(ऐल-पैल)
लेखनविषय:
काव्यरस
प्रतिथयश कवयित्री क्रांतीतैंचं अप्रतिम काव्य 'ऐल-पैल' वाचलं आणि मी सैरभैर झालो! मग काय आपोआप दाद निघालीच मनातून! ईर्शाद!!
ऐल मळे पैल खळे
भेटू मी कुठे, ना कळे
टाकता पाऊल वळे
बापूस माघारी!
ऐल दिवा पैल वात
भेट नाही पंध्रवड्यात
आहे काळोख घरात
खवीस दारी!
ऐल साद पैल जाई
चिंच फोक चोप देई
ओरडा घुमत जाई
भर बाजारी!
ऐल 'चंद्रा' पैल 'निशा'
अभिलाषा दशदिशा
धुमसतात वेड्यापिशा
पेटल्या सिगारी!
ऐल जान पैल सखी
बाप 'गाजरपारखी'
दमदाटी हो सारखी
'वळ' 'माघारी'!
ऐलपैलाच्याही पार
तुझ्या परसाचे दार
त्याच्या पायरीशी प्यार
दे गं दुपारी!
-चतुरंग
वाचने
5355
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
_/\_
ऐलपैलाच्याही पार तुझ्या परसाचे दार त्याच्या पायरीशी प्यार दे गं दुपारी!=)) मनीच्या बाता : गण्या घरचा अहेर सध्या लांब आहे म्हणे म्हणुन रंगाशेठ मोकाट सुटले असतील का रे. ;)
In reply to _/\_ ऐलपैलाच्याही पार तुझ्या by गणपा
अगदी अगदी
गणपाशेठ,
त्या मनीच्या बातांशी +१००
बाकी
ऐल जान पैल सखी बाप 'गाजरपारखी' दमदाटी हो सारखी 'वळ' 'माघारी'!या ऐवजी ऐल 'रंगा' पैल 'सखी' छबी दृष्टीला पारखी तगमग हो सारखी हृद्-व्यथा दुखरी! हे चपखल बसतंय का? ;-)
In reply to _/\_ ऐलपैलाच्याही पार तुझ्या by गणपा
आहे, (अधून मधून का होईना) लक्ष आहे.;)
शपथ मानल तुम्हाला
इतक्या कमी वेळेत भन्नाट विडंबन _/\_
रंगा इज ब्यॅक!!
'वळ माघारी' मस्त आणि शेवटचं कडवं भन्नाट!
ऐल 'चंद्रा' पैल 'निशा'
अभिलाषा दशदिशा
धुमसतात वेड्यापिशा
पेटल्या सिगारी!...___/\___ या नंतर मनातल्या मनात 'पनवेल'\'पन-वेल' अश्या अरोळ्या का उठल्या कुणासठाऊक... ;-) ?
स्पीचलेस
__/\__
फस्क्लास विडंबन!
ऐल 'चंद्रा' पैल 'निशा' अभिलाषा दशदिशा धुमसतात वेड्यापिशा पेटल्या सिगारी!फारच 'ज्वलंत' समस्या आहे ब्वॉ :)
हा हा हा ... जबरा !!!
हाहाहा जबर्या आहे...
>>>ऐलपैलाच्याही पार
तुझ्या परसाचे दार
त्याच्या पायरीशी प्यार
दे गं दुपारी!
च्यायला, ही म्हण जे किमान पक्षी 'त्रेधातिरपीट' आहे म्हणा की.
चंद्रा, निशा नी 'तू ' म्हणजे अवघडच परकरन हाय म्हना की...
चतुर-रंगा अशी फोड आहे काय चतुरंगची? ;)
प्रचंड आवडलेलं विडंबन! :) गाजरपारखी अफाट! ;)
अशी दाद मिळायला नशीब लागतं! :)
क ड क!!
त्या क्रांतीतै धन्य अन् तुम्ही त्याहून धन्य!!
तुम्हा दोघांनाही त्रिवार दंडवत! _/\_ _/\_ _/\_
राघव
ऐल जान पैल सखी
बाप 'गाजरपारखी'
दमदाटी हो सारखी
'वळ' 'माघारी'!
-चतुरंग, आपल्या शब्दखेळाचा तुरंग चौखूर उधळला आहे. मनापासून हसलो.
लै भारी - 'वळ' 'माघारी'....
भले.... :)
विडंबन मस्तच आहे.
ऐलपैलाच्याही पार
तुझ्या परसाचे दार
त्याच्या पायरीशी प्यार
दे गं दुपारी!
या ओळीतर खासच वाटल्या.
बाकी, प्रकाटाआ.
-दिलीप बिरुटे
छान विडंबन. त्यात अत्रुप्त आत्मा यांनी दिलेलं कडवं सुद्धा अगदी चपखल बसतय.
लय भारी!
ऐलपैलाच्याही पार तुझ्या परसाचे दार त्याच्या पायरीशी प्यार दे गं दुपारी!ह्या रंगाचा रंगच न्यारा आहे राव :-)
झक्कास विडंबन. भावना पुण्याला पोचली.
_/\_ ऐलपैलाच्याही पार तुझ्या