माझं आवडतं नाटक : फ़ायनल ड्राफ़्ट

भडकमकर मास्तर's picture
भडकमकर मास्तर in जनातलं, मनातलं
20 Jul 2008 - 9:30 pm

नाटक : फ़ायनल ड्राफ़्ट
लेखक आणि दिग्दर्शक : गिरीश जोशी
कलाकार : मुक्ता बर्वे
गिरीश जोशी
निर्मिती : महाराष्ट्र कल्चरल सेंटर, पुणे

जसे नाट्यलेखनाच्या मूलभूत नियमांबद्दल लिहिले, तसेच लेखनाच्या ठराविक आडाख्यांपासून दूर जाणारे, नियमांच्या साचेबद्ध चौकटी तोडणारे नाट्यलेखन यावरही लिहित आहेच..... चाहूल, साठेचं काय करायचं, लूज कंट्रोल यावर पूर्वी लिहिलं आहेच... तसंच थोडंसं वेगळं हे दोन अंकी नाटक ...

कथासार :
पूर्वी सिनेमा नाटक किंवा टीव्ही या माध्यमासाठी अभिनय आणि इतर तांत्रिक प्रशिक्षण देणार्या संस्था कमी होत्या..आता जसे जसे टीव्ही चॆनल वाढले आहेत, तशी त्या संस्थांची गरज वाढतेय आणि आपण अशा अनेक संस्था आजूबाजूला पाहत आहोत.त्यातून नवनवीन अभिनेते, लेखक , दिग्दर्शक घडत आहेत.ही गोष्ट आहे, अशाच एका संस्थेत लेखन शिकवणार्‍या प्राध्यापकाची आणि त्याच्या विद्यार्थिनीची... ती ऎकेडमीमध्ये लेखन शिकायला आलीय खरी पण तिचं अभ्यासात लक्ष नाही, शिकवलेलं कळत नाही म्हणून सर तिला शिकवणीसाठी घरी बोलावतात...त्यात सर सुरुवातीला तिला एक संपूर्णपणे कल्पनेतली गोष्ट लिहून आणायला सांगतात. पण ती स्वत:च्या आयुष्यातल्या गोष्टीच त्यात फ़िरवून फ़िरवून लिहून आणत राहते...मग सर तिच्यावर वैतागतात , त्यात दोघांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी समोर येतात.

मुलगी एका छोट्या गावातून आलेली आहे, ती गोंधळलेली आहे आणि ध्येयहीन आयुष्य जगत आहे, तिला लेखक व्हायचंय पण ती त्यासाठी तितके कष्ट घेत नाहीये कारण कदाचित तिने स्वत:च सरांचे ऎकेडमीमध्ये येण्यापूर्वीचे लेखन वाचलेले आहे, आणि तिला त्यांचे पूर्वीचे लेखन खूप आवडले आहे, मात्र ती ऎकेडमीमध्ये त्यांच्या पहिल्या तासाला ते जे सांगतात त्याने प्रचंड व्यथित झालेली आहे, तिला जाणवलेले आहे की आता लोकांना आवडतं तेच मोजून मापून लिहायला सांगणारा हा पूर्वीचा आपला आवडता लेखक नव्हे... या विरोधाभासाने ती खचलेली आहे.आणि ती सरांना विचारते की तुम्ही असं का केलंत सर? या साध्या प्रश्नाचं उत्तर सर देऊ शकत नाहीत आणि त्यांचा स्वाभिमान दुखावतो....

पंधरा वर्षांपूर्वी सरांनी थोडेफ़ार नाव कमावलेले आहे आणि आता ते एक नाटक लिहू पाहत आहेत पण गेली तीन वर्षे त्यांना ते जमत नाहीये... वैयक्तिक आयुष्यात त्यांचे बायकोबरोबरचे संबंध दुरावलेले आहेत.. एक दोन फ़ोनमधून ते उत्तम व्यक्त होतात...
सर आणि विद्यार्थिनी दोन्ही पात्रे दुखावलेली आहेत आणि आतून घाबरलेलीसुद्धा....दोघे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात....
लेखन राहते बाजूला आणि ते एकमेकांची वैयक्तिक आयुष्यातली उणीदुणी काढत राहतात. स्व टिकवण्यासाठी दुसर्‍याला दुखवण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही जणू त्यांच्याकडे....पण यातून काहीतरी चांगलं घडतं.. या सार्‍यातून ते आपापल्या चुका शोधतात, उणीवा सुधारायचा प्रयत्न करतात......त्याचे अडलेले नाट्यलेखन पूर्ण होते, तिला एक मोठी सीरियल मिळते. पण त्यांच्यात काही नाजूक बंध निर्माण व्हायची जी काही थोडी शक्यता असते तीही बारगळते आणि ते दोघे समंजसपणे दूर होतात.
_____________
या संपूर्ण नाटकाचे बलस्थान आहे, संवाद....या नाटकाचे नुसते मोठ्याने वाचन करायलासुद्धा फ़ार मजा येते असा माझा अनुभव आहे.......(याची मॅजेस्टिकने छापलेली संहितासुद्धा उपलब्ध आहे.).

गिरीशने लेखक दिग्दर्शक आणि अभिनेता अशी मोठी जबाबदारी पेलेली आहे... तो स्वत: एका संस्थेमध्ये लेखन शिकवत असल्याने अशा स्वत:च्या आयुष्यातल्या घटनावर लिहिणार्‍या विद्यार्थ्यांचा अनुभव त्याला नेहमी येत असे असे त्याने एका मुलाखतीत सांगितल्याचे आठवते...शिक्षकाच्या भूमिकेतला लेखन शिकवतानाचा बराचसा तांत्रिक भाग मी त्याच्या कार्यशाळेतसुद्धा त्याच्याच तोंडून जसाच्या तसा ऐकला आहे.. विद्यार्थिनीच्या चमत्कारिक वागण्याने गोंधळलेला, तिच्यात कळत नकळत पणे थोडासा गुंतत जाणारा पण वेळीच दूर जाणारा शिक्षक त्याने चांगला दाखवलेला आहे...मुक्ता बर्वेने सुरुवातीला अभ्यासात लक्ष नसणारी, मठ्ठ वाटणारी पण नंतरची दुखावलेली विद्यार्थिनी उत्तम सादर केली आहे...
दोनच पात्रांचे दोन अंकी व्यावसायिक नाटक पण यात नाट्यपूर्ण घटना नाहीत, प्रेमकथा नाही, रूढ खलनायक नाही,मेलोड्रामा नाही, विषय आहे नाट्यलेखनासारखा रूक्ष ( यावर काय नाटक लिहिणार ?असेही काहींना वाटू शकते )
रंगमंचावर काहीही विशेष घडत नसताना प्रेक्षकाला बंधून ठेवणे अवघडच.... पण हे नाटक ते लीलया करते..

या नाटकाचे अजून एक विशेष म्हणजे हे नाटक सुदर्शनच्या प्रायोगिक रंगमंचावर जितके रंगते तसेच ते व्यावसायिक मंचावरही प्रेक्षकांनी उचलून धरले..
( मी हे नाटक दोन्ही मंचावर पाहिले आहे आणि ते दोन्हीकडे तसेच रंगते असे मला वाटते).
प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांच्या (तथाकथित) रूढ सीमारेषा या नाटकाने अजून धूसर केल्या...
या नाटकाने २००७ मध्ये अमेरिका दौराही केला तेव्हा मिपावरच्या काही तिकडल्या सदस्यांनीही हे नाटक पहिले असेल...
त्यांनीही त्या अनुभवावर जरूर लिहावे ...

नाट्यअनुभवमाहितीआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jul 2008 - 10:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मास्तर,
नाटकाच्या परिचयाबद्द्ल आपले आभार !!!
फ़ायनल ड्राफ़्ट वाचायलं हवं असं वाटतंय.

अवांतर : श्री घाटपांडे साहेबांनी आमच्या एका लेखनाच्या निमित्ताने फायनल ड्रॉफ्टची आठवण काढली होती, ते आत्ता आठवले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मनिष's picture

20 Jul 2008 - 11:59 pm | मनिष

मी पण खूप ऐकलय ह्या नाटकाबद्द्ल, पण अजून पहाण्याचा योग नाही आला. छान ओळख करून दिल्याबद्द्ल धन्यवाद!

प्राजु's picture

21 Jul 2008 - 10:28 pm | प्राजु

अजून पाहण्याचा येओग नाही आला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मिसळपाव's picture

21 Jul 2008 - 12:23 am | मिसळपाव

....यात नाट्यपूर्ण घटना नाहीत, प्रेमकथा नाही, रूढ खलनायक नाही,मेलोड्रामा नाही, विषय आहे नाट्यलेखनासारखा रूक्ष ( यावर काय नाटक लिहिणार ?असेही काहींना वाटू शकते )
रंगमंचावर काहीही विशेष घडत नसताना प्रेक्षकाला बंधून ठेवणे अवघडच.... पण हे नाटक ते लीलया करते..

२००% सहमत! एकहि मिनीट नाटक 'रेंगाळत' नाही. दोघांच्याही भुमिका फार छान आहेत. जरूर हे नाटक बघा.

विसोबा खेचर's picture

21 Jul 2008 - 12:59 am | विसोबा खेचर

थोडक्यात, परंतु उत्तम परिक्षण! नक्की पाहीन हे नाटक. आपल्या लेखामुळे उत्सुकता वाढली आहे! मुक्ता बर्वे ही मुलगी झकासच काम करते..

असो,

संगीत हा जरी आमचा प्राण असला तरी मराठी माणूस असल्यामुळे साहजिकच नाटक ही देखील आमची दुखरी नस आहे! बर्‍याच दिवसात एखादे उत्तम नाटक पाहिले नाही...

आपला,
(नाट्यवेडा मराठी रसिक) तात्या.

सर्किट's picture

21 Jul 2008 - 6:56 am | सर्किट (not verified)

गिर्‍या आमचा खूप जुना चुलत मित्र, म्हणजे मित्राचा मित्र.

बे एरियात नाटक आले असताना काही व्यक्तिगत कारणाने जाऊ शकलो नाही.

पण मग त्याच रात्री गिर्‍याला एका बार मध्ये व्होडका पाजता पाजता वचन दिले, की आता पुण्याला येईन, तेव्हा नक्की तुझं नाटक बघीन.

आणि पुण्याला पोहोचल्या पोहोचल्या गिर्‍याने फोन करून सांगितले की उद्या यशवंतराव मध्ये नाटक आहे. गेलो.

मास्तर तुम्ही काहीही म्हणा, ह्या नाटकातला मुक्ता बर्वेचा रोल फक्त गिर्‍याला सपोर्टिंग म्हणून त्याने स्वतःने बनवलेला आहे, हे स्पष्ट दिसून येते.

(गिर्‍याला नंतर व्हिस्कीत गाठला. माझे मत त्याला सांगितले. पण गिर्‍या, गोविंद निहिलानींना नाटक आवडले, असे काहीसे सांगू लागला. तेव्हाच कळले, की त्याला ते पटले ;-)

गिरीश जोशी स्वतः नाटके सुंदर लिहितो, अभिनयही छान करतो. दिग्दर्शनाविषयी गोविंद निहिलानींशी संपर्क साधून आहे, हे छानच.

- सर्किट

भडकमकर मास्तर's picture

21 Jul 2008 - 9:02 am | भडकमकर मास्तर

ह्या नाटकातला मुक्ता बर्वेचा रोल फक्त गिर्‍याला सपोर्टिंग म्हणून त्याने स्वतःने बनवलेला आहे, हे स्पष्ट दिसून येते.
शक्य आहे... तुमच्याइतके ते मला जाणवले नसेल... ( तुम्ही लेखकाला अधिक ओळखता !! ) :)
माझे मत : नाटक दोघांचेच असल्याने विद्यार्थिनीच्या भूमिकेला पुरेसा वेळ तर आहेच, तिची व्यक्तिरेखा पुरेशी स्पष्ट आहे, फक्त पूरक सपोर्टिंग म्हणून बनवलेली / खोटीखोटी काही वाटली नाही......तिला प्रेक्षकांचा प्रतिसाद, टाळ्या हशे वगैरे कुठे कमी वाटत नाहीत...लेखक आणि दिग्दर्शकाने त्या भूमिकेला उठाव आणण्यासाठी शक्य असणारे काही टाळले आहे, असेही वाटले नाही...

आपल्याला ती भूमिका फक्त सपोर्टिंग म्हणून बनवलेली का वाटते ते लिहिलेत तर आपला मुद्दा अधिक स्पष्ट होईल..
माझे मत त्याला सांगितले. पण गिर्‍या, गोविंद निहिलानींना नाटक आवडले, असे काहीसे सांगू लागला. तेव्हाच कळले, की त्याला ते पटले
:) अशी वाक्ये तर आपली खासियत...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

सर्किट's picture

21 Jul 2008 - 10:18 pm | सर्किट (not verified)

मास्तर, आपण श्रीकांत मोघेंचे "अशी पाखरे येती", आणि दुभाषी-भक्ती बर्वेचे ती फुलराणी अर्थातच बघितले असेल. ह्या दोन्ही नाटकांतल्या स्त्री पात्रांशी आपण मुक्ता बर्वेच्या रोलशी कशी तुलना कराल ?

फायनल ड्राफ्ट हे नाटक, मला व्यक्तिशः अत्यंत आवडले. अशी पाखरे येती, आणि "एक रुका हुवा फैसला" ह्यांचे मिक्श्चर आत जाणवत रहाते. मुक्ताची भूमिका अधिक खुलवता आली असती, असे वाटते. (ती भूमिका खोटी खोटी अशी वाटत नाहीच.)

नाट्यशास्त्राचे प्रशिक्षण न घेतल्याने तांत्रिक शब्दांत सांगू शकत नाही, परंतु समजून घ्याल असा विश्वास आहे.

- सर्किट

भडकमकर मास्तर's picture

22 Jul 2008 - 2:06 pm | भडकमकर मास्तर

एक रुका हुवा फैसला .....
ते १२ की १० जुरी एकाखुनाच्या आरोपीवरती निकाल देणार असतात , आणि एकच जण तो निरपराध असल्याचं म्हणत असतो,ते सर्वांना पटवून देतो आणि शेवटी सारे जण मान्य करतात असा काही सिनेमा आहे ना तो?? ( फार पूर्वी पाहिला होता, आता नीट आठवत नाहीये)
... त्याचा याच्याशी कसा संबंध लावावा, यावर फार विचार केला, पण काही झेपलं नाही.. :(...
ते असो...
अशी पाखरे येती किंवा फुलराणी इतकी ही भूमिका सशक्त असेल / नसेल पण ती नाटकाच्या मुख्य विचाराशी प्रामाणिक आहे हे माझ्यासाठी पुरेसं आहे... तुलना करणं अनफेअर होईल हे माझं वैयक्तिक मत...पुन्हा तिची भूमिका त्याच्यापेक्षा कमी खुलवलेली आहे असं काही वाटलं नाही... त्याचीही भूमिका खुलवता आली असती असंही म्हणता येईल.( मला या भूमिका समतोल वाटल्या ,तुम्हाला नाही वाटल्या आणि मला तुमचं वेगळं मत मान्य आहे)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

प्रकाश घाटपांडे's picture

21 Jul 2008 - 9:14 am | प्रकाश घाटपांडे

सुंदर नाटक ,
मी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पाहिलं. मला तर ते जाम आवडलं.
प्रकाश घाटपांडे

मुक्तसुनीत's picture

21 Jul 2008 - 9:33 am | मुक्तसुनीत

पण का आवडले ते ल्याहा की राव ! :-)

प्रकाश घाटपांडे's picture

21 Jul 2008 - 10:00 am | प्रकाश घाटपांडे


गिरीशने लेखक दिग्दर्शक आणि अभिनेता अशी मोठी जबाबदारी पेलेली आहे... तो स्वत: एका संस्थेमध्ये लेखन शिकवत असल्याने अशा स्वत:च्या आयुष्यातल्या घटनावर लिहिणार्‍या विद्यार्थ्यांचा अनुभव त्याला नेहमी येत असे असे त्याने एका मुलाखतीत सांगितल्याचे आठवते...शिक्षकाच्या भूमिकेतला लेखन शिकवतानाचा बराचसा तांत्रिक भाग मी त्याच्या कार्यशाळेतसुद्धा त्याच्याच तोंडून जसाच्या तसा ऐकला आहे..


मला ही असेच वाटले होते. आपल्या अंतर्मनातील स्वगतं / परागतं ही कुठेतरी व्यक्त व्हावी असं वाटतच असतं. तशी संधी तो शोधतच असत. मिळाली नाही तर तो कलाकृतीच्या माध्यमातुन व्यक्त करत असतो. मनाची प्रतिबिंब उमटताना भय ,उत्सुकता, आनंद, दु:ख, त्रागा, असहायता अशा अनेक भावना यातुनच प्रतिभा स्वत:ची वाट शोधत जाते.
मनातील मळमळ ओकली कि आपल्याला ही बरं वाटतं आणि इतरांनाही साहित्याचा सुगंध! येतो .
प्रकाश घाटपांडे

झकासराव's picture

21 Jul 2008 - 9:58 am | झकासराव

मास्तर ग्रेट. तुमचा आवाका मोठा आहे. :)
हे गिरिश जोशी माकडाच्या हाती शॅम्पेन (आधीच नाव मारुती आणि शेंपेन) जे दिग्दर्शक.
हे नाटक पहायचे राहुन गेले.
आता नक्की पाहिन.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

सुचेल तसं's picture

21 Jul 2008 - 10:06 am | सुचेल तसं

छान लेख.

मी हे नाटक पाहिले होते आणि मला देखील आवडले.

http://sucheltas.blogspot.com

सूर्य's picture

21 Jul 2008 - 12:38 pm | सूर्य

हम तो तेरे आशिक है नाटक आणि चकवा चित्रपट बघितल्यानंतर मुक्ता बर्वे चा मी फॅन झालो आहे. फायनल ड्राफ्ट बद्दल ऐकले होतेच. त्याबद्दलची माहीती छान दिली आहे तुम्ही. बघावे म्हणतो.

- सूर्य.

बाजीरावाची मस्तानी's picture

21 Jul 2008 - 2:43 pm | बाजीरावाची मस्तानी

एक सुन्दर जुगलबन्दि....
मुक्ताच्या...अभिनय्-क्षमतेचा पुरेपूर वापर.
गीरिश जोशिन्चे उत्तम डीरेक्शन.....

"माकडाच्या हाती....शाम्पेन..."ऑल्सो.. वॉज दी बेस्ट वन...
सन्देश'स(२) , शर्वाणी, आनन्द.फुल्टू..कॉमेडी....
मी त्याचा सेकन्ड शो बघीतला..सुदर्शनला......

कीप ईट अप...

बाजीरावाची मस्तानी...
(.........)

धनंजय's picture

21 Jul 2008 - 5:26 pm | धनंजय

संवादांनीच खुलून येतात, "हॉरिझाँटल ऍक्शन"ने नव्हे. पण व्हर्टिकल ऍक्शनचे लांबलचक संवाद अशा प्रकारे गुंफणे, ती बळजबरीची कोंबाकोंबी वाटू नये, यासाठी मोठे कौशल्य लागते. कलाकारांना टायमिंगचे ध्यान खूप लागते...

परीक्षणाबद्दल आभार.

नाटकाची डीव्हीडी किंवा व्हीसीडी बनवलेली आहे का? बघायला आवडेल.

मुक्तसुनीत's picture

21 Jul 2008 - 10:56 pm | मुक्तसुनीत

संवादांनीच खुलून येतात, "हॉरिझाँटल ऍक्शन"ने नव्हे. पण व्हर्टिकल ऍक्शनचे लांबलचक संवाद अशा प्रकारे गुंफणे, ती बळजबरीची कोंबाकोंबी वाटू नये, यासाठी मोठे कौशल्य लागते

आमच्यातल्या "नको तो अर्थ शोधणार्‍याने" आपले काम केले असले तरी , "हॉरिझाँटल ऍक्शन" आणि "व्हर्टिकल ऍक्शन"चे तुम्हाला अभिप्रेत काय अर्थ आहेत ते नीटसे कळले नाही ....

आम्ही गृहपाठ केला!
http://www.misalpav.com/node/2356#comment-32376

(हॉरिझॉन्टल) कथेची समतलावर [प्रवाहासारखी] प्रगती - घटना घडतात
(व्हर्टिकल) कथेची खोलीत [प्रपातासारखी? :-) ] प्रगती - परिस्थितीबद्दल आपली समज वाढते

"फायनल ड्राफ्ट"च्या संघर्षात सर्व "घटना" पात्रे रंगपटावर येण्यापूर्वीच घडलेल्या आहेत, असे दिसते. नाटकाच्या संवादांतून आपल्याला "कोण कसे का वागते" याबद्दल जाण येते.

मुक्तसुनीत's picture

21 Jul 2008 - 11:16 pm | मुक्तसुनीत

-"ढ ब्याक बेंचर " ;-)

मुक्तसुनीत's picture

21 Jul 2008 - 8:04 pm | मुक्तसुनीत

भडकमकर ,
तुमचे हे परीक्षणसुद्धा अतिशय आवडले. फोटो, कलाकारांच्या पार्श्वभूमीबद्दलच्या गोष्टीमुळे ते आणखीच रोचक झाले आहे.

मी संहिता वाचली नाही ; पण दोनच पात्रे - एक पुरुष आणि स्त्री. एक विचार नकळत येतो : या दोन पात्रांमधे काही लैंगिक आकर्षणाचे अंतःप्रवाह चित्रित झाले आहेत काय ? (तसे होणे स्वाभाविक वाटले म्हणून विचारले. ) अशा प्रकारच्या आकर्षणाचे, त्यातल्या गुंतागुंतीचे स्वरूप "आत्मकथा" या नाटकात विशद झाले आहे.

निर्मितीप्रक्रियेबद्दल यातून काही नवे प्रेक्षक/वाचकाला कळते का ? "रायटर्स ब्लॉक" सारख्या गोष्टींना हे नाटक कसे भिडते ?

मेघना भुस्कुटे's picture

22 Jul 2008 - 7:18 am | मेघना भुस्कुटे

मास्तर,

परीक्षण नेहमीप्रमाणेच नेटके आणि नेमके झाले आहे. (आता 'माकडाच्या हाती शॅम्पेन' आणि 'छोट्याश्या सुट्टीत'ची वाट पाहते आहे!)

मुक्तसुनीत यांनी उचललेल्या काही मुद्द्यांच्या निमित्ताने -

लैंगिक आकर्षणांचे अंतःप्रवाह -
मला तरी असे पाहिल्याचे आठवत नाही. (मास्तर, माझी आठवण दगा देत असल्यास प्लीज सांगा.) नाही म्हणायला, सर बायकोशी फोनवरून बोलत असताना मुक्ता ऐकते. पतीपत्नींमधला बेबनाव लक्षात आल्याचे अप्रत्यक्षरित्या सुचवतेही. त्यांच्या खाजगी आयुष्यात डोकावण्याचा हा अनाहूत प्रयत्न. अर्थातच सर तिला उडवून लावतात. पण या प्रसंगात (माझ्या मते) लैंगिक आकर्षणाच्या कुठल्याही पुसट(ही) छटेपेक्षाही, सरांचे वैयक्तिक अपयश-वैफल्य आणि त्यावर मुक्ताने ठेवलेले अचूक बोट स्पष्ट दिसते.
त्या दोघांत हा आकर्षणाचा धागा नसेलच असे नाही. पण लेखकाने तो कुठेही अस्पष्टही दर्शवलेला नाही. त्याने ही शक्यता जणू सोईस्कररित्या अस्पर्श ठेवली आहे असेच वाटते. या दोन पात्रांमधे दोन संवेदनशील अस्वस्थ व्यक्तिमत्ते तेवढी दिसतात. त्यांच्या स्त्री-पुरुष असण्याचे भान तितकेसे नाही. (मास्तर, किंवा मुक्तसुनीत तुम्ही, आता 'आत्मकथा'वर लिहाच. त्याचा प्रयोग आता पाहता येणार नाही, पण संहिता मात्र आमच्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे.)

सर्जनप्रक्रिया आणि रायटर्स ब्लॉक -
हां, या मुद्द्यावर मात्र बर्‍याच घडामोडी घडतात. आदर्श गोष्ट कशी असावी, अशा नियमांपासून या घडामोडींना सुरुवात होते. वास्तव आणि कल्पित यांच्यातली सरमिसळ गोष्टीत कशी घडत जाते, ती करता करता लेखक आपल्या आयुष्यातले व्रण त्यात कसे कळत-नकळत पेरतो, हे असे होणे निर्मितीला कसे उपकारक-अपकारक होत जाते, यांत नियमांची कशी मोडतोड होत जाते असे सगळे सगळे आपण या दोन पात्रांच्या चकमकींतून पाहत जातो. गोष्टीला मुळात नियमांचा आधार असणे ठीक आणि आवश्यक - पण नियमाबरहुकूम गोष्टी 'पाडल्या' की लेखकाचे काय होते, याचा जणू वस्तुपाठच इथल्या सरांचे अपयश पाहताना मिळतो. तसे सगळे काही जागच्या जागी आहे. थोडेफार पैसे, बरीशी मानाची जागा, थोडे नाव. पण प्राण हरवला आहे. शब्दातला कोवळेपणा-ताजेपणा हरपला आहे. साले कुठे चुकते आहे काही कळत नाही... अशी त्यांची अवस्था. आणि या कोवळ्या अननुभुवी पोरीने नकळत त्यांना डिवचून यातून बाहेर पडण्यासाठी केलेली मदत.
ते दोघेही जण यांतून नव्यानं घडत जातात. मुक्ताची (दोघांचीही नाटकातली नावे काही आठवत नाही आहेत. क्षमस्व.) आत्मतुष्टी आणि लेखकरावांचे बनचुके निबरपण - दोन्हीही नकळत झडतात. उरतो तो दोघांनी एकमेकांच्या गाभ्याला केलेला ओला स्पर्श. त्यांचे नाव नसलेले - गुरूशिष्येच्या चौकटीत न बसवता येणारे अनामिक नाते.

अवांतरः या नाटकाच्या एका प्रयोगात कुणा बिचार्‍याचे पोर खच्चून बोंबलायला लागले. एकदा झाले, दोनदा झाले - पोर रडायचे थांबेना. त्याला कुणी बाहेरही नेईना. अखेर तिसर्‍या खेपेला गिरीश जोशींनी चक्क बेअरिंग सोडून म्हटले - "छे! असे चालणारच नाही," आणि गृहस्थ चक्क त्या पोराच्या दिशेने पाहत स्वस्थ बसून राहिला! मुक्ता शांत उभी! लोक अवाक होऊन पाहताहेत! तो बिचारा पोराचा बाप त्या पोराला घेऊन गडबडीने आणि शरमिंदा होऊन बाहेर पडला, सारे शांत झाले. सरांनी मुक्ताला फर्मावले, "मागच्या ओळीपासून घे,"! आणि मग नाटक सुरू झाले.
आपण जोशी सरांना मानले! 'आपापले मोबाईल्स आणि रडणारी पोरे बंद ठेवावीत' असा केविलवाणा विनोद करून 'आहे त्यातल्या त्यात' नाटक करणार्‍या आणि नको तिथे तडजोडी करणार्‍या नाटकवाल्यांच्या तुलनेत हे अफलातून आहे!

भडकमकर मास्तर's picture

22 Jul 2008 - 9:01 am | भडकमकर मास्तर

लैंगिक आकर्षणांचे अंतःप्रवाह
सर तिच्यात थोडेसे गुंतत चालले आहेत अशी शेवटी एक अस्पष्टशी जाणीव होते जेव्हा सर शेवटी म्हणतात की माझे पुस्तक मला खरंतर तुलाच अर्पण करायचे होते ...पण ते फार विचित्र दिसेल ....त्यामुळे मी हे पुस्तक माझ्या बायकोलाच अर्पण करत आहे ... तिने आयुष्यभर नोकरी केली त्यामुळे मी लिहू शकलो असंच लिहिलं आहे अर्पणपत्रिकेत ( आणि अचानक प्रामाणिकपणे) ते खरंही आहे म्हणा..

आत्मतुष्टी आणि लेखकरावांचे बनचुके निबरपण - दोन्हीही नकळत झडतात. उरतो तो दोघांनी एकमेकांच्या गाभ्याला केलेला ओला स्पर्श. त्यांचे नाव नसलेले - गुरूशिष्येच्या चौकटीत न बसवता येणारे अनामिक नाते.

अहाहा....छान वाक्य...

पोर खच्चून बोंबलायला लागले
मी पाहिलेल्या व्यावसायिकच्या प्रयोगात चार लोक मागे वेफर्स खात होते, प्लॅस्टिक पिशवीचा आवाज , आणि खातानाच्या कुरुमकुरुम आवाजाने व्यत्यय आला आणि गिरिश थांबला...म्हणाला ,"तिकडे मागे कोणीतरी वेफर्स खातंय, मगाशी इतक्या वेळा मराठीत सांगूनही त्यांना समजलेलं नाही वाटतं... एक पूर्ण प्रवेश मी वाट पाहिली ,अजून चालूच आहे ...मग त्यांचं खाऊन होईपर्यंत आपण थांबूया"...आवाज लगेच थांबला मग नाटक सुरू केलं...
... हा खरंतर चर्चेचा स्वतंत्र विषय आहे पण इथेच लिहितो
१.पॉपकॉर्न खात सिनेमा पाहणं आणि वेफर्स खात नाटक पाहणं यातला फरक प्रेक्षकांना आणखी कसा समजावणार?
२.वाजणारे मोबाईल आणि तिथेच बोलत राहणारे महान प्रेक्षक यांना चुकीची जाणीव आणखी कशी करून देणार?
३. रडणार्‍या पोराला बाहेर न नेणार्‍या प्रेक्षकाला वेगळे कसे समजावून सांगणार?

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मनीषा's picture

21 Jul 2008 - 8:20 pm | मनीषा

आम्हाला इथे मराठी नाटकं बघायला मिळत नाहीत .... पण भारतात आल्यावर हे नाटक नक्की बघीन.. (त्या वेळी या नाटकाचा प्रयोग असेल तर....)

अनंतसागर's picture

22 Jul 2008 - 6:13 pm | अनंतसागर

मास्तर,
आत्ता मला कळलं की तुम्ही ज्या चुका माझ्या स्क्रिप्ट मध्ये काढल्या त्या मला का कळल्या नाहीत ते.
वाचनासंबंधी थोडे आम्हास ही मार्गदर्शन करावे ही विनंती.