सिंदबाद...

मन's picture
मन in जनातलं, मनातलं
30 Nov 2011 - 3:14 pm

सिंदबाद...
एक वेडा खलाशी.समुद्रावर जातो म्हणून खलाशी म्हणायचं. वृत्ती तीच, भटक्याची,प्रवाशाची.
अमुक ठिकाणी "पोचणं" हे त्याचं उद्दिष्टच नसतं. त्याला फक्त तिथं "जाण्यात" मजा असते म्हणून जायचं असतं.
हरेक सफरीत काहितरी वेगळं सापडेल म्हणून थेट नौका अथांग समुद्रात फेकणारा तो सिंदबाद. इतर खलाशी "बाप रे वादळ येतय" असं म्हणताना हा "अरे व्वा! वादळ येतय " शिडांच्या जुळजुळवीला अफाट उत्साहाने लागणारा पठ्ठया.
वादळातून नाव काढल्यावर "वाचलो", "सुटलो" असे म्हणण्यापेक्षा "कस्ला थरार होता हा." असे म्हणून रोमांचित होणारा व रूढ जगाच्या दृष्टीने गाढव. कधी गलबत उलटे होउन बुडताना छोटी अरूंद नौका सोबत्यांसाठी ठेवून नजिकच्या बेटापर्यंत पोहत जायची हिम्मत ठेवणारा धाडसी सिंदबाद. ह्या सगळ्या प्रवासात चित्रविचित्र अनुभव घेतलेला, तिलिस्मी तलवार सापडलेला, डाकूंशी आणि चाच्यांशी लढलेला, प्रसंगी घाव झेलून आपल्या सहकार्‍यांना वाचवणारा हा सिंदबाद.
कधी अद्भुत जादूच्या, मायावी बेटावरून त्या दुष्ट जादूगाराच्या जाळ्यात त्यालाच अडकवत वठणीवर आणणारा चतुर सिंदबाद. कधी अजस्त्र माशांनी किंवा ड्रॅगनसदृश प्राण्यांनी गलबत घेरले गेले असताना गलबत वाचवणारा एक धाडसी, रोमांचवेडा,अल्पकालातच कंटाळणारा सिंदबाद.

प्रत्येक सफरीत आजवर कुणी न घेतलेले असे चित्रविचित्र पण समृद्ध अनुभवविश्व घेउन, जीवाशी खेळ करून शेवटी सिंदबाद घरी येउन पोचतो. ह्या अनुभवानंतर शहाण्याने तर प्रवासाचे पुन्हा नावच काढायला नको.
पण हा मात्र लागलिच "इथे राहून रोजच्या आयुष्यात करायचे काय" असे म्हणत उप्लब्ध असलेल्या चारचौघांसारख्या स्थिर पण चौकटीबद्ध आयुष्याला कंटाळत पुन्हा लागलिच पुढच्या प्रवासाची बांधाबांध करू लागतो.

एकाच सफरित भरपूर धनवान झाल्यानंतर तो घरी थांबू शकला असता,पण "घर" हे ही त्याच्यासाठी "बेट"च होते.
बेटावर फक्त काहीकाळ मुक्काम करायचा असतो; तो केवळ पुढल्या भ्रमणाला निघायला हेच पायाला भिंगरी लावलेल्या अस्सल खलाशाला समजते. तो पुढचीही सफर पूर्ण करून पुन्हा त्या "बेटावर" यायचं ठरवतो आणि तयारीला लागतो.

आपल्या सगळ्यातच हा सिंदबाद असतोच. जितके लहान वय तितका तुमच्यात सिंदबाद जास्त. एकाच ठिकाणचं स्थिरत्व त्याला जडात्व वाटतं, कंटाळवाणं वाटतं. नाही ती संकटं अंगावर ओढवून घ्यायची आणि मग स्वतःच लढून ती सोडवायची आणि वर ह्यानं खुश, उत्तेजित, रोमांचित होत पुढल्या संकटात घुसायचं एवढच त्याला समजतं. बालपणी नाही का "बाउ आहे हां तो" म्हटले तरी चटका बसल्याशिवाय बाळाला अक्कल येत नाही, किंवा रोज खरचटून,धडपडून घेतलं तरी खेळायचा उत्साह काही कमी होत नाही तसच.
अशा सिंदबादना सुरक्षित आणि सामान्य प्रवासच मंजूर नसावा. त्यांना हवे ते अंगावर येनारे roller coaster सारखे आयुष्यात येणारे अनुभव.

संथ व शांत आयुष्यात ह्यांची अवस्था एकच....
"`आहे मनोहर तरी गमते उदास"....
आहे ते उत्तम आहे, पण अजून काही तरी हवय. सोबतच्यांना ते "तुम्ही चांगले आहात, पण तुम्ही मला आता हवे आहात तसे नाही आहात" असे म्हणत ते मांडलेला डाव सोडून दुसर्‍या भिडूशी नव्याने भिडतात. कोण वाइट, कोण चांगले, कोण शहाणे कोण पागल असा विचार "शहाणी" माणसे करतात, करतच राहतात आणि ह्या "वेड्याचे" तेव्हढ्यात सात प्रदीर्घ समुद्रसफरी पूर्ण होतात देखील.

Good bye Cognizant. माझ्यातला सिंदबाद उचकलाय.
सफरीतून जगलो वाचलो तर पुन्हा तुला भेटायला येइनच.
तू छानच आहेस. दोनेक महिन्यात नव्या सफरिला निघतोय, नवीन बेटाच्या ओढीने.

--मनोबा.

संस्कृतीमुक्तकप्रकटनविचारसद्भावना

प्रतिक्रिया

गवि's picture

30 Nov 2011 - 3:21 pm | गवि

वा. क्या बात है..

कपिलमुनी's picture

30 Nov 2011 - 3:55 pm | कपिलमुनी

Good bye Cognizant. म्हणुन विचारला..

मन१'s picture

30 Nov 2011 - 4:14 pm | मन१

बदलतोय.

--मनोबा

बेस्ट्च रे, कंपनीनं आपल्याला बदलण्यापुर्वी आपण कंपनी बदलावी हे उत्तम.

अवांतर - हे बायकोच्या बाबतीत करता येत नाही
अतिअवांतर - वरचं अवांतर कुणी तरी खोतांना समजवा.

मोहनराव's picture

30 Nov 2011 - 5:43 pm | मोहनराव

<<अतिअवांतर - वरचं अवांतर कुणी तरी खोतांना समजवा.>>
खिक्क..

मनिष's picture

30 Nov 2011 - 4:04 pm | मनिष

“A ship is safe in harbor, but that's not what ships are for....
शुभेच्छा!!!

अन्या दातार's picture

30 Nov 2011 - 4:08 pm | अन्या दातार

मस्त मुक्तक. आवडले.

पिंगू's picture

30 Nov 2011 - 4:16 pm | पिंगू

मनोबा नव्या सफरीसाठी शुभेच्छा....

- पिंगू

मोहनराव's picture

30 Nov 2011 - 4:20 pm | मोहनराव

जास्तही इकडुन तिकडे उड्या मारू नका हो!!
सिंदबादचा ठिक आहे... पण जास्त उड्या मारणार्‍यांना jumping jack समजुन घेत नाहीत नंतर कंपन्या!! मग रेप्युटेशन खराब होते.

मी इंडस्ट्रीत आलो तेच मुळी आहोत तिथेच खूप मोठ्ठ व्हायचं, खूप मेहनत करून पुढे जायचं वगैरे फ्रेशरस्टाइल कल्पना घेउन. साडेतीन वर्षातच आधी होतो तिथे जीव नकोसा झाला. वैताग आला. कुटील, कारस्थानी लोकांना हल्कटपणानी उत्तर देता मी स्वतःही नीच बनेन असे वाटत होते. पुढे जाण्यासाठी इतरांच्या नरडीचा घोट घेणे तिथली राजमान्य पद्धत होती. त्याला वैतागून, स्वतःला मानवी सद्गुणांच्या जवळ राखण्यासाठी साडेतीन वर्षानी ते सोडून सध्या आहे तिथे आलो.
इथे आलो. बरे वाटले,हायसे वाटले. दोनेक वर्षे झाली सगळे सुरळित आहे. पण आता कधी नव्हे ते खाज सुटली आहे.तक्रार अशी खूप काही नाही. पण म्हटले निघावे. पुढील ठिकाणी दशकभर तरी राहण्याची इच्छा आहे.
बघूया. साडेतीन वर्षानी एक , मग पुढच्या दोन वर्षानी एक अशा दोन उड्या सध्या झाल्यात.

मोहनराव's picture

30 Nov 2011 - 5:10 pm | मोहनराव

मग ठिक आहे. पण मी खर सांगु का सगळीकडे थोड्याफार फरकाने सगळ तेच असतं.
अजुन एक मुद्दा असा की रेकगनिशन होणे व माणसाची किंमत कळणे याला थोडा वेळ लागतो. उड्या मारुन पैसा वाढतो पण प्रमोशन, चांगले काम मिळणे, प्रोफेशनल रिलेशन्स डेव्हलप होणे होत नाही.

किचेन's picture

30 Nov 2011 - 4:25 pm | किचेन

सुंदर!
भावि आयुश्यासाठि शुभेच्छा!

नवीन सफरी दरम्यान खर्‍या सिंदाबाद प्रमाणे विघ्ने येऊ नयेत ह्याच शुभेच्छा !!!
:)

पैसा's picture

30 Nov 2011 - 7:08 pm | पैसा

पुढच्या सफरीसाठी शुभेच्छा! तिथला किनारा तुला तुझं श्रेय आणि प्रेय मिळवून देईल अशी आशा बाळगूया.

प्रभाकर पेठकर's picture

30 Nov 2011 - 7:27 pm | प्रभाकर पेठकर

पुढील सफरीसाठी अनेकानेक शुभेच्छा.....!

रेवती's picture

30 Nov 2011 - 8:54 pm | रेवती

क्या बात है!
शुभेच्छा, सिंदबाद!

मन१'s picture

30 Nov 2011 - 10:47 pm | मन१

गवि,कपिलमुनी,हर्षद्,मोहनराव्,मनिष्,अन्या दातार, पिंगू, किचेन, गणपा,पैसातै, पेठकर काका, रेवतीतै
तुम्हा सगळ्यांचे आभार.
वाचल्याबद्द्लही,सूचनेबद्द्लही,इशार्‍याबद्दलही आभार.
आताच दोस्ताने इन्फोसिसचे इकॉनॉमिक टाइम्स मधील "clients asking us to slowdown the pace,slowdown the deliveries" ह्या बातमीची व "Europian Recession turning into global depression" अशा अर्थाच्या लेखाची अजून एक अशी लिंक देत सावध राहण्यास सांगितले आहे. पण आता जरा हिंडून पहायचेच ह्या मनःस्थितीत आहे.
त्यामुळे निघतोय.

@मोहनरावः- मी सध्या आहे, ते उत्त्मच आहे.
मोहनराव on Wed, 30/11/2011 - 17:10.

....पण मी खर सांगु का सगळीकडे थोड्याफार फरकाने सगळ तेच असतं.
अजुन एक मुद्दा असा की रेकगनिशन होणे व माणसाची किंमत कळणे याला थोडा वेळ लागतो
.
हे ढोबळ मानाने खरे असेल.थोड्याफार फरकाने असते ते तसे नव्हते. थोड्याफार फरकाने "चालून जाइल" इतपत जे असते ते सध्याच्या आस्थापनेत आहे.

, प्रोफेशनल रिलेशन्स डेव्हलप होणे होत नाही.

सध्या मला माझ्यासोबत पूर्वी काम केलेल्या दोन बॉसनीच आवतण धाडलेलं आहे,

आत्मशून्य's picture

30 Nov 2011 - 11:12 pm | आत्मशून्य

I love waking up in the morning not knowing what's gonna happen or, who I'm gonna meet, where I'm gonna wind up. Just the other night I was sleeping under a bridge and now here I am on the grandest ship in the world having champagne with you fine people. I figure life's a gift and I don't intend on wasting it. You don't know what hand you're gonna get dealt next. You learn to take life as it comes at you... to make each day count - टिटॅनीक

अप्पा जोगळेकर's picture

1 Dec 2011 - 12:19 am | अप्पा जोगळेकर

छानच लिहिलंय.

आयुष्याला जीवन का म्हणतात ? कारण जीवन म्हणजे पाणी. जीवन हे पाण्यासारखे प्रवाही असले पाहिजे. जर साचून राहिले तर ते डबके.
- आचार्य अत्रे

चावटमेला's picture

1 Dec 2011 - 9:51 am | चावटमेला

पुढील सफरीसाठी शुभेच्छा
-(साडेपाच वर्षांत दोन उड्या मारणारा) चावटमेला

मन१'s picture

5 Dec 2011 - 10:20 am | मन१

प्रकाटाआ

मृत्युन्जय's picture

1 Dec 2011 - 10:09 am | मृत्युन्जय

सुंदर लिहलय हो मनराव. आवडेश.

मराठी_माणूस's picture

1 Dec 2011 - 10:21 am | मराठी_माणूस

चांगले मनोगत

(अवांतरः सिंदबादगिरित जवळच्या लोकांची फरपट होणार नाहे, हि काळजी घ्यावी)

सुहास झेले's picture

1 Dec 2011 - 11:07 am | सुहास झेले

पुढल्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा !! :) :)

मदनबाण's picture

1 Dec 2011 - 4:12 pm | मदनबाण

पुढील सफरीसाठी शुभेच्छा.....!

घरोघरी मातीच्या चुली या म्हणीचा प्रत्यय तुम्हाला येउ नये येव्हढीच इच्छा.

दिपक पाटील's picture

1 Dec 2011 - 8:10 pm | दिपक पाटील

आता पर्यंत आलेल्या खूप पत्र आली , "Last Day...."
पण तुमची रीत आवडली.
शुभेछा......

फारएन्ड's picture

3 Dec 2011 - 2:04 pm | फारएन्ड

पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा!

राघव's picture

5 Dec 2011 - 12:28 am | राघव

खूप खूप शुभेच्छा!
पण स्वानुभवावरून एक सांगायची ईच्छा आहे -

जिथे जाशील तिथे कशासाठी चाललायंस हे नीट ठरवून मग जा. अन् मग त्या उद्दीष्टावरून हलू नकोस.
उद्दीष्टे अनेक असू शकतील.. चांगले वातावरण, मनाजोगता पैसा, व्यावसायिक समाधान.. इत्यादी.
पण हे सर्व असूनही पुन्हा कंटाळा येत असेल तर मुळात उद्दीष्ट शोधण्यात काहिसं चुकतंय असं वाटायला हवं. सामान्यपणे सिंदबादचं रूपक लागू पडत नाही. फक्त बदल हवा म्हणून सोडणारा खराच विरळा.
आपल्या मूळ स्वभावानुसार जी अंत:स्थ आवड आहे, ती आपल्या field मधे कुठं मिळेल ते विचारपूर्वक ठरवून ते काम करणे ही खरी बात!!
असो, पटले तर घेणे नाही तर सोडून देणे. :)
पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा!

राघव

जयंत कुलकर्णी's picture

5 Dec 2011 - 7:33 am | जयंत कुलकर्णी

नवीन नवीन बेटांवर आपल्याला अगणित हिरे माणके सापडोत ही शुभेच्छा.!

माझीही शॅम्पेन's picture

5 Dec 2011 - 8:00 am | माझीही शॅम्पेन

पुढील वाटचाली साठी शुभेच्छा !

फक्त सिंदाबादची एक कथा आहे ज्या मधे एक माकड त्याच्या मानगुटीवर बसते आणि त्याला सोडतच नाही , तसेच प्रत्येक ठिकाणी साहेब (पीएम, पीएल किवा कुठलाही मॅनेजर) मानगुटीवर बसतोच.

आणि जेव्हा तो उतरतो तेव्हा आपणच स्वता: एक माकड झालेलो असतो दुसर्‍याच्या मानगुटीवर बसायला एकदम तयार :)

मन१'s picture

5 Dec 2011 - 10:21 am | मन१

आत्मशून्य, अप्प, चावटमेला,मृत्युन्जय, मराठी_माणूस ,सुहास्,मदनबाण,दिपक,फारएन्ड,राघव्,जयंतकाका,शॅम्पेन,
दिलेल्या शुभेच्छांसाठी सर्वांना धन्यवाद.

शॅम्पेनः- मला अर्धा माकड म्हणूनच बोलावताहेत.

राघवः- माझे काही दोस्त उत्कृष्ट तरणपटू(swimmers) आहेत, काही उत्तम अभिनेते आहेत, त्यांच्या बोलण्यात क्वचित हा टोन असतोच "इथे कुठे आलो बुवा" आणि काही वेळ ते प्रश्नचिन्ह त्यांच्या चेहर्‍यावर तरंगत असतं. तर कधी जिम्मेदारीच्या ओझ्याने, वैभवाच्या आमिषाने ते प्रश्नचिन्ह झाकोळले जाते,पुसलेही जाते. प्रामाणिकपणे सांगतो, मला विशेष अशी कुठलीही आवड नाही. अभ्यासात फार पुढे कधीच नव्हतो, अभ्यासेतर कामातही(स्पर्धा,वक्तृत्व्,खेळ्,इतर कौशल्ये) नव्हतो. अगदि सर्वसाधारण, कारकुनी पद्धतीची म्हणावी अशी mediocre प्रोफाइल घेउन जगतो आहे झालं. त्यामुळे कुणीही कधी अचानक विचारले की काय करायला आवडते? तर थेट असे उत्तर कधीच देउ शकलो नाही. मला भरपूर व्यायाम करून थकल्यावर पोटभर खायला आवडते, हाताशी लागेल ते वाचत सुटायला आवडते ,एवढेच. पण ह्या तर अगदि चारचौघांसरख्या गोष्टी आहेत. "आपल्या आवडीच्या क्षेत्रात शिरा" हा सल्ला मोलाचा आहेच, पण त्यासाठी तुमची आवड काय हे तुम्हाला सांगता यायला हवे. तस्मात, मूळ आवड कसली हेच ठाउक नसल्याने आवदिला मुरड घालून इथे थांबलोय असे म्हणू शकत नाही.

मराठी_माणूस :-
सल्ला मोलाचा आहे.

अवांतरः-
काथ्याकूटात धागाकर्त्याने पुन्हा पुन्हा डोकावून आपली मते प्रकट करावीत, चर्चा पुढे न्यावी हे अपेक्षित असते.
"जनातलं मनातलं" मध्ये नक्की काय करावे? औपचारिक आभार न मानावेत, तर ते ठिक दिसत नाही. आभार मानून स्वतःचाच धागा पुन्हा वर आणावा, तर तेही ठिक वाटत नाही. करावे तरी काय.
मिपामध्ये एखादे बटन देता येइल काय ज्यायोगे एखादा प्रतिसाद दिला तरी धागा जागच्या जागी ठेवता येइल. हे बटन दाबण्याचे स्वतंत्र्य प्रतिसादकर्त्याला हवे.

सध्या तरी ह्यापुढील सर्व वाचकांचे,शुभेच्छुकांचे आधीच आभार मानतोय.

राघव's picture

5 Dec 2011 - 12:20 pm | राघव

माझं स्वत:चंच चित्र डोळ्यांसमोर उभं राहिलं जणू! :)
आणिक थोड्या डोस बद्दल राग मानू नये.
हे मी पण अनुभवलंय की स्वत:ची आवड काय हेच नीट मांडता येत नाही. यालाच आपण आवड माहित नाही असं म्हणत असतो. जसं तुम्हीच सांगता आहात-
- तुम्हाला व्यायाम करायला आवडतो
- खूप वाचायला आवडतं
आता यांची तुमच्या field मधे कशी सांगड घालता येईल हे समजत नाही ही तुमची अडचण आहे.
तुम्हाला व्यायाम करायला आवडतो ही माझ्यासारख्या आळशी माणसासाठी खूप अप्रूप वाटण्याजोगी गोष्ट आहे. या आवडीचा अर्थ तुम्ही energetic आहात. आता तुमच्या field मधे energetic व्यक्तीची गरज असेल अशी जागा कोणती?
वाचन आवडतं याचा अर्थ तुमच्या जवळ भरपूर माहिती आहे. कोणत्याही माहितीला ज्ञानात बदलण्यासाठी त्या माहितीचा उपयोग करायला हवा. अशी कोणती माहिती तुमच्याकडे आहे जिचा तुम्ही प्रत्यक्ष उपयोग करू शकाल?
या अन्‌ अशा अनेक आवडी तुमच्या असणारेत, सगळ्यांच्या असतात. त्या अभ्यासून त्यांना नीट क्रमवार 'मांडलं' की आपण व्यावसायिक दृष्टीकोनातून आपल्याला नक्की काय हवंय हे ओळखू शकतो, हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे.
आणि हो, चारचौघांसारख्या आवडी म्हणून त्या तुमच्या आवडी नाहीत असं तर होत नाही ना? सगळ्यांना या आवडींचा अर्थ लावण्याची ईच्छा असेलच असं नाही. आपल्याला तशी ईच्छा असली म्हणजे झालं. :)

राघव