आपण सगळेच बैल असतो
कोणीतरी फटके टाकत असतो आणि आपण पळत असतो
फक्त दोनवेळा अन्न आणिउतम निवार्यावर खुष असतो
मालकाच्या एखाद्या इशार्या सरशी ऊर फुटेतोवर धावत असतो.
आपण सगळेच बैल असतो
मालकाने यावे आपल्या गळ्याखालची पोळी खाजवावी
त्यानी आपली पाठ झाकावी
कधी काळी गुळपोळी चारावी म्हणुन वाटपहात असतो
आपण सगळेच बैल असतो
आपल्याल आपण बडवले गेलो आहोत याची काही लाज नसते
ती जाणीवच थिजलेली असते
उन्नत ध्येय वगैरे जाणीव कधीच निजलेली असते
वेसण काढुन टाकली तरी आपण तसेच असतो
फार तर नव्या मालकाच्या शोधात असतो
आणि नव्या मालकाकडे गेलो की जुना कसा चांगला होता याची गाणी गात बसतो
आपण सगळेच बैल असतो
प्रतिक्रिया
18 Jul 2008 - 11:15 am | सर्किट (not verified)
सुंदर कविता,
पोटेन्शिय्ल भरपूर !
शब्दांच्या निवडीविषयी अधिक काळजी घ्यावी !
(बैलांनाही भावना असतात. त्यांच्या भावनांची कदर झाली तरच कवीमनाची खात्री पटेल.)
- सर्किट
18 Jul 2008 - 11:21 am | छोटा डॉन
सर्कीटसर, मार्क नाही दिलेत ?
ऐसे विस्मरण कैसे जाहले ?
(गुणार्थी) छोटा डॉन
>>सुंदर कविता,
>>पोटेन्शिय्ल भरपूर !
असेच म्हणतो
(भविष्यातील वाचनमात्र्)छोटा डॉन
आता त्यात आमच्यासारख्या "सकाळी ६ ते रात्री १" वाल्यांची खेचली आहे पण तो भाग वेगळा ...
पण कविता सुंदर ....
(सकाळी ६ ते रात्री १ वाला बैल्)छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
18 Jul 2008 - 11:30 am | सर्किट (not verified)
सर्कीटसर, मार्क नाही दिलेत ?
ऐसे विस्मरण कैसे जाहले ?
डॉनसाहेब,
कविमहोदयांना येथे आम्ही जरा रमू देतो, आणि नंतरच गुणप्रदान सुरू करतो, हे आजवर आपल्यासारख्या जुन्या जाणत्या सदस्याच्या लक्षात आले नाही, हेही नवलच.
असो, विजुभाऊंचा हा अद्याप "नवकवित्वाचा काळ" आहे. त्यांना रमू द्या.
आपल्यात सांगतो, विजुभाऊंना कळू देऊ नका. आपापसात ५ गुण देतो. (शब्दांची निवड हे एक मुख्य कारण) तसेही मुक्तकांना आम्ही सात पेक्षा जास्त गुण देत नाही.
- (गुणग्राही) सर्किट सर
18 Jul 2008 - 11:27 am | रामदास
थोर कविता. वेळ वसूल.
आपल्याल आपण बडवले गेलो आहोत याची काही लाज नसते
जबरदस्त.
सुंदर कविता.
आय ऍम लविंग इट.
19 Jul 2008 - 12:58 am | llपुण्याचे पेशवेll
आपल्याल आपण बडवले गेलो आहोत याची काही लाज नसते
एक नंबर.. :)
आवडली कविता. आगे बढो विजुभाऊ. :)
पुण्याचे पेशवे
18 Jul 2008 - 11:30 am | शेखर
विजुभाऊ,
सुंदर कविता...
आपल्या ह्या प्रतिभेची जाणीव मला नव्हती... अजुन येऊदे...
शेखर
18 Jul 2008 - 11:33 am | बेसनलाडू
आवडले.
मालकाने यावे आपल्या गळ्याखालची पोळी खाजवावी
त्यानी आपली पाठ झाकावी
कधी काळी गुळपोळी चारावी म्हणुन वाटपहात असतो
आपण सगळेच बैल असतो
हे आणि वेसण विशेष आवडले.
(गाडीवान)बेसनलाडू
18 Jul 2008 - 11:40 am | विसोबा खेचर
छान, वैचारिक कविता...
अभिनंदन...
आपला,
(माजलेला बैल) तात्या.
18 Jul 2008 - 11:56 am | केशवसुमार
विजुभाऊ,
सगळ ठिक आहे ना की वेसण सॉरी नोकरी बदलताय?
छान कल्पना.. अभिनंदन
बाकी सर्किटमास्तरशी सहमत शब्दांच्या निवडीविषयी अधिक काळजी घ्यावी !
(रेडा)केशवसुमार
स्वगतः आता बैलाचा क्रमशः प्रवास सुरू होणार :SS ..एप्रिल कडबा खायला तयार रहा... #:S इरशाद...
18 Jul 2008 - 1:35 pm | विजुभाऊ
स्वगतः आता बैलाचा क्रमशः प्रवास सुरू होणार ..एप्रिल कडबा खायला तयार रहा... इरशाद...
एप्रील कडबा नाही एप्रिल आम्बोण म्हणा....:)
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
18 Jul 2008 - 1:49 pm | केशवसुमार
अता एप्रिल मधली गोष्ट तुम्ही जुलै मधे दिली तर ती आम्बोण च होणार
हे कस काय विसरलो.. #o
(वेंधळा)केशवसुमार
18 Jul 2008 - 12:01 pm | आंबोळी
मस्त हो विजुभौ.
स्वगतः आता बैलाचा क्रमशः प्रवास सुरूणार ..एप्रिल कडबा खायला तयार रहा... इरशाद...
=)) =)) =)) =)) =))
केशवा बैलाचा क्रमशः प्रवास नाही काही "एप्रिल महिन्यात (फ़ळे खाउन चहा पिलेल्या) बैलाचा क्रमश: स्वप्न प्रवास"
आंबोळी
18 Jul 2008 - 12:10 pm | अनिल हटेला
आपण सगळेच बैल असतो
धन्य हो देवा !!!
विजुभौ !!!!
आज जमीन मान्गो दे दू ,
आस्मान मान्गो दे दू ,
सारा जहान मान्ग के देखो ,
बस दे दू......
मस्तच कविता !!!!
(बैलांनाही भावना असतात. त्यांच्या भावनांची कदर झाली तरच कवीमनाची खात्री पटेल.)
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
18 Jul 2008 - 12:11 pm | इनोबा म्हणे
विजुभाऊ... मस्तच कविता
वेसण काढुन टाकली तरी आपण तसेच असतो
फार तर नव्या मालकाच्या शोधात असतो
आणि नव्या मालकाकडे गेलो की जुना कसा चांगला होता याची गाणी गात बसतो
आपण सगळेच बैल असतो
या ओळी विशेष आवडल्या
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
18 Jul 2008 - 4:57 pm | स्वाती दिनेश
वेसण काढुन टाकली तरी आपण तसेच असतो
फार तर नव्या मालकाच्या शोधात असतो
आणि नव्या मालकाकडे गेलो की जुना कसा चांगला होता याची गाणी गात बसतो
आपण सगळेच बैल असतो
हे विशेष आवडले.
स्वाती
18 Jul 2008 - 5:31 pm | शितल
बैलाची लै नाचक्की केली आहे हो.
पण काव्य रचना छान जमली आहे.
18 Jul 2008 - 5:36 pm | धनंजय
नोकरीबदलाचा विचार चालू आहे का?
18 Jul 2008 - 7:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विजुभौ, मालक लै तरास देऊन राह्यला का ?
मस्त काव्य, वाहात राहा ओझं :)
वेसण काढुन टाकली तरी आपण तसेच असतो
फार तर नव्या मालकाच्या शोधात असतो
आणि नव्या मालकाकडे गेलो की जुना कसा चांगला होता याची गाणी गात बसतो
आपण सगळेच बैल असतो
मस्त !!!
सर्कीट सरांनी आपल्या काव्याला कमी मार्क दिले आहेत, आमचे मार्क आहेत = ०८ :)
( छंदोबद्ध रचनेला : लघु-गुरु मात्रे मोजणा-यांना आम्ही मार्कच देत नाही ;) )
-प्रा.डॉ. दिलीप बिरुटे
18 Jul 2008 - 8:17 pm | अभिज्ञ
विजुभाउ,
कविता बेस झालीया.
अभिज्ञ
19 Jul 2008 - 1:59 am | मदनबाण
कविता आवडली..
(शिफ्ट ड्यूटी करणारा बैल)
मदनबाण.....
21 Jul 2008 - 8:07 pm | विजुभाऊ
कवितेवर विडंबने लिहिलेल्या सर्वाना धन्यवाद
http://misalpav.com/node/2608
http://misalpav.com/node/2609
आणि वर कडी म्हणुन की काय
http://misalpav.com/node/2626
एका कवितेवर इतकी विडंबने येणे खूप मस्त वाटले.
स्वगतः आता क्रमशः कविता लिहिन म्हणतो ( खातय मार बहुतेक)
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
21 Jul 2008 - 10:13 pm | चतुरंग
विजुभाऊ, तुमच्यात मुक्तछंदात पोसलेला एक बैलही दडला होता ह्याची कल्पना नव्हती! ;)
एकदम जबरा!
(चार दिवसांच्या सुट्टीनंतर आधी विडंबनेच नजरेला पडली आणि मग तुमची कविता त्यामुळे प्रतिक्रियेला उशीर!)
चतुरंग
6 Dec 2014 - 11:41 am | विजुभाऊ
बरेच दिवसानी पुन्हा याद आली
हम्मा हम्मा बोलावताच तीने शिंगे उगारली.
प्रमोशन तियेचे झाले होते. ऑनसाईटचे दर्शन घडले होते.
बदलला मालक जरी . बैलाने झूल नाही झुगारली
6 Dec 2014 - 12:14 pm | तिमा
ही कविता आजच वर आणण्याची काही खास कारणे ?
6 Dec 2014 - 1:05 pm | चुकलामाकला
सुंदर कविता!
6 Dec 2014 - 5:31 pm | शब्दानुज
गाय समोर असताना मालकाने मारले म्हणून तो हटुन बसतो का??
9 Dec 2014 - 2:47 pm | विजुभाऊ
हॅ हॅ हॅ.........