((बैल))

आंबोळी's picture
आंबोळी in जे न देखे रवी...
18 Jul 2008 - 1:02 pm

प्रेरणा : विजुभौंचा बैल

आपण सगळेच बैल असतो
कोणीतरी संस्थळ काढत असतो आणि आपण जॉईन करत असतो.
जिंदादीली आणि प्रशासक नसण्यावर खुष असतो.
रसिकाच्या एखाद्या इशार्‍यासरशी ऊर फ़ुटेतो लिहीत असतो
आपण सगळे बैल असतो.
रसिकाने यावे आपल्या लिखाणाला प्रतिसाद द्यावा
त्याने आपली कविता वाचावी
कधी काळी वाह वा , जबरा म्हणाव म्हणून वाट पहात असतो.
आपण सगळेच बैल असतो.
आपल्याला आपण विडंबवले गेलो आहोत याची काही लाज नसते.
ती जाणिवच थिजलेली आसते.
उत्क्रुष्ठ लेख वगैरे जाणीव कधीच निजलेली असते.
आपले लेख काढून टाकले तरी आपण तसेच असतो.
फ़ार तर नव्या संस्थळाच्य शोधात असतो.
आणि नव्या स्थळी गेलो की जुने कसे चांगले होते याची गाणी गात बसतो.
आपण सगळेच बैल असतो.
========================
आंबोळी-----------१८-०७-२००८

विडंबन

प्रतिक्रिया

केशवसुमार's picture

18 Jul 2008 - 1:10 pm | केशवसुमार

अंबोळीशेठ,
पुन्हा !! :O
आज काही खर नाही.. :SS
पुन्हा एकदा जबरा विडंबन..
नक्कि काल कंदिल लावला होता..
(जूना) केशवसुमार
स्वगतः मी अंबोळी नाही X( .. उगाच गैरसमज नको.. #o

अमोल केळकर's picture

18 Jul 2008 - 1:15 pm | अमोल केळकर

वा क्या बात है !
मस्तच
( विडंबनातला बैल ) अमोल
--------------------------------------------------
गुरुने दिला ज्ञानरुपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा !!
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

सहज's picture

18 Jul 2008 - 1:15 pm | सहज

प्रोप्रायटर - कंदीलकुमार

जबरी!!

:-)

बेसनलाडू's picture

18 Jul 2008 - 1:24 pm | बेसनलाडू

विचारप्रवर्तक झालंय.
(गंभीर)बेसनलाडू

विजुभाऊ's picture

18 Jul 2008 - 1:30 pm | विजुभाऊ

कन्दील्या तुझे काहे खरे नाही रे आता
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

टारझन's picture

18 Jul 2008 - 6:00 pm | टारझन

विजाभौ आगे बढो... हम तुम्हारे साथ है !
आपल्याला ओरिजीनल बैलच जाम आवडला. त्यातले जिवनविषयक सूत्र गटणे सकट सर्वांना लागू पडते.

माजलेला सांड) कुबड्या खवीस
(आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. )
नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.


तू भारी ...तर जा घरी...

अनिल हटेला's picture

18 Jul 2008 - 1:59 pm | अनिल हटेला

सॉलीड !!

येउ देत अजुन !!!!

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

ऋषिकेश's picture

18 Jul 2008 - 2:01 pm | ऋषिकेश

हा बैल सगळ्यात जास्त आवडला :)

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

स्वाती दिनेश's picture

18 Jul 2008 - 4:55 pm | स्वाती दिनेश

असेच म्हणते..
स्वाती

बिपिन कार्यकर्ते's picture

18 Jul 2008 - 2:07 pm | बिपिन कार्यकर्ते

आज मिपावर बैलांना इतका भाव आलेला पाहून बैलोबा असल्याचा अभिमान वाटतो आहे. :) :D

(गाई गाई करणारा बैल...) बिपिन.

बेसनलाडू's picture

18 Jul 2008 - 2:11 pm | बेसनलाडू

म्हणजे गाईगाई करणारा की "गाई,(ए) गाई" करणारा कार्यकर्ते साहेब? ;) (ह.घ्या.)
(जागरुक)बेसनलाडू

शितल's picture

18 Jul 2008 - 5:28 pm | शितल

छान जमले आहे विडबन.
वीजुभाऊ देख रहो हो क्या :)

विसोबा खेचर's picture

18 Jul 2008 - 5:32 pm | विसोबा खेचर

आपल्याला आपण विडंबवले गेलो आहोत याची काही लाज नसते.

हा हा हा!

'विडंबवले गेलो आहोत' हे वाक्य लै भारी.. :)

अभिज्ञ's picture

18 Jul 2008 - 7:58 pm | अभिज्ञ

अरे काय चाललेय हे?
एकतरी कविता सोडा की विडंबनाशिवाय....

विडंबन छानच झालेय.

जबरी.

अभिज्ञ.

(अवांतर-कविचे स्वगत : ह्या विडंबनकाराच्या बैलाला..... असेच असावे काय?)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Jul 2008 - 8:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खांदेकरी, मयत, अशी कोणतीच आपल्या लौकिकाला साजेशी कल्पना नसल्यामुळे विडंबन छान झालेले असूनही हार्टली घंटी वाजत नाही. :)

सर्किट's picture

18 Jul 2008 - 11:37 pm | सर्किट (not verified)

स्वानुभवामुळे विडंबनाला अधिकच (पहिली) धार आली आहे.

आपले लेख काढून टाकले तरी आपण तसेच असतो.
फ़ार तर नव्या संस्थळाच्य शोधात असतो.
आणि नव्या स्थळी गेलो की जुने कसे चांगले होते याची गाणी गात बसतो.
आपण सगळेच बैल असतो.

लाजवाब ! कंदिल सुमार !!!!

- (निर्लज्ज बैल) सर्किट

आंबोळी's picture

19 Jul 2008 - 10:54 am | आंबोळी

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी)कंदीलसुमार

ही आभाराची ढापूगीरी आम्ही आमचे मानस गुरु केशवसुमार यांच्याकडून केली आहे हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलेच असेल!

चतुरंग's picture

19 Jul 2008 - 5:46 pm | चतुरंग

काय तुझं कवतिक सांगू?
एकदम फर्मास रे! एकदम समद्यांना शिंगानं ढुसन्या देउन पाल्डस कीजोरदार हुंदडलायस!

चतुरंग

मदनबाण's picture

19 Jul 2008 - 8:37 pm | मदनबाण

आंबोळ्या जबरदस्त रे....
(रसिक बैल..)
मदनबाण.....

"Life is a joke. The only way to survive it is to find the right punchline" -- Becky Alunan

शेखस्पिअर's picture

19 Jul 2008 - 9:41 pm | शेखस्पिअर

अरे डुचक्या,
कवितेच्या जंगलात सोडलेल्या वळू तू...
वेसणलेल्या नाकातून निघालेला, विडंबवलेला सूर तू...
गोठाळलेल्या बंधनातून सुटून गेलेला बैल तू...
गाईकीत बुडालेला हंबरडलेला आवाज तू...
शेणावलेल्या पायांनी काढलेली रांगोळी तू...
चारावून टाकलेली भावना चोथावताना आवाजही न करणारा तू...
आज मात्र खरवलेली कविता केलीस तू...
जोहार..