विडंबक

आमची प्रेरणा बैलभाऊंची विजु कविता..... सॉरी विजुभाऊंची बैल कविता.. Worried
शुक्रवार आहे समजून घ्या Smile
--------------------------
आपण सगळेच विडंबक असतो
कोणीतरी कविता पाडत असतो आणि आपण त्याच्या पाळतीवर असतो
फक्त दोनवेळा चहा आणि वीस रुपये रोजीवर खुष असतो
कवीच्या एखाद्या इशार्‍या सरशी ऊर फुटेतोवर लिहीत असतो.
आपण सगळेच विडंबक असतो
कवीने यावे आपली विडंबनाची खाज भागवावी
जमल्यास आपली पाठही खाजवावी
कधी तरी चांगला कच्चा माला पाडावा म्हणुन वाट पहात असतो
आपण सगळेच विडंबक असतो
कविला आपण बडवले आहे याची आपल्याला काही लाज नसते
ती जाणीव कवीची जवाबदारी असते
उन्नत काव्य वगैरे जाणीव कधीच निजलेली असते
वृत्त मात्रा काढुन टाकले तरी आपण तसेच असतो
फार तर नव्या मालाच्या शोधात असतो
आणि नव्या मालाकाकडे गेलो की जुना कसा चांगला होता याची गाणी गात बसतो
आपण सगळेच विडंबक असतो

एट टू ब्रुटस ?

शुक्रवार असल्याने एका ब्रूटस ऐवजी दोन दिसले, समजून घ्या Wink

कोलू शेठ, जबर्या !

तुम्हालाही एकूण (९ * ०.७) = ६.३ गुण !!

कविला बडवले याची लाज = १० गुण !

दोन वेळा चहा आणि २० रु रोजी = १० गुण !

मस्तच !

- सर्किट

हा हा!

कोलूशेठ,
तुम्ही सुध्दा!! Surprise
अरे काय चालंय काय..
एकदम झकास विडंबन..
(विडंबक)केशवसुमार
स्वगतः कार्यकारणीवर दोन विडंबक बसवल्याचा परीणाम आहे हा सगळा Nerd

काय म्हणु

काय म्हणु आता ?
सगळेच विडंबनकार झाले की काय ?

(कुठे गेला तो ओरिजनल बैल ?)
मदनबाण.....

:) :)

चालू द्या.
(वाचक)बेसनलाडू

सहमत

!
Smile

पत्र कधी लिहायचं?

मस्त

Smile

आयला

आयला वरूणदेवा,

आता तू सुद्धा हे विडंबनाचे वगैरे धंदे करायला लागलास? Smile

कोणीतरी कविता पाडत असतो आणि आपण त्याच्या पाळतीवर असतो
फक्त दोनवेळा चहा आणि वीस रुपये रोजीवर खुष असतो

मस्त! Smile

बाय द वे, 'दोनवेळा चहा आणि वीस रुपये रोजी' या कल्पनेचे ऋणनिर्देश करायचे राहून गेले आहे काय? Smile

असो, परंतु कल्पना बाकी एकदम फिट्ट बसली आहे! औरभी आने दो!

आपला,
(२० रुपये रोजीचा संपादक) तात्या.

--
मिपा दिवाळी अंकाकरता दोन टाईम चहा, वीस रुपये रोजी, आणि शिग्रेट या बोलीवर काही संपादक मिळताहेत का ते पाहतो आहे! शक्तिवेलू आजकाल २५ रु रोजी देतो असं कळलं. तसं असेल तर आपणही २५ रुपये देऊ! Smile

फर्मास विडंबन

कोलुशेठ,
या संसर्गजन्य रोगाची लागण तुम्हाला पण झाली का? छान.
वेलकम टू क्लब!

स्वगत : केश्या मेल्या किती लोकाना लागण करणार आहेस? Nerd

आंबोळी

धन्यवाद!

सर्व वाचक आणि प्रतिसादकर्त्यांचे आभार! Smile

हा हा हा!

अजून एक विडंबक तयार झालाच!!
कोलबेरा मस्तच रे.

(स्वगत - चार दिवस गावाला गेलो होतो, येऊन बघतोय तर विडंबनांचा पाऊस आणि नव्याने लागण झालेले विडंबक! आता कसं छान वाटतंय!! Wink )
चतुरंग

हम्मा

कोलबेरकाका हम्मा........ हम्मा.......
फार तर नव्या मालाच्या शोधात असतो Rolling On The Floor
(माताय आता केसुशेठच फक्त राहिले आहेत मला बडवायचे )

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत