सध्या विडंबनाचे पेव फुटले आहे ते बघून मला एक अत्यंत जूने विडंबन आठवले. १९३२ सालचे एक भजन पूरणभगत नावाच्या सिनेमातले... गायक अत्यंत तोलामोलाचा....के सी डे... आपल्या मन्ना डेचे बहुतेक ते काका होते आणि एस डी बर्मन यांचे गुरू.
त्यांचे हे गाणे ऐका...
हे गाणे त्या काळात खूप म्हणजे खूपच गाजले होते.
बरोबर चार वर्षाने या गाण्याचे विडंबन करण्यात आले मिस. फ्रॉन्टियर मेल मधे. त्याकाळातील बोल्ड नटी फिअरलेस नादीया हिचा हा सिनेमा. त्याचा संगित दिग्दर्शक होता मुहम्मद का कोणीतरी. हा एक उमदा आणि चांगला संगीतकार होता. प्रत्येक चित्रपटात ज्याचे संगीत हा देत असे त्यात हा एखादे गाणे स्वतःवर चित्रबद्ध करायचा.... अर्थात त्यातील बरचशी विनोदीच होती म्हणा.... आमच्या गावात अगदी लहानपणी सारखी फिल्म तुटायची, त्या काळात हा आणि समूंदरी डाकू हे दोन सिनेमे पाहिल्याचे स्मरते. ( एकदा त्या तंबूचे वर्णन करायचे आहे मला.....)
ते हे विडंबन...
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
16 Nov 2011 - 7:10 pm | पैसा
ते तंबूच्या थिएटराचं वर्णन पण एकदा द्या!
16 Nov 2011 - 7:32 pm | प्रास
आभारी आहे.
आधी हे विडंबन माहिती नव्हतं. आजच ऐकलं. छान आहे. आवडलं.
:-)
16 Nov 2011 - 8:56 pm | यकु
विडंबन अगदी साऊंडबॉक्सला कान लाऊन ऐकावं लागलं. ;-)
पण एवढं जुनं अजून शिल्लक आहेच हेच भारी म्हणायचं.