प्रतिथयश कवयित्री क्रांतीतैंचं अप्रतिम काव्य 'ऐल-पैल' वाचलं आणि मी सैरभैर झालो! मग काय आपोआप दाद निघालीच मनातून! ईर्शाद!!
ऐल मळे पैल खळे
भेटू मी कुठे, ना कळे
टाकता पाऊल वळे
बापूस माघारी!
ऐल दिवा पैल वात
भेट नाही पंध्रवड्यात
आहे काळोख घरात
खवीस दारी!
ऐल साद पैल जाई
चिंच फोक चोप देई
ओरडा घुमत जाई
भर बाजारी!
ऐल 'चंद्रा' पैल 'निशा'
अभिलाषा दशदिशा
धुमसतात वेड्यापिशा
पेटल्या सिगारी!
ऐल जान पैल सखी
बाप 'गाजरपारखी'
दमदाटी हो सारखी
'वळ' 'माघारी'!
ऐलपैलाच्याही पार
तुझ्या परसाचे दार
त्याच्या पायरीशी प्यार
दे गं दुपारी!
-चतुरंग
प्रतिक्रिया
15 Dec 2011 - 9:14 pm | गणपा
_/\_
=))
मनीच्या बाता : गण्या घरचा अहेर सध्या लांब आहे म्हणे म्हणुन रंगाशेठ मोकाट सुटले असतील का रे. ;)
15 Dec 2011 - 9:29 pm | प्रास
अगदी अगदी
गणपाशेठ,
त्या मनीच्या बातांशी +१००
बाकी
या ऐवजी
ऐल 'रंगा' पैल 'सखी'
छबी दृष्टीला पारखी
तगमग हो सारखी
हृद्-व्यथा दुखरी!
हे चपखल बसतंय का?
;-)
16 Dec 2011 - 7:36 am | रेवती
आहे, (अधून मधून का होईना) लक्ष आहे.;)
15 Dec 2011 - 10:13 pm | जाई.
शपथ मानल तुम्हाला
इतक्या कमी वेळेत भन्नाट विडंबन _/\_
15 Dec 2011 - 10:22 pm | प्राजु
रंगा इज ब्यॅक!!
15 Dec 2011 - 10:27 pm | मेघवेडा
'वळ माघारी' मस्त आणि शेवटचं कडवं भन्नाट!
15 Dec 2011 - 11:11 pm | अत्रुप्त आत्मा
ऐल 'चंद्रा' पैल 'निशा'
अभिलाषा दशदिशा
धुमसतात वेड्यापिशा
पेटल्या सिगारी!...___/\___ या नंतर मनातल्या मनात 'पनवेल'\'पन-वेल' अश्या अरोळ्या का उठल्या कुणासठाऊक... ;-) ?
15 Dec 2011 - 11:26 pm | सूड
स्पीचलेस
__/\__
16 Dec 2011 - 8:25 am | नंदन
फस्क्लास विडंबन!
फारच 'ज्वलंत' समस्या आहे ब्वॉ :)
16 Dec 2011 - 9:00 am | सुहास झेले
हा हा हा ... जबरा !!!
16 Dec 2011 - 9:19 am | प्रीत-मोहर
हाहाहा जबर्या आहे...
16 Dec 2011 - 10:02 am | प्यारे१
>>>ऐलपैलाच्याही पार
तुझ्या परसाचे दार
त्याच्या पायरीशी प्यार
दे गं दुपारी!
च्यायला, ही म्हण जे किमान पक्षी 'त्रेधातिरपीट' आहे म्हणा की.
चंद्रा, निशा नी 'तू ' म्हणजे अवघडच परकरन हाय म्हना की...
चतुर-रंगा अशी फोड आहे काय चतुरंगची? ;)
16 Dec 2011 - 12:37 pm | क्रान्ति
प्रचंड आवडलेलं विडंबन! :) गाजरपारखी अफाट! ;)
अशी दाद मिळायला नशीब लागतं! :)
16 Dec 2011 - 2:36 pm | राघव
क ड क!!
त्या क्रांतीतै धन्य अन् तुम्ही त्याहून धन्य!!
तुम्हा दोघांनाही त्रिवार दंडवत! _/\_ _/\_ _/\_
राघव
16 Dec 2011 - 3:43 pm | विसुनाना
ऐल जान पैल सखी
बाप 'गाजरपारखी'
दमदाटी हो सारखी
'वळ' 'माघारी'!
-चतुरंग, आपल्या शब्दखेळाचा तुरंग चौखूर उधळला आहे. मनापासून हसलो.
लै भारी - 'वळ' 'माघारी'....
16 Dec 2011 - 3:45 pm | गवि
भले.... :)
16 Dec 2011 - 4:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विडंबन मस्तच आहे.
ऐलपैलाच्याही पार
तुझ्या परसाचे दार
त्याच्या पायरीशी प्यार
दे गं दुपारी!
या ओळीतर खासच वाटल्या.
बाकी, प्रकाटाआ.
-दिलीप बिरुटे
16 Dec 2011 - 7:58 pm | इन्दुसुता
छान विडंबन. त्यात अत्रुप्त आत्मा यांनी दिलेलं कडवं सुद्धा अगदी चपखल बसतय.
17 Dec 2011 - 9:24 am | नगरीनिरंजन
लय भारी!
17 Dec 2011 - 3:28 pm | दिपक
ह्या रंगाचा रंगच न्यारा आहे राव :-)
17 Dec 2011 - 3:34 pm | पैसा
झक्कास विडंबन. भावना पुण्याला पोचली.