ्रुटी असते.

3. फ्रूट ब्रॅन्डी :

द्राक्षांऐवजी वेगवेगळ्या फळांपासून ही ब्रॅन्डी बनवली जाते. सफरचंद, जरदाळू, वेगवेगळ्या प्रकारच्या बेरीज, प्लम ह्या फळांच्या रसाला फर्मेंट कले जाते आणि मग डिस्टील्ड करून फ्रूट ब्रॅन्डी तयार होते.

ब्रॅन्डीची खरी ओळख ती जगाच्या कुठल्या भागात बनवली गेली आहे त्यानुसार होते. दारूचे माहेरघर असलेले फ्रान्स हे अत्युच्च दर्जाच्या ब्रॅन्डीसाठीही प्रख्यात आहे. ब्रॅन्डीचेही युरोपियन आणि उरलेले जग अशी भौगोलिक विभागणी आहे.
फ्रेंच ब्रॅन्डीज

कोन्यॅक


जगप्रसिद्ध आणि एक नंबरवर असणारी 'कोन्यॅक' ही फ्रेंच ब्रॅन्डी आहे. फ्रांसच्या कोन्यॅक नावाच्या परगण्यात तयार होणारी ही 'ग्रेप ब्रॅन्डी' आहे.बाजूच्या चित्रात निळ्या रंगाने दर्शवलेला फ्रान्समधील हा कोन्यॅक परगणा.


ही इतकी प्रसिद्ध आणि अत्युच्च दर्जाची आहे की ब्रॅन्डीसाठी व्यापक अर्थाने सामान्य नावा होऊन बसले आहे. कोन्यॅक 'डबल डिस्टील्ड' असते. ही इतकी सुपरफाईन असण्याचे कारण म्हणजे ज्या कास्क मध्ये ही मुरवली जाते त्याचे लाकूड ओक वृक्षांच्या कुठल्या जंगलातले वापरायचे याचे नियम ठरलेले आहेत. Limousin or Tronçais ह्या जातीच्या ओक झाडांच्या लाकडापासून तयार केलेली कास्कंच मुरवण्याकरिता वापरली जातात. त्याचे कारण म्हणजे ह्या लाकडाने व्हॅनिलाचा गंध आणि काहीशी चव ब्रॅन्डीला मिळते.

अर्मान्यॅक (Armagnac) :


फ्रान्समधल्या दक्षिणेकडील Gascony ह्या प्रांतातील अर्मान्यॅक ह्या परगण्यात तयार होणारी ही ब्रॅन्डी Armagnac म्हणून ओळखली जाते. ह्या परगण्यातल्या खालील जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने अर्मान्यॅक तयार केली जाते.

  1. Bas-Armagnac
  2. Armagnac-Ténarèze
  3. Haut-Armagnac


ही कोन्यॅकशी मिळती जुळती असली तरीही बनवण्यासाठी वापरली जाणारी द्राक्षे, जमिनीचा (माती) पोत, डिस्टीलेशन प्रोसेस, चव,गंध आणि ब्रॅन्डीचा पोत असे फार फरक आहेत ह्या दोन प्रकारांत.अर्मान्यॅक कोन्यॅकप्रमाणे 'डबल डिस्टील्ड' नसून 'सिंगल डिस्टील्ड' असते.ही ब्रॅन्डी कोन्यॅकच्या आधी सुमारे 150 वर्षापासून अस्तित्वात आहे असे म्हटले जातेपण दुर्दैवाने कोन्यॅकला मिळालेली लोकप्रियता, प्रतिष्ठा काही अर्मान्यॅक नाही मिळवू शकली.अर्मान्यॅक मुरवण्यासाठी वापरले जाणारे कास्क Limousin, Alsace ह्या जातीच्या ओक वृक्षाचे लाकडापासून बनविलेले असतात. Monlezun ह्या जंगलात मिळणार्‍या काही ओक वृक्षांचे लाकूडही वापरले जाते. ह्या लाकडांमध्ये 'टॅनीन' जास्त प्रमाणात असते हे ब्रॅन्डीमधे मिसळले जाते आणि एक आगळा स्वाद आणि गंध अर्मान्यॅकला बहाल करते.

इतर ब्रॅन्डीज

फ्रान्स खालोखाल इटलीचा नंबर लागतो लोकप्रिय ब्रॅन्डी बनवण्यामध्ये. 'ग्रॅपा' ही प्रसिद्ध ब्रॅन्डी (Pomace प्रकारातली) ही इटालियन ब्रॅन्डी आहे. त्यानंतर अमेरिकन, स्पॅनिश आणि जर्मन ब्रॅन्डीज लोकप्रिय आहेत.

ब्रॅन्डीच्या ग्रेड्स

ब्रॅन्डी मुरवत ठेवलेल्या कालावधीप्रमाणे ब्रॅन्डीच्या ग्रेड्स ठरवलेल्या आहेत. ब्रॅन्डी साधारण 2 वर्षे ते 20 वर्षे मुरवत ठेवली जाते. 25 वर्षापेक्षा जास्त जुनी ब्रॅन्डी खराबा आणि पिण्यासाठी अयोग्य मानली जाते.

डिस्टील्ड झालेली पण मुरवण्यासाठी कास्कमधे ठेवण्यापूर्वीची जी ब्रॅन्डीची अवस्था तारुण्यावस्था असते तिला 'eau-de-vie' असे म्हटले जाते. ह्या eau-de-vie ला किती काळ मुरवेले जाते त्यावरून ब्रॅन्डीची ग्रेड ठरते.

VS
(Very Special)

कास्क मध्ये कमीत कमी 2 वर्षे मुरवत ठेवली गेलेली ब्रॅन्डी

VSOP
(Very Special Old Pale)

कास्क मध्ये कमीत कमी 4 वर्षे मुरवत ठेवली गेलेली ब्रॅन्डी

XO
(Extra Old)

कास्क मध्ये कमीत कमी 6 वर्षे मुरवत ठेवली गेलेली ब्रॅन्डी. भविष्यात ही सहा वर्षाची मर्यादा 10 वर्षे होणार आहे.

ह्या व्यतिरिक्त अजूनही काही मानांकने आहेत पण ती खासकरून कोन्यॅकसाठी वापरली जातात.

Napoleon
VSOP पेक्षा जास्त पण Xo पेक्षा कमी मुरवलेली कोन्यॅक दर्शवण्यासाठी हे मानांकन वापरले जाते.

Extra
कमीत कमी 6 वर्षे मुरवलेली कोन्यॅक दर्शवण्यासाठी हे मानांकन वापरले जाते.

Vieux
VSOP पेक्षा जास्त पण Xo पेक्षा कमी मुरवलेली कोन्यॅक दर्शवण्यासाठी हे मानांकन वापरले जाते.

Vieille Réserve
Xo पेक्षा जास्त पण Hors d’age पेक्षा कमी मुरवलेली कोन्यॅक दर्शवण्यासाठी हे मानांकन वापरले जाते.

Hors d’âge
Xo पेक्षा जास्त मुरवलेली. Hors d’age म्हणजे beyond age. उच्च दर्जाची कोन्यॅक दर्शवण्यासाठी हे मानांकन वापरले जाते.

ब्रॅन्डी पिण्याचा 'ब्रॅन्डी स्निफर (Brandy Snifter)'


ब्रॅन्डी पिण्यासाठी वापरण्यात येणार्‍या ग्लासला ब्रॅन्डी स्निफर म्हणतात.
ह्यातून ब्रॅन्डी पिण्याआधी मनसोक्त हुंगायची असते.

ब्रॅन्डी पिण्याची पद्धत


हा ब्रॅन्डी स्निफर ह्या चित्रात दाखल्याप्रमाणे पकडायचा असतो. असे पकडण्यामुळे ग्लासातली ब्रॅन्डी हलकीशी गरम (उबदार) होउन तिच गंध खुलतो आणि चवही खुलते.ब्रॅन्डीत किंचीत कोमट पाणी घालून प्यायल्यास तिची लज्जत काही औरच असते. थंड केलेली (बाटली फ्रीझमध्ये ठेवून, ग्लासात बर्फ घालून नव्हे) ब्रॅन्डी 'नीट' घेतल्यास एक आगळाच आनंद देते.

ब्रॅन्डी ही प्रामुखाने जेवणानंतर प्यायचे मद्य आहे. जेवल्यानंतर, ब्रॅन्डीसोबत जर सिगार, तोही क्युबन, असेल तर जी काही ब्रम्हानंदी टाळी लागते की साक्षात यम जरी त्यावेळी आला तर त्याचीही, माणसाला त्या समाधिस्त अवस्थेतून बाहेर काढायची, ईच्छा होणार नाही. :)

अशी ही ब्रॅन्डीची गाथा सुफळ संपूर्ण करतो.

प्रतिक्रिया

मद्या पासुन ४ हात लांब रहात असल्याने निव्वळ वाचनाचा आनंद लुटल्या गेला आहे. :)

मन१'s picture

11 Jan 2012 - 2:34 pm | मन१

मालिका भन्नाटच होती. चतुरंग चेसचा डाव अगदि रंगवून सांगायचे ते आवडायचे तेही बुद्धीबळ धड समजतही नसताना .
तसेच न पिताही हे लेख वाचले तरी मस्त वाटतं.

प्रचेतस's picture

11 Jan 2012 - 2:47 pm | प्रचेतस

आँ....मग हे काय हो गणपाशेठ? ;)

विवेक मोडक's picture

11 Jan 2012 - 2:54 pm | विवेक मोडक

बिअरची गणना मद्यात होते का??
कॉलिंग सोत्रि :)

बियरला मद्य म्हणण्या इतके आम्ही 'दुधखुळे' नाही. ;)

प्रचेतस's picture

11 Jan 2012 - 3:05 pm | प्रचेतस

विकिपेडीया कदाचित दुधखुळे असावेत ब्वा. ;)

तरी सोत्रींचे अणुभवाचे बोल ऐकायला मिळतीलच. ;)

सोत्रि's picture

11 Jan 2012 - 6:38 pm | सोत्रि

मालिकेतील पुढचे पुष्प 'गाथा बीयरची' असेल :)

- (साकिया) सोकाजी

मृत्युन्जय's picture

12 Jan 2012 - 10:23 am | मृत्युन्जय

बियरला मद्य म्हणण्याइतका दूधखुळा असुनही ही लेखमाला आवडलेला

मद्यंजय

हंस's picture

11 Jan 2012 - 2:50 pm | हंस

आम्हा अज्ञानांना ज्ञानाचे चार मौक्तिक कण दिल्याबद्दल धन्यवाद!

डॉक्टर ब्रँडी नामक एक प्रकार चाखून पाहिला होता.
कदाचित कशी प्यायची ते कळत नसेल म्हणून असेल पण भयंकर कडुझार होता

यकु's picture

11 Jan 2012 - 6:33 pm | यकु

>>>डॉक्टर ब्रँडी नामक एक प्रकार चाखून पाहिला होता.
>>>>कदाचित कशी प्यायची ते कळत नसेल म्हणून असेल पण भयंकर कडुझार होता

-- ब्रॅण्‍डीमध्‍ये ''गोवळकोंडा'' हा ब्रॅण्‍ड नेहमीच्या वापरातला आहे.. एकदा तिच्याऐवजी जाळीत पॅक केलेली डॉक्टर ब्रॅण्‍डी घेतली होती. भोयोंकर कडुझार होतीच.. पण अंमलही लवकर अस्तास गेला.

गोवळकोंडा मात्र 2 पेगमध्‍येच जखडून टाकते.
गोवळकोंडा घेतल्यानंतरचा एक फायदा असा की दुसर्‍या दिवशी डोके धरत नाही.

स्मिता.'s picture

11 Jan 2012 - 3:25 pm | स्मिता.

गाथा नेहमीप्रमच अभ्यासपूर्ण आहे. आवडली

पण हा एक न आवडलेला प्रकार आहे.
इकडे काही हॉटेलांमधे जेवणानंतर छोट्याश्या वर दाखवलेल्या ग्लासात कोन्यॅक किंवा अर्मान्यॅक देतात. त्याचा अर्धा घोट घेतल्यानंतर गिळू की टाकून देवू असं झालेलं. कसं बसं गिळतानाही ठसका लागलाच!

परिकथेतील राजकुमार's picture

11 Jan 2012 - 3:36 pm | परिकथेतील राजकुमार

जबर्‍यादस्त रे माणसा. सलाम तुला.

जेवल्यानंतर, ब्रॅन्डीसोबत जर सिगार, तोही क्युबन, असेल तर जी काही ब्रम्हानंदी टाळी लागते की साक्षात यम जरी त्यावेळी आला तर त्याचीही, माणसाला त्या समाधिस्त अवस्थेतून बाहेर काढायची, ईच्छा होणार नाही.

ह.भ.प. धमालबाबामहाराज बारामतीकरांनी हा अनुभव एकदा दिलेला आहे. अर्थात सिगार सोडून.

*फटू आंतरजालाव्रुन घेतला आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Jan 2012 - 4:48 pm | बिपिन कार्यकर्ते

सलाम ... +१

विजुभाऊ's picture

11 Jan 2012 - 3:38 pm | विजुभाऊ

ह.भ.प. धमालबाबामहाराज बारामतीकरांनी हा अनुभव एकदा दिलेला आहे. अर्थात सिगार सोडून.

त्या हभप कीर्तनकार म्हाराजांचे किस्से कीर्तन एकदा सुरू झाले के भल्या भल्यांची ठ्याS नंदी टाळी लागते

परिकथेतील राजकुमार's picture

11 Jan 2012 - 3:42 pm | परिकथेतील राजकुमार

तसेही श्री. श्री. विजुभाऊ ह्यांच्या किर्तनाचा लाभ देखील आम्हाला एकदा प्राप्त झालेला आहे ;)

प्रीत-मोहर's picture

11 Jan 2012 - 4:01 pm | प्रीत-मोहर

आम्हासही हा लेख वाचुन ह.भ.प. धमालबाबामहाराज बारामतीकरांची आठवण आली.

बाकी लेख मस्तच!!

मोदक's picture

11 Jan 2012 - 4:19 pm | मोदक

सुंदर माहिती..

मोदक

विसुनाना's picture

11 Jan 2012 - 4:25 pm | विसुनाना

कोन्यॅक म्हटले की 'चांदनी' मधला तो ऋषी कपूर - श्रीदेवीचा 'कोन्यॅक शराब नही होती'वाला सीन आठवतो. त्यात तोच भल्यामोठ्या तसराळ्यासारखा स्निफर ग्लास वापरलेला आहे.

हेनेसी व्हीएसओपी कोन्यॅक एकदाच प्यायलो होतो - साध्या पाण्यात घालून. म्हणजे ती कशी प्यायची असते ते तेव्हा माहितच नव्हते. :(

सुहास..'s picture

11 Jan 2012 - 4:35 pm | सुहास..

चालु देत !!

परत कधी चान्स मिळाला की , पहुवा....जिर्‍याची....मोहाची.....मोडाची.....सिल्की.....कवटी....मोराची.....आणि इतर ही लिहा ;)

मेघवेडा's picture

11 Jan 2012 - 4:50 pm | मेघवेडा

क्लास! साला तुझ्या हाती नवसागर दिली तर तिच्यातलंही सौंदर्यच दाखवशील तू! :)

सोत्रि's picture

11 Jan 2012 - 6:40 pm | सोत्रि

:)

धन्यवाद !

- (अंमळ हसू आलेला) सोकाजी

प्रकाश घाटपांडे's picture

11 Jan 2012 - 7:24 pm | प्रकाश घाटपांडे

साला तुझ्या हाती नवसागर दिली तर तिच्यातलंही सौंदर्यच दाखवशील तू

वाह! क्या बात है सोकाजीवर ही अस्सल प्रतिक्रिया!

सुहास झेले's picture

11 Jan 2012 - 5:25 pm | सुहास झेले

सहीच... अजुन येऊ द्यात :) :)

सन्जोप राव's picture

11 Jan 2012 - 6:02 pm | सन्जोप राव

सुरेख माहितीपूर्ण व रंजक लेख. आवडला.

अत्रुप्त आत्मा's picture

11 Jan 2012 - 7:07 pm | अत्रुप्त आत्मा

सो.त्री...नेहमीप्रमाणेच अभ्यासपूर्ण/रंजक/उत्कृष्ठ... :-)

(को-रडा :-( )-अत्रुप्त आत्मा

रेवती's picture

11 Jan 2012 - 8:09 pm | रेवती

माझ्यासारख्या अज्ञानी सदस्येला तुमचा हा लेख सगळ्या (तुमच्याच) लेखांपेक्षा आवडला.
खरच एंजॉय केला.

गवि's picture

11 Jan 2012 - 8:50 pm | गवि

मस्त लेख. एकदम डीटेलवार.
खरंय. ब्रँडी हे साईडलाईन झालेलं मद्य आहे. सर्वात स्वस्त = ब्रँडी अशी प्रतिमा आहे. औषधी म्हणूनसुद्धा.
कोनॅक ही ब्रँडीच आहे हे माहीत नव्हतं.
फ़ेणी ही माझी सर्वात आवडती गोष्ट ब्रँडीच म्हणायची का मग?
फ़ळापासून बनवलेली असते डिस्टिल करुनच...

सोत्रि's picture

11 Jan 2012 - 11:23 pm | सोत्रि

फ़ेणी ही माझी सर्वात आवडती गोष्ट ब्रँडीच म्हणायची का मग?
फ़ळापासून बनवलेली असते डिस्टिल करुनच...

हो तसे म्हणता येऊ शकेल (तिसर्‍या प्रकारातील फ्रूट ब्रॅन्डी). कारण बहुतेक सर्व देशी दारवा, फेणीसहित, ह्याच पद्धतीने बनवल्या जातात.
त्या त्या फळांच्या रस फर्मेंट करून मग त्याला डिस्टील्ड केले जाते.

फक्त दर्जाहीन साहित्य, 'सफाईदारपणाची उणीव, उच्च व्यावसायिक मूल्यं आणि उच्च दर्जा बद्दल अनास्था आणि कास्कमधे न मुरवणे (त्यामुळेच त्या रंगहीन असतात) हे सर्व त्या जोडीला असल्यामुळे त्या हव्याहव्याश्या वाटत नाहीत :(

पहुवा....जिर्‍याची....मोहाची.....मोडाची.....सिल्की.....कवटी....मोराची.....आणि इतर ही लिहा

सुहास... ह्यालाही वरील उत्तर लागू होइल :)

- (साकिया) सोकाजी

अमेरिकन त्रिशंकू's picture

12 Jan 2012 - 2:50 am | अमेरिकन त्रिशंकू

सोत्रि,

स्निफर नाही स्निफ्टर. बाकी छान.

सोत्रि's picture

12 Jan 2012 - 9:21 am | सोत्रि

चूक सुधारल्या जाईल!

You know English is very funny language :) मी T सायलेंट असावा असे गृहीत धरून चाललो होतो.

संमं, कृपया हा बदल करण्याची विनंती करतो आहे.

- (माणूस) सोकाजी

प्रभाकर पेठकर's picture

12 Jan 2012 - 3:07 am | प्रभाकर पेठकर

ब्रँडी (Hennessy) अनेकदा हाती घेऊन विकत घ्यावी की नाही (कारण आवडेल की नाही ह्याची शाश्वती नसल्याने) ह्याचा निर्णय न झाल्याने घ्यायची टाळले आहे. पण आता, धाडस करावे म्हणतो.

VS, VSOP, XO, Napoleon..इ.इ. मानांकनांबाबत आजच माहिती मिळाली. ज्ञानात भर पडली.

ज्ञानात भर पड्ली, आता ऑफिसच्य पार्ट्यात ज्ञानी म्हणुन मिरवता येईल, त्याबद्दल धन्यवाद.

मुक्त विहारि's picture

12 Jan 2012 - 4:25 pm | मुक्त विहारि

मला दारूचे जास्त प्रकार माहित न्हवते....तुमच्या मुळे खूप मदत झाली.....

आभारी आहे....