कॉकटेल लाउंज : लॉन्ग आयलंड आइस्ड टी

सोत्रि's picture
सोत्रि in पाककृती
25 Nov 2011 - 4:08 pm

मोहितो...व्हाइट रशिअन...झणझणीत मरीआइ...अनारीटा... | बी 52... | क्लासिक मार्टीनी...

आज शुक्रवार, विकांताचे वेध लागले असतीलच. तर मग ह्या विकांतासाठी सादर आहे नवीन कॉकटेल.
‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “लॉन्ग आयलंड आइस्ड टी”

पार्श्वभूमी:

हे कॉकटेल सत्तरच्या दशकात अमेरिकेत न्यु यॉर्क येथिल 'लॉन्ग आयलंड' मधल्या एका बारमधल्या बार टेंडरने बनवले. त्यामुळे त्याच्या नावात लॉन्ग आयलंड आले आहे आणि 'आइस्ड टी'च्या रंग साधर्म्यामुळे लॉन्ग आयलंड आइस्ड टी असे नाव सार्थ झाले .

ह्या कॉकटेलमधे प्रत्यक्षात आइस्ड टी नसतो. ह्या कॉकटेलमधे बरीच स्पिरीट्स वापरलेली असल्यामुळे अतिशय जहाल (Potent) असे हे कॉकटेल असते. नुसते लागणारे साहित्य बघितले तरी याची कल्पना येईल :)

ह्या कॉकटेलची बरीच (खुपच) व्हेरिएशन्स आहेत. अ‍ॅक्चुअल आइस्ड टी वापरलेलेही. पण खरे आणि अस्सल कॉकटेल हे टकिला वापरूनच बनवले जाते. टकिला आणि ट्रिपल सेक मुळे चव आइस्ड टी कडे झुकते.

प्रकार: मिक्स्ड ड्रिंक कॉकटेल

साहित्य:
व्हाईट रम- 15 मिली
वोडका - 15 मिली
टकीला-15 मिली
जीन – 15 मिली
ट्रिपल सेक – 15 मिली
स्वीट अ‍ॅन्ड सार सिरप - 25 मिली
बर्फ
लिंबाचा काप सजावटीसाठी
बार स्पुन

ग्लास:हाय बॉल

हाय बॉल ग्लासमधे बर्फ भरून घ्या.

सर्व स्पिरीट्स एका मागोमाग एक अशी त्या बर्फावर ओतुन घ्या. सर्वात शेवटी स्वीट अ‍ॅन्ड सार सिरप ओता. आता खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे आइस टी सारखा रंग येइल.

मग त्यात कोला (आवडीप्रमाणे: कोक, पेप्सी किंवा थम्स अप) घालून टॉप अप करा.

मस्त रंग आणी चव असलेले कॉकटेल तयार आहे :)

बार स्पुन घेउन आता सर्व मिश्रण व्यवस्थित स्टर करा.

लॉन्ग आयलंड आइस्ड टी तयार आहे :)

'एक्स्ट्रा लॉन्ग' असे व्हेरिएशन असते आणि जर तसे हवे असेल तर साहित्यातील सर्व स्पिरीट्स 15 मिली ऐवजी 25 ते 30 मिली करा. हे एक्स्ट्रा लॉन्ग असे व्हेरिएशन आपापल्या हिमती आणी कुवतीनुसारच आजमावून बघा.

नंतरच्या परिणामाला हा सोक्या जबाबदार असणार नाही ;)

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

25 Nov 2011 - 4:41 pm | मदनबाण

आहाहा...काय ढवळलयं ! काय ढवळलयं ! ;)
काय रे सोक्या त्या चम्मचला काय इशेष नाव हाय का ?का तो पण झिंगुन झिंगुन असा झाला आहे ? ;)

बाकी मी पहिली आईस्टी स्वातीदिनेश ताईच्या ठाण्याच्या घरी प्यायली होती,तो पर्यंत आईसटी मधला आ पण ठावुक नव्हता !

(खरीखुरी आईसटीच पिणारा)

सोत्रि's picture

25 Nov 2011 - 5:26 pm | सोत्रि

नाही रे, तो चमचा झिंगलेला नाहीयेय. :)
त्याला 'बार स्पून' असे म्हणतात आणि तो तसाच असतो.

- (साकिया) सोकाजी

प्रकाश घाटपांडे's picture

25 Nov 2011 - 7:12 pm | प्रकाश घाटपांडे

अशा पळीने आम्ही संध्या करताना आचमने घेत असू. ॐ केशवाय नमः ॐ नारायणाय नमः ॐ माधवाय नमः ॐ गोविंदाय नमः
अवांतर- हे कर्मकांड फार खर्चिक दिसतयं!

विजुभाऊ's picture

25 Nov 2011 - 4:59 pm | विजुभाऊ

बंटी और बबली मध्ये अभिषेक बच्चन घेतो ते कॉकटेल बहुतेक हेच असावे.

आत्मशून्य's picture

25 Nov 2011 - 5:05 pm | आत्मशून्य

आइस्ड टी आवडतोच, पण हे म्हणजे भन्नाटच.

साबु's picture

25 Nov 2011 - 5:12 pm | साबु

चान्गलीच किक बसत असेल की ह्याने?

स्मिता.'s picture

25 Nov 2011 - 5:51 pm | स्मिता.

यावर सजावटीकरता आईस टीप्रमाणेच पुदिन्याची पानंही खोचलेली पाहिली आहेत.

क्या केहने...

लाँग आयलंड... अहाहा.....आपले तर नेहमीचेच..
पण त्याला लागण्यार्‍या जिनसांची यादी पाहून दुर्दैवाने यापुढेही हाटेलातच जाऊन प्यावा लागणार असं दिसतं.

घरी बनवण्यासारखी चीज नाही वाटत. इतक्या वेगवेगळ्या दारवा घरात आणून ठेवता येणं अवघड.. :(

बाकी यात काही व्हर्शन्समधे खरा आईस-टी ही घालतात हे प्रथमच ऐकलं..

सुहास झेले's picture

25 Nov 2011 - 6:25 pm | सुहास झेले

ज ह ब ह र !!!

मोहनराव's picture

25 Nov 2011 - 6:44 pm | मोहनराव

जबराट आहे हे!!
सोकाजीराव विकांत जवळ आला की असे काही द्यायलाच पाहिजे का? तुमच्या यामधील अभ्यासाला आपला _/\_

सोकाजी काका ;आमच्या एका तज्ञ मित्राने खरबुजाच्या तुकड्यांवर व्हिस्की ओतुन ती तासभर मुरवेली त्यानंतर त्यावर मीठ मिरपुड शिंपडून काय झक्कास मजा आणल होता.
या प्रकाराला काय म्हणतात?
अज्ञानी मुमुक्षु
विजुभाऊ

सोत्रि's picture

25 Nov 2011 - 7:19 pm | सोत्रि

विजुभौ,
त्याला "Watermelon Infused Vodka" म्हणतात.
ही घ्या त्याची रेसिपी.

http://www.wikihow.com/Make-a-Vodka-Watermelon

- (साकिया) सोकाजी

ता.क.: काका म्हटल्यामुळे विजुभौचा जाहीर आणि तीव्र निषेध! निषेध!! निषेध!!!

अन्या दातार's picture

26 Nov 2011 - 12:33 am | अन्या दातार

चला, आता एक फ्रुट पार्टी करु. काय म्हणता सोकाजी?

नंदन's picture

28 Nov 2011 - 1:00 pm | नंदन

मद्याचार्यांनी दिलेल्या रेशिपीप्रमाणे ह्याच वीकांताला नक्की प्रयत्न करून पाहिला -

Vodka Infused Watermelon

अंमळ वेळ लागला, पण चव अफलातून होती.

रघुनाथ.केरकर's picture

25 Nov 2011 - 7:46 pm | रघुनाथ.केरकर

अजी म्या ब्रह्म पाहीले

वा वा वा....

लॉन्ग आयलंड आपल एकदम आवडीच, पण खुप वेळा झाल्यामुळे त्याचा जहालपणा सध्या कमी झालाय माझ्यासाठी, म्हणुन सध्या थोडा बदल केलाय : ), तरी सर्वात आवडीच तेच.

लॉन्ग आयलंडची पार्श्वभुमी पहिल्यांदाच ऐकली, धन्यवाद

--टुकुल

रेवती's picture

26 Nov 2011 - 7:20 am | रेवती

दारवांमधलं काहीएक समजत नाही.
आज ट्रॅफिकजॅममध्ये मागेच असलेला टॅक्सीवाला आमच्या गाडीला इतका टेकायला येत होता म्हणून जरा बघितले तर त्याच्या गाडीवर टेकिला (टकिला) अशी झायरात रंगवलेली होती. तेवढीच काय ती दारूशी दोस्ती!;)
पाकृचा फोटो आवडला.

प्रचेतस's picture

26 Nov 2011 - 8:50 am | प्रचेतस

_/\__/\__/\_
तुमच्या मद्याभ्यासाला सलाम.

अत्रुप्त आत्मा's picture

27 Nov 2011 - 10:22 am | अत्रुप्त आत्मा

सोकाजीराव गंमत नाही,पण खरच ह्या कॉकटेलक्रुतींचा इथे लिहिलाय त्याच नामाभिधानाने तसाच एक ग्रंथ प्रकाशीत करा...नाव द्या--- ''कॉकटेल लाऊंज-अर्थात मद्य-राज मेहेल'' आमच्या सारखी को-रडी माणसंही त्यातल्या अभ्यासपूर्ण लेखनशैली साठी वाचतील,मग मद्यधर्मातल्या उपासकांचे तर बोलायलाच नको... आंम्हाला वाचुन झींग चढते... तयांचे तर काय होइल?हे वेगळे सांगणे न लगे...तुंमचा ग्रंथ त्यांच दारुबरोबर नुसतं लगीनच लावणार नाही,,,तर ''तो'' संसार सुखाचा कसा करावा याच मार्गदर्शनही करेल... मग आंम्ही तुमच नाव सो-काजी असं ठेऊ ;-)

(मद्यधर्मातला ब्रम्हचारी)-अत्रुप्त आत्मा

अवांतर-मीही तंबाखुबाज आहे.आणी त्याप्रांतातले सगळे प्रकार चिकार चाखलेत. पण त्याच्या अश्या क्रुती टाकता येत नाहीत कारण त्या प्रांतातले सोवळे सनातनी त्यांना विक्रुती म्हणतात .त्यामुळे काय टाकणार क्रुती :-(

(मुक्त व्यसनी)- अत्रुप्त आत्मा

एकदा प्रयत्न तरी करुन बघा...

अवांतर - लोकप्रभा दिवळी २०११ मधपान "पान" या विषयावर रामदास काकांचा छान लेख आहे.

मोदक.

सोत्रि's picture

27 Nov 2011 - 4:16 pm | सोत्रि

मीही तंबाखुबाज आहे

मीसुद्धा तंबाखुबाज आहे हो :) १२० - ३०० आहाहाहा..... :P

हा घ्या आपल्याला भाईकाकांचा पाठिंबा आणि होउन जाउद्या एक 'गाथा तंबाखुची'......

- (तंबाखुबाज) सोकाजी

अत्रुप्त आत्मा's picture

27 Nov 2011 - 6:50 pm | अत्रुप्त आत्मा

थांब-आखू च दे अता मला तंबाखु-चा प्लॅन...
तुझं नाव १२०/३०० तर माझं तंबाखु मॅन ;-)
लिहितोच आता नाटक तुला अता धक्का देणारच
नाटकाचे नाव माझ्या मी तंबाखू खाणारच :-p

प्रचेतस's picture

27 Nov 2011 - 6:59 pm | प्रचेतस

हे १२०-३०० म्हणजे नेमकं काय असतं कुणी मला सांगेल काय,
तुम्ही गाय छाप खाता का राजा खैनी खाता कुणी पटकन बोलेल काय.

(निर्व्यसनी)वल्ली. ;)

१२०-३०० हे तंबाखू चे प्रकार आहेत... १२० - ३०० हे बहूदा त्या त्या प्रकारचे दर होते.. पण नंतर ते नावालाच चिकटले...

(स्वतः निर्व्यसनी असलेला पण मित्रांमुळे किरकोळ माहिती असलेला) मोदक

परिकथेतील राजकुमार's picture

28 Nov 2011 - 11:23 am | परिकथेतील राजकुमार

मीसुद्धा तंबाखुबाज आहे हो

हा धागा सोत्रेच्या घरी मस्त वाईनचे घोट घेतच उघडायचा असे ठरवले होते ;) मात्र ह्या वाक्याने राहावले नाही.

काही अंमळ जुन्या आणि लडखडत्या आठवणी जागृत झाल्या.

शिल्पा ब's picture

28 Nov 2011 - 11:16 am | शिल्पा ब

आधि मला वाटायचं थोडंसं अल्कोहोल असेल पण हा आईस टी तर टी शिवाय बाकी सगळं असलेला आहे.