कॉकटेल लाउंज : मार्गारीटा (फ्रोझन)

सोत्रि's picture
सोत्रि in पाककृती
23 Dec 2011 - 11:39 am

आज शुक्रवार, अर्धा दिवस संपला, विकांतचे वेध लागले असतीलच...

‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “मार्गारीटा (फ्रोझन)

पार्श्वभूमी:

माझी कॉकटेलच्या रंगबीरंगी आणि मादक विश्वाची सफर ह्या कॉकटेलपासूनच झाल्यामुळे हे कॉकटेल मला जास्त जवळचे आहे.

ह्या कॉकटेलच्या उगमाच्या फार दंतकथा आहेत. एका कहाणीप्रमाणे एका मोठ्या समारंभात त्या समारंभाच्या प्रमुख पाहुण्याच्या मुलीच्या नावाने एक नविन ड्रिंक बनवले ते म्हणजे मार्गारीटा. तर एक कहाणी सांगते की एका बारटेंडरने ह्या ड्रिंकचा शोध लावला आणि तीच्या नावाचे स्पॅनिश रुपांतर होत होते मार्गारीटा म्हणून ह्या कॉकटेलला मार्गारीटा हे नाव पडले.

पण मी म्हणतो आपण 'गुठलीया गिननेकाच क्यू, डायरेक्ट आमंच खाने का ना' :)

तर जरी हे कॉकटेल मेक्सिकन टकीलापासून बनवले असले तरीही हे पुर्णतः अमेरिकन कॉकटेल आहे. मेक्सिकोमधे हे तितकेसे लोकप्रिय नाहीयेय.

प्रकार: टकीला बेस्ड कॉकटेल

साहित्य:

टकीला
1.5 औस (45 मिली)

कॉईंत्रु (दुसरा पर्याय – ट्रिपल सेक)
1 औस (30 मिली)

मोसंबी ज्युस
0.5 औस (15 मिली)

लिंबू ज्युस
10 मिली

एक कप बर्फ

मोसंबीची साल सजावटीसाठी

ब्लेंडर

मोजण्याचा जिगर

ग्लास: – कॉकटेल किंवा मार्गारीटा

कृती:
सर्वप्रथम कॉकटेल ग्लासमधे पाणी आणि बर्फाचे खडे टाकून फ्रीझमधे फ्रॉस्टी करण्यासाठी साधारण तासभर ठेवून खालच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे मस्त फ्रॉस्टी करा.

आता एका प्लेट मधे मीठ पसरवून घ्या. लिंबू कापुन ते ग्लासच्या तोंडावर एकसारखे चोळून घ्या. आता ग्लासाचे तोंड त्या मीठाच्या प्लेटमधे गोल फिरवून घ्या. खालच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे ग्लासच्या तोंडावर मीठ बसलेले असले पाहिजे.

आता मोसंबीचा आणि लिंबाचा रस काढून घ्या.

आता टकीला, कॉइंत्रु (किंवा ट्रिपल सेक), आणि मोसंबी आणि लिंबू रस ब्लेंडर मधे ओतून घ्या.

आता बर्फ ब्लेंडर मधे टाका आणि मिडीयम स्पीडवर बर्फाचा चुरा होईपर्यंत व्यवस्थित ब्लेंड करून घ्या.

आता ब्लेंड झालेले मिश्रण ग्लासमधे ओतून घ्या. मोसंबीची साल सजावटीसाठी ग्लासमधे अलगद सोडा.

चुरा झालेला बर्फ म्हणजे बर्फाचा गोळा खाताना होतो तसा झालेला चुरा. पण त्यात थोडे थोडे तुकडे असलेले मला आवडतात.

मस्त चवदार फ्रोझन मार्गारीटा तयार आहे :)

ब्लु मार्गारीटा

वरच्या रेसिपीमधे कॉईंत्रु किंवा ट्रिपल सेक ऐवजी 'ब्लु कुरासाओ (Blue Curacao)' ही लिक्युअर वापरल्यास तेवढ्याच प्रमाणात वापरल्यास 'ब्लु मार्गारीटा' हे एक व्हेरिएशन कॉकटेल तयार होते.

ब्लु कुराकाओ हे कॉईंत्रु किंवा ट्रिपल सेक प्रमाणेच एक ऑरेंज लिक्युर आहे. अधिक माहितीसाठी.


(ब्लु मार्गारीटाचे चित्र आंजावरून साभार)

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

23 Dec 2011 - 11:54 am | प्रचेतस

_/\__/\__/\_
मद्यसम्राट सोकाजीरावांना मानाचा मुजरा.

मद्य पीत नसलो तरी एक शंका. हे कॉकटेल पिताना ग्लासच्या सर्वच बाजूने पितात का मीठाचा स्वाद उतरण्यासाठी?

ब्ल्ड प्रेशरचा त्रास असेल तर कडा पुसुन प्यावे,मिठ चांगले नाही त्या त्रासाला.........

सोत्रि's picture

23 Dec 2011 - 1:45 pm | सोत्रि

टकीलाचा स्वाद सर्वार्थाने खुलण्यासाठी मीठ हा एक अत्यावश्यक घटक आहे.
त्यामुळे ग्लासच्या सर्व बाजूने पिण्यास अजिबात लाजू नये. :)

- (साकिया) सोकाजी

गवि's picture

23 Dec 2011 - 11:57 am | गवि

एकदम झकास भाग आहे हा सोकाजीराव..

.. गोव्यात मे महिन्यात गेलो असताना ताज्या हापूस आंब्याची मार्गरिटा बनवत होते.. एकावर एक दोन मार्गरिटा फस्त केल्या.. काय अप्रतिम होता तो प्रकार.. अर्थात आंब्याची मार्गरिटा अशी कन्सेप्ट ओरिजिनल असेल नसेल.. पण होती मात्र खल्लास...

कपिलमुनी's picture

23 Dec 2011 - 12:14 pm | कपिलमुनी

ब्लू मार्गारीटाने आठवणी ताज्या केल्या ;) !!
दिसायला अतिशय सुंदर असा कॉकटेल आहे ..सजवु तेवढे सुंदर दिसते ..

तुमचा प्रेजेंटेशन आणि स्टेपस अप्रतिम !!

जाम आवडला !!

असाच एक नीलवर्णी पेय म्हणजे ब्लू लगून

आणि गवि म्हणतात तस "ताज्या हापूस आंब्याची मार्गरिटा " प्यायला गोव्याला गेला पाहिजे ..

तुम्हाला मेनी मेनी धन्यवाद ....

आणि एक फर्माईश आहे :

न्यु ईयरसाठी एक कॉकटेल होउन जाउ द्या ;)

गवि's picture

23 Dec 2011 - 12:17 pm | गवि

ताज्या हापूस आंब्याची मार्गरिटा " प्यायला गोव्याला गेला पाहिजे ..

मलाही असंच वाटत होतं.. पण मुंबईत पॉप टेट्समधे मी मे महिन्यात अशी हापूस मार्गरिटाची मागणी केली तेव्हा मला इथेही त्यांनी खास फर्माईश म्हणून आनंदाने बनवून दिली..

परिकथेतील राजकुमार's picture

23 Dec 2011 - 12:24 pm | परिकथेतील राजकुमार

असाच एक नीलवर्णी पेय म्हणजे ब्लू लगून

फटू पाहिल्या पाहिल्या अगदी हेच आठवले होते. मुंबईला हा प्रकार पहिल्यांदा चाखला होता.

सोत्रि लेका सकाळी सकाळी असले काय टाकत नको जौ बे ... उगा जीवाची कालवाकालव होत राहते संध्याकाळपातुर .

बाकी कॉकटेल हाय एकदम बुम्बाट ;)

सोत्रि's picture

23 Dec 2011 - 1:56 pm | सोत्रि

न्यु ईयरसाठी एक कॉकटेल होउन जाउ द्या

नक्कीच! एक कॉकटेल, 'देसी धमाका' कॅटेगरीतले, राखून ठेवले आहे न्यु ईयरसाठी :)
पुढच्या शुक्रवार पर्यंत कळ काढा :)

- (साकिया) सोकाजी

सुहास झेले's picture

23 Dec 2011 - 12:23 pm | सुहास झेले

जबरा.... !!!!

मद्यसम्राट सोकाजीरावांना मानाचा मुजरा.

ती निळी मार्गारीटा भलतीच आकर्षक आहे.
कधी पासुन खुणावतेय... ये उचल मला, मी तुझीच आहे.
:love: :love:

खादाड's picture

23 Dec 2011 - 1:55 pm | खादाड

:)

पक पक पक's picture

23 Dec 2011 - 2:32 pm | पक पक पक

फारच भन्नाट मद्यकॄति आहे.......

प्यारे१'s picture

23 Dec 2011 - 2:33 pm | प्यारे१

म्हणूनच मी सोडत नाही....... ;)

सोत्रि's picture

23 Dec 2011 - 4:18 pm | सोत्रि

आत्ताच चिंतातूर जंतू कडून मिळालेल्या लिंकवरून मस्त माहिती मिळाली.


Margarita Sames
legendary inventor of the margarita

आत्मशून्य's picture

23 Dec 2011 - 4:25 pm | आत्मशून्य

Sokajirao hits high again with Margarita frozen. Great!

अत्रुप्त आत्मा's picture

24 Dec 2011 - 12:24 am | अत्रुप्त आत्मा

_/\__/\__/\_ मुजरा हो मद्याचार्य :-)

५० फक्त's picture

24 Dec 2011 - 8:35 am | ५० फक्त

जबराच, धन्यवाद या अशा माहितीवरुन जिथं पार्ट्यात जातो तिथं पित नसलो तरी फंडे द्यायला तुमचे धागे फार उपयोगी पडतात,